स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत का पडले आयुक्त मुंढे वाचा !

नागपूर:- स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज महापालिकेतील कंपनीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीची आवश्‍यकता काय होती, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. दोनच दिवसांत या बैठकीसाठी विषयपत्रिका तयार करण्यात आली. एवढ्या घाईत बैठक घेण्याची गरज काय, असा प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केला होता.

नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्तांनी कंपनीच्या सीईओपदी नसताना अनेक निर्णय घेतले. या निर्णयांना मंजुरीच्या प्रस्तावात कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित करीत संचालक मंडळातील १३ सदस्यांनी धुडकावून लावला.

बैठकीत कंपनीचे चेअरमन प्रवीण परदेसी आणि दुसरे संचालक भारत सरकारचे दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. एवढ्या घाईत बैठक आयोजित केल्यामुळे प्रवीण परदेशी यांनी नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ एस. के. मिश्रा यांचे मत घेतले.

त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून मागील संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे कायदेशीर मत घेण्याचे नमूद केले होते, असे सांगितले. त्यानंतरच १४ फेब्रुवारी ते १० जुलैपर्यंत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करावी, असेही मिश्रा यांनी परदेसी यांना सांगितले.

विशेष म्हणजे हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनीच आजच्या बैठकीसाठी तयार करून चेअरमन प्रवीण परदेसी यांच्याकडे पाठविले असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने बोलावण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुन्हा एकाकी पडल्याचा टोला महापौरांनी लगावला.

आयुक्तांनी कुठल्याही कायदेतज्ज्ञांचे मत न घेता बैठक घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न महापौरांनी केला.

आजच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णय यांचा समावेश आहे. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कायदेशीर मत घेतल्यानंतरच या विषयावर विचार करावी, असा निर्णय एकमताने सर्व अधिकारी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. व्हीसीवरुन सहभागी झालेले दीपक कोचर यांचेही तेच मत पडले. त्यामुळे आजच्या बैठकीतही १३ जण एका बाजूला, तर तुकाराम मुंढे एका बाजूला असल्याचे चित्र दिसल्याचे जोशी यांनी सांगितले. नागपूर मेट्रो धक्कादायक घटनेने हादरली! मेट्रो कार्यालयाची टेलिफोन लाईन झाली हॅक..तब्बल इतक्या लाखांचा फटकाअशी बैठक घेताच येत नाही, असे मत एस.के. मिश्रा यांनी या आक्षेपावर व्यक्त केल्याचेही महापौर म्हणाले.

यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णयाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव होता. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला. विषय पत्रिकेतआयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे.

स्मार्ट ॲक्शन प्लॅन तयार करा: पालकमंत्री राऊत

नागपूर:- शहरी व ग्रामीण भागात वाढलेली मृत्यू संख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून राऊत म्हणाले की, लॉकडाउन हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो.जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी स्मार्ट अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या.

साथीच्या काळासाठी खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे पालकमंत्री म्हणाले. मात्र, संबंधित एजन्सीकडे स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामुग्री असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सफाई कामगार मोठ्या प्रमाणात लागणार आहेत, असे डॉ. मित्रा यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर व डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.

उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ असल्याचे पालकमंत्री म्हणाले.उपचारासाठी मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोरोना विरुद्धच्या लढ्यात काही स्वयंसेवी संस्था स्वयंप्रेरणेने प्रशासनासोबत काम करण्यास तयार असून आजच्या बैठकीत याबाबत सादरीकरण करण्यात आले.

Your glass of alcohol could have some additional tax cubes

Nagpur:- In what may lead to a rise in liquor prices, the Directorate-General for Goods and Service Tax Investigation (DGGSTI) has increased cumulative demand for more than Rs100 crore from liquor manufacturers such as Antiquity, McDowell’s, Carlsberg, Tuborg in Aurangabad and Nashik, and three distillers in Vidarbha manufacturing county liquors. The step had been taken by the DGGSTI Nagpur zonal unit.

Extra neutral alcohol (ENA) is among the essential raw materials used for human consumption to produce hard liquor. While the liquor consumed is GST-free, tax sleuths have argued that ENA is not intended for human consumption in pure form. And except for the liquor industry, it can still be taxed at 18%. Distillers were actually paying 20% VAT on the content to the state government and 2% federal sales tax on inter-state transactions.

NMC to drop SIS to ticket Aapli Bus

Nagpur:- Nagpur Municipal Corporation’s (NMC) transport department has decided to discontinue the Security and Intelligence Services (SIS) one of Aapli Bus operators’ ticketing agencies due to poor results.

“The ticketing agency’s contract ended on July 30 and the department will replace SIS with the lowest bidder, the Unity Security Force, and Training Institute,” Transport Committee Chair Narendra Borkar told.

Two ticketing agencies SIS and Unity Security Force were approved by the NMC. SIS was to have 242 drivers and Unity 751, and the two agencies had to run 380 buses together. The organization has struggled to allocate sufficient numbers of drivers commensurate with the number of scheduled services over the past few months, undermining the city bus service’s smooth operations. Every month, the NMC paid both agencies about Rs1 Crore.

He called on the conductors of SIS to deposit the electronic ticketing machines with the NMC. He also said all the conductors under the new dispensation should be inducted.

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी स्वीकारला पदभार

नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी गुरूवारी (ता.३०) सकाळी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मनपाचे उपायुक्त निर्भय जैन व सहा. आयुक्त महेश धामेचा यांनी त्यांचे स्वागत केले.

मूळ हरयाणा येथील निवासी असलेले जलज शर्मा बी.टेक कम्प्युटर इंजिनिअर आहेत. प्रथम २०११ मध्ये ते भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) रुजू झाले. त्यानंतर त्यांची २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेत सुमारे अडीच वर्ष कार्यभार स्वीकारल्यानंतर ते गुरुवारी (ता.३०) नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे‍.

News Credit To NMC

नागपुरात शहरात लॉकडाऊन नाहीच…!

लॉकडाऊनमुळे जनता आधीच हवालदिल झाली आहे. लॉकडाऊन लागावा अशी मानसिकता या शहरातील नागरिकांची नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचीसुद्धा ही मानसिकता असून जर प्रशासनाने जबरीने लॉकडाऊन लादला तर लोकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

नागपुरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन लावावा की नाही यावर चर्चा करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर उपस्थित होते.

नागपूर शहरात ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत बाजारातील दुकाने सम आणि विषम तारखांच्या नियमानुसार सुरू आहेत. परंतु यापुढे १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावरील दुकाने दररोज सुरू ठेवण्यात यावेत, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. ९ मीटर अथवा त्याखालील कमी रुंदीच्या मार्गावरील दुकानांसाठी सम-विषम तारखांचा नियम कायम ठेवण्यास त्यांनी सांगितले. अनेक दुकानदारांवर नियमाच्या नावाखाली दंड ठोठावण्यात येत आहे.

हा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत झाला नाही. त्यामुळे असा बेकायदेशीररीत्या दंड आकारणे तात्काळ बंद करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. मूर्तीकारांवर आर्थिक दंड लावण्याचा त्यांनी विरोध केला. मस्कासाथ मध्ये गर्दी पहता सम-विषम नियम लागू कराव असे ही ते म्हणाले.

तत्पूर्वी सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितले. शिवाय जी आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करीत आहे, त्यांना योग्य साहित्य पुरविणे आवश्यक आहे. त्यांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार कृपाल तुमाने यांनी जनजागृतीवर भर दिला. कोरोनाला न घाबरता कोरोना नाहीच अशी मानसिकता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आ.गिरीश व्यास म्हणाले की, किराणा ओळीमध्ये गर्दी पाहता ‍तिथे सम-विषम नियम लागू करा. आ. नागो गाणार म्हणाले, रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

जनतेची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यंत्रणेने ऍक्टिव्ह होऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आ. मोहन मते म्हणाले, लॉकडऊनमुळे गरिबांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी गरिबांच्या पोटाची व्यवस्था करावी, अशी सूचना मांडली. आ. कृष्णा खोपडे म्हणाले, या विषयावर राजकारण करू नये असे सांगितले. सम-विषम नियम बंद करण्याचा पण त्यांनी सल्ला दिला. शहराच्या आउटर भागात दारूचे अड्डे सुरू झाले आहेत. तेथे होणाऱ्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना केली.

आ. विकास कुंभारे यांनी विलगीकरणाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की जर लॉकडाऊन केला तर नागरिक विरोध करतील. आ. प्रा. अनिल सोले यांनी शहरात जे निर्णय एकतर्फी घेणे सुरू आहे, त्यावर आक्षेप नोंदविला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे मत व्यक्त केले. स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही या शहरात लॉकडाऊन होऊ नये, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले की, जनप्रतिनिधीनां सोबत घेऊन निर्णय घ्या. पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी पोलिसांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बाजू मांडली.

बैठक नियमित होणार
लॉकडाऊन असो, जनजागृती असो की कोरोनाची परिस्थिती असो, या सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी आता यापुढे लोकप्रतिनिधींची नियमित बैठक होईल. पुढील बैठक शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी जाहीर केले.

News Credit To NMC

मिशन बिगीन अगेन: ऑगस्टपासून नागपूरात मॉल उघडणार?

नागपूर:- कोरोना साथीच्या प्रादुर्भावात लॉकडाऊनमुळे गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेल्या मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सला दिलासा मिळाला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत मनपा आयुक्त मुंढे यांच्या वतीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानुसार  5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होतील. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत व्यवसायासाठी अनुमती दिली जाईल.

मॉलअंतर्गत सिनेमाघराव्यतिरिक्त, फुड कोर्ट, रेस्टॉरंट्सच्या किचन ना देखील परवानगी दिली जाईल, परंतु त्यांना केवळ होम डिलिव्हरीच करता येईल. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार औद्योगिक युनिटला पूर्वीप्रमाणेच परवानगी दिली आहे. यात कोणताही नवीन दिलासा दिला गेलेला नाही. त्याचप्रमाणे बांधकाम व पर्जन्यपूर्व कामांनाही पूर्वीप्रमाणे परवानगी देण्यात येणार आहे.

वाहनांत प्रवाशी संख्येत दिलासा: मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास मान्यता देण्यात आली असताना, वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आणि  दुचाकी वाहनांच्या प्रवाशांची संख्याही वाढविली गेली आहे. टॅक्सी आणि कॅबमध्ये आता चालक व्यतिरिक्त 3 प्रवासी, रिक्षात ड्रायव्हर व्यतिरिक्त 2, चारचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त 3 दुचाकी वाहनात डबल सीट परंतु दुचाकीमध्ये हेल्मेट आणि मास्क लावण्याचे अत्यावश्यक केले आहे.

गोल्फ, जिम्नॅस्टिक, बॅटमिंटनला परवानगी: मैदानी खेळांत संघाव्यतिरिक्त गोल्फ कोर्स, आउटडोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅटमिंटन आणि मलखांब यासारख्या खेळांनाही सोशल डिस्टंसींगच्या अटीवर परवानगी दिली जाईल. परंतु पोहण्याच्या तलावांवरील बंधन पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले गेले आहे. या व्यतिरिक्त, पूर्वीच्या अनलॉक मधे ज्या व्यवसायिक अॅक्टिव्हिटींना परवानगी होती ती पूर्वीच्याच अटींच्या आधारावर सुरू राहील. सरकारी कार्यालये व खासगी कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवरील बंदी कायम राहील.

विद्यापीठाच्या उपकुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया सुरू: 15 उमेदवारांची मुलाखत

नागपूर:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे नवीन उपकुलगुरू पदासाठी शोध प्रक्रीया वाढवत गुरुवारपासून ऑनलाइन निवड प्रक्रियाही सुरू केलीय. यात पहिल्या टप्प्यात 30 जुलै रोजी 15 उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत विद्यापीठे व इतर महाविद्यालयातील अनुभवी उमेदवारांचा समावेश होता.

शुक्रवारी कुलगुरू पदासाठी आणखी 15 उमेदवारांची मुलाखत ऑनलाईन घेण्यात येणार आहे. एप्रिलपासून विद्यापीठाचे उपकुलगुरू पद रिक्त आहे. नियुक्तीसाठी 19 मार्च रोजी काढलेल्या नोटीसनुसार पात्र उमेदवार 20 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकत होते. 20 एप्रिलनंतर 132 हून अधिक उमेदवारांनी त्यांचे अर्ज आणि बायोडाटा ई-मेलद्वारे पाठविला.

5 उमेदवारांची निवड होईल: विद्यापीठाचे कुलपति आणि माजी कुलपतींसह इतर अनुभवी उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. शोध समितीने प्राप्त झालेल्या अर्जांमधून 30 उमेदवारांची निवड केली आणि त्यांना मुलाखतीसाठी ईमेल पाठविला. हे पाहता गुरुवारी पहिल्या टप्प्यात ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. ज्यांनी मुलाखत दिली त्यांच्यामध्ये गणित विभागाचे प्रा किशोर देशमुख, प्रा. विनायक देशपांडे आणि एलएडी आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला चक्रदेव यांचा समावेश होता.

शुक्रवारी होणा-या मुलाखतींत प्रा राजू मानकर व इतर उमेदवार हजेरी लावतील. या प्रक्रियेद्वारे अंतिम 5 उमेदवारांची निवड केली जाईल, ज्यांची राज्यपाल मुलाखत घेतील. त्यापैकी एक ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात निवडून येण्याची शक्यता आहे.

मुलाखती दरम्यान, शोध समितीने उमेदवारांना शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन आणि सद्य शैक्षणिक स्थितीविषयी सादरीकरण करण्यास सांगितले. त्याशिवाय उमेदवारांना नवीन शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठ कायद्याबाबत आपले मत मांडायला सांगितले. शोध समितीचे अध्यक्ष अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले होते. यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे व आयआयटी कानपूरचे संचालक, व्हीआयटीचे प्रा. अभय करंदीकर यांचा समावेश होता.

दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे महानगर प्रमुख: शिवसैनिकांत आनंदाची लाट

नागपूर:- राजकारणाच्या दृष्टीने आता शिवसेना उपराजधानी नागपूरला अधिक महत्त्व देत आहे. आता नागपुरातही सेनेने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. यामुळेच प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना दिली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबत शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आतापर्यंत शिवसेना जिल्हाध्यक्षांची नेमणूक करत होती त्याअंतर्गत दोन शहर प्रमुखांची नेमणूक करण्यात यायची.

आता शहर प्रमुखांऐवजी शिवसेनेने दुष्यंत यांना प्रथमच महानगराचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आणि पक्ष संघटनेला घट्टपणे उपराजधानीत रोवण्याचे काम त्यांचेवर सोपवले. शिवसेनेच्या शहरप्रमुखांना मागे अटक झाल्यानंतर पक्षप्रमुखांनी जिल्हाध्यक्षांची पुन्हा नियुक्तीही तहकूब राखली होती. अशा परिस्थितीत आता दुष्यंत यांना देण्यात आलेली नवीन जबाबदारी महत्त्वाची मानली जातेय.

शुभेच्छांचा वर्षाव: दुष्यंत यांची नियुक्ती झाल्याचे समजताच शिवसैनिक व पदाधिका-यांमध्ये आनंदाची लाट आली. फटाके फोडून आणि मिठाई वाटून तरुणांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वच शिवसैनिक घरी पोचले. माजी जिल्हाप्रमुख सतीश हरडे, शहर समन्वयक नितीन तिवारी, युवा सेनेचे हितेश यादव, गुड्डू रहांगडाले, मुन्ना तिवारी, अक्षय मेश्राम, आशिष हाडगे, अब्बास अली, ओंकार पारवे, बाल्या मगरे, ललित बावनकर, शशिधर तिवारी, शशिकांत ठाकरे, आकाश पांडे, संदिप पटेल, पवन घुग्गुस्कर, बंटी धुर्वे, धीरज फंदी, छगन सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

मनपात फडकवणार भगवा: नवनियुक्त महानगर प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी म्हणाले की, पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न करू. त्यांचे लक्ष्य संघटना मजबूत करणे हे आहे. ते म्हणाले की, येत्या मनपा निवडणुकीत महानगरपालिकेत शिवसेनेचाच भगवा ध्वज फडकविला जाईल.

कोरोना: 18 परिसर सील, मनपाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले

नागपूर:- कोरोनामुळे सतत वाढत असलेल्या रुग्णांबरोबरच आता शहरातील प्रतिबंधित भागांतही वाढ होते आहे. शुक्रवारी मनपा आयुक्त मुंढे यांचे आदेशावरून शहरातील १८ परिसर सील करण्यात आले. मंगळवारी विभागांतर्गत प्रभाग ११ मधील गोधनी रोड झिंगाबाई टाकळी स्थित श्री कृष्णा मंगल कार्यालयाजवळ सातपुते अपार्टमेंट्सचा काही परिसर, याच विभागातील किड्स वर्ल्ड जवळील  आरएमएस कॉलनी, सानवी क्लासिक अपार्टमेंट्सचा काही परिसर, प्राइम नर्सिंग होमसमोर अहबाब कॉलनीचा काही परिसर, प्रभाग 10 मधील पासपोर्ट कार्यालयाशेजारी सादिकाबाद कॉलनीतील काही परिसर सील करण्यात आले.

धंतोली झोनअंतर्गत प्रभाग १७ मधे रामेश्वरी रोड येथील जोशीवाडीचा काही परिसर, त्याच विभागातील चंद्रमणी नगरातील जयभीम को ऑप सहकारी संस्थेचा काही परिसर, वंजारी नगर येथील विश्वमुख अपार्टमेंट इमारत, प्रभाग 35 येथे श्रीनगर चे एचआयजी -9 अपार्टमेंट प्लॉट क्रमांक सी -6 संपूर्ण इमारत सील केली गेली.

नेहरू नगर झोनमध्ये ४ परिसर सील केले गेले. इतर विभागांप्रमाणेच नेहरू नगर झोनमध्येही ४ परिसराला सील करण्यात आले. प्रभाग २६ मधील गोपाळ कृष्ण नगर परिसरातील काही भाग, चेतनेश्वर नगरचा परिसर, ललिता पब्लिक स्कूलजवळील शैलेश नगरचा काही परिसर व प्रभाग २८ मधील रतन नगर परिसर, गाडगेबाबा लेआऊटचा परिसर सीलबंद करण्यात आला.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग ३७ मधील रवींद्र नगरचा काही परिसर, प्रभाग ३८ मधील जयताळा घाट रोडवरील हिरणवार लेआउटचा काही परिसर आणि प्रभाग ३६ मधील स्नेहनगरमधील सेंट्रल एक्साईज कॉलनीचा काही परिसर सीलबंद करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत प्रभाग १२ मधील सेमिनरी हिल्समध्ये असलेल्या सुरेंद्र गढ येथील राधाकृष्ण मंदिराजवळील काही जागेस सील करण्यात आले. आसिनगर झोन अंतर्गत प्रभाग ७ मधील आशिष ज्वेलर्सजवळ महेंद्र नगरच्या काही रांगेचा परिसर सील करण्यात आला.

Exit mobile version