५ जानेवारीला निवडणूक : आठ उमेदावरांचे १६ नामनिर्देशन पत्र

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी ५ जानेवारी २०२१ला निवडणूक होणार आहे. यासाठी बुधवारी (ता.३०) नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी वेळ देण्यात आला होता. निर्धारित वेळेमध्ये महापौर पदासाठी ४ तर उपहापौर पदासाठी ४ असे एकूण ८ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र निगम सचिव डॉ.रंजना लाडे यांच्याकडे सादर केले. विशेष म्हणजे, आठ उमेदवारांद्वारे एकूण १६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

२१ डिसेंबर रोजी संदीप जोशी यांनी महापौर पदाचा व मनीषा कोठे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता नवीन महापौर निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. बुधवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीमध्ये नामनिर्देशपत्र स्वीकारण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदासाठी प्रभाग १९ ‘ड’ चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग १५ ‘अ’ चे नगरसेवक सुनील हिरणवार हे सूचक तर प्रभाग ३१ ‘ड’ चे नगरसेवक रवींद्र भोयर हे अनुमोदक होते. उपमहापौर पदासाठी पक्षाकडून प्रभाग २३ ‘ब’ च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग १५‘क’ च्या नगरसेविका रूपा राय या सूचक होत्या तर प्रभाग १३‘ब’ च्या नगरसेविका रूतिका मसराम अनुमोदक होत्या.

महाविकास आघाडीकडून प्रभाग ३३ ‘ड’ चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग २७‘अ’चे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हे सूचक होते तर प्रभाग ३८‘ब’चे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे हे अनुमोदक होते. उपमहापौर पदाकरिता आघाडीकडून प्रभाग २८ ‘ब’च्या नगरसेविका मंगलाबाई प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग ३३ ‘ड’चे नगरसेवक मनोजकुमार गावंडे हे त्यांचे सूचक तर प्रभाग ८‘ड’चे नगरसेवक भुट्टो जुल्फेकार अहमद अनुमोदक होते.
बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ‘ड’ चे नगरसेवक नरेंद्र नत्थुजी वालदे यांनी महापौर पदाकरिता नामनिर्देशन सादर केले. प्रभाग ६‘अ’चे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार हे त्यांचे सूचक तर प्रभाग ६ ‘ड’चे नगरसेवक मो.इब्राहिम तौफीक अहमद हे अनुमोदक होते. उमहापौर पदाकरिता पक्षाकडून प्रभाग ६ ‘क’च्या नगरसेविका वैशाली अविनाश नारनवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग ६ ‘ब’च्या नगरसेविका वंदना चांदेकर ह्या त्यांच्या सूचक व प्रभाग ७ ‘क’ च्या नगरसेविका मंगला लांजेवार अनुमोदक होत्या.

काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २०‘क’ चे नगरसेवक रमेश गणपती पुणेकर यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग २१ ‘ब’चे नगरसेवक नितीन साठवणे हे सूचक तर प्रभाग १२ ‘अ’च्या नगरसेविका दर्शनी धवड या अनुमोदक होत्या. पक्षाकडून प्रभाग १० ‘ब’च्या नगरसेविका रश्मी निलमनी धुर्वे यांनी उपहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग १०‘क’चे नगरसेवक नितीश ग्वालबंशी हे सूचक तरप्रभाग १०‘अ’च्या नगरसेविका साक्षी राउत या अनुमोदक होत्या.

दयाशंकर तिवारी आणि मनीषा धावडे यांचे प्रत्येकी ४ तर रमेश पुणेकर व रश्मी धुर्वे यांचे प्रत्येकी २ नामनिर्देशन
भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी व उपमहापौर पदासाठी मनीषा धावडे यांनी प्रत्येकी ४ असे एकूण ८ नामनिर्देशनपत्र सादर केले. दयाशंकर तिवारी यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नामनिर्देशनाचे सूचक संजय बंगाले व अनुमोदक नरेंद्र (बाल्या) बोरकर होते. तिसऱ्या क्रमांकाच्या नामनिर्देशनाचे संदीप जाधव हे सूचक तर वर्षा ठाकरे ह्या अनुमोदक होत्या. चवथ्या नामनिर्देशनाचे प्रवीण दटके सूचक तर मनीषा कोठे अनुमोदक होत्या. भाजपाच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार मनीषा धावडे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नामनिर्देशनाचे सूचक प्रदीप पोहाणे व श्रद्धा पाठक अनुमोदक होत्या. तिसऱ्या नामनिर्देशनाच्या माया इवनाते सूचक व शकुंतला पारवे अनुमोदक होत्या. चवथ्या नामनिर्देशनाचे सूचक वीरेंद्र कुकरेजा तर अनुमोदक दिव्या धुरडे होत्या.

काँग्रेस पक्षातर्फे रमेश पुणेकर यांनीही महापौर पदाकरिता दोन नामनिर्देशन सादर केले. त्यांच्या दुसऱ्या नामनिर्देशनाचे संदीप सहारे हे सूचक होते तर हरीश ग्वालबंशी हे अनुमोदक होते. पक्षाच्याच रश्मी धुर्वे यांनीही उपमहापौर पदासाठी दोन नामनिर्देशन सादर केले. संजय महाकाळकार हे त्यांचे सूचक तर स्नेहा निकोसे ह्या अनुमोदक होत्या.

प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजाविरोधात मनपाची कारवाई

संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. बुधवारी (ता.३०) तिन झोनमध्ये केलेल्या चार कारवाईच्या माध्यमातून सुमारे चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (ता.३०) धंतोली झोनअंतर्गत एक, गांधीबाग झोनअंतर्गत दोन आणि आशीनगर झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आल्या. या माध्यमातून चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला. २३७ नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.

हिंगणा एमआयडीसी मधील स्पेसवूड कंपनीला मोठी आग

नागपुरातील हिंगणा औद्योगीक वसाहतीत मध्ये असलेल्या एका फर्निचर कंपनीला दुपारी साडे चार च्या सुमारास मोठी आग लागली आहे. स्पेसवूड नामक ही कंपनी आहे. आज सायंकाळच्या सुमारास साडे चार वाजता अचानक मोठी आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुर महापालिकेचे अग्निशमन दलाच्या पथकांनी पाण्याचा जोरदार मारा सुरू केला आहे. आगीनं रौद्र रूप धारण केल्याने लांब अंतरावरूनही आगीचे आणि धुराचे लोट दिसतायेत. आगीच्या घटनेनंतर तुर्तास तरी कोणत्याही जिवित हानीची अद्याप तरी महिती नाही. ज्या कंपनीत आग लागली त्या कंपनीत लाकुड मोठ्या प्रमाणात असल्याने आग अतिशय वेगाने पसरली आहे.

आग विझविण्याचे प्रयत्न युध्दस्तरावर सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग स्पेसवूड कंपनी पुरती मर्यादीत ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. स्पेसवूड कंपनीच्या अवतीभवती ही आग पसरली नाही. सुमारे दिड तासापासून अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

घरीच राहून करा नववर्षाचे स्वागत

नव्या करोनावताराच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्ष स्वागत घरातूनच करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष संबंधी नुकतेच मनपा आयुक्तांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार ३१ डिसेंबरला रात्री फटाक्यांची आतषबाजी तसेच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजन आणि मिरवणुकांवर बंदी असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागपूर शहरात फुटाळा, अंबाझरी, धरमपेठ, गांधीसागर तलाव, इतवारी, महाल आदी ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उपरोक्त व अन्य ठिकाणीही नागरिकांनी गर्दी न करता आरोग्याची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे, ६० वर्षावरील नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांचे सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळावे.

३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी तलावालगत, उद्यान, रस्त्यावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना सामाजिक अंतर पाळले जाईल, मास्क व सॅनिटायजरचा वापर होईल, याचे कटाक्षाने पालन करावे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात अशावेळी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल याची विशेष काळजी घ्यावी. नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करू नये, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितले आहे.

उपरोक्त आदेशाचे कुणाकडूनही उल्लंघन झाल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१ व ६० नुसार तसेच भारतीय दंड संहिता मधील कलम १८८ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

मनपा हद्दीतील शाळा ४ जानेवारी पासून होणार सुरू

मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा, विद्यालये ४ जानेवारी २०२१पासून सुरू होणार आहेत. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी (ता.२६) आदेश निर्गमित केले आहेत.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार कोव्हिड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना आणि अटींच्या अधीन राहून इयत्ता ९वी आणि १२वी चे वर्ग ४ जानेवारी २०२१पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आणि अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. शाळा प्रशासनाद्वारे शाळेमध्ये सुरक्षेच्या सर्व सुविधांची पूर्ती करणे आवश्यक आहे. शाळेमध्ये थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायजर, साबण, पाणी आदी सर्व आवश्यक वस्तूंची उपलब्ध असण्याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी.
शाळा सुरू करताना शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कोव्हिडची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असून त्यांना चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करावे लागणार आहे. वर्गखोली तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्थेमध्ये योग्य शारीरिक अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था करावी. कोव्हिड संदर्भातील सुरक्षेची काळजी घेणारे संदेश जसे मास्कचा वापर करा, शारीरिक अंतर राखा, स्वच्छता बाळगा आदी संदर्भात पोस्टर किंवा स्टिकर्स शाळेच्या दर्शनी भागात लावावे.
या सर्व प्रक्रियेमध्ये शाळा व्यवस्थापनाने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडणे गरजेचे आहे. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्यासाठी किमान ६ फूट शारीरिक अंतर राखले जाईल यासाठी विशिष्ठ चिन्हे लावणे, शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्याचे व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा-या बाणाच्या खुणा करणे याबाबात शाळा व्यवस्थापनाने योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज स्वच्छ ठेवणे, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे, याबाबत संपूर्ण साहित्याची उपलब्ध करणे हे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. उपरोक्त सर्व बाबींच्या तपासणीसाठी खाजगी शाळांकरिता शिक्षणाधिकारी, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मनपाच्या शाळांची तपासणी करणे ही मनपाच्या शिक्षणाधिका-यांची जबाबदारी राहिल. वर्गखोल्यांमध्ये हवा खेळती असावी याची कटाक्षाने काळजी घेण्यात यावी. वर्गखोल्यांच्या खिडक्या, दारे खुली ठेवूनच शिकविण्यात यावे.
उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता करूनच शाळा सुरू करण्यात याव्यात. उपरोक्त बाबींची पूर्तता झाली असल्याचा अहवाल जिल्हा परिषद नागपूर माध्यमिक शिक्षणाधिकारी, मनपा शिक्षणाधिकारी यांनी मनपा आयुक्तांना सादर करणे बंधनकारक आहे.
News Credit To NMC

पूर्व मेयर ने तोड़ा नियम, पालिका ने लगाया पांच हजार का जुर्माना

नागपुर:- संदीप जोशी जिन्होंने हाल ही में महापौर पद से इस्तीफा दिया है, इनसे पुर्व ढाई साल तक महापौर रहनेवाली और नागरिकों को नियम पालन बतानेवाली पर ही। नगर निगम के लक्ष्मीनगर जोन कार्यालय से दोषी पाए जाने की नौबत आ गई। पूर्व मेयर नंदा जिचकर पर 5,000 रुपये का जुर्माना लगाया गया। उन्होंने बच्चे की शादी के टैंट के लिए घर के सामने सड़क के किनारे एक सौ पचास वर्ग मीटर की जगह के लिए अनुमति ली थी। लेकिन सड़क पर दो दिनों के लिए तम्बू लगा रखा गया था।

पूर्व मेयर नंदा जिचकर के घर पर बच्चे की शादी हुई । इसके लिए, उन्होंने लक्ष्मीनगर क्षेत्र से प्रतापनगर में अपने निवास पर सड़क के किनारे 150 वर्ग फुट जगह में एक मंडप स्थापित करने की अनुमति ली थी। उन्होंने 19 और 20 दिसंबर के दो दिनों के लिए 750 रुपये का भुगतान भी किया था। लेकिन डेढ़ सौ वर्ग मीटर के बजाय, उन्होंने पूरे रास्ते में मंडप स्थापित कया। इसलिए बस्ती के नागरिकों को आने-जाने में बहुत तकलीफ उठानी पड़ी। नतीजतन, नागरिकों ने लक्ष्मीनगर जोन कार्यालय में शिकायत दर्ज कराई। इस शिकायत पर, जोनल अधिकारियों ने तुरंत पूर्व महापौर से एक टीम को तम्बू का निरीक्षण करने के लिए भेजा।

यह पाया गया कि अनुमति देते समय उल्लिखित नियमों का उल्लंघन किया गया था। ज़ोन के सूत्रों ने कहा कि यह देखा गया है कि पूर्व महापौर ने पूरी सड़क के साथ 20×20 क्षेत्र में एक मंडप बनाया था। इसके बाद, NMC की टीम ने मण्डप को भी हटा दिया। मंगलवार को, जोनल अधिकारियों ने पूर्व मेयर नंदा जिचकर पर 5,000 रुपये का जुर्माना लगाया। एक अधिकारी ने यह भी कहा कि पूर्व महापौर जिचकार ने जुर्माना अदा किया था। सोनेगांव परिवहन विभाग ने उनके पति, सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी शरद जिचकार को भी नोटिस जारी किया।‌‌

पालक मंत्री ने पानी की किल्लत को किया हल।

नागपुर:- नागपुर के लोगों को हर साल होने वाली पानी की कमी की समस्या को हल करने के लिए, ऊर्जा और संरक्षक मंत्री डॉ नितिन राउत ने संबंधित सभी अधिकारियों की बैठक बुलाई। उन्होंने इस वर्ष नागपुर महानगर पालिका क्षेत्र के लिए 173,500 मिलियन क्यूबिक मीटर पानी आरक्षित करने का निर्देश दिया। आरक्षित जल की मात्रा पिछले वर्ष की तुलना में अधिक है और इससे पानी की कमी की समस्या का समाधान होगा।

सिंचाई परियोजना के जलाशय से पीने का पानी आरक्षित करने के लिए, संरक्षक मंत्री डॉ नितिन राउत की अध्यक्षता में बचत भवन में बैठक आयोजित की गई थी। बैठक में जिला कलेक्टर रविंद्र ठाकरे, नागपुर के नगर आयुक्त राधाकृष्णन बी, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नागपुर के अधीक्षक अभियंता जयंत गवली, लघु सिंचाई विभाग के कार्यकारी अभियंता राजेश ढुमने और निगम और विभिन्न संगठनों के अन्य अधिकारी उपस्थित थे।‌‌

नागपुर जिले में 5 बड़ी परियोजनाएँ, 12 मध्यम परियोजनाएँ और 60 छोटी परियोजनाएँ हैं ऐसे कुल 77 परियोजनाएँ हैं। इस वर्ष सभी परियोजनाओं में प्रचुर मात्रा में पानी है। इसलिए, अभिभावक मंत्री ने संबंधित अधिकारियों से पूछा कि क्या आपूर्ति मांग के अनुसार हो सकती है। वर्तमान में, जिले में 77 परियोजनाओं के परियोजना भंडार के 1777.73 गैलन में से 1277.30 गैलन पानी पांच बड़ी परियोजनाओं में उपलब्ध है, 12 मध्यम परियोजनाओं में 160.05 गैलन और 60 छोटी परियोजनाओं में 127.05 गैलन कुल 1564.4 गैलन पानी उपलब्ध है। उपलब्ध पानी का प्रतिशत 89.56 है, इसकी जानकारी अधीक्षण अभियंता जयंत गवली ने दी।

नवंबर 2020 से जून 2021 तक, जिले में बड़ी परियोजनाओं से पानी की आपूर्ति की मांग 151.41 दलगामी, मध्यम परियोजनाओं से 19.42 दलगामी और छोटी परियोजनाओं से 3.29 दलगामी और नदी से 56.175 दलगामी है। सिंचाई विभाग ने संस्थागत आधार पर सभी जल आरक्षण को मंजूरी देने की अपनी तत्परता का संकेत दिया था क्योंकि घरेलू और औद्योगिक पानी की मांग की तुलना में पानी की प्रचुर आपूर्ति है। इसलिए इस वर्ष मांग के अनुसार जलापूर्ति की जाएगी।‌‌

परदेशातून परतलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा: कोरोनाच्या नवीन दहशतीने प्रशासनाचा इशारा

नागपूर:- युरोपियन देशांतील ‘कोरोनाच्या नवीन प्राणघातक स्टेनची माहिती उघडकीस आल्यानंतर राज्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असताना शहरातील कोरोनाशी संबंधित प्रत्येक विषयासाठी जबाबदार असलेल्या मनपा प्रशासनानेही खबरदारी घ्यायला सुरुवात केली. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचेकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे की गेल्या 15 दिवसांत, जे लोक थेट युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांतून पोहोचले आहेत त्यांनी ताबड़तोब मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

आता थेट पाठविले जाईल कोविड केअर सेंटरला: कोरोनाच्या नवीन आवृत्तीस सामना करण्याच्या उद्देशाने शहरातील हॉटेलांना मनपाद्वारे परदेशातून येणा-या प्रवाश्यांसाठी संस्थात्मक विलगीकरण केंद्र म्हणून स्थापित केले गेले आहे. मनपा आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार वरील देशांकडून येणा-या प्रवाशांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी होणार नाही, त्याऐवजी त्यांना थेट विमानतळावरून कोविड केअर सेंटर (विलगीकरण केंद्र) येथे पाठवले जाईल. आरटी-पीसीआर चाचणी त्या केंद्रावर पाठविल्यानंतर 5 ते 7 दिवसांत घेण्यात येईल, तोवर प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. जर चाचणी नकारात्मक आढळल्यास, 7 दिवस पूर्ण झाल्यास, प्रवाश्याला संस्थात्मक विलगीकरणातून सोडण्यात येईल, परंतु 7 दिवस त्याला घरातही अलग रहावे लागेल. जर चाचणी पॉजिटिव आली आणि प्रवाशाला कोणतीही लक्षणे नसतील तर त्याला त्याच हॉटेलमध्ये किंवा काेविड हॉस्पिटलमध्ये 14 दिवस रहावे लागेल.

विमानतळावर 5 पॉझिटिव्ह आढळलेः कोरोनाच्या नवीन आवृत्तीची भीती दिवसेंदिवस पसरत असली तरी, हवाई प्रवाशांवर त्याचा काही परिणाम दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या वतीने गोवा, अहमदाबाद, दिल्ली आणि राजस्थानहून महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात जाणा-या विमान प्रवाशांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या दुस-या टप्प्यात थंडीच्या संभाव्यतेमुळे या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता कोरोनाच्या नवीन आवृत्तीचा टप्पा पाहायला मिळत आहे. परंतु विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही काटेकोर कारवाई केली जात नसल्याने बघायला मिळते, प्रवाशांकडूनही नियमांचे पालन केले जात नाही. नागपूर विमानतळावर आलेल्या 738 प्रवाश्यांपैकी 73 प्रवाशांकडे कोरोना चाचणी प्रमाणपत्र नव्हते, याचाच अर्थ नागपूर विमानतळावर तपासणी झाल्यानंतर त्यापैकी 5 जण पॉजिटिव आढळले.

एबीव्हीपीचे राष्ट्रीय अधिवेशन २५ डिसेंबरपासून नागपुरात, शेतकरी आंदोलनाबाबत होईल चर्चा

नागपूर:- 25 डिसेंबरपासून नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे, हे अधिवेशन 2 दिवसांचे असेल आणि 25 रोजी सुरू होईल आणि 26 रोजी संपेल, हे अधिवेशन हेडगेवार भवन, रेशिमबाग, नागपुर येथे होईल, जे आरएसएसचे सहकार्यवाह भैयाजी जोशी शुभारंभ करतील, या दोन दिवसीय अधिवेशनात देशभरातून 80 लोक जुळतील व नागपुरात वास्तव्य करतील, बाकीचे ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले जातील, विशेष म्हणजे या चळवळीतील शिक्षणाबरोबरच देशात सुरू असलेल्या शेतकरी चळवळीवरही चर्चा होईल.

एबीव्हीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस निधी त्रिपाठी म्हणाले की, या अधिवेशनात शेतकरी चळवळीवर चर्चा होईल, तसेच शेतक-यांची कशी दिशाभूल केली जात आहे, याबद्दलही चर्चा करू, आम्ही यावरही जोर देत आहोत की केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांचा भ्रम दूर करण्याची काळजी घ्यावी, शेतकरी चळवळीत अराजक घटक गेले आहेत. आज शेतकरी चळवळ कुप्रसिद्ध होत आहे, अशा परिस्थितीत या शेतकरी चळवळीला त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे.

यासह एबीव्हीपीच्या राष्ट्रीय सरचिटणीस निधी त्रिपाठी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण, देशाची व राज्य स्थिती, स्वावलंबी भारत, कोरोना आणि भारत या विषयांवरही चर्चा होईल, या 2 दिवसाच्या आंदोलनादरम्यान युवा कार्यकर्ता मनीष कुमार यांना 1 लाख रुपयांचा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते देण्यात येणार आहे.

8.4 डिग्री किमान तापमान: शहर गारठले

नागपूर:- शहरास आता थंडीचा विळखा पडला आहे. सलग दुस-या दिवशीही थंडी आपल्या तडाख्याच्या कमालीत राहिली. दिवसाही लोक जॅकेट-स्वेटरमध्ये फिरतांवा दिसले. रविवारी तापमान अचानक 8.6 अंशांपर्यंत घसरले. हुडहुडी भरवणारा वा-यांमुळे हिवाळ्याची तिव्रता वाढवत होता. दुसरा सोमवारचा दिवसही सारखाच राहिला. किमान तापमानात किंचित घसरण झाली आणि त्याची नोंद झाली. सोमवारी हवामान खात्याने किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअस नोंदविले, जे सरासरीपेक्षा 4.3 अंश कमी होते. त्याचवेळी कमाल तापमान 29 अंश नोंदवले गेले. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता थंडी सतत वाढत जाईल. महिन्याच्या अखेरीस, पारा देखील 6-7 अंशानी खाली येऊ शकतो.

स्वच्छ हवामान राहिलं तर वाढेल थंडी: काही दिवसांपूर्वी ढगाळ हवामानामुळे थंडी नाहीशी झाली होती. किमान तापमान 13 ते 18 अंश पर्यंत नोंदविले जात होते. पण आकाश निरभ्र झाल्यानंतर पारा अचानक खाली आला आहे. 27 डिसेंबरपर्यंत शहरातील हवामान निरभ्र राहील असा अंदाज विभागाने वर्तविला आहे. अशा हवामानात थंडी वाढेल. किमान तापमान 9 ते 13 अंश आणि पुढील आठवड्यात कमाल तापमान 29-30 अंश राहील, असा अंदाज विभागाने वर्तविला आहे.

Exit mobile version