मनपा मुख्यालयात थर्मल स्कॅनिंग सुरु

नागपूर महानगरपालिकेतर्फे सिव्हील लाईन्स मुख्यालयात येणारे नागरिकांची थर्मल स्कॅनिंग सोमवारी (1 जून) ला प्रारंभ करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर थर्मल स्कॅनिंग करुन कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेश व्दारावरच सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची शरीराचे तापमानाची चाचणी करुन नोंद घेण्यात आली.

महापौर श्री. संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे,‍ वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती अध्यक्ष श्री. पिंटू झलके, स्वास्थ समिती सभापती श्री. विरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक श्री. दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे यांनी सुध्दा स्वत:ची चाचणी करुन घेतली. तसेच मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे यांच्यासह मनपाचे अन्य अधिकारी व कर्मचारी आणि बाहेरुन येणारे नागरिकांनी पण स्वत:ची तपासणी करुन घेतली. दररोज 1000 ते 1500 लोकांची तपासणी केली जात आहे.

News Credit To:- NMC

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Exit mobile version