Cantonment hospital in Kamptee expects test kits for Covid-19

Nagpur:- Two more people living in the Military Engineering Services (MES) quarters in Kamptee cantonment tested Covid positively on Monday, after a woman employee. Those include his aunt and a staffer. They were sent to the Waregaon near Kamptee Covid treatment centre.

Sources said samples were sent for testing from a further 15-20 people living in the quarters. Apart from that, last week nearly 20 army personnel were still undergoing care at the military hospital, with almost the same number already being cured.

The individual who tested positive said his wife had a fever initially and was taken to a private Kamptee hospital. If they were in question, the doctor told them to have a Covid test performed. “We went for the tests straight away, and were found positive,” he said.

For the uniformed staff, the cantonment area has a military hospital and a cantonment hospital for those living in the city. However, no medical kits were available at the hospitals until Tuesday. There have been requests from the cantonment ‘s civilian citizens to include the packages.

6 deaths in dist, 1 in Akola as Vidarbha sees 389 new cases

Nagpur:- With six Covid-19 deaths taking district toll to 99 in Nagpur on Tuesday and 340 in Vidarbha region, total Covid-19 cases reached 12,948 in total. After the announcement on July 27 of 400-plus cases from July 22 to 26 and 555, the number came to 389 for the first time in the last six days under 400. On the other hand, on Tuesday in Vidarbha, 367 patients recovered bringing recovery rate again up to 67%.

Nagpur recorded once more the highest cases in a day among the 11 districts of Vidarbha. The sum reached 12,984, with Nagpur (151), Amravati (67), Buldhana (41), Yavatmal (40), Gadchiroli (38), Chandrapur (24), Wardha (13), Washim (8), Bhandara (6), and Gondia (4).

 

हनुमाननगर परिसरातील १४८ नागरिकांचे ‘कोव्हिड स्वॅब टेस्ट’

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मनपाद्वारे ‘हाय रिक्स’ व्यक्तींची ‘कोव्हिड स्वॅब टेस्ट’ करण्यात येत आहे. सोमवारी (ता.२८) हनुमाननगर झोन अंतर्गत १४८ जणांची ‘स्वॅब टेस्ट’ करण्यात आली.

हनुमाननगर येथील चौकोनी मैदानात मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे परिसरातील नागरिकांनी चाचणी करण्यात आली. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर, नगरसेविका उषा पॅलेट, शीतल कामडी, मनपाचे अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, डॉ. गोगुलवार, डॉ.शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू उपस्थित होते.
हनुमाननगर परिसरात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत अशा ‘हाय रिस्क’मधील नागरिकांसह कोणतिही लक्षणे नसलेली व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही कोव्हिड स्वॅब टेस्ट करण्यात आली. कोव्हिड संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे पालन करून संपूर्ण सुरक्षितरित्या ही चाचणी घेण्यात आली आहे.
परिसरात सोशल डिस्टंसिंग राखणे, योग्यरित्या मास्क लावणे, सॅनिटायजिंग करणे याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. या कार्यासाठी अनील लांबाडे, शंकर भोयर, अंकुश पाटील, वैभव चौधरी, विजय गोडबोले, गुड्डू गुप्ता, रवी अंबाडकर आदींनी सहकार्य केले.

COVID19: मानव जीवन पर प्रभाव? क्या बदला? अनुसंधान के महत्वपूर्ण मुद्दे

नागपुर:- कोविड19 का भारतीय समाज पर दूरगामी प्रभाव पड़ा है, जिसमें 80 प्रतिशत आबादी आर्थिक तनाव का सामना कर रही है। शोध के निष्कर्षों के अनुसार, इस अवधि के दौरान सामाजिक अलगाव के कारण लगभग 50 प्रतिशत लोग तनाव और चिंता से पीड़ित हैं।

वीएसपीएम डेंटल कॉलेज एंड रिसर्च सेंटर के ओरल पैथोलॉजी विभाग के डॉ रोहित मोहरिल और डॉ अल्का दिवे ने “भारतीय जीवन शैली पर कोविड19 का प्रभाव – एक प्रतिनिधि नमूना अध्ययन” यह शोध परियोजना को सफलतापूर्वक पूरी कि। इंजीनियर, डॉक्टर, व्यापारी, फार्मासिस्ट, गृहिणी जैसो विभिन्न क्षेत्रों के लोगों को इसमें शामिल किया गया।

518 लोगों के एक अध्ययन के अंत में, यह पाया गया कि बहुत से लोग अब हाथ की स्वच्छता और महामारी के बारे में पहले से कहीं अधिक जागरूक हैं। महामारी के दौरान लगभग 50 प्रतिशत लोगों को नियमित दवा और स्वास्थ्य जांच के लिए अस्पताल पहुंचने में पहले से ज्यादा कठिनाई हुई।

अध्ययन की सबसे महत्वपूर्ण खोज यह थी कि लगभग 80 प्रतिशत लोगों ने वित्तीय तनाव का अनुभव किया। शोधकर्ताओं का यह भी कहना है कि बहुत से लोग नौकरी, व्यवसाय की असुरक्षा का अनुभव कर रहे हैं। सांस्कृतिक और धार्मिक आयोजन भी अब उतने बड़े नहीं होंगे जितने पहले होते थे। लोग अब पहले की तुलना में डिजिटल भुगतान माध्यम को लोग अधिक प्राथमिकता दे रहे हैं। इससे भारत सरकार की डिजिटल इंडिया पहल को गति मिलेगी।

यह शोध सरकारी नीति निर्माताओं और भारत में व्यापारियों के लिए रोजगार के नियमों में सुधार करने के लिए महत्वपूर्ण हो सकती है। अध्ययन के निष्कर्ष बताते हैं कि अध्ययन को कोविड19 के अंत के बाद सामाजिक योजना के लिए एक आधार के रूप में इस्तेमाल किया जा सकता है। इस शोध प्रबंध के लिए VSPM का प्रबंधन, अधीष्ठाता डॉ उषा रडके, उपअधीष्ठाता डॉ एस आर शेनॉय को उनके सहयोग के लिए निर्माताओ ने धन्यवाद दिया है।

मुख्यमंत्र्यांचे वाढदिवशी निशुल्क रूग्णवाहीका सेवेत समर्पित

नागपुर: आज दि 27/07/2020 रोजी सायंकाळी 4 वा, शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिनानिमित्त्याने युवासेना नागपूर तर्फे “मोफत रुग्णवाहिका सेवे” चा मा आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख हितेश यादव, नगरसेविका मंगला गवरॆ, यांची प्रमुख उपस्थिति होती, कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा, उपजिल्हा प्रमुख आकाश पांडे, ऋषिकेश जाधव, शहर सचिव गौरव गुप्ता यांनी केले
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी युवासेना जिल्हा चिटणिस शशिधर तिवारी, शहर प्रमुख अक्षय मेश्राम,उप शहर प्रमुख रोहित तायवाडॆ,रमनजित सिंग सैनी, प्रिती काकडॆ, आकाश रेवतकर, निखिल कडाऊ, अक्षय पांगड, प्रसाद पचोरी, यश मुळॆ, आशिष हरणॆ, शुभम शेडॆ यांची अन्य कार्यकर्त्यांसह उपस्थिती होती.

आम्ही सर्व आरोग्य यंत्रणेच्या पाठिशी!

कोव्हिड-१९ या महामारीविरुद्ध गेल्या चार महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा जिकरीने लढा देत आहे. त्यांच्या अडचणी आम्हाला ठाऊक आहे. या परिस्थितीत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून हवी असेल ती मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आपण आवाज द्या. आम्ही धावून येऊ, असा विश्वास देत महापौर संदीप जोशी यांच्यासह खासदार आणि आमदारांनी मेयो आणि मेडिकलमधील अधिकाऱ्यांकडून व्यवस्थेची माहिती घेतली आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठिशी उभे आहोत, असा विश्वास दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारात आणि नेतृत्वात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे यांनी सोमवारी (ता. २७) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे भेट देऊन कोव्हिड-१९ संदर्भात असलेल्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली आणि अडचणीसुद्धा जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई होते. प्रारंभी त्यांनी मेयो रुग्णालयाला भेट दिली. प्रारंभी मेयोतील कोव्हिड हॉस्पीटलला जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर अधिष्ठाता कक्षात झालेल्या बैठकीत व्यवस्था आणि अडचणी जाणून घेतल्या. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. सागर पांडे यांनी सध्या मेयोमधील व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली. आतापर्यंत मेयोमध्ये १७४० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ५५० बेडची व्यवस्था असून ग्रामीणमधील रुग्णांचाही भार वाढत असल्याने भविष्यात बेड कमी पडू शकतात, असे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशाच्या आधार घेत नागपूर महानगरपालिकेने लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवाय आमदार निवास, व्हीएनआयटी, वनामती, सिम्बॉयसीस आणि पाचपावली विलगीकरण केंद्राचे रुपयांतर कोव्हिड केअर सेंटरमध्ये केल्याने २२०० बेडची व्यवस्था झाली आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होईल, अशी माहिती डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली. शिवाय काही खासगी रुग्णालये आणि हॉटेल्समध्येही अशा रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी मेडिकल रुग्णालयाला भेट दिली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांच्यासह अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. तिरपुडे, डॉ. गोसावी ह्यांनी मेडिकलमध्ये कोव्हिड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची आणि व्यवस्थेची माहिती दिली. मेयोमध्ये कोव्हिड रुग्णांसोबतच अन्य रुग्णांचाही भार वाढला असल्याने बेडची कमतरता भविष्यात भासू शकते. शिवाय नागपूर शहराव्यतिरिक्त नागपूर ग्रामीण आणि नागपूर व अमरावती विभागातील सर्व शहरे यासोबतच मध्यप्रदेशातील काही शहरातील रुग्ण सरळ येत असल्याने मेडिकलचा ताण वाढत चालला आहे. लक्षणे नसलेली रुग्ण अधिक प्रमाणात येत असल्याने पेच निर्माण झाला होता. परंतु आता मनपाने नव्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्यान असल्याने मेडिकलचा भार बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे ते म्हणाले.
अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांनी सांगितले की, अमरावती विभागातील अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत येथे येतात. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या १७ गरोदर माता मेडिकलमध्ये दाखल आहेत. त्यात ७ महिलांची प्रसूती झाली. अशी अनेक आव्हाने समोर आहेत. असे असतानाही संपूर्ण चमू निकराने आणि जिकरीने लढा देत असल्याचे ते म्हणाले.

‘बेस कॅम्प’ची संकल्पना उत्तम
सरळ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर नियंत्रण असावे यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात मुंबई आणि पुणे शहराच्या धर्तीवर ‘बेस कॅम्प’ तयार केले तर रुग्णालयांवरील भार बराचसा कमी होईल. जो कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल किंवा लक्षणे असतील त्याने सर्वप्रथम बेस कॅम्पमध्ये जावे. तेथून त्याला कुठल्या रुग्णालयात न्यायचे, लक्षणे नसतील आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याला गृह विलगीकरणात ठेवायचे की अन्यत्र कुठे न्यायचे यासंदर्भात तेथील यंत्रणा निर्णय घेईल. मेडिकलचे अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांनी मांडलेली ही संकल्पना महापौरांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी उचलून धरली. यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

महापौरांनी केले संपूर्ण चमूचे कौतुक
मेयो आणि मेडिकलची संपूर्ण यंत्रणा पहिल्या दिवसापासून कोव्हिडशी लढा देत आहे. त्यांचे काम सर्वोत्तम आहेत. हेच खरे सैनिक आहे, असे म्हणत सर्व चमूचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यात स्वयंसेवी संस्थांची मदत हवी असेल तर तसे सांगा. अन्य कुठलीही मदत सांगा. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या मदतीसाठी सज्ज आहोत. मेडिलकमध्ये प्रस्तावित हेल्पडेस्क तातडीने सुरू करायचा असेल आणि तेथेही स्वयंसेवकांची आवश्यकता असेल, ५०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था हवी असेल तर ते सुद्धा करून देण्यास महापौर संदीप जोशी यांनी तयारी दर्शविली. स्वयंसेवकांना कोव्हिडशी कसे लढायचे हे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून प्रतिबंधित क्षेत्र किंवा रुग्णालयात त्यांची मदत घेता येईल, अशी सूचनाही त्यांनी मांडली. अन्य लोकप्रतिनिधींनीही काही सूचना करीत आवश्यक ती सर्व मदत करु, असा विश्वास दिला.

लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे आता घरीच विलगीकरण

कोव्हिड-१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहूनच घरी विलगीकरण करता येईल.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत नागपूर महानगरपालिकेने स्थानिक स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रतिबंधित कालावधीमध्ये रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार लक्षण नसलेले/सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र अशा तीन लक्षणांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटल येथे दाखल करावयाचे आहे. मात्र यापुढे लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून गृह विलगीकरण करता येईल.

काय आहे मार्गदर्शक सूचना?
शासनाने आणि स्थानिक स्तरावर मनपाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेले असावे. संबंधित रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात. एचआयव्हीग्रस्त, कर्करोगाचा उपचार घेणारे रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आदी रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण गृह विलगीकरणाकरिता पात्र राहणार नाहीत. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले वयोगवृद्ध रुग्ण तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, जुनाट यकृत/फुप्फुस/मूत्रपिंडाचे रुग्ण आदी रुग्णानची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांनी केल्यानंतरच सदर रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधित काळजीवाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय किंवा संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी अथवा मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य राहील. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी लागेल. मोबाईलवर ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करावे व ते सतत ॲक्टिव्ह असेल याविषयी दक्ष राहावे. रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी मनपाचे सर्वेक्षण अधिकारी, सर्वेक्षण पथक अर्थात रॅपिड रिस्पॉन्स टीमला माहिती देणे अनिवार्य राहील. रुग्णांने स्वत:चे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र भरुन द्यावे लागेल. सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सदरील व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल. उपचार करणाऱ्या डॉक्टराननी गृह विलगीकरणासाठी अनुमती देण्यापूर्वी तपासणी करावी. निकट सहवासीयांना घरी करावयाच्या अलगीकरणासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना https://www.mohfw.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काळजीवाहू व्यक्ती व रुग्णांसाठीच्या सूचनाही परिशिष्ट क्र. २ मध्ये दिलेल्या आहेत.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी?
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छवासास अडथळा निर्माण हाणे, ऑक्सीजन सॅच्युरेशनमध्ये कमतरता येणे, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था, शुद्ध हरपणे, अस्पष्ट वाचा होणे, झटके येणे, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता येणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी गंभीर लक्षणे आढळल्या त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

आरोग्य यंत्रणेची जबाबदारी
गृह विलगीकरणासंदर्भात आरोग्य यंत्रणेची जबाबदारीही स्पष्टपणे नमूद केलेली आहे. मनपाच्या आरोग्य यंत्रणा सर्व रुग्णांचे संनियंत्रण करेल. विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीचे संनियंत्रण कार्यक्षेत्रातील सर्व्हेक्षण चमू प्रत्यक्ष भेटीद्वारे करेल. कॉलसेंटरद्वारे त्याचा पाठपुरावा करेल. रुग्णांच्या प्रकृतीची नोंद कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, कॉलसेंटरमधील कर्मचारी ठेवतील. आरोग्य कर्मचारी रुग्णांना अथवा नातेवाईकांना प्रकृतीच्या स्वपरिक्षणाबाबत मार्गदर्शन करतील व सूचना देतील. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची माहिती कोव्हिड-१९ पोर्टल व फॅसिलीट ॲप यावर टाकण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी याचे संनियंत्रण करतील. जर रुग्णाने नियमाचा भंग केला किंवा रुग्णाला अधिक उपचाराची गरज भासली तर सदर रुग्णाला संदर्भित करण्याची यंत्रणा तयार असेल. कुटुंबातील सर्व सदस्य व निकट संपर्कातील व्यक्ती या सर्वांची तपासणी व संनियंत्रण मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल. डिस्चार्जबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांचेही काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मनपा आरोग्य यंत्रणेची राहील.

गृह विलगीकरण कधीपर्यंत राहील?
गृह विलगीकरणाखाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १० दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसल्यास गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर रुग्णाला पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वपरिक्षण करण्याबद्दल सल्ला देण्यात येईल. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोव्हिड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

 BACK TO HOME PAGE

नागपुरात जनता कर्फ्युची आजची पहाट

नागपूर:- वाढत्या कोरोना रूग्णसंख्येस आळा बसावा म्हणून:
√ २ दिवसीय स्वयंस्फुर्त संचारबंदीची प्रशासनाद्वारे राबवणूक.
√ शहरात तब्बल ६० ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी.
√ पहाटेपासूनच‌ कर्फ्युविषयक जनजागृति साठी प्रशासनातले अधिकारी कर्मचा-यांचे पथक रस्त्यांवर
√ पोलिसांचे पथकही साध्या ड्रेसवर ठिकठिकाणी आढावा घेत असल्याचे निदर्शनास येतेय.
√ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन
√ आपातकालीन आवश्यक अश्याच सेवा सुरू रहाणार.
√ सर्व महत्वाच्या रस्त्यांवर शुकशुकाट.

9 कर्मचारियों को कमिश्नर ने किया सस्पेंड

नागपुर: नगर आयुक्त मुंढे पहले ही जनप्रतिनिधियों के साथ विवाद मे हैं, शुक्रवार को उन्होंने कुछ कर्मचारियों को फटकार लगाई। मुंढे कल सुबह 6 बजे अचानक निगम मुख्यालय में गए। मुख्यालय के मुख्य द्वार के निकट कोरोना नियंत्रण कक्ष है। यह कमरा 24 घंटे खुला रहता है। यहां स्टाफ को शिफ्ट में बुलाया जाता है। रात के शिफ्ट में कर्मचारी ठीक से ड्युटी नहीं बजा रहे थे। कर्तव्य नहीं निभा रहे इन चारो कर्मचारीयो को कमिश्नर ने तत्काल प्रभाव से निलंबित कर दिया।

इसके बाद मुंढे ने अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशंस सेंटर का दौरा किया। वहां से, शहर के प्रत्येक क्षेत्र में सफाईकर्मी ड्यूटी के लिए मौजूद हैं या नहीं यह दिखाई देता हैं, उनका निरीक्षण किया। फोन लगाकर अचानक स्वच्छता निरीक्षकों को विभिन्न क्षेत्रों में जांचा और उनके लोकेशन चेक कीए। उसके बाद पाचपावली, इंदौरा, धरमपेठ जैसे कुछ स्थानों पर उपस्थिति शेड का दौरा किया। वहां उपस्थिति रजिस्टर जांचे। वहां भी कुछ स्वच्छता निरीक्षक और अन्य कर्मचारी इमानदारी से ड्यूटी करते नहीं पाए गए। उन्हें भी तत्काल निलंबित करने का आदेश दिया गया है।

कोरोना कहर: महाल-गांधीबाग झोनमध्ये 6 तर शहरात 22 परिसर सील

नागपूर:- शहरात कोविड19 साथीचा प्रादुर्भाव किती वाढतो आहे याचा अंदाज प्रतिदिन वाढणार्‍या सकारात्मक रूग्णांच्या संख्येने तर येतोच शिवाय प्रतिबंधित भागांच्या वाढत्या संख्येनेही याचा अंदाज येतो, याचेच जिवंत उदाहरण म्हणजे गुरुवारी शहरातील 22 परिसर मनपा आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. त्यातल्यात्यात महाल-गांधीबाग झोनमध्ये सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळाल्यानंतर 6 भागात बंदी घालण्यात आली. या विभागातील प्रभाग 18 मध्येच 2 भाग सिल करण्यात आले.

त्यात महाल हेडगेवार निवास जवळ जोग गल्लीचा परिसर, राम मंदिर गल्लीत श्रीधर अपार्टमेंट्सचा परिसर, प्रभाग 19 मधील लाल इमली चौक परिसर, प्रभाग 22 मधील हमालपुरा ठाकरे वाडा परिसर, प्रभाग 8 मधील गोलिबार चौक परिसर आणि त्याच विभागातील भानखेडा येथील त्रिपिटक बुद्ध विहार जवळील परिसर सील करण्यात आले.

आसिनगर झोनचे 6 तर लकडगंजमध्ये 4 परिसर सील: महाल-गांधीबाग झोनप्रमाणेच, असीनगर झोनमध्येही कोरोना रूग्ण जास्त मिळाल्यामुळे गुरुवारी 6 परिसर सील करण्यात आले. ज्यामध्ये प्रभाग 7 अंतर्गत 4 परिसर सील करण्यात आले. प्रभाग 7 मधील बाळाभाऊ पेठेच्या व्हीएचबी कॉलनीचा परिसर, त्याच प्रभागातील नवानकाशा गल्ली क्रमांक १ परिसर, पाचपावली येथे कुर्‍हाडकर पेठेचा परिसर, जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेजवळील परिसर, त्याच झोनच्या प्रभाग २ मधील गुरु तेज बहादूर सिटी कॉम्प्लेक्स, याच प्रभागात कामगार नगर चौकातील हिमांशू अपार्टमेंटचा परिसर सील करण्यात आला.

अशाप्रकारेच लकडगंज झोनमध्येही 4 परिसर सील करण्यात आले. लकडगंज विभागांतर्गत प्रभाग 24 मधील भरतनगर येथील हनुमान मंदिराजवळ, त्याच प्रभागातील गोकुळ डेअरीजवळील परिसर, प्रभाग 22 मधील टेलिफोन एक्सचेंज चौकातील दळवी रुग्णालयाजवळील परिसर, प्रभाग 24 मधील भवानी नगर स्थित दिनबंधू सोसायटीचा परिसर. अशी सिमाबंदीची कारवाई करण्यात आली.

मंगळवारी झोनमध्येही 3 परिसर सिल: येथील प्रभाग 9 अंतर्गत मेकोसाबाग येथील रजत विहार परिसर, याच प्रभागातील कडबी चौकातील साई मंदिर जवळ, कामठी रोड रेल्वे क्वार्टरचा परिसर, प्रभाग १० मधील सादिकाबाद रोडवरील अवस्थी नगर परिसर सील करण्यात आला. त्याशिवाय धरमपेठ विभागातील प्रभाग 12 अंतर्गत हजारीपहाड टेकड्यांवरील रचना सायंतारा फेज -2, धंतोली विभागातील प्रभाग 33 मधील कुकडे लेआऊट कॉम्प्लेक्स, प्रभाग 35 मधील दीन प्रजापती सोसायटीचा परिसर सिल करण्यात आला आहे.

Exit mobile version