नागपुर कोरोना ब्लास्ट आज 14 मरीज पाए गए पॉज़िटिव.

नागपुर कोरोना ब्लास्ट – आज 14 मरीज पाए गए पॉज़िटिव .क्वारन्टाइन मे रखा गया था इन्हे .8 मरीजो का संबंध मरकज से और 6 मोमिनपुरा इलाके के मरीज .एक ही दिन मे इतने मरीजो का संक्रमण आया सामने .गहरी चिंता का विषय. MLA Hostel में कोरंटाईन थे स्थिती भयावह है “आप घर में रहे”.

कामठी मे पहला कोरोना पाजिवटू मिला । नई  कामठी को रेड जोन घोषित  किया  गया  । देवबंद मे पढ़ाई  कर कामठी वापस आया 24 वर्षीय  एक युवक जो की एम एल ऐ हाऊस मे कोरनटाईन मे रखा गया  है इस की रिपोर्ट  पाजिवटी आने सै नई  कामठी को रेड जोन घोषित  कर सील कर दिया गया है । पुलिस  तहसीलदार  और न प अधिकारी मौक ए वारदात पर पूरी पजर रखै हुए  है । आधिकारिक  पुष्टी  का इन्तेजार  है

‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भावनिक आवाहन- आयुक्त तुकाराम मुंढे

कोव्हिड-१९ बद्दल आजही बहुतांश नागरिकांना नेमकी माहिती नाही. त्याची उत्पत्ती, त्याचा प्रसार, त्याची भयावहता, त्याचे गांभीर्य, त्यावरील उपाययोजना आदींबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी समाधान केले. कोव्हिड-१९ म्हणजे नेमके काय हे सांगताना त्यांनी वैद्यकीय दृष्टिकोनातून अगदी सोप्या भाषेत नागरिकांना त्याची माहिती करुन दिली. एकदा कोरोना विषाणू गळ्याखाली उतरला की नंतर उपचार कठीण होऊन बसतो. त्यामुळे त्याची लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. वेळीच उपचार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वॉरंटाईन व्हा आणि समाजाला आपल्यापासून धोका होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी सार्वजनिक रूपाने जयंती साजरी करता येणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचाराला आपल्याला आत्मसात करायचे आहे. कोरोनाला हरविण्यासाठी आता ख-या अर्थाने संघटित होउन संघर्ष करण्याची वेळ आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर घरातच नतमस्तक होउन सर्वांनी कोरोनाशी घरात राहून लढण्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

अनेक ठिकाणी गरजूंना मदत पोहोचत नसल्याचे नागरिकांनी लक्षात आणून देताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर अशा गरजूंना अन्न पोहोचविण्याचे काम सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करीत आहे. यासाठी ०७१२-२५३९००४ हा दूरध्वनी क्रमांक आहे. ज्यांना रेशनची गरज आहे अशा गरजूंना रेशनसुद्धा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे असे काही आढळल्यास नागरिकांनी मनपाला माहिती द्यावी. मनपाची चमू गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्यास कटीबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

कॉटन मार्केट आणि नव्याने सुरू करण्यात आलेले इतर पाच मार्केट मनपाने बंद केले. यात नियोजन फसले, यंत्रणा कमी पडतेय की नागरिक आवरत नाही. या प्रश्नावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, मनपा प्रशासन जे निर्णय घेते ते परिस्थिती पाहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय घेत असते. कॉटन मार्केटमध्ये कितीही आवरण्याच्या प्रयत्न केला तरी प्रचंड गर्दी व्हायची. त्यामुळे ते बंद करून इतर काही ठिकाणी मैदानावर गाड्या पाठविणे सुरू केले. मात्र, तेथेही नागरिकांनी सामाजिक अंतर पाळले नाही म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेक शेतकरी संघाशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून वॉर्डावॉर्डात भाजीपाला पोचविला जात आहे. सध्यातरी नागरिकांना भाजीपाला मिळण्यात कुठली अडचण नसल्याचे ते म्हणाले.

कोव्हिड-१९ हा नागरिकांच्या जीवावर उठलेला या शतकातला भयानक विषाणू आहे. त्याविषयी सर्वप्रथम जाणून घ्या. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या. शासनाच्या निर्देशाचे पालन करा. घरीच राहा आणि कोरोनाशी योद्धा बनून लढा द्या, सामाजिक अंतर पाळा, अत्यावश्यक कामाकरिताच घराबाहेर पडा. लवकर घरी जा. घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी (ता. ११) नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.

पूर्वी मास्क वापरण्याची गरज नाही, असे सांगितले गेले मात्र नंतर मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले, असे का या प्रश्नाला उत्तर देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, राज्यात कोरोनाने जेव्हा शिरकाव केला तेव्हा त्याची तीव्रता कमी होती. त्यानंतर हळू हळू संख्या वाढत गेली. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य शासन वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करते. पूर्वी शासनाच्या निर्देशासनुसार मास्क प्रत्येकाने वापरणे बंधनकारक नव्हते. मात्र, आता कोरोनाचा प्रसार आणि वाढती रुग्णसंख्या बघता आपल्यापासून दुसऱ्याला आणि इतरांपासून आपल्याला रोग होऊ नये, ही काळजी घेण्यासाठी शासनानेच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मास्कचा वापर करा आणि स्वत:सोबतच इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे त्यांनी सांगितले.

नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’ वर चाचण्या सुरू

नागपूर : इन्व्हेंटिस रिसर्चचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक बी. बिरेवार यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मूळचे हे औषध जपानच्या फुजी केमिकल इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडने तयार केले आहे आणि अनेक प्रकारच्या ‘एन्फ्लुएन्झा’ प्रकारच्या आजारांवर प्रभावी असल्याचे डॉ. बिरेवार यांनी सांगितले. व्यावसायिक कारणासाठी कंपनीला या चाचण्या आयोजित करण्यासाठी फुजी केमिकल इंडस्ट्रीजची परवानगी मिळाली नाही. पण जर आम्ही चाचण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच परवानगी मिळेल, असे डॉ. बिरेवार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत. 

इन्व्हेंटिस रिसर्च ही चंद्रपूर आधारित मल्टी आर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असून सन १९७६ मध्ये बाबूराव व्ही. बिरेवार यांनी स्थापन केली. कंपनी अजूनही शेती, फार्मास्युटिकल्स, औषधे, प्लास्टिक आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी आवश्यक औषधे आणि सेंद्रीय रसायने तयार करते. इन्व्हेंटिस कंपनीची स्थापना डॉ. दीपक बिरेवार यांनी सन २०१४ मध्ये केली होती आणि कंपनीचे कामकाज संपूर्ण भारतात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीने सुरू आहे. कंपनीने २०१५ मध्ये फार्मा स्टार्टअपचा ईटी पुरस्कारही जिंकला आहे.

फ्लाविपिरॅव्हिर’ एक सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) किंवा बल्क ड्रग फुजी केमिकल इंडस्ट्रीजने विकसित केले आहे. कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी मानले जाणारे जगप्रसिद्ध औषध ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याचा कंपनी ‘फ्लाविपिरॅव्हिर’ सोबत प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये दररोज २० ते ३० लाख गोळ्या ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याची क्षमता आहे, पण सध्याच्या परिस्थितीत ही क्षमता कमी पडत आहे. बिरेवार म्हणाले, सरकारने ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ औषधावरील निर्यात बंदीदेखील काढून टाकली आहे. त्यामुळे या औषधाची निर्यात क्षमता वाढली आहे. आम्ही जवळपास एका महिन्यात ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ आणि पुढील अडीच महिन्यात ‘फ्लाविपिरॅव्हिर’ विकसित करण्याची योजना आखली आहे, असेही ते आत्मविश्वासाने म्हणाले.

नागपुरातील आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर शहरासाठी मोठी दिलासादायक व सकारात्मक बाब शनिवारी (ता.११) दिसून आली. शहरातील आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीवरून आलेल्या कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याच्या परिवारातील तीन कोरानाबाधित रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होउन घरी परतले. या तीन रुग्णांमध्ये दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे तिनही रुग्णांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले.शुक्रवार(ता.१०)पासून कोरोनासंदर्भात नागपूर शहराकरिता दिलासादायक माहिती मिळत आहे. शुक्रवारी खामला येथील ४२ वर्षीय व्यक्तीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे सुट्टी देण्यात आली. याच व्यक्तीच्या संपर्कात आलेले त्यांची ५९ वर्षीय आई, ३४ वर्षीय पत्नी आणि १४ वर्षीय मुलगा कोरोनामुक्त झाले आहेत.
१७ मार्च रोजी दिल्ली येथून परतलेल्या खामला येथील ४२ वर्षीय व्यक्तीची २६ मार्च रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. खबरदारी म्हणून या व्यक्तीच्या परिवारातील सर्व सदस्यांची २६ मार्च रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली. २७ मार्च ला सदर रुग्णाची ५९ वर्षीय आई, ३४ वर्षीय पत्नी आणि १४ वर्षीय मुलाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्वरीत तिनही रुग्णांना रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये भरती करून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शनिवारी (ता.११) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, खामला येथील कोरोनाबाधीत असलेल्या रुग्णाला शुक्रवारी (ता.१०) ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. त्याच परिवारातील तीन रुग्णही आज घरी परतत आहेत. विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया या सर्वांना याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांच्या मार्गदर्शनात रुग्णांवर संपूर्ण उपचार करण्यात आला. उपचार करणा-या तज्ज्ञ डॉक्टरांतर्फेही रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे सांगण्यात आले. आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार रुग्णांना सुट्टी देण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण आठ रुग्णांपैकी तीन रुग्ण घरी परतल्याने आता रुग्णालयात ५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर या रुग्णांनाही सुट्टी होण्याची शक्यता आहे.

घाबरून जाउ नका, घरीच राहा ; तीनही रुग्णांचे आवाहन
तीनही रुग्णांनी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, तसेच रुग्णालयातील अन्य सर्व कर्मचा-यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली, त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. कोरोनामुळे कुणीही घाबरून जाउ नये. प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यांचे सर्वांनी पालन करावे. कुणीही घराबाहेर पडू नये, नियमित स्वच्छता पाळावी. ताप, सर्दी, घसादुखी, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता तातडीने उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर डिस्टिलरीची रुग्णालये आणि पोलिस प्रशासनाला ,3000 लिटर विनामूल्य देण्याची योजना आहे.

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अन्न धान्य पुरवठा विभागा मार्फत असलेल्या रेशन दुकानात व मदर डेअरीच्या शाखेत सुद्धा जादा नागरिकांची वर्दळ राहत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सरांचे निर्देशानुसार 900 लिटर हँड सॅनिटायझर नागपूर डिस्ट्रीलरीच्या माध्यमा तून निःशुल्क उपलब्ध करुन दिल्या.

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई कांतीलाल उमाप सर यांनी मद्य व्यवसायीकाना हँड सॅनिटायझर निर्मिती बाबत आवाहन केल्या वरुन नागपूर मधील नागपूर डिस्ट्रीलरी, मानस ऍग्रो व रॉयल ड्रिंक्स यांनी हँड सॅनिटायझर उत्पादन सुरु केले आहे. यामध्ये नागपूर डिस्ट्रीलरी यांनी हॉस्पिटलस व पोलीस प्रशासन यांना २० हजार लिटर निःशुल्क देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय सर, पोलीस अधीक्षक ग्रामीण ओला सर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे सर यांचेशी चर्चा करुन अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी अन्न धान्य पुरवठा विभागास 700 लिटर व मदर डेअरी साठी 200 लिटर हँड सॅनिटायझर रोहिणी पाटराबे सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी, रागिणी फुलझडे झोनल अधिकारी टेका नाका तसेच डॉ. सलीम राजू यांच्या उपस्थितीत सुपूर्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली, तसेच आरोग्य सेतु एपचे फायदेही सांगितले

मा पंतप्रधान यांनी मांडलेले मुद्दे :

आत्तापर्यंत आपण “जान है, तो जहान है” असे म्हणत होतो . आता पुढच्या काळात आपल्याला ” जान भी है और जहान  भी है” या तत्वावर या संकटात काम करायचे आहे

कोरोना रुग्णास प्रसंगी ऑक्सिजनची गरज असते. व्हेंटिलेटर तर नंतर येते पण कोविड  रुग्णालयात प्रत्येक बेड जवळ त्याला वेळीच ऑक्सिजन मिळाला तर उपयोग होईल.

टेलिमेडिसिन तसेच मोबाईल क्लिनिक उपक्रम लगेच सुरु करा. कोरोनामुळे इतर साध्या आजाराच्या रुग्णांना  उपचार मिळत नाही अशी परिस्थिती आहे

प्रत्येक कॉलनी, वसाहत यांच्यासाठी मोबाईल क्लिनिक नेले तर फायदा होईल. आता डॉक्टर्स देखील कुठल्याही कायदेशीर अडचणीशिवाय फोनवरून इतर साध्या रोगासाठी औषध सुचवू शकता अशी परवानगी आहे

.आरोग्य सेतू मोबाईल एप अतिशय उपयुक्त असून तो सर्वानी डाउनलोड करावा, त्याचा भविष्यात देखील उपयोग होणार आहे. भारतासारख्या देशात जिथे मोठी लोकसंख्या आहे तिथे कोरोना सारख्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञान उपयोगी ठरेल.

या प्रसंगात काही आवश्यक आणि फायदेशीर बदल करून घ्या. एपीएमसी कायद्यातही सुधारणा करा. शेतकऱ्याला त्याचा शेतमाल सहजपणे ग्राहकांना विकता आला पाहिजे ते पहा. जिथे वेअर हाउसेस आहेत तिथून देखील शेतमाल विकता आला पाहिजे जेणे करून बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही

कोरोनाचे संकट पुढील काळात कसे स्वरूप धारण  करेल ते सांगता येणार नाही.  त्यामुळे पॅरा मेडिकल कर्मचारी तयार ठेवा, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय आरोग्य मंत्रालयाने केली आहे, निवृत्त सैनिकांना देखील सहभागी करून घ्या.

कोरोना वर उपचारासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी  करताहेत. त्यांच्यावर हल्ले केल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही. कठोर कारवाई करा . उत्तर-पूर्व किंवा जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांसमवेत देखील कुणीही वेडेवाकडे वागू नका.

लॉक डाऊन च्या बाबतीत अनेक मुख्यमंत्र्यांनी उपयुक्त सूचना केल्या आहेत, अनेक जण करीत आहेत. याबाबतीत आम्ही निश्चित दोन तीन दिवसांत काय करायचे ते ठरवत आहोत पण लॉकडाऊन वाढवावे लागले तरी या कालावधीतील नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. विशेषतः: जे मजूर, कामगार आहेत त्यांना हाताला काम कसे मिळेल ते पाहावे लागेल. उद्योगांशी बोलून ठरवावे लागेल.

हा लढा प्रदीर्घ काळ   चालणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी अधिकारी याना काम करावे लागणार आहे, तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किती टक्के लोकांनी कामावर येण्याबाबत ठरवावे लागेल. पण अधिकाऱ्यांनी तर यावेच

पुढील आर्थिक बाबतीत केंद्र व राज्यांनी मिळून एकत्रित नियोजन करावे लागेल. यातही आपण काही चांगल्या संधी शोधल्यास देश पुढील काळात एक नवी आर्थिक ताकद म्हणून पुढे येऊ शकतो.

सर्वोच्च न्यायालय ने दिया था शालाओं को पोषण आहार वितरण करने का आदेश , कल्मेश्वर और मौदा तालुका ने किया १०० प्रतिशत वितरण

नागपुर :कोरोना वायरस संक्रमण के चलते देशभर में लॉक डाउन चल रहा है।वायरस संक्रमण को रोकने के लिए जिले की ज्यादातर सभी शालाओं को १६ मार्च के बाद बंद कर दिया गया था।

राज्य के सभी शालाओं में सरकार द्वारा पोषण आहार भिजवा दिया गया था।ना कि सिर्फ मार्च का बल्कि अप्रैल और मई माह का भी पोषण आहार शालाओं को सप्लाई कर दिया गया था।

किन्तु कोरोनावायरस संक्रमण के चलते शालाएं बंद होगयी इसी के चलते सर्वोच्च न्यायालय ने राज्य की शालाओं को बच्चों को पोषण आहार वितरित करने के आदेश दिए थे।जिसमे नागपुर में लगभग ६० -६१  जिले कि शालाओं में सर्वोच्च न्यायालय के आदेशानुसार पोषण आहार बच्चों को वितरित कर दिया गया है।

सूत्रों के अनुसार ऐसा बताया जा रहा है के शहर के कल्मेश्वर और मौदा तालुका शाला ने तो पोषण आहार लगभग १०० प्रतिशत वितरित कर दिया है।

इसके अलावा कुछ तालुका जहां सर्वोच्च न्यायालय के निर्देशानुसार वितरण का कार्य प्रगति पर है इनमें से जो तालुका वितरण कर चुकी है वह इस प्रकार है- नरखेड,कटोल,उमरेड,कामठी,हिंगना,मौदा,कुही, पारशिवनी,रामटेक,सावनेर,भिवापुर,कल्मेश्वर , नागपुर ग्रामीण।वैसे जिले में १९१७ में से लगभग ११६५ शालाओं में वितरण कार्य हो चुका है।पोषण आहार का वितरण शाला वर्ग १ से लेकर ८ वर्ग तक के विद्यार्थियों को वितरण किया जाना था।

सर्वोच्च न्यायालय का यह भी आदेश है के को शिक्षक शिक्षिका या मुख्याध्यापक पोषण आहार वितरण करने में असमर्थ होंगे उन पर कार्यवाही की जाएगी।

महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर देखील लॉकडाउन वाढणार आहे. किमान 30 एप्रिलपर्यंत राहणार

या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी 14 एप्रिलपर्यंत आम्ही स्पष्ट करीत आहोत

आज पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली.  वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहभागी होऊन संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपास्थित होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम पंतप्रधानांना राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अवगत केले. ते म्हणाले की राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे 33 हजार चाचण्या घेण्यात आल्या असून 1574 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर 30 हजार 477 जणांचे निगेटिव्ह आहेत. 188 रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत.

बाधित क्षेत्रांसाठी आम्ही तत्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरण याची परिणामकारक अंमलबजावणी करीत असल्याने संख्या वाढत असली तरी  फैलाव रोखण्याचा आम्ही चांगला प्रयत्न करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मृत्यू दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असला तरी जास्तीतजास्त मृत्यू अति धोका गटातील ज्येष्ठ आणि ज्यांना इतरही काही आजार आहेत यांचे झाले आहेत.

राज्यातील तपासणीसाठी आलेल्या 70 टक्के लोकांत लक्षणे दिसत नाहीत. यातील रोज 150 लोकांना आम्ही प्राथमिक उपचार करून बरे करून पाठवत आहोत.  राज्यात कोविड उपचारांसाठी तीन स्तरावर व्यवस्था केली असून अगदी सर्दी, ताप, न्यूमोनिया लक्षणांसाठी कोविड केअर सेंटर, मध्यम स्वरूपाच्या लक्षणांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि गंभीर रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड रुग्णालयातून उपचार करीत नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली

राज्यात मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी संख्या वाढत असली तरी इतरत्र परिस्थिती नियंत्रणात हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्याचे उदाहरण दिले.

परराज्यातील सुमारे 6 लाख श्रमिक, कामगार, स्थलांतरित यांना निवारा केंद्रातून दोन वेळेसचे जेवण, नाश्ता देण्यात येत आहे पुल टेस्टिंग किंवा ग्रुप टेस्टिंग बाबत केंद्राने विचार करावा त्याचप्रमाणे सारी रोगाच्या प्रादुर्भावकडेही आमचे लक्ष आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट, एन 95 मास्क, इतर वैद्यकीय उपकरणे लवकरात लवकर मिळावेत अशी मागणी केली बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन वाढविण्याबाबत मत व्यक्त केले.

नागपुर में आज 2 और कोरोना संक्रमित मरीज़ पाए गए जिसमे से एक सतरंजीपुरा और एक चंद्रपुर का पीड़ित

नागपुर: राज्य में कोरोना पॉजिटिव मरीज़ों की संख्या दिन पर दिन बढ़ती  जा रही  है। देखा जाये तो पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापुर और नागपुर में कोरोना के रोगियों में वृद्धि हुई है। इसके कारण, महाराष्ट्र में कोरोना संक्रमण के केसेस बाकि राज्यों से ज्यादा है।

आज नागपुर में  दो और लोगों को कोरोना पॉजिटिव पाया गया है। इनमें से एक मरीज़ एक कोरोना पॉजिटिव मरीज़ के संपर्क में है, जिसकी सतरंजीपुरा इलाके में मौत हो गई। दूसरा मरीज चंद्रपुर के मरीज के संपर्क में है। इस मरीज के संपर्क में आने वाले कुल सात लोगों में कोरोना था। इसलिए नागपुर में भी कड़े एहतियात बरतने की आवश्यकता है।

महाराष्ट्र के कुछ और जिलों की बात करें तो  पुणे में कोरोना से एक पुलिसकर्मी की माँ संक्रमित हो गई है। और आज इस तरह के तीन नए कोरोना रोगी पुणे में पाए गए हैं।उधर, कोल्हापुर के शाहूवाडी तालुका में कोरोना संक्रमित के संपर्क में आई एक रिश्तेदार महिला की रिपोर्ट पॉजिटिव आई है।औरंगाबाद में कोरोना पॉजिटिव से दो और रिपोर्ट सामने आई हैं। इसलिए औरंगाबाद में कोरोना रोगियों की संख्या 20 तक पहुंच गई है।तीन पॉजिटिव  कोरोना रोगी ठाणे जिले के बदलापुर में पाए गए हैं। पुलिसकर्मी की पत्नी और बेटी कोरोना से संक्रमित हो गए हैं।
फ़िलहाल नागपुर में कोरोनों पीड़ितों की संख्या 25 से बढ़कर 27 हो गई है।

नदी स्वच्छतेसोबतच नाला स्वच्छतेलाही सुरुवात

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : २२७ नाल्यांचा समावेश शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदीचे स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रारंभ होत आहे. त्यापैकी पाच झोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नागपूर शहरातील दहाही झोनअंतर्गत २२७ नाले आहेत. यातील बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आणि त्यानुसार निर्देश देत स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
नाला सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरू असून नागरिक घरातच आहेत. लॉकडाऊननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा नाला स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
सध्या धरमपेठ, हनुमाननगर, नेहरू नगर, गांधीबाग आणि आशीनगर या पाच झोनअंतर्गत असलेल्या १३३ नाल्यांमध्ये पाच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन टन क्षमतेची एक, चार टन क्षमतेची एक, आठ टन क्षमतेच्या दोन आणि ११ टन क्षमतेची एक मशीन कार्यरत आहे. यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून ३१ मे रोजी शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.
नाला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वॉर्डचे स्वच्छता निरिक्षक, वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.

१० झोनमध्ये २२७ नाले
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२. धरमपेठ झोनमध्ये ३५, हनुमाननगर झोनमध्ये १४, धंतोली झोनमध्ये १४, नेहरु नगर झोनमध्ये १५, गांधीबाग झोनमध्ये ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज झोनमध्ये सात, आशीनगर झोनमध्ये १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येईल.

Exit mobile version