nagpurupdates

मुंढे यांची पुन्हा बदली: १५ दिवसांतच आदेश बदलला

नागपूर:- माजी मनपा आयुक्त मुंढे यांना बदली होऊन जेमतेम १५ दिवस झाले नसतांना पुन्हा सरकार ने नव्याने पुन्हा अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द केले, १५ दिवसांपुर्वीच महाराष्ट्रातील १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.

मनपा आयुक्त पद ऐवजी जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिवपदी मुंढे यांची बदली झाली मात्र राज्य शासनाने पंधरा दिवसातच हा आदेश काल बदलवला व मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करून त्यांचेजागी श्री किशोर राजे निंबाळकर सचिव मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे

मुंढे कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने नव्या पदाचा पदभार ग्रहण न करता नागपूरातच होम क्वारंटाईन होते, आता त्यांची प्रकृति उत्तम असून अहवाल निगेटिव आल्याने त्यांनी स्थानिक नागरिकांस भेटण्यासही अनुमति दिली होती, लवकरच ते मुंबईस रवाना होतील. नागपूरशी, जनतेशी त्यांचे चांगलेच ऋणानुबंध जुळले.

कालच्या अन्य २ बदल्यांत एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर तर ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर उल्लेखीत आहेत.

Published by

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Exit mobile version