टिळक पुतळा महालवर भाजपाचा विजय जलोष

नागपूर: देशात ११ राज्यात निवडणूकीत भाजपच्या अभुतपूर्व विजयानंतर उपराजधानीतील राज्य भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाची लाट उसळली, याचे प्रदर्शन काल सायंकाळी महाल येथे एकत्र येत विजयी जल्लोष साजरा करत केले गेले. शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, राज्यसभेचे खासदार डॉक्टर विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, व महिला कार्यकर्त्यांनी टिळक पुतळा येथील पक्ष कार्यालयाजवळ या सोहळ्याचे नेतृत्व केले. यावेळी पक्षातील कार्यकर्ते व नागरिकांची चांगलीच गर्दि होती.

शहराध्यक्ष प्रविण दटके यावेळी म्हणाले की पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वावर चा विश्वास हा विजय आहे, ते देशातच नन्हे तर जागतिक नेतृत्व म्हणून सिद्ध होत आहे, देशातील शेवटच्या मानसापर्यंत लाभ हे या निवडणूकीतील यशाचे गमक आहे. त्यांचे नेतृत्वावर अविश्वास असणारे, विशेषत: महाराष्ट्रातले काही राजकीय नेत्यांस ही जोरदार चपराक आहे. मोदीजी समवेत पक्षप्रमुख नड्डा, बिहारचे निवडणूक प्रभारी नागपूरचे सुपुत्र फडणवीस व ती सर्व नेते ज्यांनी अविचलपणे विकासकामे राबवली व सलग चार वर्ष सत्ता टिकवली त्यांचेच हे श्रेय आहे

याप्रसंगी भोजराज डुबे, निता ठाकरे, चेतना टाक, किशोर पांडूलकर, संजय अवचित, विनोद कनेरे, किशन गावंडे, दयाशंकर तिवारी, प्रगति पाटील, उपेंद्र पटले, जितू ठाकूर, संजय महाजन, संजय वाधवानी, संजय बालपांडे, लिला कुरेशी, शक्ति ठाकूर, पवन तिवारी, संजय यादव यांच्या व्यतिरिक्त शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version