गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचाशिधा, मंत्रिमंडळ बैठकीत ९ महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये गणेश उत्सव आणि दिवाळीला १०० रूपयांचा आनंदाचा शिधा, कॅसिनो कायदा रद्द, रस्ते जोड योजना प्रकल्प या सारख्या निर्णयांचा समावेश आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीतील ९ निर्णय

  1. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव
  2. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचाशिधा . प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा
  3. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार
  4. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी
  5. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
  6. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला
  7. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे
  8. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
  9. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version