VIDEO: विधानसभेत आमदारांच्या कपबशा थेट शौचालयात धुतल्या जात असल्याचा एक व्हिडिओ शेयर करत राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा.

विधीमंडळ परिसरात आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. याशिवाय आमदार निवासातील टॉयलेटचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात असून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे. त्यांनी या धक्कादायक प्रकाराचा एक व्हिडिओच ट्विट केला असून त्यात वेटर टॉयलेटमधील पाण्याचा वापर करून आमदारांसाठी असेल्या कपबशा धूत असल्याचं दिसून येत आहे.

व्हिडिओ शेयर करताना आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था, असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. त्यामुळं आता विधानभवनातील या किळसवाण्या प्रकारावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version