नागपूर जिल्हा परिषदेची विनंती आपले गाव, तुमची जबाबदारी – सरकारी नियमांचे पालन करा

नागपूर:- पुणे ,मुंबई,नागपूर किंवा राज्यातील कोणत्याही शहरातून, परराज्यातील आमच्या बांधवांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या गावी येणार असाल तर आपलं स्वागत आहे ,पण_ आपण सरळ गावी न जाता प्रथम दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्या. त्यानंतर स्वतःहून १४ दिवस अलगीकरण व्हा. लपून राहू नका,घाबरून जाऊ नका,शासनाने आपली नीट व्यवस्था केलेली आहे.

आपल्या गावी आपला परिवार आहे ,आपल्या एका चुकी मुळे गावाकडील आपल्या कुटुंबाला व गावाला त्रास होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायत व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका ,आरोग्य सेवक , शिक्षक , सर्व शासकिय यंत्रणा आपल्या आरोग्यासाठी झटत आहेत  गावाकडे शहरासारखी  पुरेशी आरोग्य सेवा उपलब्ध  नाही, आपण सुज्ञ आहात, शासकिय नियमांचे पालन करा.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version