रुग्ण संख्येत दिलासा नाहीच, आढळले 444 नवे संक्रमित

नागपूर:- मार्चमध्ये सुरू झालेला कोरोनाचा दु:खदायी कालावधी संपायचे काही नाव घेत नाहीय. सारं वर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, परंतु संक्रमित रूग्णांत सातत्य सुरूच आहे. दरम्यान, शुक्रवारी 444 नवीन रुग्णांमध्ये संसर्ग होण्याची पुष्टी झाली. यासह जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 119221 वर पोहोचली आहे. त्याचवेळी कोरोनामुळे काल रोजी 7 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 3832 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कोरोनाची श्रृंखला ब्रेक होत नाहीय: सध्या ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत, परंतु तरीही शहरात दररोज 300 हून अधिक लोक पॉजिटिव होत आहेत. शुक्रवारी झालेल्या तपासणी अहवालांत शहरातील 364 आणि ग्रामीण भागातील 77 लोकांचा अहवाल पॉजिटिव आला असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 876715 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. 24 तासांत 5143 लोकांचा तपासणी करण्यात आली आहे.

चाचणीनुसार आढळतेय की कोरोना पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. हा लोकांसाठी एक प्रकारचा इशारा आहे. जर तपासण्या 6000 पेक्षा जास्त सुरू झाल्या तर रुग्ण संख्या 500 वर ओलांडू शकते. जिल्ह्यात सध्या 5983 सक्रिय प्रकरणे आहेत. जे मागील आठवड्यापेक्षा जास्त आहे. शुक्रवारी 358 रूग्ण बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण 109406 रुग्ण बरे झाले आहेत. आता जिल्ह्यातील रिकवरीचा दर 91.77 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

जानेवारीत दुसर्‍या लाटेची शक्यता: दरम्यान, जानेवारीच्या मध्यात पुन्हा एकदा दुसरी लहरी येण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आजकाल थंडी वाढू लागली आहे. या हंगामात सर्दी, पडसे, खोकला यांचे रुग्णही वाढत आहेत. यामुळेच किरकोळ लक्षणे आढळून आली तरी डॉक्टरांनी त्वरित कोविड चाचणी घेण्याचा सल्ला दिला आहे. हा हंगाम दम्याच्या रूग्णांसाठीदेखील घातक आहे. या रुग्णांचीही वेळोवेळी तपासणी केली जावी. आजकाल लोकांचे याकडे दुर्लक्ष वाढलेले आहे.

लोक फक्त मास्क लावून असलेले दिसतात, परंतु स्वच्छतेवर त्यांनी लक्ष कमी केले आहे. ही स्थिती कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी पौष्टिक असू शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की अंदाजानुसार जानेवारीत पुन्हा रुग्णांची संख्या वाढल्यास शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाचा उद्रेक मंदावला, रविवारी मिळाला थोडा दिलासा

नागपूर:- कोरोनाच्या बाबतीत रविवार रोजी शहरास थोडा दिलासा मिळाला. पॉजिटिव देखील पूर्वीपेक्षा कमी असल्याचे आढळले आणि मृतांची संख्याही कमी होती. प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात कोरोनाने रविवारी पुन्हा 5 मृत्यू झाले. मृतांपैकी 4 शहरातील आणि १ ग्रामीण भागातील आहेत. यासह, कोरोनापासून आतापर्यंत जिल्ह्यात 3,797 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 2,590 हे शहरातील आणि 660 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. त्याचवेळी 547 जिल्ह्याबाहेरील आहेत.

दिवाळीच्या काही दिवस आधी कोरोना पॉझिटिव्हची रोजची संख्या बर्‍यापैकी कमी झाली होती. मृत्यू देखील आटोक्यात होते, पण दिवाळीच्या हंगामात बाजारातली गर्दी आणि उत्सवानंतर पुन्हा पॉजिटिव संख्येत मोठी वाढ झाली. दिवाळीनंतर दररोज सरासरी 4-5शे पॉझिटिव्ह मिळताहेत. रविवारी 300 चा अहवाल पॉजिटिव आला आहे.

१.१७ लाखांच्या पलीकडे पॉजिटिव: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्हची संख्या १,१७,२११ आहे. रविवारी सापडलेल्या 300 नवीन पॉझिटिव्हपैकी 261 शहरातून आणि 39 ग्रामीण भागातील आहेत. रविवारी 4896 लोकांचे तपास अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 300 लोक पॉजिटिव आढळले आहेत. आतापर्यंत शहरात 92,781 पॉझिटिव्ह सापडले असून ग्रामीण भागात त्यांची संख्या 23,701 वर पोहोचली आहे. या महामारीची दुसरी लाट येईल अशी अपेक्षा असल्याने प्रशासन कोविड -१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन अजूनही नागरिकांना करीत आहे.

534 निरोगी: रविवारी हादेखील दिलासा मिळाला की 534 रुग्ण निरोगी झाल्यानंतर घरी परतले आहेत. यासह, कोरोनाला पराभूत करणार्‍यांची संख्या आतापर्यंत 1,07,632 वर पोहोचली आहे. निरोगी लोकांची टक्केवारी 91.83 आहे. रविवारी जे लोक निरोगी हेते त्यांच्यातील शहरातील 405 आणि ग्रामीण भागातील 129 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 85,238 पॉझिटिव्ह आणि ग्रामीण भागात 22,394 पॉजिटिव्ह निरोगी झाले आहेत.

आढळले 457 कोरोना पॉझिटिव्ह, सक्रिय प्रकरणे वाढतीच

नागपूर: शहरात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचे 5002 रूग्ण आहेत, ज्यांचे उपचार रूग्णालय व घरात केले जात आहेत. यामध्ये शहरातील 4,377 आणि ग्रामीण भागातील 525 रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह्यात पुन्हा 457 नवीन पॉझिटिव्ह सापडले आहेत, त्यापैकी 377 शहरातील आणि 79 ग्रामीण भागातील आहेत. यासह आतापर्यंतची सकारात्मक संख्या 1,10,789 झाली आहे. शुक्रवारी पुन्हा 8 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. एकत्रितपणे मृतांची संख्याही, 6336 पर्यंत वाढली आहे.

शुक्रवारी शहरात 6 जणांचा मृत्यू झाला तर ग्रामीण भागातील 1 आणि जिल्ह्याबाहेरील 1 रुग्णांचा मृत्यू झाला. असे म्हटले जात आहे की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत संक्रमित लोकांची संख्या आता वाढत आहे, जरी मृत्यूची संख्या नियंत्रित असली तरी. पहिल्या लहरीत एक काळ असा होता की दररोज सुमारे दीड महिन्याभर या साथीच्या रोगाने 40-50 मृत्यू होत होते. या भीतीदायक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले, परंतु अत्यंत सावधगीरी घेण्याची वेळ आली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

262 रूग्णांस सुटी: शुक्रवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील 262 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. यामध्ये शहरातील 237 आणि ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. हे एकत्र करून, कोरोनामधून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1,02,151 झाली आहे. शुक्रवारी रिकवरी दर 92.20 टक्के होता. दिवाळीपूर्वी तेहा दर 93-94 टक्के दरम्यान पोहोचला. दिवाळीनंतर रिकवरी दर जवळपास 1 टक्क्यांनी खाली आला आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर लोक मास्क लावण्याच्या नियमांचे पालन करतात, सामाजिक अंतर पाळतात, वारंवार साबणाने हात धुतात, सॅनिटायझर वापरतात आणि गर्दी टाळतात आणि कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत तर या परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतील. लस येईपर्यंत शिथिलता न बाळगण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नागपुरातील 5 कोविड केअर सेंटर बंद

नागपूर: राज्य सरकारने कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेची जोरदार शक्यता व त्यापासूनचा धोका वर्तवलाय, त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात (ग्रामीण) 5 कोविड केअर सेंटर बंद केली आहेत. स्थानिक नागरिकांनी याचा जोरदार निषेध केला आहे. जिल्ह्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये एक कोविड केअर सेंटर सुरू केले. 13 तालिुक्यामध्ये 13 कोविड केअर केंद्रे सुरू केली गेली. पण गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना संक्रमण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याला आधार धरत जिल्हा प्रशासनाने मौदा, कुही, सावनेरसह ५ ठिकाणते केंद्र बंद केले. ज्या तहसील मधील केंद्रे बंद केली गेली त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात की कोरोनाची दुसरी लाट आली तर रूग्णांना वेळेवर कुठे ठेवले जाईल.

धोका अद्याप टळलेला नाही, केंद्र सुरू करा: कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळला नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आगमनाचा अंदाज राज्य सरकारने वर्तविला आहे. अशा परिस्थितीत काही महिन्यांपासून हे केंद्रे यथास्थितित राखले गेले पाहिजे होते. कमी पेशंट येण्याचे कारण सांगून हे सेंटर बंद करणे योग्य नाही. बंद केंद्रे त्वरित सुरू करावीत. अशी संयोजक, शेतकरी हक्क मंच यांनी मागणी केली.

केंद्र तात्पुरते बंद: मौदा, कुही, सावनेर सह ज्या 5 तहसीलमध्ये कोविड केअर सेंटर बंद आहे ते कोविडचे रुग्ण गेल्या दोन आठवड्यांपासून सापडलेले नाही म्हणून तात्पुरती बंद केली गेली आहेत. रुग्ण येताच ही केंद्रे पुन्हा सुरू केली जातील. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, -डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगीतलेय

दिवाली मे, नागपुर में 80% कोविड बेड खाली

नागपुर: कोविड -19 के घटते मामलों और पिछले दो सप्ताह में रिकवरी में वृद्धि के कारण कोविट -19 अस्पतालों में 80% बेड दिवाली से पहले ही खाली हैं।

सरकारी और निजी अस्पतालों में अब बिस्तर आसानी से उपलब्ध हैं, लोगों को खांसी बुखार और सांस फूलना जैसे लक्षण विकसित होने की स्थिति में खुद को जांचने और भर्ती होने में संकोच नहीं करना चाहिए। अधिकारियों ने जानकारी दी है कि उत्सव के बावजूद, सभी समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र और कोविड अस्पताल 24X7 काम करेंगे और नागरिकों के लिए चिकित्सा सुविधाएं हाथ में उपलब्ध होंगी।

“लोगों को कोविड दूर करने के मानदंडों का पालन करने की सलाह दी जाती है। हमें किसी भी प्रकार की भीड़ और सामाजिक समारोहों से बचना चाहिए। भुले बिना मास्क पहनना, और उत्सव के दौरान अक्सर हाथ धोने के लिए सैनिटाइज़र का उपयोग, सोशल डिस्टेंस पालन आदी बातें आदत बनाए, नागपुर डिवीजन के स्वास्थ्य सेवाओं के उप निदेशक डॉ संजय जायसवाल कहते हैं। उन्होंने नागरिकों से अपील की कि वे किसी भी लक्षण का अनुभव होने पर खुद का परीक्षण करवाएं और जल्द से जल्द खुद को अलगाव मे कर लें।

सिविल सर्जन कार्यालय से उत्पन्न दैनिक कोविड -19 रिपोर्ट के अनुसार, कुल 1,116 मरीज वर्तमान में विभिन्न चिकित्सा सुविधाओं (समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र, अस्पताल और देखभाल केंद्र) में भर्ती हैं, जबकि 2,063 मरीज 13 नवंबर को कॉरंटाइन हैं। कुल 115 चिकित्सा सुविधाओं में अब 5,500 से अधिक कोविड -19 बेड उपलब्ध हैं। केवल 1,116 बिस्तरों के साथ, लगभग 80% बेड अब खाली हैं।

जिले भर के सभी परीक्षण केंद्रों में परीक्षण सुविधाएं भी उपलब्ध हैं। 13 नवंबर को, कुल 5,558 परीक्षण किए गए थे।‌‌

बर्डीच्या गर्दीने यंत्रनेस चिंता, एनडीएसचे ४५ जवानासह सर्वत्र मिळून १५३ ची तैनाती

नागपूर: सिताबर्डीच्या उत्सवी खरेदीचा तुफान गर्दीचा व्हिडिओ, फोटो मिडीयावर नॅशनल व्हायरल झाल्यानंतर प्रशासन, यंत्रणेने तातडीने राबवलेल्या उपाययोजनांची बातमी आपणासाठी दिली होती, यातला आजचा अपडेट म्हणजे याऊपरही हि गर्दि आटोक्याबाहेर जात असल्याने प्रशासनाचे टेंशन
वाढले आहे. आज अधिक संख्येने जवान तैनात केले जाऊन परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.

दिवाळी खरेदीसाठी शहरातल्या प्रमुख बाजारपेठांत प्रचंड गर्दि होत आहे, कोरोना संसर्गाचा धोका विचारात घेता गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस व प्रशासनाने कंबर कसली आहे. धनत्रयोदशी हा दिवस खरेदीचा उत्तम मुहुर्त मानतात म्हणून या दिवसास होणारी संभाव्य खरेदि गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. यांचा विचार करता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सीताबर्डी, महाल, गांधीबाग भागाचा पुन्हा दौरा केला. गर्दिवर नियंत्रण ठेवण्यासाठी १५३ जवान तैनात करण्यात आले आहेत, तर सिताबर्डी बाजारात होणा-या गर्दिचा विचार करता प्रशासनाने अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी उपद्रव शोध पथकासह तैनात केले आहे, एन डि एस चे ४५ जवानांची तैनाती येथे केली गेली आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हनुमान नगर 205 नेहरू नगर ते पाच गांधी यांचे पाचशे जवान तैनात करण्यात आले आहेत तरी फटका बाजारासाठी 35 जवान तैनात करण्यात आले आहे यात समावेश आहे मार्केटमध्ये नियंत्रणासाठी नेहरूनगर करण्यात आले आहे तसेच यासाठी करण्यात आले आहे दिवाळीपश्चातही ३ दिवस ते तैनातीवर असतील.

लक्ष्मी नगर झोनचे १५, धरमपेठ झोनचे २०, धंतोली झोनचे १० जवान तर ईतवारी, महाल, गांधीबाग बाजारांतील गर्दिवर नियंत्रण ठेवण्यासाठी हनुमान नगर झोनचे ५, नेहरू नगर झोनचे ५, गांधीबाग झोनचे ११ व लकड़गंज झोनचे ५ असे ३३ जवान तैनात केले गेले आहेत. कमाल चौक व जरिपटका बाजारासाठीही ३५ जवान तैनात केले आहे, यात आसिनगरचे १८, मंगळवारी झोनचे १७ जवानांचा समावेश आहे, सक्करदरा मार्केट गर्दि नियंत्रणास नेहरू नगर झोनचे २० जवान तैनात असतील, किराणा ओळ, रेशिम ओळ, भंडारा रोड बाजारातल्या गर्दी नियंत्रणासाठी सतरंजीपूरा झोनचे १५ व लकड़गंज झोनचे ५ जवान तैनात असतील.

प्रशासनाने त्याची यंत्रणा व्यवस्थित राबवून गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले आहेत, मात्र सर्वसाधारण खरेदीदाराने खरेदीसोबत आजार घरी आणत आहोत का? याचे भान राखणे आवश्यक आहे, सण उत्सवांस गालबोट लागू नये याची दक्षता घेणे अगदी आवश्यक आहे.

कोरोना रुग्णांत वाढ, बाळगा सावधानी

नागपूर: सणासुदीच्या दिवसात कोरोनावाढीचा जाणकारांचा अंदाज पुन्हा रंग घेतोय असे दिसू लागलेय, कमी होत जाणा-या आकडेवारीने परत उभारी घेतलीय, सुरुवातीला तपासण्या कमी व रुग्णांची संख्याही कमी कमी होत असल्याने याविषयाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याचेच चित्र होते. अशात आता उत्सवी खरेदीदरम्यान कोरोणा महामारीच्या प्रतिबंधक उपाययोजनांची सावधगिरी नागरिकांकडून योग्यप्रकारे न बाळगण्याचा धोकाही निर्माण झाला.

शहरात काल दिनांक 11 नोव्हेंबर रोजी 271 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले यात शहरातील 166 तर ग्रामीण भागातील 103 रुग्णांचा समावेश आहे दिवसभरात 64 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तसेच सहा जणांचा मृत्यू झाला आहे चार हजार 192 रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.

कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे कोरोना विषयक दक्षता बाळगण्याचे आवाहन सर्वच यंत्रणा ठिकठिकाणी करत आहेत. बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणासाठीही प्रशासन उपाय योजना राबवत आहे, अशात नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून योग्य ते नियम पालन अनुसरावे.

नागपूरात कोरोना दुस-या लाटेची संभावना

नागपूर: उपराजधानी नागपूर मध्ये कोरोना महामारीच्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याची संभावना व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याची निश्चित वेळ वा कालावधी कधी राहील याला घेऊन अनेक अनिश्चितता असल्याचे चित्र आहे. सणासुदिंचा मोसम सुरू झालेला आहे, त्यामुळे संदेह व्यक्त केला जात आहे की संक्रमणाची प्रकरणं अजूनही एक वेळा वाढू शकतात, परंतु जाणकारांचे मते एक बाब सुखावह आहे की नागपूर मध्ये प्रथम लाटेवेळी जशी स्थिती बिघडली होती तशी ती असणार नाही, पूर्व मध्ये जितकी भयावह स्थिती झाली होती तशी गंभीर असणार नाही कारण यंत्रणाही आता ब-याच प्रमाणात दक्ष आहे.

देशात कोरोनाचे प्रकरणांची दुसरी लाट बरेच जागी आढळली गेली, देशातील राजधानी दिल्लीमध्ये तर तिसरी लाट येण्याची गोष्ट केली जात आहे, यातच उपराजधानी नागपूरात दुस-या लाटेची शक्यता वर्तवल्या जात आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याबाबत घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

ते सांगतात कि याबाबत बहुसंख्य चर्चा केल्या जात आहे, कालावधीबाबत मत मतांतरे आहेत कुणी नोव्हेंबर शेवटास तर कुणी सांगतय डिसेंबर अंतास वा काही जानेवरी पर्यंतही शक्यता सांगत आहेत. यात कसलीच एकवाक्यता नाही, तरी जेव्हाही अशी लाट येईल प्रशासन तयारीत असेल, जे आपण करू शकतो आपण त्यास्तव सजग राहू. जे आपल्या हाती नाही त्याबाबत विचारात का वेळ खर्च करावा?

दुसरी बाब म्हणजे लाट सर्व जागी येत आहे, जशी यूरोपात आढळली, दिल्लीची गोष्ट चालू आहे कि तेथे तृतीय लाट सुरू आहे यावरून आपणाकडेही यांचे पडसाद येतील, काही आकडेवारीत वाढ आढळेलच अशांत जितकी सजगता राखल्या जाईल तितका त्या लाटेचा चरम रोखण्यात हातभार लागेल. तिच्या फैलावात रोखथाम होईल, करिताच मास्क वापर, सोशल डिस्टेंस पालन व सॅनिटायजेशनसह हस्तप्रक्षालन ही सवय व्यवस्थीत कायम राखल्यास आपण सारे मिळून यातूनही मार्ग काढू.

जिल्ह्यात उद्रेक होतोय कमी, आतापर्यंत ३ हजार मृत्यु

नागपूर:- कोरोनाचा प्रभाव आता कमी होताना दिसत आहे. परंतु डॉक्टरांचे सल्ल्यानुसार लस उपलब्ध होईपर्यंत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र बाजारासह अन्य सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतरांचे पालन न केल्याने आणि मास्क परिधानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे धोका कायम आहे. दरम्यान, बुधवारी २१ रुग्णांच्या मृत्यूसह आतापर्यंत एकूण मृत्यू आंकड़ा ३००० वर पोहोचला आहे. यामध्ये ५ ग्रामीण आणि ८ शहरी रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता परिस्थिती सामान्य असल्याचे दिसते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर लोक नियमांचे पालन करतील तर रोगाचा धोका कमी होईल. मास्क सतत वापरणे अनिवार्य आहे. तसेच, सामाजिक अंतर पालन देखील महत्वाचे आहे. रोगाचा सामना करण्यासाठी लस उपलब्ध होईपर्यंत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. बुधवारी जिल्ह्यात 24 तासांत 6160 जणांची चाचणी करण्यात आली. यात 429 लोकांस संसर्गाची पुष्टी झाली. यासह, आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 91988 वर पोहोचली आहे.

बुधवारी विविध रूग्णालयात दाखल केलेल्या 457 रुग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. अशाप्रकारे, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 82896 रूग्ण बरे झाले आहेत. रिकवरी दर ९०.१२% तर जिल्ह्यात सध्या सक्रीय रूग्णांची संख्या 6092 आहे. यापैकी जवळपास १९०० रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. तर उर्वरितांवर घरातच विलगीकरणात उपचार सुरु आहेत. पुढील आठवड्यापर्यंत, पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे.

91988 एकूण संसर्गीत.
3000 मृत्यू
82896 बरे होऊन घरी
बुधवारी 429 पॉझिटिव्ह

अनलॉक पश्चातही बँकांबाहेर गर्दी, बराच काळ आपल्या पाळीचे प्रतिक्षेत लोक, तासंतास उभे राहिल्यानंतरही परतावे लागते.

नागपूर: शहरात अनलॉक झाल्यानंतरही एप्रिल आणि मे सारख्या लांबच लांब रांगा अजूनही बँकांच्या बाहेर दिसत आहेत. बँकांमधून पैसे काढण्यासाठी येणा-या ग्राहकांची रांग अद्याप बँकेच्या आवार बाहेरील रस्त्यावर पोहोचत आहे. बरेच तास उभे राहिल्यानंतरही त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागतेय. या प्रकरणात बँकेच्या कामकाजाविषयी ग्राहकांमध्ये रोष वाढत आहे. बँकांमध्ये जशी लॉकडाऊनची स्थिती अजूनही कायम आहे.

केवळ 4 ते 5 ग्राहक इतके वेळ घेतात की बाहेर उभे असलेले उर्वरित 30 ते 40 ग्राहक अस्वस्थ होतात. बर्‍याच वेळा सर्व्हर लिंक नसल्याचे सांगून अनेक तास ग्राहकांना ताटकळत उभे ठेवले जाते. जेव्हा सर्व्हरची लिंक येते आणि ग्राहक आत येण्यास प्रारंभ करतात, तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ होते. दुपारचे जेवण सुटी एक तासही घेऊ शकते, रांगेत उभे असलेले ग्राहक त्रस्त आहेत. दुपारच्या जेवणानंतरही 8 ते 10 ग्राहकांचीच कामे होतात आणि इतरांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.

छोट्या छोट्या गोष्टी होतत नाहीत: शहराच्या एक किंवा दोन नव्हे तर कैक बँकात हेच चित्र आहे, लांबच लांब रांगा दिसू शकतात. छोट्या छोट्या कामांसाठीसुद्धा ग्राहकांना तासनतास उन्हात उभे राहावे लागते आहे. बाहेरील इतक्या मोठ्या गर्दीमुळे सामाजिक अंतर नियमाची पूर्णपणे ऐसी-तैसी केली जातेय. बर्‍याच लोकांना गर्दीत मास्क घालायचा नसतो, त्याने इतरांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक बँकाबाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास गार्ड नसतात. अशा प्रकारे, कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे. ज्याप्रमाणे आज सर्व काही सामान्य होत आहे त्याच प्रकारे बँकांनाही सामाजिक अंतराचा व ईतर नियम दिले जावेत जेणेकरुन गर्दी त्यांच्या बँकांसमोर रस्त्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही.

उघडण्यापूर्वी लागतात रांगा: बँक उघडण्याआधीच लोक आपल्या नंबरसाठी तेथे पोहोचतात, ज्यामुळे बँक उघडणीचे वेळी रांग खूप लांब होते. बँकांच्या बाहेर सुविधा नसल्याने कडक उन्हात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रांगेत पेन्शनसाठी येणा-या वृद्धापासून तरूणापर्यंत अनेक जण असतात, आपल्या पाळीची वाट पाहताना दिसतात. एका महिला ग्राहकाने सांगितले की ती गेल्या 2 दिवसांपासून बँकेच्या चकरा करीत आहे, परंतु नंबरची वाट पाहत असताना दुपारचे जेवणाची सुटी होते, व परतावे लागत आहे. घर सांभाळत बाहेरची कामं ही दुहेरी कसरत आहे त्यातही असे होत असल्याचे तिने सांगितले

Exit mobile version