नागपूर: शहरात व ग्रामीण परिसरांत ऑक्सीजन पातळी तपासणी व ऑक्सि मिटरबाबत जनजागृति व्हावी या उद्देश्याने एक अभिनव अभियान आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने राबवत आहेत. कोरोना प्रसार रोखथामासाठी जनजागृतीसाठी आम आदमी पार्टी नागपूरचे कार्यकर्ते थेट जनतेशीच संपर्क साधत आहेत. शहरात कोरोना वाढ चरम पदावर आहे आणि यामध्ये आरोग्य यंत्रणा ही कुठेतरी अडखळत आहे, त्यास हातभाराकरिता आणि प्रसाराचा वेग पाहता पक्षप्रमुख व दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिमिटर वापर व ऑक्सिजन पातळी तपासणी गरजेची असल्याने त्यास अनुसरून कार्यकर्ते घरोघर तशी ऑक्सिजन पातळी तपासत आहेत ज्यायोगे कुणाची पातळी कमी आढळताच त्यास योग्य आरोग्य सुविधा उपचारांचे निर्देश दिले जाऊन जीव वाचविले जाऊ शकतात. याच उद्देशाने घरोघरी जाऊन ऑक्सिमिटर वापरत ऑक्सिजनची पातळी तपासणी केली जात आहे, या पद्धतीने सुरू हि मोहिम एक चांगला उपक्रम ठरतो आहे
Category: COVID-19
सर्दी खांसी या बुखार को नज़रअंदाज़ ना करें,तुरंत उपचार करवाएं और कोरोना से छुटकारा पाएं – डॉ समीर अरबट
दरअसल शहर में दिनों दिन कोरोना मरीजों की संख्या बढ़ती जा रही है इसके साथ ही सरकारी व प्राइवेट हॉस्पिटल्स में भी मरीजों की तादात बढ़ गई है।
वर्तमान स्तिथि को देखते हुए क्रीम्स हॉस्पिटल के मेडिकल डायरेक्टर डॉ समीर अरबट ने स्वास्थ्य से जुड़े कुछ सुझाव नागरिकों को दिए –
“उनका कहना था के यदि किसी मरीज़ को मौसमी सर्दी खांसी या बुखार है।या किन्हीं कारणों से उसे स्वास्थ्य ठीक नहीं लग रहा है तो ,वह व्यक्ति घर पर ही आराम करे और साथ ही अपने स्वास्थ्य सलाहकार या निकटतम स्थित हॉस्पिटल से संपर्क कर के तुरंत अपना उपचार शुरू करवाए । ”
आगे डॉ समीर अरबट ने यह भी कहा के ” यदि आप पहले से ही बीमार हैं तो ऐसी स्तिथि में बाहर घूमना आपको कोरोना संक्रमण की चपेट में ना ला दे ” वैसे आजकल डिजिटल टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ गई है कि आप घर बैठे बैठे भी वीडियो कॉल के जरिए डॉक्टर से परामर्श ले सकते हैं।
किन्तु सबसे ज्यादा जरूरी यह है के आप समय रहते उपचार करें ताकि आपको कोई बड़ी समस्या का सामना ना करना पड़े।
आणखी ४० रुग्णालये ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून घोषित रुग्णहिताच्या दृष्टीने आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा महत्वपूर्ण निर्णय
नागपूर, ता. १६ : शहरातील कोव्हिडबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी यापूर्वी ६२ खाजगी रुग्णालयांना ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये आता आणखी ४० रुग्णालयांची भर पडली आहे. म्हणजे आता शहरात एकूण १०२ खाजगी रुग्णालयांमध्ये कोव्हिडचे उपचार केले जाणार आहे. रुग्णहिताच्या दृष्टीने मनपाद्वारे हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहे. शहरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये सुरूवातीला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जायचे. मात्र शहरातील वाढती स्थिती लक्षात घेता त्यानंतर काही खाजगी रुग्णालयांना कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र यानंतर शहरातील वाढते संक्रमण लक्षात घेता आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ही संख्या वाढवून ४० वर केली. शहरात अजूनही बेड्स अभावी अनेक रुग्णांचे हाल होत असल्याचे निदर्शनात येताच मंगळवारी (ता.१५) महापौर संदीप जोशी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिका-यांशी बैठक घेतली. या बैठकीत आणखी खाजगी रुग्णालये ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. त्यानुसार मनपा आयुक्तांनी बुधवारी (ता.१६) नव्याा ४० रुग्णालयांसंदर्भात आदेश जारी केले. शहरात यापूर्वी ६२ ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ घोषित करण्यात आले होते. यात आता नवीन ४० रुग्णालयांची भर पडली असून आता शहरात एकूण १०२ ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ झाले आहेत. यापैकी ४० रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू असून इतरही रुग्णालयांमध्ये लवकरच उपचार सुरू केले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली आहे. सदर नवीन ४० ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’मध्ये येत्या ४८ तासांमध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण भरती करण्यात येतील. या रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता येणा-या बाधित रुग्णाला दाखल करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार सुरू करून रुग्णाचा रियल टाईम डाटा मनपाच्या पोर्टलवर नियमीत अद्ययावत करणे रुग्णालय प्रशासनाला अनिवार्य राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नवे ४० ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ परफेक्ट हेल्थ सुपर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल धंतोली, न्यूक्लिअस मदर अँड चाईल्ड मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, नेल्सन मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल सक्करदरा, श्रीकृष्ण हृदयालय अँड क्रिटीकल केअर सेंटर, डॉ.के.जी.देशपांडे मेमोरियल सेंटर फॉर ओपन हार्ट सर्जरी, मेडिकेअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल उंटखाना रोड, सेंट्रल इंडिया कार्डीओलॉजी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, बोरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, तामसकर क्लिनीक रामदासपेठ, लोटस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अँड मॅटर्नीटी होम, सफल हॉस्पिटल काँग्रेस नगर, प्रेस्टिज हॉस्पिटल छावनी, जी.टी.पडोळे हॉस्पिटल, खलाटकर हॉस्पिटल रेशीमबाग, श्रावण हॉस्पिटल अँड किडनी इन्स्टिट्यूट, रहाटे सर्जीकल हॉस्पिटल, ग्रीन सिटी हॉस्पिटल अँड नर्सींग होम, मुखर्जी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, आरएनएच हॉस्पिटल प्रा.लि., आदित्य हॉस्पिटल क्रिटीकल केअर अँड इमर्जन्सी सेंटर, खोब्रागडे चाइल्ड ट्रस्ट हॉस्पिटल अँड इन्टेन्सिव्ह केअर इन्स्टिट्यूट, आरोग्यम सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, कलर्स चिल्ड्रेन हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल शिवाजी नगर, तारांगण सर्जीकल हॉस्पिटल, सुपरलाईफ हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, एलिक्झिर मेट्रो सिटी हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअर, अभियोग स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंटर सेंटर अँड मॅटर्निटी होम, कुबडे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जेनक्यूअर हॉस्पिटल, एस.एस. मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, गार्सीयस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मेट्रो हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटल, आपुलकी वैरागडे हॉस्पिटल, शांती मोहन हॉस्पिटल, स्वस्तीक क्रिटीकल केअर, इंद्रायनी स्पेशॅलिटी हॉस्पिटल, ग्रेस हॉस्पिटल.
कोवॅक्सिन या भारतीय लसीची नागपुरात चाचणी दुस-या टप्प्यात
नागपूर:- कोरोना या महाभयंकर आजाराचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी त्यावर प्रतिबंधक लस संशोधनाचा जगभरात प्रयत्न चालू आहे, भारतातही कोवॅक्सिन ही लस सर्वत्र चाचणीच्या टप्प्यात आली आहे, नागपुरातही तिची प्रथम चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे तर आता दुसऱ्या टप्प्यातील चाचणीही नागपूरात सुरू झाली आहे.
१२ ते ६५ वयोगटातील ५० व्यक्तिंवर ही मानवी चाचणी केली जाणार आहे. यात २२ महिला तर २८ पुरूषांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २२ व्यक्तींवर ही चाचणी यशस्वीपणे केली गेलीय तर त्याअंतर्गतचे, पश्चातचे निकालही सकारात्मक असे भेटलेले आहेत.
भारत बायोटेक, एन आय सी पुणे व आय सी एम आर यांच्या संयुक्त विद्यमाने कोवॅक्सिन मानवी चाचणीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झालेला आहे आणि तो यशस्वी होताना दिसत आहे. नागपूरातील सेंटर मध्ये पहिल्याच दिवशी लावण्यात आलेल्या ५० लोकांपैकी सर्वांनाच हा डोस लावल्यानंतर कोणालाही काही त्रास झाला नाही, आता दुस-या डोसची परवानगी शासनाने दिलेली आहे, भारतात ८ सेक्टर मधे ३८० लोकांना हि वॅक्सिन लावली जात आहे, नागपूरात पैकी ५० वर ही चाचणी केली गेली. यात ७ मुलं तर ५५ वयोगटात ८ जेष्ठ नागरिक आहेत, लस टोचणीपश्चात कुणालाच कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही तर हा सुरक्षित वाटतो आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस झाल्यानंतर दुसरा डोस साठी २८ दिवसानंतर सदर नागरिकांस बोलवण्यात येणार आहे, त्यांचे रक्ततपासण्या केल्या जातील, त्यावरून शरिरात उत्पन्न एंटिबॉडीज पाहिल्या जातील व वॅक्सिन ची तिसरी चाचणीस प्रारंभ केला जाईल.
दुस-या फेजप्रमाणेच तृतीय टप्पाही तितकाच कालावधी घेईल तो यशस्वी ठरल्यास जानेवारीत पहिल्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता बळावेल असे केंद्राचे अधिका-यांनी सांगीतले
द. नागपूरचे आमदार श्री मोहन मते यांची आमदार निवास येथील कोवीड सेंटरला भेट
नागपुर: द. नागपूरचे आमदार श्री मोहन मते यांनी काल मंगळवार दिनांक 15 रोजी आमदार निवास येथील कोवीड सेंटरला भेट दिली. नागपुरातील आमदार निवास येथील सेंटरला सहा महिने पूर्ण झाले त्यानिमित्ताने दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहन मते त्यांनी येथे भेट देऊन तेथील सर्व आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व कर्मचारी यांचे शाल व गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला तसेच त्यासर्वांचे आभार मानले. इतरांकडूनही अशीच मानवसेवा निरंतर सुरू राहील ही अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके, नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्यासोबत त्यांची सदिच्छा भेट देण्यात आली, आमदार निवास नागपूर चे नोडल अधिकारी डॉक्टर नितीन गुल्हाणे, वैद्यकीय अधिकारी दिव्या भांडारकर यांच्याशी आमदारांनी या वेळी संवाद साधला.
याप्रसंगी डॉक्टर मानसी रेवतकर, डॉक्टर आदिती उईके, डॉक्टर ऋतिका खोलगडे, डॉक्टर किरण नाईक तसेच प्रियंका ठाकरे मनीष, रूपाली, भाग्यश्री, मेघा, आशिष कोल्हे व गजेंद्र मेश्राम हे उपस्थित होते.
कोरोना गया क्या? खरीदारी के लिए शहर के बाजारों में उमड रही भिड
नागपुर: शहरवासी अब कोरोना से नही डरते। शहर के बाजारों में रोज बढ रही भीड़ देख यही कहा जा सकता है। खुद को जिम्मेदार कहलाते नागरिक और व्यापारी कोरोना संक्रमण को रोकने के लिए सावधानी बरतने के बजाय बाजार में महामारी काल में लागु नियमों का धड़ल्ले से उल्लंघन कर रहे हैं। नतीजतन, प्रशासन की चिंताए और गहरा रही है। कुछ दिन पुर्व में दि गई चेतावनी के अनुसार सितंबर माह सही में कोरोना के लिए सबसे घातक महीना साबित हो रहा है, इस माह मौतों के मामले और कोरोना रोगी भी कई अधिक बढे। हालाँकि, चर्चा धीरे-धीरे जोर पकड़ रही है कि तालाबंदी ही समस्या का अब एकमात्र समाधान है। पर ऐसा कहने वाले ही खुलेआम घूमते दिखाई पड़ रहे हैं। कोरोना का कहर कई गुणा गहरा होकर कसता जा रहा है। हर दिन २००० संक्रमित और ४० से ५० लोग मौते हो रही हैं। इसलिए सभी को सावधान रहने की जरूरत है। लेकिन नागपुरकर अपनी गैरजिम्मेदारी दिखा बाजारो की रौनक भीड़ बनाकर बढ़ा रहे है। महल, बर्डी, सदर, सक्करदरा, कॉटन मार्केट, कलमना, इतवारी, गांधीबाग और अन्य जगहो में हर दिन नागरिकों की भीड़ बढ़ती देखी जा सकती है। नियमों की अनदेखी कर दुकानों पर बढती भीड़ के लिए व्यापारि भी आंखें मूंदे रखते हैं। पिछले माह, तत्कालीन नगर आयुक्त मुंढे ने बाजारो में बढ़ती भीड़ देख तालाबंदी की चेतावनी दी थी। लेकिन स्थानीय व्यापार संघ ने राजनीतिक दलों की मदद से उनका विरोध किया। लेकिन अब कोरोना मरीजों की बढ़ती संख्या और मौतों से व्यापारी वर्ग भी चिंतित हैं। नतीजतन, कई लोग अब कर्फ्यू लगाने के पक्ष में बोल रहे हैं। होलसद कपड़ा संघ ने जिम्मेदारी निभाते एक सप्ताह का मार्केट बंद रखा है, ऐसे प्रयासों की उम्मीदें अन्य सभी से कि जा रही है। शहर में मास्क नहीं पहनने के लिए ₹200 का जुर्माना अब बढ़ाकर ₹500 कर दिया गया है, फिर भी बाजारो में भीड़ लगातार बनी है। कोरोना का लगातार फैलता शिकंजा फिलहाल काबू से बाहर है और शहर के सभी अस्पताल मरीजो से खचाखच भरे पड़े हैं, ऐसे में बेड उपलब्ध नहीं होने के कारण पीड़ितों की सेवा करने वाले डॉक्टर और पुलिसकर्मी भी अपनी जान गंवा रहे हैं। नागरिक इस तरह की गंभीर स्थिति को भी हल्के में ले रहे हैं। यह सच में चिंताजनक बात है। शहर में कहीं भी देखे तो सामाजिक दूरी की कोई भावना किसी में नहीं नजर आई है। कोरोना ने शहर, जिले के सभी क्षेत्रों में घुसपैठ की है। घर से बाहर निकलना घातक हो सकता है। भीड़ से बचने के लिए, कई कार्यालयों ने कर्मचारियों को ६ माह तक के लिए घर से काम करने की अनुमति दी है। पर फिर भी कई लोग बिना वजह घुमते देखे जा सकते हैं, रेहड़ी वाले, फुटपाथ किनारे लगे स्टॉल्स पर भी लोग दुरियां नही बना पाते हैं, प्रशासन की लगातार जागरूकता अभियानो का कईयो पर कुछ भी असर नहीं हुआ पाया जा सकता है।
कोवीड पेशंटवर उपचार करा अन्यथा परवाना रद्द: शहरातल्या ६२७ खाजगी हॉस्पिटल्सला महापौरांचा अल्टिमेटम
नागपूर: कोरोना प्रसारावर अंकुश लावण्याचे प्रशासनाचे एकापाठोपाठ एक प्रयत्न सध्या तरी अपुरे पडत आहे असेच चित्र आहे, लॉकडाउन लावल्या जाणार नसल्यामुळे नुकतेच महापौरांनी जनतेस स्वयंस्फूर्तपणे जागरूकता राखण्यासंबंधीचे आवाहन केले होते, अनेक व्यापारी संघटना आपल्या परीने प्रतिष्ठाने बंद राखून यात मदत करीत आहे तरिही त्याच धर्तीवर अनेक लोक मात्र या सर्व प्रयत्नांना, उपायांना जुमानत नाहीयत म्हणूनच शहरात मास्क न लावता वावरणाऱ्यांना आता दंड ₹२०० वरून ₹५०० वाढवल्या गेला, पोलिस उपायुक्तांनीही त्यांच्या ताफ्यास वर्दळ व रहदारी नियंत्रणास्तव वाहनतपासणी, तसेच अतिक्रमणासाठी बाजारपेठांत कारवाई सुरू केली आहे, तरीही लोकांत सुधारणा दिसून येत नाही, अशात आरोग्य सुविधांचाही तुटवडा प्रचंड जाणवतो आहे, या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना पेशंट चा आकडा सतत वाढतोच आहे. जिल्ह्यात आज १६६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आज १९५७ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५५४३० झाली आहे. आतापर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ४२३३३ झाली आहे. नागपूरात एकूण क्रियाशील रुग्ण ११३४४ असूनपैकी ५७५७ गृह विलगिकरणात आहेत. आजचे दिवसभरात ४८ मृत्यु झाले असून त्यापैकी ६ मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.३७ टक्के असे आहे. लोकांत या महामारी विषयक जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. प्रशासन या दृष्टीने अनेक अभियान राबवत असले तरी सर्वसामान्यांनी त्यात सहभाग घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे,
मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पंवार से विदर्भ और नागपुर स्वास्थ्य प्रणाली पर ध्यान देने का आग्रह करता हूं – भाजपा नेता बावनकुले
दरअसल दिनों दिन कोरोना के संक्रमण से लोग ग्रसित होते जा रहे हैं। आलम यह है कि अब ऐसी स्तिथि आग़ई है के ज्यादातर सरकारी व निजी अस्पतालों में आईसीयू बेड व जरूरी उपचारों के लिए मरीज़ को लंबा इंतजार करना पड़ रहा है या दर ब दर भटकना पड़ रहा है।इसी बात को लेकर भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने अपना बयान जारी किया जिसमें उन्होंने कहा कि- विदर्भ और नागपुर स्वास्थ्य प्रणाली कोविद को नियंत्रित करने में विफल रही है।
अब तो विदर्भ भी कोरोना का एक गढ़ बना हुआ है। नागपुर में भी कोरोना से हालात गंभीर है। भाजपा नेता चंद्रशेखर का यह भी कहना था कि – ऐसी स्तिथि देखते हुए मैं राज्य के मुख्यमंत्री उद्घव ठाकरे जी से यह आग्रह करता हूं के वो इस मामले को गंभीरता से लें।वरना लोगों में यह संक्रमण भयावह रूप ले लेगा और मृत्यु दर भी बढ़ जाएगा।
यहां पर एक बढ़ा कोविड सेंटर बनाने की जरूरत है ताकि बढ़ी संख्या में आईसीयू बेड, दवाईयां, वेंटिलेटर उपलब्ध हो सकें। जैसी सुरक्षा प्रणाली मुंबई व पुणे में की जा रही है वैसी ही ध्यान रखना होगा विदर्भ और नागपुर का । इसी विषय में उन्होंने मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्य मंत्री अजित पवार से आग्रह किया।
कोरोना काळात शहीद झालेल्या पोलिस कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा कवच प्रदान
नागपूर: राज्यातील पोलिस दल कोरोना विरुद्ध लढाईत आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची पर्वा न करणार्या पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचेकडील शासन निर्णयानुसार अधिकृत वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून 50 लाख रुपये प्रदान करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे त्याच अनुषंगाने नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत, शहीद झालेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा धनादेश आज प्रदान करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील कार्यरत पोलिस कर्मचारी व पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे नेमणुकीस असलेले सहायक फौजदार भगवान सखाराम शेजुळ व धंतोली पोलीस स्टेशन येथे नेमणुकीत असलेले पोलीस हवालदार सिद्धार्थ हरिभाऊ सहारे हे दोन्ही पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना covid-19 संक्रमण होऊन आजारी पडल्याने व त्यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू होऊन ते शहिद झाले. नमूद पोलीस कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य प्रस्ताव पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आदेशान्वये पोलिस समाधान कक्ष पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर यांनी मुदतीत कागदोपत्री कारवाई पूर्ण करून, पोलीस महासंचालक मुंबई यांच्यामार्फत, महाराष्ट्र शासनाला विनाविलंब सादर करून प्रत्येकी 50 लाख रुपये रक्कम मंजूर करून घेतली व आज शनिवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचार्यांचे वारसदारांस, पत्नी श्रीमती कुसुम भगवान शेजुळ व श्रीमती ईरा सिद्धार्थ सहारे यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे धनादेश नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार व सह पोलीस आयुक्त श्री नीलेश भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद पोलीस कर्मचार्यांचे वारसांना त्यांना भविष्यात काही अडचणी आल्यास नागपूर शहर पोलीस सदैव पाठीशी राहून सहकार्य करेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी श्री अमितेशकुमार पोलीस आयुक्त नागपूर शहर व सह पोलीस आयुक्त निलेश भरणे यांचे आदेशान्वये श्री गजानन राजमाने पोलीस उपायुक्त मुख्यालय यांचे मार्गदर्शनाखाली श्री राम शास्त्रकार, रिता कोहरे पोलीस समाधान कक्ष यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
