नागपूर विभागात ९ हजार २९३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था!

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी दरम्यान नागपूर विभागाच्या पाचही जिल्ह्यात विविध क्षेत्रातील सुमारे ९ हजार २९३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजुरांकरीता विशेष शिबिरात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी दिली आहे.

इतर राज्यातील स्थलांतरित नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगाणा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आहेत, यामध्ये नागपूर शहर ७५५, नागपूर ५०९, वर्धा १७९४, भंडारा ३४९, गोंदिया १०८५, चंद्रपूर ४३९५, व गडचिरोली ४०६ अशा ९ हजार २९३ स्थलांतरितांचा समावेश आहे.

नागपुरात साधारण १२ मार्चपासून कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली. पहिल्या दोन आठवडयात एक अंकी असणारी रुग्णसंख्या ही आता साधारणत १७ पॉझिटिव्ह रुग्णांवर स्थिरावली आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन सक्षमतेने काम करत आहे. मात्र कोरोना विषाणूपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक मजुरांचा रोजगार बुडाला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांच्याही पोटामध्ये दोन घास पडले पाहिजे, आपण जसे दररोज भोजन घेतो तसे त्यांनाही जेवण मिळाले पाहिजे ,त्यांचे जगणे सुलभ होण्यासाठी शासनातर्फे शेल्टर हाऊसची सोय करण्यात आली आहे.

नागपूर जिल्हयातील हिंगणा येथे मध्यप्रदेशातील कामगार मोठया प्रमाणावर रोजी रोटीसाठी येतात. कोरोनाची चाहुल लागताच कलम १४४ लावल्याने ते हिंगणा येथेच थांबलेत. तातडीने जिल्हा प्रशासनातर्फे रेणुका सभागृहात त्यांना निवारा उपलब्ध्‍ करून देण्यात आला. येथे ३० मार्च पासून साधारण २६ कामगार राहतात. त्यामध्येच कैलास व सविता कैलास मरताम हे दाम्पत्यही आहेत.

रेणुका सभागृहातील या लोकांची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सभागृहात थांबलेल्या लोकांसाठी स्वतंत्र बेड देण्यात आले. त्यांना शुध्द पिण्याचे पाण्यासोबतच प्रत्येकाला साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, बिस्कीट पुडा, केसांना लावायचे तेल, पिण्याच्या पाण्याची बॉटल प्रशासनाने दिली आहे. तसेच बातम्या बघण्याकरीता प्रोजेक्टरची सुविधा, स्वतंत्र भोजन कक्ष, मोबाईलकरीता वाय-फाय आदी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी इंदीरा पखाले यांच्या मार्गदर्शानाखाली तहसीलदार संतोष खांडरे मुख्याधिकारी राहुल परिहार, पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, असून तलाठी सोनकुसरे, नांदुरकर, दीपक गादे व इतर कर्मचारी कार्यरत आहेत.

ना. नितीन गडकरी ७ एप्रिलला घेणार कोरोनासंदर्भात जिल्ह्याचा आढावा

नागपूर: केंद्र सरकारने नागपूर जिल्ह्यातल कोव्हिड-१९ बाबत निरिक्षण आणि आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याच अनुषंगाने नागपूर जिल्हा कोव्हिड-१९ बाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. ७) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार गिरीश व्यास, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ओ.एस.डी. डॉ. फूलपाटील, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया उपस्थित राहतील.

मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका !

जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरूनच जावे. मास्क लावल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंबंधी एक व्हीडिओ संदेश आयुक्तांनी जारी केला आहे. यामध्ये मनपा आयुक्तांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना १०० टक्के लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. केवळ लॉकडाऊनचे पालन केल्यानेच आपण या संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो.
जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून प्रशासनाने या वस्तू घरपोच मिळण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी नागरिकांना या वस्तुंसाठी किंवा अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास त्यांनी मास्क लावूनच बाहेर निघावे. वापरण्यात येणारा मास्क हा विकतच घेतला पाहिजे असे नाही. तर हा मास्क आपल्याला घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Nagpur: No new positive case has reported with data disclosure of Nagpur DIO in the last 24 hours

Nagpur: No new positive case has reported with data disclosure of Nagpur DIO in the last 24 hours, the total number of cases reported in Nagpur is still 17 with four recovered discharged patients.
On the other news, the newly-launched AIMMS Nagpur laboratory checked sixty-two swab samples on Sunday for coronavirus, all negative.
Between 1 and 3 April, NMC tracked and quarantined 197 individuals according to the Ministry of Housing Directives.
Mayo released 33 reports on April 3, and all were negative. Mayo released a survey. On 4 April, AIIMS Nagpur tested 45 samples and one of the positive checks, a takia Deewanshah, Mominpura capsule. Positive testing.
AIIMS Nagpur is scheduled to publish remaining reports on Monday

मरकजहून परतलेल्या नागरिकांनी ,जिल्हा प्रशासनास माहिती देणे बंधनकारक

नागपूर दि. 6 : दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. अद्याप माहिती न दिलेल्या नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षास संपर्क करावा जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाही अशांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज निर्देश दिले.
दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित मरकज संम्मेलनास उपस्थित राहिलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण विभागात विलगीकरण केंद्रामार्फत तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने पाठविलेल्या यादीनुसार मरकजला उपस्थित राहिलेल्या विभागातील नागरिकांचा शोध घेऊन विलगीकरणात आरोग्य तपासणी सुरु आहे. परंतु अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्हा नियंत्रण कक्षास माहिती देणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिली नाही असे प्रशासनाच्या लक्षात आल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संविधान कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
मरकजहून नागपूर येथे परतलेल्या नागरिकांसाठी आमदार निवास, वनामती व रविभवन सुरु करण्यात आलेल्या विलगीकेंद्रात सुविधा करण्यात आली आहे. अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हानिहाय कोरोना नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक
अ.क्र कार्यालयाचे नाव दूरध्वनी क्रमांक
1 जिल्हाधिकारी, नागपूर       0712-2562668
2 नागपूर महानगर पालिका    0712-2567021
3 जिल्हाधिकारी, वर्धा         07152-243446
4 जिल्हाधिकारी, भंडारा      07184-251222
5 जिल्हाधिकारी, चंद्रपूर       07172-272480
6 जिल्हाधिकारी, गडचिरोली  07132-222031
7 जिल्हाधिकारी, गोंदिया      07182-230196
मरकजहून परत आलेल्या परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाशी संपर्क न केलेल्या नागरिकांनी तात्काळ नियंत्रण कक्षासोबत संपर्क करून आपली माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

Nagpur: The highest Samai in the world lit to show gratitude to those battling against COVID-19

Nagpur April 6:-The world’s tallest Samai, Pooja Lamp, at Jerryl Lawns, was lit here on Sunday to express appreciation to health care workers and emergency service providers who are risking their lives to battle COVID-19.

City dwellers saw lighting candles and diyas to pay tribute to health care staff, sanitation workers and emergency service providers.

Citizens in various states of the country on Sunday switched off the lights of their homes and lit earthen lamps, responding to Prime Minister Narendra Modi’s ‘9 p.m., 9-min’ call to defeat the coronavirus in the country.

The number of positive coronavirus cases in the country continues to increase. According to the Ministry of Health and Family Welfare, the total number of confirmed cases of COVID-19 is 3,577 with 83 deaths.

PM’s call: Gadkari lights lamps with family in Nagpur

By lighting diyas in his home here with his family members, Union Minister Nitin Gadkari replied to Prime Minister Narendra Modis ‘call to turn off the lights for nine minutes on Sunday night.

The Gadkari family lit the lamps on the balcony of their home. “My family and I are lighting the torch of unity with the government. We’ve also made a solution to unity in this time of crisis,” Gadkari said.

Meanwhile, RSS Chief Mohan Bhagwat and General Secretary Bhaiyyaji Joshi have conducted deep prajavalan ‘(lighting of lamps) at the Sangh headquarters here.

Most people in the city responded to the PM lights — by switching off the lights in their homes for nine minutes, and by lighting the lamps and candles in the galleries or on the terraces. Men even burst crackers in some cases. On Friday, Modi urged people to switch off the lights in their homes and light up lamps, candles or cell phone torches for nine minutes at 9 p.m. on Sunday to demonstrate the country’s “collective determination” to fight the coronavirus.

Coronavirus: Bronx Zoo Tiger positive results for Covid-19

A four-year-old Malayan female tiger at the Bronx Zoo tested positive for coronavirus.

The tiger, called Nadia, is believed to be the first known instance of a human infected animal with Covid-19.

The Bronx Zoo in New York City says the findings of the study have been checked by the National Veterinary Services Laboratory in Iowa.

Nadia, along with six other big animals, is believed to have been poisoned by an asymptomatic zoo keeper.

The cats began showing symptoms, including dry cough, late last month after exposure to an unidentified employee.

“It is the first time that all of us have learned anywhere in the world that a human contaminated the animal and the animal got ill,” Paul Calle, chief veterinarian at the zoo, told Reuters news agency on Sunday.

He said that he plans to share the findings with other zoos and organizations studying the transmission of Covid-19.

Tiger King Star In Virus Isolation, husband says Pangolins carry strains related to the new coronavirus “We tested the cat [Nadia] out of abundance of caution and will ensure that any knowledge we gain about Covid-19 will contribute to the world’s continued understanding of this novel coronavirus,” the zoo said in a statement.

Nadia, her sister Azul, as well as two Amur tigers and three African lions with symptoms, are all expected to recover completely, the zoo said.

Big cats had some loss of appetite, but “otherwise they are doing well under veterinary treatment and are lively, alert, and engaging with their keepers,” he said.

The zoo said it is not clear whether the virus will evolve in animals such as tigers and lions because different species will respond differently to new infections, but all animals will be closely monitored.

NMC says there are no onions and potatoes on temporary vegetable markets

Nagpur: Believe it or not, the Nagpur Municipal Corporation (NMC), which has developed temporary 24 open-air vegetable markets throughout the city to support people during the lockdown, has prohibited the selling of potatoes and onions in those markets.

Citizens visiting the markets were surprised not to find potatoes or onions. The two are the most important vegetables primarily because of their flexibility and long shelf life. One can not believe that cooking without onions and potatoes was the general reaction of the buyers. Archana Raut, a resident of Reshimbagh, said that NMC had done a great job of setting up a vegetable market in Reshimbagh. “But I am not persuaded that their decision not to allow the selling of potatoes and onions is the right one,” she said. The decision would negate the lockout, as people will have to make another trip or visit another place to buy potatoes and onions, said Dinesh Palange, another local resident.

Kishan Balpande, a wholesaler of onions and potatoes, said he had been in the queue since 10 am to enter the Reshimbagh property. “The NMC officials told me that I would not be allowed there in the evening,” Balpande said.

While Municipal Commissioner Tukaram Mundhe was not available for comment, a senior NMC official explained the decision of the Civic Chief to help farmers sell new, perishable goods. He said that potatoes and onions were available in other markets such as Budhwari Bazaar, Itwari, Gokulpeth, Mangalwari etc. Chetan Bhagwan Kewte, a farmer from Dighori, expressed dismay at NMC’s decision to limit the entry of vegetable growers to Reshimbagh soil to only 60. Kewte said that, since most of the farmers supplying vegetables to the city come from the southern part of the district, they prefer the Reshimbagh soil.

The NMC official said that entry was limited to all 24 vegetable markets. NMC allocates tokens to farmers to do business in designated markets throughout the city, he said, adding that a decision had been taken to streamline the operation of all 24 markets in the area.

कोरोना रुग्णासाठी लढणाऱ्या योध्यासाठी हॉटेल सेन्टरपॉइंट ची सेवा

*डॉक्टर ,सहकर्मचाऱ्यांना गेस्टरूम, भोजनाची सुविधा

*हॉस्पिटल ते हॉटेल प्रवास सुविधा

डॉक्टरांच्या सेवेला सलाम

नागपूर दि ५  करोना सारख्या संसर्गजन्य  आजारापासून जनतेच्या सुरक्षेसाठी डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र अविरत सेवा देत आहेत, अशा रुग्णासाठी सेवा देताना प्रसंगी धोका सुध्दा स्वीकारून  सेवरूत्तीने आज कार्यरत आहेत, अशा सर्वांसाठी येथील सुप्रसिद्ध हॉटेल सेंटर पॉईंट ने रहाणे, जेवण    यासाठीची जबाबदारी स्वीकारली आहे,

कोरोना मुळे संपूर्ण जगात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, भारतातही प्रत्येकाच्या मनात भितीचे वातावरण आहे, अशा वातावरणात डॉक्टरांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे, त्याच्या सेवेला सलाम करतानाच  हॉटेल सेंटर पॉईंट तर्फे या मेडिकोजला ऑफ  ड्युटी सर्व सुविघ साठी उपलब्द असल्याचे पत्र विभागीय आयुक्त डॉ  संजीव कुमार यांना  जसबीर सिंग अरोरा यांनी दिले आहे, ही सुविधा आजपावून उपल्बध करून दिली आहे.

      नागपूर सह मध्यभारतातील कोरोना रुग्णाला अहोरात्र सेवा देताना जनतेसाठी  प्रसंगी स्वतः धोका सुद्धा स्वीकारण्यास मागेपुढे पहात नाहीत अशा योध्यासाठी  हॉटेल मॅनेजमेंट ने  ऑफडूटी सेवा, तसेच त्यांना यासाठी पोलीस विभागाच्या परवानगीने वाहन व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे,

कोरोना रुग्णाला सेवा सेवा देताना  स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी  कामाचे तास संपल्यावर स्वतःला दूर ठेवतात, अशा परिस्थितीत  त्यांची सेवा करण्याची जबाबदारी  सर्वसामान्यांची आहे, ही जबाबदारी हॉटेल सेंटर पॉईंट स्वीकारत असल्याचे जसबीर सिंग अरोरा यांनी विभागीय आयुक्त संजीव  कुमार यांना कळविले आहे,जिल्हा प्रशासनाच्या करोना संदर्भातील गरजू व्यक्तीच्या सेवेसाठी आलेली जबाबदारी स्वीकारन्याची  तयारी असल्याचे श्री अरोरा यांनी सांगितले आहे.

Exit mobile version