स्विगी ने जाहीर केली ग्राहकांच्या फेव्हरेट फूड ची यादी; प्रत्येक मिनिटाला 95 चिकन बिर्यानीची ऑर्डर तर गुलाबजाम गुड पदार्थांमध्ये अव्वल

आता जेवण बनावट येत नसलं तरी प्रत्येक जण हमखास स्विगी, झोमॅटो किंवा उबर इट्स या ऍप्सवरून कधीही आणि कुठेही ऑर्डर करू शकतो. परंतु, स्विगी या ऍपने नुकतीच अशी काही माहिती प्रदर्शित केली आहे, जी वाचून तुम्हीही व्हाल थक्क. स्विगीने सांगितल्यानुसार, या ऍपवरून सर्वात जास्त चिकन बिरयानी ऑर्डर केली जाते.

स्विगी ऍपने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यांदरम्या देशभरात सर्वात जास्त ऑर्डर या चिकन बिरयाणीच्या घेण्यात आल्या होत्या. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मिनिटाला जवळपास 95 ऑर्डस या बिर्याणीच्याच येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे त्यांच्या यादीत बिर्याणीला पहिले स्थान मिळाले आहे तर सर्वात जास्त ऑर्डसच्या दुसऱ्या स्थानावर आहे मसाला डोसा तर तिसऱ्य़ा स्थानावर आहे पनीर बटर मसाला हे पदार्थ. विशेष म्हणजे याच वर्षी नाही तर सलग मागील तीन वर्षांपासून सर्वात सर्वात आवडती डिश म्हणून चिकन बिर्यानीलाच सर्वात जास्त पसंती मिळालेली पाहायला मिळत आहे. तर स्विगीने जाहीर केलेल्या अहवालानुसार डेझर्ट म्हणजेच गोड पदार्थांमध्ये गुलाबजामला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे आणि दुसऱ्या स्थानावर आहे फालुदा तर तिसऱ्या स्थानावर मूगडाळीचा हलवायला पसंती मिळाली.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version