एकसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कर व करसंकलन विभागाची पुनर्रचना

नागपूर महानगरपालिकेकरिता उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर आहे. मनपाच्या कार्यक्षेत्राचे क्षेत्रफळ बघता मालमत्ता करापासून प्राप्त उत्पन्न व वार्षिक मागणी ही सुसंगत नाही. राज्याच्या इतर महानगरपालिकेच्या तुलनेत नागपूर मनपाव्दारा करयोग्य मूल्यांकनाचे दर व करयोग्य मूल्यावर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराचे दर कमी आहेत. या दराला सुसंगत करुन मालमत्ता कर आकारणीत एकसूत्रता व पारदर्शकता आणण्याचा दृष्टीने कर व कर संकलन विभागाची पुनर्रचना करीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

या निर्णयानुसार नागपूर महानगरपालिका सीमेतील प्रत्येक इमारत व जमिनीकरीता मालमत्ता कर निर्धारण नियमान्वये होणेविषयी व कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्याच्या स्वेच्छा निर्णयानुसार मालमत्ता कर निर्धारणाची कार्यवाही होणार नाही, या हेतूने नव्याने प्रत्यायोजन आदेश काढून मालमत्ता कर निर्धारणाचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. यानुसार आता दीड लाख रुपये करपात्र मूल्य अथवा ५०० चौ.मी. इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ आणि १००० चौ.मी.

क्षेत्रफळापर्यंत खुला भूखंड असल्यास झोन कार्यालयातील सहायक आयुक्त यांना कर निर्धारणाचे अधिकार राहतील. १.५१ लाखांपासून ते तीन लाखांपर्यंत करपात्र मुल्य किंवा ५०१ चौ.मी. ते १००० चौ.मी. पर्यंत इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ असल्यास आणि १००१ चौ.मी. ते २००० चौ.मी. क्षेत्रफळापर्यंत खुला भूखंड असल्यास कर निर्धारणाचे अधिकार उपआयुक्त (महसुल) यांचे मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संग्राहक मुख्यालय यांना सोपविण्यात आले आहेत.

रुपये तीन लाखांवर करपात्र मूल्ये असलेली प्रकरणे किंवा १००० चौ.मी. पेक्षा अधिक बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या इमारती अथवा २००१ चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या खुल्या भूखंडाच्या कर निर्धारणाचे अधिकार उपायुक्त (महसूल) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. यामुळे झोन सहायक आयुक्तांवर त्यांचे कार्यक्षेत्रातील प्रत्येक इमारत व जमिनीच्या मालमत्ता कर निर्धारणाची जबाबदारी असणार आहे.

यापूर्वी कर निरीक्षक/स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांनी नामांतरण /मालकी हक्क हस्तांतरणच्या कार्यात केलेल्या चुकीमुळे केंद्रीय कार्यालयात मालकी हक्क हस्तांतरणबाबतच्या प्रकरणासंबंधी दैनंदिन तक्रारी प्राप्त होत आहेत. या कारणास्तव यापुढे हे काम संबंधित झोन सहायक आयुक्तांनी करणे अपेक्षित असल्याचे आदेशात म्हटले आहे.

जीआयएस मुळे अनेक मालमत्ता कर निर्धारणाच्या टप्प्यात

जी.आय.एस. सर्वेक्षणाच्या माध्यमातून बऱ्याचशा मालमत्ता प्रथमच मालमत्ता कर निर्धारणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. बऱ्याचशा मालमत्तांकरिता संबंधित वॉर्डाच्या राजस्व निरीक्षकांनी/ स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांनी वेळेच्या वेळी मालमत्ता कर निर्धारण केलेले नाही.

त्यामुळे मालमत्ता कर निर्धारणातून मालमत्ता सुटल्याचे जी.आय.एस. सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. ज्या आर्थिक वर्षात असे निदर्शनास आले त्या तारखेपासून जास्तीत जास्त सहा वर्ष किंवा मालमत्ता ज्या वेळी निर्माण झाली, त्या तारखेपासून यामध्ये जो कालावधी कमी असेल अशा कालावधीपासूनच पूर्वलक्षी प्रभावाने मालमत्ता कर निर्धारण करण्यात येणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील इमारत व जमिनीकरिता कलम १५० (अ) च्या तरतुदीन्वये वेळेच्या वेळी मालमत्ता कर आकारणी केलेली नाही, त्यांचेविरूद्ध आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सदर त्रुटी दुरूस्त करण्यासाठी अशा मालमत्तांची नियमानुसार कर निर्धारण कक्षामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

अवैध बांधकामावर शास्ती

अवैध बांधकामावर शास्ती आकारण्याचे आदेश महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीन्वये अनधिकृत बांधकामावर शास्ती आकारणे अपेक्षित आहे. त्यानुसार ६०१ ते १००० चौ.फूट पर्यंतचे निवासी बांधकामाला प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने तसेच १००१ चौ.फूट पुढील निवासी बांधकामासाठी प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्याची तरतूद आहे.

परंतु संबंधित तरतुदीच्या अनुषंगाने इमारत विभागाद्वारे कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्याने नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग व मालमत्ता कर विभागाने समन्वय साधून नागपूर महानगरपालिका सीमेतील अवैध इमारतींवर शास्ती लादण्याचे निर्देश संबंधित झोन सहायक आयुक्तांना देण्यात आलेले आहेत.

मालमत्ता कर निर्धारण, मालकी हक्क हस्तांतरण, मालत्ता कर वसुली, अवैध इमारत बांधकाम याबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतल्या जाणार नाही, असे कडक निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित झोन सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

आक्षेप ग्राह्य नाही!

नागरिकांनी मालमत्तेत बदल केला असेल, नवीन खरेदी केलेली असेल अथवा भोगवट्यात असलेल्या मालमत्तेबाबत प्राप्त भोगवटा प्रमाणपत्र किंवा बांधकाम पूर्णता प्रमाणपत्राच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत मालमत्तेच्या बदलासंदर्भात माहिती घोषित करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात असलेल्या तरतुदीन्वये कर विभागाने नोटीस देऊनही माहिती घोषित करण्यात आली नाही.

मनपाने अशा मालमत्तेसंदर्भात जीआयएस डाटा सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे मालमत्ता कर आकारणीसाठी नोटीस पाठविली. त्यावर विहीत मुदतीत आक्षेप घेणे अपेक्षित होते. मात्र, या तरतुदीचाही उपयोग नागरिकांनी केलेला दिसून येत नाही. मागणी देयक तामील केल्यानंतर आक्षेप घेण्यात येत असून हे नियमाविरुद्ध असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे हे आक्षेप आता ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

-तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरही कारवाई

नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे विकेंद्रीकरण करताना मालमत्ता कर विभागातील राजस्व निरीक्षक/स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांकरिता पूर्वीच्या प्रत्यायोजन आदेशान्वये प्राप्त अधिकारांतर्गत संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वत:चे प्रमुख कर्तव्य विसरून मालमत्तेचे नामांतरण, मालकी हक्क हस्तांतरण, मालमत्ता कर निर्धारणचे कामे चुकीच्या पद्धतीने केल्याचे काही प्रकरणांत निदर्शनास आलेले आहे. सहायक कर निर्धारक व सहायक आयुक्त झोन यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा सुद्धा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे.

जाणून बुजून काही मालमत्ता धारकांना छळण्याच्या हेतूने पूर्वार्धात कामे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी झाली असून प्रकरणनिहाय चौकशीअंती दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईपर्यंत कार्यवाही करण्यात आली आहे. दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारेही मालमत्ता कर निर्धारण करताना हेतुपुरस्सर त्रुट्या करण्यात आल्याचे काही प्रकरणात निदर्शनास आले आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ च्या तरतुदीअंतर्गत कार्यवाही करण्यात येत असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.

का आणी कसा पसरला सोशल मीडियावर बिनोद उल्लेख असलेल्या फनी मेम्सचा ट्रेंड?

गेल्या काही दिवसांत आपण “बिनोद” उल्लेख असलेल्या बर्‍याच कमेंट, मेम्स पाहिल्या असतील. अगदी काही ऑफिशियल वेबसाइट व हॅन्डलर्सनेही या “बिनोद” च्या नावाने ट्वीट केलेले आहे, सोशल मीडियावर हा “बिनोद” एक स्पॅमिंग ट्रेंडच बनले आहे. इतकेच नाही तर ट्विटरवर ‘बिनोद’ च्या नावावर मजेदार मेम्स आणि विनोदही बनले आहेत. ट्विटरकर्ते सारेच ‘बिनोद’ ट्रेंड करत आहे, पण हा बिनोद नेमका कोण आहे हे अद्याप ब-्याच लोकांना माहिती नाही. आपणसुद्धा सोशल मिडियावर मेम्सचा महापूर असलेल्या हा “बिनोद” नेमका कोण आहे आणि स्पॅमिंगचा त्याचा काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्नात असाल तर वृत्त पुर्ण वाचा..

खरंतर, याची सुरूवात स्लेयपॉईंट नावाच्या युट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओसह झाली. व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट विभागात बिनोद नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या नावानेच कमेंट दिली. बिनोद यांच्या नावाच्या या कमेंटला सात पसंती (लाईक) मिळाले. स्लयपॉईंटने ही कमेंट इतकी ताणली कि या छोट्याश्या गोष्टीमुळे, बिनोदचे नाव इंटरनेटवर ट्रेंड झाले.

विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे, ट्रोल करायचा भाग म्हणून नेटिझन्सने या बिनोदचे नाव टाकून व्हिडिओचे स्पॅमिंग सुरू केले. तत्पश्चात जेव्हा कुठलाही यु ट्यूब लाईव्ह विडियो चालू असेल त्यावर कमेंट विभागात “बिनोद” चा पूर येऊ लागला. तर असा हा बिनोद हा अद्याप अज्ञातच होता ज्याने यूट्यूब व्हिडिओंवर आपले‌ नाव चुकिने कमेंट केले आणि स्पॅमर्ससाठी एका नव्या अस्त्राची सुरूवात झाली.

मग विविध माध्यमांवर ” कौन है बिनोद?” हा ही ट्रेंड सुरू झाला. कालांतराने खरा बिनोद हा बिनोद थारू असल्याचेही कळले पण त्यास काही जास्त प्रसिद्धी मिळाली नाही, मात्र “बिनोद” ट्रेंड ची धाव सुसाट सुरू राहिली.

अल्पावधितच हा बिनोद यु ट्यूब व्यतिरिक्त अन्य माध्यमांवरही ट्रेंड बनला. यु ट्यूब वरून इन्स्टा, मग ट्वीटर फेसबुक असं करत जगभर झाली. आता ट्विटरमध्ये बिनोद अव्वल स्थानी आहे. सोशल मीडिया वापरकर्ते बिनोद वरील मजेदार मेम्स आणि विनोद सातत्याने शेअर करताहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल वा ट्रेंड होईल याचा अंदाज कुणालाही करता येणे अवघड आहे हेच सिद्ध होते.

सकाळपासूनच संततधार सुरू, सतर्कतेची साद

नागपुर:- शहरात रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. पाऊस आणि आधी वाच विश्रांती घेतलेली नाही तरी पावसामुळे उदभवणाऱ्या कुठल्याही आपतकालीन परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळविता यावे यासाठी मनपा मुख्यालयातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर येथे ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ उभारण्यात आले आहे.

संपूर्ण शहरभरात लागलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून परिस्थितीचे निरीक्षण करण्यात येते. शहरातून आलेल्या नागरिकांच्या कॉल्सची दखल घेत तात्काळ कार्यवाही केली जाते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज येथून पावसाळी परिस्थितीची पाहणी केली. व या केंद्रातून होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

शहरात कुठे रस्त्यांवर जास्त प्रमाणात पाणी साचले असेल अथवा खोलगट वस्त्यांत पाणी साठले असेल तिथे मदतचमू पाठवून तत्परतेने कार्य येथून संचालित होते. अनेक इमारतींच्या तळ भागात अशा संततधारेणे जलभराव होत असतो व नुकसान होते. नागरिकांनी विनंती कॉल केल्यास त्वरित मदत कार्य सुरू होऊन संभाव्य अडचणींवर मात करता येते.

आता वाहने 60 च्या वेगाने धावतील, 1 महिन्यासाठी नागपूरात चाचणी

नागपूर:- ऑरेंज सिटी आणि आउटर रिंग रोडवरील रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता, पोलिस विभागाने वाहनचालकांना वेगावर मर्यादा घालून दिली आहे. आता शहरातील रस्त्यांवर वाहने ताशी 60 किमी वेगाने धावतील.

जॉइंट सीपी निलेश भरणे यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एक जीआर जारी केला आहे. यामध्ये 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान दुचाकी, कार, ऑटो रिक्षा, ट्रक आणि बस चालकांसाठी नवी वेग मर्यादा घालण्यात आली आहे. 1 महिन्यासाठी समान चाचणी केल्या नंतर सर्व काही नियंत्रणात राहिले तर ही जीआर मुदत वाढविण्यात येईल.

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने वर्ष 2018 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील वाहनांची गती मर्यादा 50 वरून 70 किमी पर्यंत वाढविली आहे. केंद्राच्या या निर्णयावर शहर पोलिसांनी कसलीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) यांचेशी चर्चा केल्यानंतर शहरातील वाहनांची गती मर्यादा वाढविण्याचा निर्णय आता घेण्यात आला.

रस्ते व विकासकामांची दयनीय अवस्था पाहता शहरातील वाहनांच्या गती मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरातील वाहतूक डीसीपी विक्रम सादी यांनी सांगितले की शहरातील आतील व बाहेरील रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची अधिकृत गती वाढविण्यात आली आहे.

नवी वेग मर्यादा इनर आऊटर

  • दुचाकी 60। 70
  • चारचाकी 60 80
  • बस 60 90
  • ट्रक 60 80
  • ऑटो 50 60

6 महिन्यांत 1074 शेतकर्‍यांची आत्महत्या: बावनकुळे यांनी केली आर्थिक पॅकेजची मागणी

नागपूर:- कोरोना साथीने राज्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या 6 महिन्यांत आर्थिकदृष्ट्या सपशेल हरलेल्या 1074 गरीब आणि मध्यमवर्गीय शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतक-यांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे आणि पॅकेज जाहीर न केल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ज्यामुळे या शेतकरी कुटुंबांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे.

ते म्हणाले की, जानेवारी ते जून या 6 महिन्यात जवळपास दररोज 6 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक धक्का शेतक-यांनाच बसला आहे. विशेषत: फळ आणि भाजीपाला उत्पादकांना तर सर्वाधिक फटका बसला. शेतकर्‍यांचे उत्पादन शेतातच पुर्णपणे खराब झाले.

बावनकुळे यांनी तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली, शेतक-यांना आर्थिक पेचातून मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी व नुकसान भरपाई जाहीर करावी. ते म्हणाले की, गेल्या वर्षी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात पिके नष्ट झाली.

लॉकडाऊनमुळे दुसरे संकट शेतकर्‍यांवर आले. भाजीपाल्यास भाव न मिळाल्याने, उत्पादनांची बाजारात विक्री न झाल्याने मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शेतक-यांसाठी पॅकेज सादर करून मदत करावी.

स्वबळावर सक्षमता सिद्ध करा: गडकरी

नागपूर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, दहावीची परीक्षा ही जीवनातली अंतिम परीक्षा नसते. ही तर सुरुवात आहे, जीवन स्वतःच एक मोठी परीक्षा असते. आपल्या ज्ञानाच्या मदतीने आपली क्षमता सिद्ध करा. मनपातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुले मनपाच्या शाळेत शिक्षण घेतात, परंतु हि सर्व मुले शिक्षणामध्ये मागे राहिली, हा समज मनपाच्या मुलांनी खोटा असल्याचे सिद्ध केले.

ते म्हणाले की, मनपा एज्युकेशन चेअरमन आणि अधिका-यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विशेष कोचिंग पॅटर्नला विद्यार्थ्यांचे यश म्हणून पाहिले गेले आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्तेत आलेल्या मनपाच्या 13 विद्यार्थ्यांचा त्यांनी याप्रसंगी सत्कार केला. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, विरोधी पक्षनेते संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाणे, दयाशंकर तिवारी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे आदी उपस्थित होते.

इंग्लिश मीडियमचे आव्हान: सभापति दिवे म्हणाले की, मनपा शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांचे कार्यकाळात शक्य तितके प्रयत्न केले गेले. 22 मनपा शाळांमधील शिक्षकांना वनामतीचे प्रशिक्षण देण्यात आले. दहावीच्या 100 मुलांना निवडण्यात आले व त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले ज्यामुळे मुले चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. ते म्हणाले की शहरातील गरीब मुलांसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात निविदा प्रक्रियादेखील करण्यात आली आहे. कोविड19 मुळे ते काम रखडले आहे.

बाघों को बचाने के लिए सड़क पर उतरे आदिवासी किसान …

बुलढाणा: वर्तमान में अकोला-खंडवा रेलवे लाइन का चौड़ीकरण चल रहा है। रेल मंत्रालय के अनुसार, यह मार्ग मेलघाट टाइगर रिजर्व से होकर गुजरेगा। हालाँकि, इस क्षेत्र में स्वाभिमानी शेतकरी संगठन और आदिवासी सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए बुलढाणा और अकोला जिलों की सीमा पर वरखेड गाँव के पास एक बड़ा आंदोलन शुरू हो गया है ताकि मेलघाट टाइगर रिजर्व के बजाय जिले में अन्य जगह से रेलवे लाइन की माँग की जा रही है।

हाल ही में, मुख्यमंत्री ने रेल मंत्रालय को पत्र लिखकर वैकल्पिक मार्ग की मांग की थी। कल, मुख्यमंत्री ने बाघों को बचाने के लिए उनकी नसबंदी के प्रस्ताव को अस्वीकार कर दिया। इस पृष्ठभूमि पर यह आंदोलन होने वाला है।‌‌

आंदोलनकारियों का विचार है कि इस रेलवे लाइन का निर्माण इस क्षेत्र के आदिवासियों और किसानों के लिए बुलढाणा जिले से किया जाना चाहिए ताकि बुलढाणा जिले में आदिवासी क्षेत्र के विकास के लिए रेलवे द्वारा इस क्षेत्र के किसानों को उनके माल का परिवहन करने में सुविधा होगी। इसलिए, आदिवासी और स्वाभिमानी किसान संगठन आज सुबह सड़कों पर उतरकर आंदोलन में शामिल हुए। रेल मंत्रालय और सरकार को जगाने के लिए घोषणाएँ की गईं।

स्वाभिमानी के विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर के नेतृत्व में सैकड़ों किसान सुबह से ही सड़कों पर उतर आए। मेलघाट टाइगर प्रोजेक्ट रेलवे लाइन को रद्द करके, अकोट बरानपुर बुलढाना जिले के माध्यम से एक रेलवे लाइन बनाई जानी चाहिए। इस मांग को लेकर स्वाभिमानी शेतकरी संगठन सड़कों पर उतर आया है। जंगल को बचाने के लिए और बाघ को बचाने के लिए स्वाभिमान का यह आंदोलन चल रहा है। कई किसानों की जमीन रेलवे लाइन में जा रही है। इसमें मांग की गई है कि केंद्र सरकार और राज्य सरकार द्वारा किसानों को जमीन का उचित मुआवजा दिया जाए।

9 अगस्त क्रांति दिवस पर महात्मा गांधी के विचारों को लेकर आंदोलन किया जा रहा है। लेकिन स्वाभिमानी ने सरकार को चेतावनी दी है कि आने वाले समय में आंदोलन और तेज होगा।‌‌

आकाशवाणी चौकात शोले चित्रपटातल्यासारखी विरूगीरी

नागपूर:- आकाशवाणी चौकात शोले चित्रपटातल्यासारखी विरूगीरी करित एक व्यक्ति आत्महत्येच्या ईराद्याने येथील जिओ सेलफोनच्या उत्तुंग टॉवरवर चढला, तेथून तो उडि मारण्याचे प्रयत्नात होता.

अल्पावधितच पोलिस, अग्निशमन दल व पत्रकारांचाही ताफा घटनास्थळावर पोचला, तोवर बघणा-यांचीही चिक्कार गर्दी जमा झाली. पोलिसांना जमाव व वाहतूकीवर नियंत्रण मिळवावे लागले.

नशिबाने विरूचा रोल करणा-या धर्मेंद्र प्रमाणेच या प्रकरणाचा अंत सुखद झाला, सदर इसमाची वृत्त लिहेपर्यंत ओळख पटू शकली नव्हती तर तो कोणत्या उद्देश्याने वा मागण्यांचे पुर्ततेसाठी या प्रकारास धजावला हे ही समजलेले नाही

लॉकडाउन के भरोसे ना रहो, खुद अपनी जीवन शैली बदलो: मुंढे

नागपुर: नगर आयुक्त मुंढे कल तक कोरोना नियंत्रण के लिए लॉकडाउन की कोशिश में थे। हर दो या तीन दिन में वह चेतावनी जारी करते थे। लेकिन कल उन्होंने संवाददाताओं से कहा कि कोरोना पर काबू पाया जा सकता है अगर लोग लॉकडाऊन पर अवलंबीत होने के बजाय अपनी जीवन शैली और आदतों को बदल दें।

मुंढे ने पालक मंत्री और नगर निगम की ओर से आयोजित कोरोना समीक्षा बैठक में लॉकडाउन पर जोर दिया था। इस बैठक में, मुंढे को छोड़ सभी ने लॉकडाऊन का विरोध किया था। मेयर जोशी ने लॉकडाऊन को रोकने के लिए दो दिन का जनता कर्फ्यू लगाने का फैसला किया था। जिसमे लोगों ने जमकर सफल बनाया। इसके बाद भी, ऐसी आशंका थी कि मुंढे कभी भी लॉकडाऊन करेंगे। इसलिए, महापौर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस कर चेतावनी दी थी कि अगर हमे जबरन लॉकडाऊन में डाला जाएगा तो हम सड़क पर उतरेकर प्रदर्शन करेंगे।

वर्तमान में कोरोना रोगियों की संख्या और शहर में होने वाली मौतों में जबरदस्त वृद्धि हुई है। इस पृष्ठभूमि पर फिर से लॉकडाउन लगाया जा सकता है क्या? यह सवाल मुंढे से किया गया, तो उन्होंने उल्टे पूछा कि लॉकडाउन लगाने से क्या फायदा होगा। लॉकडाउन तोड़ने वाले भी बहुत हैं। आप इसे फिर न्युज बनाओगे। अंततः, लॉकडाउन की सफलता या विफलता नागरिकों पर निर्भर करती है। उनके सहयोग के बिना कुछ भी सफल नहीं हो सकता। क्या इसका मतलब यह है कि लॉकडाउन लागू नहीं किया जाएगा? यह पूछे जाने पर, “मैंने यह भी नहीं कहा, आप ही इससे गलत मतलब निकाल रहे हैं,” मुंढे ने कहा।‌‌

अगर मैं लॉकडाउन लगाता हूं, तो यह केवल 14 दिनों के लिए होगा। एक दिन भी कम या ज्यादा नहीं होगा। मुंढे ने कहा कि नागरिकों को चार दिन पहले नोटिस दिया जाएगा। लॉकडाउन प्रशासन के लिए नहीं बल्कि जनता के लिए है। उन्होंने यह भी कहा कि यदि आप फेस मास्क नहीं पहनते, अपनी जीवनशैली में बदलाव न लाए, नियमों का पालन न करें, तो लॉकडाउन भी समस्या का समाधान नहीं करेगा।

प्रचार के आरोप: मुझे शोहरत का बहुत शौक है। इसलिए, यह आरोप लगाया जाता है कि यह इलेक्ट्रॉनिक्स और सोशल मीडिया पर लगातार चमकने कुछ न कुछ करते रहता हू। इसमें कोई तथ्य नहीं है। सभी फुटेज देखें। आज तक, मैंने कोविड के अलावा किसी भी विषय पर बात नहीं की है। उन्होंने अपने विरोधियों द्वारा लगाए गए सभी आरोपों का खंडन करते हुए कहा कि उन्होंने जो कुछ भी कहा वह कोरोना और स्वच्छता के बारे में था।‌‌

आरोग्य विभाग जिल्हा परिषदेत कोरोना, घाबरलेल्या कर्मचार्‍यांत संताप

नागपूर:- जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागात कोरोनाचा पाश पोहोचला आहे. विभागाचे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. वैद्यकीय तपासणीत त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आणखी एक अधिकारीही पॉजिटिव्ह आढळले आहे.

काही दिवसांपूर्वीच तहसील कार्यालयात एक वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर तहसील कार्यालय बंद होते. परंतु जिल्हा परिषद विभागात पॉजिटिव्ह आढळून आल्यानंतरही कर्मचार्‍यांना ड्युटीवर बोलावले जात असल्याने त्यांच्यात भीती व संताप वाढतो आहे.

काही कर्मचार्‍यांनी त्यांच्या विभागप्रमुखांना सीईओ कुंभजेकर यांना काही दिवस कार्यालय सिल करण्याची विनंती केली आहे. भंडारा आणि अहमदनगर जिल्हा परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण कार्यालय सीलबंद करुन काही दिवस स्वच्छता सॅनिटाईजेशन कामे करण्यात आली. परंतु येथे कोरोनापासून कर्मचार्‍यांचे रक्षण करण्यासाठी सीईओंनी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.

Exit mobile version