नागपुर: चिटणीसपुरा, महाल
येथील चिटणीसवाड्याची भिंत आणि कवेलूचे छत कोसळले, आज दुपार सुमारास झालेल्या मुसळाधार पावसामुळे हि घटना घडली असून जिर्ण झालेली हि भिंत व बांधकाम कोसळले, सदर बांधकाम बरेच वर्ष जुनं असल्याने त्याबाबत दक्षता घेतली जात होती यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अश्याच प्रकारची बरीच जुनी बांधकामे असलेल्या ठिकानी नागरिकांनी सजग रहाने जरूरीचे आहे, हवामान खात्याने पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता वर्तविलेली आहे, आज पावसाने शहरास वादळी तडाख्याचा अनुभव दिला, दिड तास सपाटून पाण्याच्या मा-याने सर्वच परिसरांत पाणी साचले तर बरेच रस्ते पाण्याने दुथडी भरून वहात असल्याचे चित्र होते
Category: Nagpur Local
विशेष बैठक: नागपुर, चंद्रपुरचे पालकमंत्री व जिल्हाधिका-यांची उपस्थिति
नागपुर:- आज नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अवैध रेती वाहतुकीने निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था या विषयावर गृह व इतर संबंधित विभागांची बैठक घेतली. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत जी, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे आमदार आशिष जयस्वाल जी, विभागीय आयुक्त, नागपूर डॉ. संजीव कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नागपूरचे पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प नागपूर योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
तसेच या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, गोंदियाचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उमस्थित होते.
कोरोना तपासनी: खासगी लॅबोरेटरींसाठी सरकारने निश्चित केला दर
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी स्पष्ट केले की सरकारने खासगी प्रयोगशाळांत केल्या जाणा-या कोरोना विषाणू चाचणीचे दर 4500 रुपयांवरून कमी करून 2200 रुपये केले आहेत. या चाचणीचे दर कमी केल्याने आता लोकांना थोडा दिलासा मिळेल.
ते म्हणाले, ‘व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया (व्हीटीएम) च्या माध्यमातून स्वॅब गोळा करण्यासाठी रुग्णालयांना आता 2200 रुपये आकारण्यात येणार आहे, तर थेट घरून स्वॅबचे नमुने गोळा करण्यासाठी 2800 रुपये मोजावे लागतील. पूर्वी ही फी अनुक्रमे 4500 आणि 5200 रुपये होती.
आरोग्यमंत्र्यांनूसार सुधारित दर प्रयोगशाळांकडून आकारले जाणारे कमाल दर असतिल. हे दर आणखी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी खासगी प्रयोगशाळांशी बोलू शकतात. “खासगी प्रयोगशाळांनी याहून जास्त शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” हे नवीन दर देशात सर्वात कमी असल्याचाही त्यांनी दावा केला.
कोविड -19 च्या चाचणीसाठी राज्यात सध्या 91 प्रयोगशाळा असून जवळपास चार ते पाच लवकरच तयार होतील. सरकारने मागील आठवड्यात राज्यातील अधिकृत खासगी प्रयोगशाळांद्वारे घेतल्या जाणार्या कोविड -19 चाचण्यांचे दर निश्चितीसाठी चार सदस्यीय समिती गठीत केली होती.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) राज्यातील 44 सरकारी आणि 36 खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणूची तपासणी करण्यास परवानगी दिली आहे. सरकारी-प्रयोगशाळांत चाचण्या मोफत असतात. तर आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी 4500 रुपये शुल्क निश्चित केले होते.
पूर्वी चाचणीसाठी आवश्यक असे किट आयात केले जात होते. त्यामुळे आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांसाठी हे शुल्क निश्चित केले होते. मात्र, आता किट भारतातच तयार केल्या जात आहेत, करिता आयसीएमआर खासगी प्रयोगशाळांशी नवीन दर विचारणा करत त्याबाबत निर्णय घेऊ शकले.
पावसाळ्याआधीच नद्यांचे पुनरुज्जीवन
नागपूर: पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाउनच्या कालावधीतच शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम पावसाळ्याआधीच पूर्ण केले आहे. या कामगिरीचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले.
ट्विटवर मुंढेनी याबाबत माहिती दिली: नाग नदीचे पुनरुज्जीवन केले गेलेय. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह कायम ठेवण्याचं काम करतात. महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केलेय. नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण आपले कर्तव्य आहे, शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांत नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. त्यामुळेच नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्वच्छ केली पाहिजे या विचारांती केवळ स्वच्छता मोहीमच नाही तर पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. सामान्यपणे मे महिन्यात हे काम व्हायच पण लॉकडाऊन मुळे मार्चमध्येच काम सुरु केलं आणि आज तिन्ही नद्या नागपूरकरांना पुर्वीसारख्याच स्वच्छ स्वरुपात भेट म्हणून देण्यात येत आहेत. या नदीमध्ये मोठ्याप्रमाणात घनकचरा, द्रव्य आणि प्राण्यांची संख्या होती हे दिसून आलं. दरवर्षी केवळ गाळ काढून नदीचकिनारी ठेवला जायचा. पावसाळ्याच्या काही दिवस आधी घाईघाईत ही सफाई व्हायची, काढलेला गाळ दुसऱ्या जागी हलवण्याआधीच पाऊस यायचा आणि गाळ पुन्हा नदीत जायचा. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी साचायचे. याच गोष्टी टाळण्यासाठी या वर्षी नदीपात्रातून काढलेला गाळ आणि कचऱ्याची शहरातील इतर भागांमध्ये विल्हेवाट लावली. यामुळे दोन फायदे झाले. नदी पूर्णपणे स्वच्छ होऊन आधीसारखी दिसू लागली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या नदीमधील गाळ शहरातील सखल भागामध्ये टाकल्याने तिथेही पाणी साचण्याची शक्यता कमी झालीय. नाग नदीचा शहरात १७ किलोमीटरचा फेरा आहे. या १७ किलोमीटर अंतरास ५ टप्प्यांमध्ये, पिवळी नदीची ४ टप्प्यांमध्ये तर पोरा नदीची ३ टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. पुन्हा या कामाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर न देता प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच जलदगतीने काम शक्य झालं. शहरातील एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या पात्रामधून घाण, कचरा आणि गाळ कढण्यात आला. महानगरपालिकेने अवघ्या दोन महिन्यांमध्ये इतर संस्थाच्या मदतीने हे काम करुन दाखवलं
आदित्य ठाकरे यांनीही मुंढेंचे ट्विट रिट्विट करत या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “आम्ही नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वचनबद्ध आहोत. या कायाकल्पाला या वर्षाच्या सुरूवातीला पाठिंबा देत पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने मान्यता दिली होती” असे त्यांनी लिहिलेय.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? मुख्यमंत्री कार्यालयातर्फे खंडन
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे 97648 संख्येवर पोचली आहेत आणि संक्रमणामुळे आतापर्यंत 3438 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशासह अनेक राज्यांत लॉक-डाऊन पुन्हा सुरू करण्याची शक्यता ठिकठिकाणी वर्तविली जात आहे. यास विराम लावण्याकरीता मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या अफवेचे खंडन करण्यात आले.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही, असे महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना कोठेही गर्दी करू नये व सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती केली आहे.
मान्सून अखेर राज्यात: नागपूरात पुढचे २ दिवस जोमदार
नागपुर: तिव्र गर्मीचे दिवस संपले, यंदा मान्सूनपुर्व सरिंनीही शहरात सुखद वर्षाव केला, तर काल मान्सूनचा प्रथम पाऊसही दिलासादायी बरसला. हवामान विभागाच्या अहवालांतही शहरात या वर्षाच्या मान्सूनच्या सुरूवातीच्याच हंगामात आगामी दोन दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
भारतीय हवामान खात्यानूसार मुंबईच्या पालघरमध्ये आणि ठाणे व इतर ठिकाणी ईशारा दिला आहे, जेथे तिव्र गडगडाटांसह विजा व मुसळाधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकानी 30 ते 40 किमी प्रतितासाचे गतिसह हा वर्षाव होईल. अहवालानुसार, उत्तरेकडील चालू असलेला कमी दाबाचा पट्टा या पर्जन्यप्रक्रियेच्या हालचाली बनवतोय ज्यामुळे शहरात पावसाच्या घडामोडींस विकास मिळेल.
यात मुंबई, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक ठिकाणांचा समावेश राहील, जेथे दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्र प्रभावित होताहेत व यापुढेही होतील. याखेरीज त्रिपुरा, आसाम आणि मिजोरमसह इतर राज्यात प्रचंड पाऊस संभवतो.
कोरोनटाईन सेंटर में सेवा दे रहे हैं मनपा कर्मचारियों का सत्कार किया गया।
नागपुर:- वाठोडा स्थित सिंबोसिस कॉलेज के कोरोनटाईन सेंटर में पिछले दो महीनों से निरंतर अपने घर-परिवार से दूर रहें कर अपनी सेवा दें रहें मनपा के अधिकारी एवं सफाई कर्मचारियों का नेहरू नगर झोन सभापति तथा प्रभाग क्रं 26 की नगरसेविका सौं समिता ताई चकोले एवं प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना नागपुर अध्यक्ष राकेश गांधी, भाजपा पुर्व नागपुर के उपाध्यक्ष राजेंद्र चकोले के नेतृत्व में सोशल डिस्टेंसींग का ध्यान रखकर, सभी प्रकार के एतिहात बरतते हुए कोरोना योद्धाओं का पुष्पगुच्छ भेंट देकर सत्कार किया गया।
नेहरू नगर झोन सभापति तथा प्रभाग क्रं 26 की नगरसेविका सौं समिता ताई चकोले ने वाठोडा स्थित सिंबोसिस कॉलेज के कोरोनटाईन सेंटर में पिछले दो महीनों से मनपा के अधिकारी एवं सफाई कर्मचारियों को उनके सेवा कार्यों के लिए धन्यवाद देते हुए कहा की कोविड-19 से जारी जंग में प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र जी मोदी ने हर बार देश को संबोधित करते कहां है की कोरोना योद्धाओं को हर तरीके से सम्मान मिलना चाहिए एवं हमें यह ध्यान रखना चाहिए कि वे अपने घर-परिवार से दूर रहकर हमारे लिए निरंतर अपनी सेवा दे रहे है सो इसलिए आज हम भी आप सभी का यह सम्मान करने जा रहें हैं और आप लोगों के सेवा कार्यों के सामने यह सम्मान हमारे तरफ से बहुत छोटा सा प्रयास है आप लोगों के प्रति हमारा आभार व्यक्त करने का।
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना नागपुर अध्यक्ष राकेश गांधी ने मनपा के अधिकारी एवं सफाई कर्मचारियों का सत्कार करते हुए सभी को उनके सेवा कार्यों के लिए आभार व्यक्त करते हुए धन्यवाद कहा। इस अवसर पर प्रमुखता से भाजपा प्रभाग क्रं 26 के वार्ड अध्यक्ष सुरेश बराई, रामशरण बनीया, सौं छाया गुजेंवार आदि भाजपा के पदाधिकारी गण उपस्थित थे।
मानमोडे लेआउट आणि मार्टिनगर परिसर सील: मनपाने केले कंटेनमेंट झोन घोषित
नागपूर:- शहरातील काही भागात कोरोना रूग्ण आढळल्यास, आजूबाजूच्या भागात सीलिंगची प्रक्रिया स्वीकारली गेली, त्याच क्रमात आता मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग 11 मधले मानमोडे लेआउट, झिंगाबाई टाकळी आणि प्रभाग 1 चे मार्टिननगरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने लोकांच्या सुरक्षिततेसाठी व संसर्ग दुष्परिणाम रोखण्यासाठी या परिसरास सीलबंद करण्यासाठीचे आदेश मनपा आयुक्त मुंढे यांनी निर्गमीत केले.
या भागातील सर्व हालचालींस तातडीचे प्रभावाने बंद केले गेले, सीमा सील करण्याचे आदेश दिले. केवळ तातडीच्या सेवेत काम करणार्या सरकारी व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना, वैद्यकीय कारणास्तव, डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअरचे दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, पासधारक आणि पोलिसांद्वारे वितरीत पासधारक जे आवश्यक वस्तू पुरविणा-या लोकांत मोडतात अशांना यात सूट देण्यात आली आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी झोन प्रभाग 11 अंतर्गत, मानमोडे लेआउट, झिंगाबाई टाकळीतील दक्षिण-पूर्वेतील सनशाईन इमारत, दक्षिण-पश्चिमेतील राजेंद्र निठोणे, उत्तर-पश्चिमेकडील रोहन खंडेलवाल यांच्या यांच्या इमारतीचा परिसर आणि ईशान्येकडील शंकरराव राठोड यांच्या निवासस्थानापर्यंतचा परिसर बंद केला.
त्याचप्रमाणे प्रभाग 1 च्या मार्टिनगरच्या दक्षिण-पूर्वेस भगवान लांजेवार यांच्या निवासस्थानापर्यंत, दक्षिण-पश्चिमेस मायकेल फर्निचर, उत्तर-पश्चिमेस मारिस सिरिलचे निवासस्थान, उत्तरेस पिंटू किराणा व उत्तर-पूर्वेतील गणेश सहारे यांचे निवासस्थानापर्यंत बंदी जाहीर केली. मनपाचे अधिकारी आणि पोलिस प्रशासनास योग्य कारवाईचे निर्देशही देण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रात, तातडीच्या घटना वगळता, इतर हालचाली पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
तर शहरात होईल कोरोना स्फोट: आयुक्त मुंढे
नागपूर:- ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारचे मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात संचारबंदीत सूट देण्यात आली आहे, परंतु सूट मिळाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष देऊन सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर शहरातील ‘कोरोना स्फोट’ तिव्रतेने वाढण्याचा इशारा मनपा आयुक्त मुंढे यांनी दिला. याची तीव्रता गांभीर्याने घेत त्यांनी लोकांना नियमपालनाचे आवाहन केलेय.
ते सांगतात, कोविड19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करत लोक बेजबाबदारपणे काम करताहेत, कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. चारचाकी वाहनात एक प्लस टू आणि दुचाकीवर केवळ एका व्यक्तीस परवानगी आहे, त्याचे उघडपणे उल्लंघन केले जाते आहे.
जनतेसाठी धोकादायी: लॉकडाऊनमध्ये सूट मिळणे म्हणजे स्वतःचे आणि इतरांचा जीव धोक्यात आणणे नव्हे. सूट मिळाल्यानंतर लगेचच मास्कनिना सार्वजनिक ठिकाणी जाणे, सामाजिक अंतर न पाळणे, गरज नसेल तरी घराबाहेर पडने यामुळेच संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ही लोकांसाठी धोक्याची बाब आहे.
सध्या देण्यात आलेल्या सवलतींत अशा उल्लंघनांच्या घटनावाढीतही काटेकोरपणे कारवाई केली जात नाही. परंतु जर तत्सम नियमांचे उल्लंघन होतच राहिले तर संबंधितांवर आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई केल्या जाईल. त्यामुळे कोरोनाशी लढयात प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नाईक तलाव, बांग्लादेश परिसरात संवाद:
सतत रूग्णसंख्या वाढ आढळत असलेल्या नाईक तलाव आणि बांग्लादेश परिसरांत लोकांत दहशत वाढतेय करिता मनपाच्या अधिका-यांच्या पथकाने तेथे लोकांना संवाद साधत दिलासा दिला आहे. संवादादरम्यान त्यांनी सांगितले की एकमेकांशी संपर्कात आर्यावर्त कोरोनाचा संसर्ग पसरतो. रुग्णालयांत कोरोनावर यशस्वी उपचार केला जातोय, बरे होणार्यांची संख्या वाढती आहे. म्हणूनच, लक्षणे दिसल्यास विलगीकरनात जाण्याचा सल्ला दिल्यास प्रशासनाने विरोध करू नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, विलगीकरण कक्षात रहाणे आवश्यक आहे
मुंढे आणि पोलिसांत पुन्हा बेबनाव: नाईक तलाव बिर्याणी पार्टी प्रकरण
नागपूर:- लॉकडाऊन दरम्यान पोलिस विभाग आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी कोरोना विषाणूसंसर्ग नियंत्रणाचे श्रेयावरून वाद निर्माण झाला होता. आता नाईक तलाव बिर्याणी पार्टी प्रकरणामुळे संसर्गविषयक विधानाबाबत पुन्हा तसे पुढे येत आहे.
नाईक तलाव परिसरात अचानक कोरोना उद्रेक आढळल्याने मनपा आयुक्त मुंढे यांनी वक्तव्य दिले होते की, लॉकडाऊन संपल्याच्या आनंदात एका युवकाने आपल्या घरात बिर्याणी पार्टी आयोजित केली व बर्याच मित्रांनी त्या पार्टीत भाग घेतला. तेथून संसर्ग वेगाने पसरला. बिर्याणी पार्टीमुळे नाईक तलाव परिसरात कोरोना पसरल्याची बातमी देशभर पसरली. पोलिसांनी या विषयाचा तपास सुरू केला आणि बिर्याणी पार्टिच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचा दावा केला. परिसरात अशी कोणतीही पार्टी झाली नाही.
या झोनचे डीसीपींनी 10 ते 12 जणांचे नोंदवलेल्या जबाबात ही गोष्ट आतापर्यंत खोटी ठरली असल्याचे सांगीतले. ज्या युवकावर पार्टी आयोजनाचा आरोप आहे, त्यानेही पोलिस चौकशीत स्पष्ट नकार दिलाय. इतकेच नव्हे तर शेजार भागात राहणा-या 10 ते 12 जेष्ठ नागरिकांचीही जबाब पोलिसांनी नोंदविलेत त्यानुसार असा कोणताही प्रकारचा कार्यक्रम परिसरात झाला नव्हता.
दाट लोकवस्तीच्या या भागात एकमेकांचे लहानसहान गोष्टीही लपून रहात नाही, परंतु सर्वजण तसा प्रकार घडल्याबाबत नकार देत आहेत, खोटी माहिती पसरवून नागरिकांत दहशत माजविण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ही बातमी कोणी पसरविली त्याची कसून चौकशी केली जाईल. आणि कायदेशीर कारवाई देखील करू.
लॉकडाऊनमध्ये पार्टी कशी? चौकशीदरम्यान असे समजले की, ज्या तरूणावर पार्टी आयोजित करण्याचा संशय आहे तो रोजंदारी करतो. 26 मे रोजी तो रुग्णालयात गेला आणि 27 तारखेला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर 4 मे पर्यंत त्यास रुग्णालयातच दाखल केले होते. दरम्यान, 31 मे रोजी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले.
अशा परिस्थितीत तो लॉकडाऊन संपल्यानिमित्त पार्टी कसा देऊ शकेल. या युवकाने स्वत: पोलिसांना सांगितले की, गेल्या 3 महिन्यांपासून टाळेबंदीमुळे काम बंद होते. त्याचे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. स्वत:ची प्रकृती बिघडली असता तो इतरांना पार्टी कसा देऊ शकेल?
