स्मार्ट सिटीच्या सायकल ट्रॅक कार्याचा शुभारंभ

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या माध्यमाने १८ किमी मधून ६ किमी लांब डेडीकेटेड सायकल ट्रॅकच्या पहिल्या चरणाचे कार्याचा शुभारंभ नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी मुख्यमंत्री बंगला रामगिरीच्या समोर गुरुवारी (२८ जानेवारी) ला सकाळी पारंपारिक पध्दतिनी केला. पहिल्या चरणामध्ये ६ किमीचा सायकल ट्रॅक तयार होईल.

या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) श्री. राजेश दुफारे, महाव्यवस्थापक (पर्यावरण) डॉ. प्रणिता उमरेडकर सुध्दा प्रामुख्याने उपस्थित होते.
केन्द्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, स्मार्ट सिटीज मिशनच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेले इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रम मध्ये शापूरजी – पॉलनजी कंपनीकडून प्राप्त सी.एस.आर निधितून सायकल ट्रॅकच्या निर्माण होणार आहे.
मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने १८ किमी लांब सायकल ट्रॅक प्रस्तावित केला आहे. आता प्रथम चरण मध्ये ६ किमीचा ट्रॅकचे काम सुरु केलेले आहे. कोव्हिड-१९ च्या काळात मोठया प्रमाणामध्ये नागरिकांनी सायकलचा वापर केला. सायकल चालविणे आपले शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक आहे तसेच पर्यावरणालापण याचा मोठा फायदा होतो. सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी वेगळयाने जमीन संपादन करण्याची गरज नाही. आता नवीन रस्त्याचे निर्माण करतानाच सायकल चालविणेसाठी सायकल ट्रॅकचा डिजाईन मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी सांगितले की, इंडिया सायकल्स फार चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत १८ किमीच्या सायकल ट्रॅकचा निर्माण नागपूर स्मार्ट सिटीच्या माध्यमाने केला जात आहे. सायकल चालविणा-यांसाठी ही फारच मोठी संधी स्मार्ट सिटीच्या वतीने उपलब्ध करुन दिली जात आहे. आमचा प्रयत्न आहे की नागरिकांनी जास्तीत- जास्त सायकलचा वापर करावा त्याच्यातुन ते निरोगी राहतील आणि प्रदूषण कमी करण्यात मोठी मदत होईल.
काटालाईन इंफ्रा प्रोडक्ट प्रा.लिमिटेड सायकल ट्रॅकचा निर्माण करत आहे. फुटपाथ लगत १.५ मीटर रुंद सायकल ट्रॅकसाठी कोल्ड प्लास्टीक पेंटचा वापर करण्यात येत आहे. ही माहिती प्रबंध निदेशक श्री. अमित थत्ते यांनी दिली. यावेळी महाव्यवस्थापक श्री. रोहित सराफ आणि पश्चिम क्षेत्र प्रमुख श्री. आनंद गिजरे, स्मार्ट सिटीचे डॉ.पराग अरमल, डॉ. मानस बडगे, डॉ. संदीप नारनवरे सुध्दा उपस्थित होते.
प्रथम चरणामधे : रामगिरी – लेडीज क्लब – लॉ कॉलेज चौक – महाराजबाग – विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान – जपानी गार्डन – रामगिरी या रस्त्यावर काम करण्यात येत आहे.
प्रस्तावित १८ किमी सायकल ट्रॅक : लॉ कॉलेज चौक – भोले पेट्रोल पंप – नीरी – यू टर्न घेऊन भोले पेट्रोल पंप – महाराजबाग – वीसीए – जपानी गार्डन – टीव्ही टॉवर – वासुसेना नगर – फुटाळा तलाव – वॉकर्स स्ट्रीट – लेडीज क्लब – लॉ कॉलेज.

8 फेब्रुवारीपासून मनपाच्या शाळा होतील सुरू:पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होतील

नागपूर:- महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये 8 फेब्रुवारीपर्यंत वर्ग 5 ते 8 च्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी शनिवारी हे आदेश काढले. वर्ग 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले होते. ग्रामीण भागातही काही दिवसांपूर्वी वर्ग सुरू झाले. इयत्ता 8 वी पर्यंत वर्ग कधी सुरू होतील याबद्दल चर्चा सुरब होती. तथापि, कोरोना संसर्ग लक्षात घेता, शाळा व्यवस्थापन आणि मुलांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांसह वरील आदेश शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी जारी केले आहेत.

शिक्षक आणि कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यकः राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या मिशन अगेन अंतर्गत जाहीर केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे या आदेशात म्हटले आहे. शैक्षणिक व क्रीडा विभागाने 10 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या एसओपीची काळजी घ्यावी लागेल. यानुसार हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळेप्रमाणेच मनपाच्या शाळेतही 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग घेणारे शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांना आरटीसीपीआर चाचणी अनिवार्य असेल.

त्याशिवाय कोणताही शिक्षक किंवा शालेय कर्मचारी ड्युटी करू शकणार नाहीत. त्याच वेळी, शाळांना थर्मामीटर, थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सिमीटर सारख्या वैद्यकीय गॅझेट्स ठेवणे आणि त्यांचा वापर करणे आवश्यक केले आहे. शाळांमध्ये स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. हात धुण्यासाठी विद्यार्थ्यांना साबण आणि पाणी उपलब्ध करून द्यावे लागेल.

पालकांची लेखी संमती अनिवार्य: या दरम्यान, शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, स्टाफ रूममध्ये आणि विद्यार्थी ज्या ठिकाणी शाळेत उपस्थित आहेत अशा ठिकाणी सामाजिक अंतराचे कठोरपणे पालन करावे.

शाळा व परिसरातील स्वच्छता राखणे, आवश्यक साहित्य पुरविणे व वेळोवेळी तपासणी करणे ही जबाबदारी मनपा, शिक्षणाधिकारी, जिप प्राथमिक-माध्यमिक शिक्षण विभागाची असेल. त्याशिवाय स्कूल बसच्या स्वच्छतेसंदर्भात कठोर सूचना आहेत. त्याअंतर्गत, स्कूल बसेसना दिवसातून 2 वेळा स्वच्छ करावी लागेल (मुले जेव्हा बसतात आणि उतरतात तेव्हा).

बंद खोल्यांमध्ये वर्ग होणार नाहीत: याशिवाय कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये वर्ग घेण्यास सक्तीने निषिद्ध आहे. खोलीतील सर्व खिडक्या आणि दारे खुले असणे आवश्यक आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी व्यवस्थापनास सर्व स्वच्छताविषयक आवश्यक साहित्य आणि आवश्यक नियमांशी संबंधित व्यवस्था करावी लागेल.

शहरातील कोचिंग क्लासेस सुरू करण्यास मनपाची सशर्त परवानगी

मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग, संगणक प्रशिक्षण संस्था आदी कोचिंग क्लासेस कोव्हिड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करून १८ जानेवारी २०२१पासून सुरू करण्याबाबत नागपूर महानगरपालिकेद्वारे परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी (ता.१८) आदेश निर्गमित केले आहेत.

शहरातील कोचिंग क्लासेस सुरू करण्यात यावेत या मागणीसंदर्भात ‘इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग असोसिएशन’द्वारे महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन देण्यात आले होते. कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑफलाईन शिकवणी विना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा प्रभाव त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावरही पडतो. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक सकारात्मक निर्णय घेण्याबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली. महापौरांशी झालेल्या सविस्तर चर्चेअंती आयुक्तांनी सोमवारी (ता.१८) आदेश निर्गमित केले.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार इयत्ता नववी पासून पुढील कोचिंग क्लासेस सॅनिटायजेशन व सोशल डिस्टंसिंगबाबतचे मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. कोचिंग क्लोसेससह मनपा क्षेत्रातील विविध शासकीय प्रशिक्षण संस्था उदा. वनामती आदींना प्रशिक्षण सुरू करण्याकरिता सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे मानक कार्यप्रणाली निर्गमित केल्यानुसार त्याचे अनुपालन करणे आवश्यक राहिल.

क्रीडा स्पर्धा, उपक्रमांच्या आयोजनाला सुद्धा परवानगी
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षण घेतात अशा संस्थांना क्रीडा स्पर्धांचे आयोजन, बैठक व विविध क्रीडा उपक्रमांच्या आयोजनाबाबतही मनपा आयुक्तांद्वारे परवानगी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध क्रीडा प्रशिक्षण संस्थांचा समावेश असून यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे स्वतंत्रपणे मानक कार्यप्रणाली निर्गमित केल्यानुसार त्याचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सुचनांचे पालन करणे बंधनकारक
प्रशिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लासेस सुरू करताना सदर संस्थांनी कोव्हिड-१९च्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. प्रशिक्षणार्थी प्रवेश करताना थर्मल गनद्वारे नियमित तपासणी करावी. मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सर्व संस्थांमधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोव्हिड-१९साठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. सदर संस्थांनी प्रवेश दारावर तसेच प्रशिक्षण सभागृहामध्ये सॅनिटायजर मशीन उपलब्ध करून देणे बंधनकारक राहिल. दोन प्रशिक्षणार्थींमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. सभागृहाच्या एकूण आसन क्षमतेच्या ५०टक्के पेक्षा जास्त उपस्थितीला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. दोन बॅचमध्ये किमान अर्धा तासाचे अवकाश ठेवून प्रत्येकवेळी सभागृह तसेच संगणक साहित्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहिल. मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्गांना लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

News Credit To NMC

सोमवारपासून शहरातील सर्व फुटपाथ, रस्ते अतिक्रमणमुक्त करा

शहरातील सर्व झोन अंतर्गत येणारे रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याबाबत कारवाईला सोमवारपासून गती द्या, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपायुक्त महेश मोरोने व सर्व सहायक आयुक्तांना दिले.

शहरात फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण संदर्भात मनपाने अतिक्रमणधारकांविरुद्ध कठोर पाऊले उचलली आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आपल्या आदेशात शहरातील सर्व भागांमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी एकाच वेळी मोहीम चालविण्यास सांगितले आहे. मनपा आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देत सांगितले की, सर्व भागांमध्ये प्रभावी कारवाई नियमित होताना दिसली पाहिजे. यासाठी कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, सिव्हील इंजिनिअरिंग असिस्टंटसह 8 मजूर मिळून प्रत्येक वॉर्डात पथकाचे गठन करून मोहीम राबविण्यात येईल.

कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई
अभियानादरम्यान अतिक्रमणाबाबत ढिसाळ धोरण अवलंबविणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि जर एखादी तक्रार किंवा गडबड आढळल्यास विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपा आयुक्तांनी दिला आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर उपायुक्त महेश मोरोने यांनी सर्व झोनशी संबंधित अधिकाऱ्यांना ही मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच त्यांनी अतिक्रमणधारकांना फुटपाथ आणि रस्त्यांवर ताबा न करण्याचे आवाहन केले आहे.
शहरात सोमवारपासून फुटपाथ आणि रस्त्यांना अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात येईल. या दरम्यान आता प्रत्येक भागात अतिक्रमणधारकांचे सामान जप्त केले जाईल आणि कोणत्याही स्थितीत परत मिळणार नाही. मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेल्या सामानाचा लिलाव मासिक तत्वावर केला जाईल, असेही मनपा आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

News Credit To NMC

शहरांतले प्रसाधनगृह आता जी-मॅप वर

नागपूर:- शहर स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण पुढाकार, आपल्या जवळचे प्रसाधनगृह सहजतेने शोधता येईल आता गुगल मॅपवर.

शहरात स्वच्छतागृहांच्या बाबतीत महापालिकेतर्फे संपन्नतेचे वातावरण बनविले गेले आहे, सार्वजनिक प्रसाधन गृहांची माहिती जनसामान्यांना सुलभतेने व्हावी याकरिता अशा प्रसाधनगृहांना गुगल मॅप वर अधिकृतरीत्या नोंदणीकृत केले गेलेले आहे. या सुविधेमुळे शहरातील अनोळखी परिसरात फिरत असताना निसर्गविधींसाठी त्यांची गरज पडली तर आता फक्त एका क्लिकवर अशा प्रसाधनगृहांची माहिती तातडीने मोबाईलवरच माहिती पडेल व पुढील आपात परिस्थितीपासून नागरिकांची सुटका होणार. मनपा ने त्यांचे प्रसिद्धि स्थळावर हि माहिती दिली आहे, हा एक चांगला व अभिनव उपक्रम महापालिकेने राबविला आहे व याविषयी महापालिकेचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

गांधीबाग झोनमध्ये साडेचार टन प्लॉस्टिक जप्तl

प्रतिबंधित प्लॉस्टिक संदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गांधीबाग झोनमध्ये मंगळवारी (ता.१२) मोठी कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोनमधील उपद्रव शोध पथकाचे (एनडीएस) प्रमुख सुशील तुप्ते आणि त्यांच्या पथकाद्वारे ४ हजार ५०० किलो (साडेचार टन) नॉन ओवेन प्लॉस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आली. यामध्ये प्रतिबंधित नॉन ओव्हन प्लॉस्टिक कॅरी बॅगच्या दहा बॅग जप्त केल्या. या मालाची अंदाजे किंमत साडेपाच लाख रुपये आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १२) सकाळी ६ वाजून १५ मी. रियाज लॉन कळमना मार्केट जवळ करण्यात आली. मनपाच्या या कारवाईबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपद्रव शोध पथकाचे अभिनंदन केले.

पकडण्यात आलेले वाहन क्रमांक एमएच ४८ बीएम १२३१ असून गाडी चालकाचे नाव रविंद्र पाल असे आहे. गाडीचे कागदपत्र तापासल्यानंतर हा सर्व माल इतवारी येथील तीन नल चौकात राखी टेक्सटाईल्स येथे पाठवला जात होता. राखी टेक्सटाईल्स मधून नागपूर शहरातील इतर भागात ही प्लॉस्टिक पुरवली जात असे. उपद्रव शोध पथक प्रमुख विरसेन तांबे यांनी दिलेल्या सुचनेनूसार वाहन गांधीबाग झोनमध्ये आणण्यात आले.

कारवाईची माहिती अप्पर आयुक्त श्री. राम जोशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ प्रदीप दासरवार यांना देण्यात आली. काही वेळातच गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील व झोन अधिकारी सुरेश खरे घटनास्थळी पोहचले. नविन वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

प्रतिबंधित प्लॉस्टिक कॅरी बॅगने भरलेली गाडी छत्तीसगड येथिल मारूती नॉन ओव्हन प्लास्टिक लिमीटेड, राजनांदगाव येथून आली होती. ही गाडी १० जानेवारीला राजनांदगाव येथून निघाली आणि १२ जानेवारीला नागपूरात पोहचताच उपद्रव शोध पथका(एनडीएस) ने कारवाई करीत साडेपाच लाखाचा माल जप्त केला.

News Credit To NMC

कचरा संकलन कर्मचा-यांच्या संपाचा 5 झोनवर परिणाम

नागपूर: कचरा संकलन कामगारांच्या न्याय्य मागण्यांबाबत शहरात दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे, परंतु मनपा प्रशासनाने किंवा एजी एन्व्हिअरो कंपनीनेही याकडे गांभीर्याने पाहिले नाही. यामुळेच आता मंगळवारपासून लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरू नगर झोनमधील कचरा गोळा करणार्‍या कर्मचार्‍यांकडून संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि धंतोली झोनमधील कंपनीचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी एकदिवसीय लाक्षणिक संप झाला तरी कंपनीने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता नागपूर जिल्हा मनपा कंत्राटदार कामगार संघटनेचे अध्यक्ष युगल विदावत यांनी बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की 5 झोनमधील सुमारे 1,080 कर्मचारी संपात सहभागी होतील. संपात सामील होऊ नये म्हणून कंपनी कर्मचार्‍यांना धमक्या मिळत आहेत.

कंपनीला नियमांनुसार नोटिसः विदावत म्हणाले की कंपनीला नियमांनुसार 15 दिवस आधी नोटीस पाठविली गेली. 17 डिसेंबरला नोटीस दिल्यानंतरही कंपनीने कोणताही पुढाकार घेतला नाही. अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांच्या कार्यालयात कंपनीचे अधिकारी आणि संघटना यांच्यात चर्चा झाली, ज्यामध्ये कंपनीला या समस्येचे सामंजस्याने सामोरे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण कंपनीची हट्टवृत्ती धरून आहे. कर्मचार्‍यांवर होणा-या अन्यायविरोधात कामगार आयुक्तांकडे देखील तक्रार करण्यात आली. यानंतर 4 वेळा सुनावणी झाली, पण कंपनीकडून याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. ते म्हणाले की कंपनीने नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिका-यांनी सुरुवातीला तरुणांकडून पैसे घेतले आणि त्यांना कामावर नियुक्त केले. पण नंतर 80 कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले.

कंपनी बहाने करत आहे: कामगार आयुक्त आणि मनपा प्रशासनासमोर कंपनी कर्मचार्‍यांना काढल्यावर कंपनीने स्पष्ट नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनी खोटी माहिती देत आहे. ते सांगतात की त्यांना पूर्णपणे काढले गेले नाही, आवश्यकतेनुसार काम दिले जात आहे. तर वास्तविकता अशी आहे की एका दिवसात 80 कर्मचारी कमी झाले आहेत. कोरोनासारख्या संकटात मनपाचे सहकार्य करूनही कर्मचारी कमी झाले. लोकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी इतक्या समस्या असूनही कचरा संकलन चालू आहे. परंतु आता न्याय्य मागण्यांबाबत अनिश्चित संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

अवैध होर्डिंग व मोबाईल टॉवरवर कडक कारवाई करा : विजय (पिंटू) झलके

शहरात आजच्या स्थितीत अवैध होर्डिंगची संख्या मोठी आहे. याशिवाय अवैध मोबाईल टॉवर्सची वाढती संख्या नागरिकांसाठी धोक्याची ठरत आहे. होर्डिंग लावताना आणि टॉवर उभारताना मनपाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष होत असल्याचाही प्रकार घडत आहे. या सर्व प्रकाराची तातडीने दखल घेत संबंधित अधिका-यांनी तात्काळ अवैध होर्डिंग आणि टॉवर संदर्भात कडक कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

शहरातील अनेक भागात लावण्यात आलेल्या विविध अवैध होर्डिंग आणि मोबाईल टॉवर संदर्भात सोमवारी (ता.११) स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत निगम सचिव डॉ.रंजना लाडे, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरीश राउत, सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, उपअभियंता श्रीकांत देशपांडे, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, जितेंद्र तोमर आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात दहाही झोन अंतर्गत ९९१ अधिकृत होर्डिंगची नोंद मनपाकडे आहे. होर्डिंगकरिता परवानगी देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही मनपाची जबाबदारी आहे. ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट’शिवाय मनपाद्वारे कुठल्याही होर्डिंगला परवानगी देण्यात येत नसल्याची माहिती यावेळी संबंधित अधिका-यांमार्फत देण्यात आली. फेब्रुवारी २०१९ला दहाही झोनमधील सर्वे करण्यात आले. त्यामध्ये गांधीबाग झोनमध्ये ११, सतरंजीपुरा ८, लकडगंज ५, आसीनगर २१ व मंगळवारी झोनमध्ये ४ असे एकूण ४९ अवैध होर्डिंग आढळले आहेत.

सुमारे ११ महिन्याच्या आधीची सदर आकडेवारी असून उर्वरित एक ते पाच झोनची आकडेवारी लक्षात घेता ही संख्या शंभरावर जाण्याची शक्यता आहे. मनपाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपैकी होर्डिंगद्वारे मिळणारे उत्पन्न हे एक स्त्रोत आहे. सध्या मनपाला फक्त रु. १.२५ कोटी दरवर्षी उत्पन्न होत आहे. त्यामुळे यासंदर्भात प्रशासनाद्वारे आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. शहरातील अशा सर्व अवैध होर्डिंगवर आळा घालता यावा यासाठी आढळलेल्या अवैध होर्डिंगवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

याशिवाय नागपूर शहरात एकूण ७७३ टॉवर्स आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधील १३१, धरमपेठ ६९, हनुमाननगर ९८, धंतोली ५२, नेहरूनगर ७९, गांधीबाग ६५, सतरंजीपुरा ३४, लकडगंज ७५, आसीनगर ७८ आणि मंगळवारी झोनमधील ९२ टॉवर्सचा समावेश आहे. या टॉवरकडून कर स्वरूपात वर्षाला २ कोटी ५२ लाख ७३ हजार ७९१ रूपये डिमांड प्राप्त होते. मात्र यापैकी अनेक टॉवर्स मनपाकडून रितसर परवानगी न घेता सुरू आहेत. त्याचा प्रभाव मनपाच्या उत्पन्नावर पडतो आहे. त्यादृष्टीने सर्व टॉवर एजन्सीला येत्या सात दिवसात रितसर परवानगी घेण्याबाबत तात्काळ नोटीस देण्याचेही स्थायी समिती सभापतींनी निर्देशित केले.

अवैध होर्डिंग आणि टॉवर संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशांचे पालन करीत सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मनपाद्वारे पारदर्शी पक्रिया तयार करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात आवश्यक ते धोरण निश्चित करण्यात यावे. त्यामधून मनपाच्या उत्पन्न वाढीसह नागरिकांच्या सुविधेकडेही लक्ष देण्यात यावे, असेही निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
News Credit To NMC

मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक

महापौर दयाशंकर तिवारी
जागतिक विक्रमासाठी निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींचा महापौरांच्या हस्ते सत्कार : मनपा शाळेचे नांव विश्व पातळीवर
नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे विशेषत: गरीब घरातील आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठी प्रतिभा आणि क्षमता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते अंतरिक्षालाही गवसणी घालू शकतात. ही बाब मनपाच्या दोन विद्यार्थीनींनी खरोखरच अंतरिक्षात झेप घेउन सिद्ध केली आहे. या विद्यार्थिनींमध्ये ती क्षमता रूजविण्यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षक, शिक्षिकांचे मनापासून अभिनंदन. मनपाच्या विद्यार्थिनींचे हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल यात शंका नाही, अशा शब्दांमध्ये नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालया

31 जानेवारीपर्यंत वाढले लॉकडाउनः मनपा आयुक्तांचे आदेश जारी

नागपूर:- कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जारी करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांसह सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यानी हा आदेश जारी केला ते आपल्या आदेशात म्हणाले की, लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनमध्ये जारी केलेल्या अटी अजूनही लागू केल्या गेलेल्या आहेत.

३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या पाहता हे लॉकडाउन 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले. ते आता 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागपूर महानगरपालिका हद्दीतील संबंधित अधिका-यांनी लॉकडाऊन विस्तारासंदर्भात कामकाज गांभीर्याने सुरू ठेवावे. भविष्यात कोरोना प्रसाराची परिस्थिती पाहता, वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करणे देखील शक्य असल्याचे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version