दुसर्‍या कोरोना लाटेसाठी प्रशासन सज्ज:-जिल्हाधिकारी ठाकरे

नागपूर: जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचा असा विश्वास आहे की कोरोना नियंत्रक उपाययोजनां दरम्यान प्रशासनाला अनेक अनुभव आले आहेत. त्रुटी देखील आढळून आल्या. हेच कारण आहे की जिल्ह्यात कोरोनाची ‘दुसरी लहर’ आली तरी तत्सम तोडगा काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आता स्वसुरक्षा राखत आपली कामे करण्याची वेळ आली आहे.

पत्रकारांशी झालेल्या चर्चेत ठाकरे म्हणाले की कोरोना काळाच्या सुरूवातीस लोकांच्या मनात भीती व संभ्रम होता. विलगीकरणात ठेवण्याच्या भीतीने लोक तपासणीस येत नव्हते. परंतु आता जनजागृतीसह प्रशासकीय तयारीही पूर्ण झाली आहे. अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. सर्व प्रकारच्या अनुभवाच्या आधारे असे म्हणता येईल की डिसेंबरमध्ये कोरोना लाट परत आल्यासही प्रशासन सज्ज असेल. तथापि, अशा परिस्थितीचा संभव नाही. जरी तसे झाले तरी त्याची तीव्रता कमी असेल. जिल्ह्यातील सर्व स्तरातील अधिका-यांशी दररोजच्या अहवालांवर चर्चा होत आहे. ग्रामीण भागात पुढील चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात येईल.

सर्व स्तरावर कामं होत आहे: ‘माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी’ मोहिमेअंतर्गत विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांपासून सातत्याने सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. हा रोग नियंत्रित करण्यास्तव अधिकाधिक लोकांचे सहभागाची आवश्यकता आहे. लोकांनी स्वत: च तपासणी करवूव घ्यावात. व इतर लोकांस संक्रमित होण्यापासून वाचवू शकतात. प्रत्येक तहसीलमध्ये आरोग्य अधिकारी, नियंत्रण अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नियंत्रण कक्ष, जिल्हा टास्क फोर्स डॉक्टरांशी याकरिता संपर्क साधता येईल.

विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानेही रुग्ण व कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्यासाठी सहकार्य केले आहे. विभाग प्रमुख मोईज हक म्हणाले की विद्यार्थ्यांच्या मदतीने मेयो आणि मेडिकलमधे पोस्टर्सच्या माध्यमातून कुटुंबांना जागृत केले जात आहे. नातेवाईकांना माहिती झाल्याने डॉक्टर आणि परिचारिकांना त्यांचे कार्य करण्यात मदत मिळत नाही. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे म्हणाले की, रोग नियंत्रणासाठी लोकांचा पाठिंबा आवश्यक आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ही माहिती दिली. या वेळी जिल्हा दंडाधिका-यांनी पत्रकारांकडूनही सूचना मागितल्या.

मास्क न लावणा-या २२२ नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवार (९ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११००६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३८,६२,०००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४१, धरमपेठ झोन अंतर्गत ६०, हनुमाननगर झोन अंतर्गत १४, धंतोली झोन अंतर्गत १३, नेहरुनगर झोन अंतर्गत ९, गांधीबाग झोन अंतर्गत १६, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २०, लकडगंज झोन अंतर्गत १६, आशीनगर झोन अंतर्गत १६, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ५५३६ बेजबाबदार नागरिकांकडून रु २७ लक्ष ६८ हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. 

सर्व सफाई कर्मचा-यांची कोव्हिड तपासणी करा

शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी सफाई कर्मचारी नियमित कार्य करीत आहेत. आजच्या कोव्हिडच्या काळात सफाई कर्मचारी अहोरात्र सेवाकार्य बजावत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी कार्य करणा-या सर्व सफाई कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही मनपाची जबाबदारी आहे. कोव्हिडच्या संसर्गापासून बचाव व्हावा, तो झाल्यास तातडीने उपचार मिळावे यासाठी झोनस्तरावर सर्व सफाई कर्मचा-यांची कोव्हिड चाचणी करण्यात यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

सफाई कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न व कोव्हिड-१९मध्ये कार्यरत सफाई कर्मचा-यांचे प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता.५) आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य विभागाचे राजेश लवारे, किशोर मोटघरे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिंग कछवाह, नागपूर महानगरपालिका शाखा अध्यक्ष प्रदीप महतो, मोती जनवारे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’मध्ये फिरते कोव्हिड चाचणी केंद्र तयार करण्यात आले आहेत. या चाचणी केंद्रांद्वारे प्रत्येक झोनमधील सर्व सफाई कर्मचा-यांची चाचणी करण्यात यावी. चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळणारे व जोखमीच्या रुग्णांवर मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेश हॉस्पिटल आणि आयुष रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येईल. मनपाच्या या तिनही रुग्णालयांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचा-यांकरिता राखीव बेड्स ठेवण्यात आले आहेत, असेही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार यांनी संपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने प्रमुख मागण्यांची महापौरांना सूची सादर करण्यात आली. कोव्हिडमध्ये कार्य करीत असताना मृत्यूमुखी पडलेल्या बाधितांना ५० लाख विमा योजनेचा लाभ आणि परिवारातील सदस्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, कर्मचा-यांच्या पगारातून कपात जीपीएफ रक्कम व त्यावरील व्याज २० दिवसाच्या आत संबंधिताच्या बँक खात्यात जमा करून वार्षिक हिशोब पावतीचे वाटव करणे, शासनाच्या धोरणाप्रमाणे कोव्हिडमध्ये कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवणे, कोव्हिड बाधितांचे अंत्यविधी कार्य करणा-यांना मोबदला देणे, ‘श्रम साफल्य’ योजने अंतर्गत कामगारांना घर बांधून देणे, शिल्लक ऐवजदार सफाई कामगारांना नियमीत करणे, सफाई कर्मचा-यांची क्वॉर्टर रजिस्ट्री करणे आदी मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.

यासर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ सोडविता येणारे प्रश्न मार्गी लावले. २२०६ ऐवजदार सफाई कामगार नियमीत करण्यात आले असून उर्वरित ३५० ऐवजदार सफाई कामगार तसेच शिल्लक सर्व ऐवजदार सफाई कामगारांना नियमित करण्याचा विषय तत्कालिन मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे यावेळी महापौरांनी सांगितले.

याशिवाय कोव्हिड बाधितांचे अंत्यविधी कार्य करणा-या सफाई कर्मचा-यांना आता १ हजार रुपये मोबदला देण्यात येणार आहे. सफाई कर्मचा-यांच्या क्वॉर्टर रजिस्ट्री संदर्भात पुढील आठवड्यात स्थावर विभागाची बैठक बोलावण्याचेही निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

News Credit To NMC

कोरोना बाधीत मनपा शिक्षकांसाठी बेड आरक्षीत ठेवा : महापौर

कोव्हिड काळात सेवा बजावणा-या शिक्षकांना भेडसावणा-या समस्या व त्याबाबत येणा-या तक्रारींची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता.५) मनपा शिक्षक संघाच्या समस्यांचा आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत शिक्षक आमदार नागो गाणार, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, माध्यमिक शिक्षक संघाचे प्रमोद रेवतकर, मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, प्रमुख सचिव देवराव मांडवकर, कोषाध्यक्ष मलविंदरकौर लांबा आदी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक संघाद्वारे शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांची सूची सादर करण्यात आली. झोनमध्ये कार्यरत शिक्षकांसोबत असभ्यतेची भाषा थांबविणे, शिक्षकांना कोव्हिड-१९च्या सेवेतून कार्यमुक्त करून साप्ताहिक रजा द्यावी, वाहतूक तसेच प्रोत्साहन भत्ता विनाविलंब देणे, सुरक्षा साहित्य उपलब्ध करणे, शिक्षकांना रात्रपाळीत काम न देणे, शिक्षकांना ५० लाखाचे विमा कवच देणे, ५५ वर्षावरील व विविध आजारांनी ग्रस्त शिक्षकांना कोव्हिड कार्यातून सूट देणे, ऑक्सिमीटरद्वारे तपासणीसाठी वैद्यकीय चमू नियुक्त करणे, कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आल्यास शिक्षकांना गृहविलगीकरणात ठेवणे, मनपा शिक्षकांकरिता स्वतंत्र कोव्हिड रुग्णालयाची व्यवस्था करणे, कोव्हिड व ऑनलाईन शिक्षण अशा दोन्ही जबाबदा-या न ठेवता एका जबाबदारीतून मुक्त करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शिक्षकांच्या समस्या आणि त्यावरील प्रशासनिक भूमिका यांची माहिती महापौर संदीप जोशी यांनी जाणून घेतली. कोव्हिड-१९ अंतर्गत कार्य करणा-या शिक्षकांना त्यांच्या कार्याला अनुसरून आवश्यक ती सर्व सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी यावेळी निर्देश दिले. ५५ वर्षावरील आणि अस्थमा, मधुमेह, रक्तदाब यासह दिव्यांग, अपघातग्रस्त व विविध आजारांनी ग्रस्त शिक्षकांना सरसकट कोव्हिडच्या कार्यातून मुक्त करणे शक्य नाही.

आजच्या कोव्हिडच्या काळात कर्मचा-यांची गरज लक्षात घेता उपरोक्त शिक्षकांना बाहेरील काम न देता त्यांना झोनस्तरावर कार्यालयीन कामेच देण्यात यावी. याशिवाय ऑक्सिमीटरद्वारे तपासणीसाठी वैद्यकीय चमू नियुक्त करणे शक्य नसल्याचेही प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुढील पर्याय निघेपर्यंत शिक्षकांनी संपूर्ण सुरक्षेसह कार्य करावे.

शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाल्यास बाधिताची काळजी घेण्यासाठी कुणी नसल्यास संबंधित शिक्षकांना सात दिवसाची रजा देण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. कोव्हिड-१९ व ऑनलाईन शिक्षण अशा दोन्ही जबबादा-या असणा-या शिक्षकांना एका जबाबदारीतून मुक्त करण्याच्या मागणीसंदर्भात ३ दिवसात आवश्यक माहिती सादर करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले.


मनपा कर्मचा-यांसाठी राखीव बेड्स

मनपा शिक्षक व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्यांच्याकरिता शहरात स्वतंत्र रुग्णालय आरक्षित करून विनामूल्य उपचार करण्याच्या शिक्षक संघाच्या मागणीची महापौर संदीप जोशी यांनी दखल घेतली. मनपातील शिक्षक आणि इतर कर्मचा-यांसाठी मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल आणि आयुष रुग्णालयात राखीब बेड्स ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सातव्या वेतन आयोगासंदर्भात समिती गठीत

मनपा ठरावानुसार मनपा शिक्षक कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे आणि शालार्थ प्रणालीत समाविष्ठ शिक्षक आणि कर्मचा-यांचे सहाव्या वेतन आयोगाचे थकबाकी बिल १८ महिन्यांपासून प्रलंबित असून यासंबंधी पुढील कार्यवाही करण्याच्या मागणी संदर्भात महापौरांनी शिक्षण समिती सभापतींच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली. समितीमध्ये शिक्षण समिती सभापती, उपसभापती व अतिरिक्त आयुक्तांचा समावेश आहे. सदर समितीने संपूर्ण विषयासंदर्भातील अभ्यास करून ७ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

News Credit To NMC

मास्क न लावणा-या १९४ नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवार (५ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १९४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ९७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०१०५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३४,११,५००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४५, धरमपेठ झोन अंतर्गत २७, हनुमाननगर झोन अंतर्गत १५, धंतोली झोन अंतर्गत १०, नेहरुनगर झोन अंतर्गत ६, गांधीबाग झोन अंतर्गत १५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत ८, आशीनगर झोन अंतर्गत २२, मंगळवारी झोन अंतर्गत ३० आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द सोमवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ४६३५ बेजबाबदार नागरिकांकडून रु २३ लक्ष १७ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ.

ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.

News Credit To NMC

स्मार्ट सिटीच्या कॅमे-यांचे माध्यमाने गुन्हेगारांना पकडण्यात यश – पोलिस आयुक्त

नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने लागू करण्यात येणारे नागपूर सेफ ॲड स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या कामाचा आढावा पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी मनपा च्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील स्मार्ट सिटी कॉन्फरन्स हॉल मध्ये घेतला.

बैठकीचे आयोजन नागपूर स्मार्ट सिटीच्या ई-गर्व्हनेंस विभागाच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीत अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री. सुनील फुलारी, दिलीप झलके, एन.डी.रेडडी, पोलीस उपायुक्त सर्वश्री. विक्रम साळी, विवेक मसाळ, राहुल माकणीकर, गजानन राजमाने, श्वेता खेडकर, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, वाहतुक अभियंता शकील नियाजी व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे उपस्थित होते.

पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी स्मार्ट सिटीच्या वतीने नागपूरात लावण्यात आलेले ३६०० सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमाने गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यात येणा-या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, कॅमे-यांच्या माध्यमाने गुन्हेगारांना पकडण्यात यश प्राप्त झाले आहे. येणा-या काळात या तंत्रज्ञानाचा अधिक वापर करुन गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात येईल. त्यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या माध्यमाने वाहतुकीला सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.

यासाठी वाहतुक पोलिस विभाग व नागपूर स्मार्ट सिटीचे संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. व्ही.ए.एम.एस च्या माध्यमाने वाहतुक पोलिस संबंधी जनजागृती करण्याचे पण त्यांनी निर्देश दिले. तसेच त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाजवळ सेन्ट्रल कमांड ॲन्ड कंट्रोल सेन्टर चे कार्याचा आढावा घेतला आणि हे काम नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधीतांना दिले.‍ यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्वागत स्मार्ट सिटीच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी केले.

बैठकीच्या नंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार व अन्य अधिका-यांनी श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरची सुध्दा पाहणी केली. स्मार्ट सिटी ई-गर्व्हन्सचे जी.एम.डॉ. शील घुले यांनी त्यांना सिटी ऑपरेशन सेंटरच्या विविध कार्याची माहिती दिली. बैठकीत डॉ. शील घुले, ई. ॲन्ड वायचे समीर शर्मा, एल.ॲन्डटी.चे अजय रामटेके, आशीष भगत, अनूप लाहोटी, आरती चौधरी, कुणाल गजभिये आदी उपस्थित होते.

News Credit To NMC

एनडीसीने ठोठावले 205 विनामास्कचे चालान

नागपूर:- महानगरपालिकेच्या एनडीसी पथकाने मंगळवारी मास्क न वापर/बाळगल्याबद्दल 205 जणांवर चालान लादले आणि 1,02,500 रुपये दंड ठोठावला. या पथकाने आतापर्यंत एकूण 8841 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली असून एकूण 2779500 असा आर्थिक रूपात दंड आकारलेला आहे.

मंगळवारी लक्ष्मीनगर झोनमध्ये 52, धरमपेठमध्ये 33, हनुमाननगरमध्ये 16, धंतोलीत 9, नेहरू नगरात 19, गांधीबागमध्ये 16, सतरंजीपुरामध्ये 22, लकडगंजमध्ये 14, आशिनगरमध्ये 20, मंगळवारीत 2 आणि मनपा मुख्यालयात 2 जणांवर कारवाई केली.

आतापर्यंत 500 रुपयांच्या चलनानुसार 3,341 निष्काळजी नागरिकांकडून एकूण 18,85,500 रुपये शुल्क आकारले गेले आहे. असे असूनही, कोरोना संक्रमणादरम्यान अद्याप बरेच नागरिक मास्क वापराकडे दुर्लक्ष करताहेत. असे लोक इतरांच्या जीवाला धोका राखत बाहेर फिरताहेत.

स्मार्ट सिटीची सिटी लेव्हल ॲडव्हायझरी फोरमची सभा संपन्न

नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्यावतीने सिटी लेव्हल ॲडव्हायझरी फोरमच्या सभचे सोमवारी (२८ सप्टेंबर) ला मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील स्मार्ट सिटी कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.

शहराचे महापौर व स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाचे सदस्य श्री. संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, श्री. ‍गिरीश व्यास, माजी आमदार श्री. प्रकाश गजभिये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत डायगव्हाणे व सिटी एक्शन ग्रुपचे प्रमुख श्री.विवेक रानडे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे यांनी सदस्यांसमोर स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यांनी सांगीतले की, स्मार्ट सिटीज मिशन केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये सुरु केले आहे. स्मार्ट सिटीचा उद्देश नागपूरला राहण्यायोग्य (लाईव्हली), प्रदुषण रहित, सुरक्षित, सस्टेनेबल व सुदृढ शहर बनविण्याचा आहे. पूर्व नागपूरच्या मागासलेल्या भागातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण कार्य प्रारंभ केले आहे. ऑक्टोंबर पासून स्मार्ट सिटी क्षेत्रामध्ये कार्यास गती येणार आहे.

पैन सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर सेफ ॲड स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण शहरात ३६०० कॅमेरे लावण्यात आले आहे. याच्या मदतीने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आरोपी शोधण्यात मदत ‍मिळत आहे. केंद्र शासनाने इंडीया सायकल्स फार चेंज चॅलेंज उपक्रम सुरु केला आहे. नागपूरात सायकल चालविण्यायोग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्यात येणार आहे. नागपूरच्या सीताबर्डी बाजारपेठेला व्हेइकल फ्री झोन करण्यासाठीपण सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यांनी सांगीतले की नुकतेच स्मार्ट सिटीच्या रॅकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. नागपूरने आता २३ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

सभेत खासदार डॉ.विकास महात्मे यांनी बायसिकल लेनच्या संकल्पनेचे स्वागत केले ते म्हणाले की, निरोगी राहण्यासाठी सगळयांनी सायकल चालविली पाहिले.
आमदार श्री. कृष्णा खोपडे यांनी स्मार्ट सिटीच्या पूर्व नागपूरातील क्षेत्रात कामात गती आणण्याचे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी प्रकल्प बाधित नागरिकांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी केली जेणेकरुन त्यांच्या मनात प्रकल्पाबद्दल विश्वास निर्माण होईल आणि त्यांचे सहकार्य लाभेल.

आमदार श्री. गिरीश व्यास यांनी नागपूरला क्राइम फ्री सिटी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. त्यांनी सांगीतले की, स्मार्ट सिटी क्षेत्रामध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात यावे तसेच शाळा, कॉलेज, रुग्णालयांसाठी जागा आरक्षित करावी. माजी आमदार श्री. प्रकाश गजभिये यांनी नागपूर शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोणाने प्रयत्न करण्याचे सांगीतले. स्मार्ट सिटीला फक्त एक क्षेत्रामध्ये नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगीतले. सभेचे आभार प्रदर्शन कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकुर यांनी केले. सभेत स्मार्ट सिटीचे अधिकारी श्री. राजेश दुफारे, डॉ. शील घुले, अधि. मनजीत नेवारे, राहुल पांडे इत्यादी उपस्थित होते.

News Credit to NMC

नागपुर को 500 करोड़ रुपये का विशेष अनुदान दें: निगम की स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके की मांग

नागपुर:- नागपुर महानगर पालिका की स्थायी समिति के अध्यक्ष ने नागपुर को 500 करोड़ रुपये के विशेष अनुदान की मांग की है। नागपुर नगर निगम स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके ने इस संबंध में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को एक पत्र लिखा है। नागपुर महानगर पालिका की आय में भारी कमी आई है। इसलिए, उन्होंने राशी के अभाव के कारण नागपुर को 500 करोड़ रुपये के विशेष अनुदान की मांग की है।

कोरोना काल ने इस वर्ष नागपुर महानगर पालिका की आय में कमी की है। नतीजतन, वर्तमान में निगम के खजाने में पर्याप्त रूपया जमा नहीं हुआ है। इससे कई विकास कार्य प्रभावित हो रहे हैं। इसलिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को 500 करोड रुपये का विशेष अनुदान देना चाहिए। उन्होंने इस संबंध में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को पत्र भी लिखा है।

कोरोना के कारण, नागपुर महानगर पालिका की आय में भारी कमी आई है। एक काल मे संपत्ति कर द्वारा ही निगम के खजाने में 400 करोड़ रुपये का जोड़ बनता था। जलापूर्ति से भी राजस्व 100 करोड़ रुपये तक जाता था। पर इस साल यह सभी आय कम हुई है।

इसलिए, आयुक्त द्वारा प्रस्तुत बजट और वास्तविक बजट को देखते हुए, चित्र यह है कि इस वर्ष घाटा कम से कम 800 से 1000 करोड़ होगा। इसलिए ही नगरपालिका स्थायी समिति सभापति ने राज्य सरकार से कम से कम 500 करोड़ रुपये के विशेष अनुदान की मांग की है‌‌

मनपा आयुक्तांनी दिला आरोग्य सुविधा सुदृढ करण्यावर भर

नागपूर:- मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पदभार घेतला तेव्हा रुग्णांची आणि मृतकांची संख्या सतत वाढत चालली होती. रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात गरज असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध न होणे, या तक्रारींवर त्यांनी लक्ष दिले. पूर्वी केवळ सात खासगी रुग्णालयात 300 च्या जवळपास बेड्स होते. आता शहरातील एकूण ५३ रुग्णालये नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहेत. हे त्यांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नांचे यश आहे. या ५३ रुग्णालयांमध्ये सहा शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये १५१४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १९२२ बेड्स असे एकूण ३४३६ बेड्स शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. या सर्व ५३ रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू असून येथे बेड्सच्या उपलब्धतेनुसार अतिजोखमीच्या रुग्णांना भरती केले जात आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यास सोमवारी (ता. २८) एक महिना पूर्ण होत आहे. नागपुरात एकीकडे कोव्हिड रुग्णांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढत असतानाच त्यांनी स्वीकारलेला कार्यभार त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र, एक महिन्याच्या काळात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न, घेतलेले निर्णय आणि त्याला आता मिळू लागलेले यश यामुळे त्यांच्या कार्याचे आणि एकूणच कार्यशैलीचे कौतुक होऊ लागले आहे.पदभार स्वीकारल्यानंतरच्या केवळ एक महिन्याच्या काळात नागपूर शहरातील आरोग्य सोयी सुदृढ करण्यावर त्यांनी भर दिला आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच रुग्णालयातील खाटांची संख्या वाढावी यासाठी त्यांनी आपला मोर्चा खासगी रुग्णालयांकडे वळविला. खासगी रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केला. खाटांची संख्या वाढविणे, चाचणी वाढविणे, ॲम्बुलन्स, शववाहिकांची संख्या वाढविणे आणि कुठलाही त्रास न होता नागरिकांना आरोग्य सेवा तातडीने मिळणे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

शहरातील महत्वाच्या आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सद्या ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये सेवा सुरू करण्याबाबत कार्य सुरू आहे. खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणा-या देयकाचे बिलाचे ऑडिट (अंकेक्षण) करण्यासाठी ऑडिटर (अंकेक्षक) नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी ५ रुग्णवाहिका यासह एकूण ६५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आहेत. यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. शहरात दररोज ६५०० ते ७ हजार कोव्हिड चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आणखी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येत असलेल्या त्रुट्यांमुळे मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरळीत करण्यात आले आहे. मनपाची रुग्णालये सज्ज असून वैद्यकीय कर्मचा-यांच्या अभावी ते सुरू करण्यास अडचण होती. यावरही उपाय शोधण्यात आले आहेत. रेल्वेने काही दिवसांपूर्वीच मनपाला रुग्णालय देण्याचे जाहिर केले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस ते रुग्णालय सुरू न करता येऊ शकल्याने तेथील वैद्यकीय चमू मनपाच्या सदर येथील आयुष रुग्णालयात सेवा देणार आहे. त्यामुळे मनपाच्या सदर येथील रुग्णालयात कोव्हिड उपचार केले जाईल. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलची जबाबदारी शहरातील साई मंदिर ट्रस्टने घेतली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातही उपचार सुरू करण्यात आले आहे. पाचपावली रुग्णालयात कोव्हिड पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार व त्यांची प्रसूती सुरू करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील शिक्षण पूर्ण झालेले ६० डॉक्टर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) येथून शिक्षण पूर्ण केलेल्या २०० डॉक्टरांना लवकरच नियुक्ती देण्यात येत आहे. त्यामुळे महत्वाचा वैद्यकीय कर्मचा-यांचा प्रश्न सुटला आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस मनपाकडे मनपा रुग्णालयांचे ४०० बेड्स उपलब्ध होतील. दरम्यान, राज्य शासनाने कोव्हिड रुग्णांची माहिती जलदगतीने मिळावी आणि लोकसहभागातून हे साध्य व्हावे यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम १५ सप्टेंबरपासून हाती घेतली. नागपुरात या मोहिमेचे कामही आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात युद्ध पातळीवर सुरू आहे. आरोग्य सेवा सुदृढ करण्याच्या या कार्यात आयुक्तांच्या नेतृत्वात अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने यांच्यासह आरोग्य विभागाची संपूर्ण चमू कार्यरत आहे.*प्रत्येक झोनमध्ये ५ रुग्णवाहिका*कोव्हिड संदर्भात नागरिकांना जलद प्रतिसाद मिळून त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मनपातर्फे कार्यवाही करण्यात आली आहे. त्याद्वारे झोनस्तरावर यंत्रणा बळकट करण्याचे कार्य करण्यात आले. अतिजोखमीच्या कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी झोनस्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहे. मनपाद्वारे एकूण ६५ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामधून प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहे. यासाठी झोनस्तरावर नियंत्रण कक्षही स्थापित करण्यात आले आहे.

शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या सुविधेकरिता नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नाने महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाचे कार्य करण्यात आले आहेत. कोरोबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेड्सची वर्तमानस्थिती लक्षात यावी यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०७१२ – २५६७०२१ या क्रमांकावर फोन करून रुग्णांना शहरातील रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता जाणून घेता येत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांकाच्या १० लाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांना गरजेच्या वेळी अचूक माहिती मिळावी, त्यांची भटकंती होउ नये यासाठी मनपातर्फे ‘डॅशबोर्ड’ सुद्धा तयार करण्यात आले असून यामध्ये सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे त्यांच्याकडील बेड्सची ‘रियल टाईम’ माहिती अपडेट केली जाते. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांमध्ये एक ‘कोरोना मित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांसंदर्भात कुठलिही तक्रार नागरिकांना असल्यास त्याची माहिती त्वरित ‘कोरोना मित्रा’ला देण्यात यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. अगोदर मनपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासन कामे करायचा. आता आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेउन काम करण्याची सुरुवात केली आहे, त्याचे चांगले परिणाम दिसत आहे. उच्च न्यालायलाने महापौर श्री संदीप जोशी यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त केली आहे आणि या समितीने कोव्हिड रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यासाठी सुनावणी घेतली.आयुक्तांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी 22 ऑगस्टला नागपूर शहरात कोव्हिडमुळे झालेल्या मृत्यूची संख्या 591 मृत्यू झाले होते. पॉझिटिव्ह रुग्ण 17768 होते, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 8183 होती. शनिवारी 26 सप्टेंबर पर्यंत 59150 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 45653 पर्यंत पोहचली आहे. मृतांची संख्या 1999 झाली आहे. आयुक्त दररोज मृतांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मनपा आरोग्य विभागाने पाच रुग्णालय तयार केले होते पण तिथे डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती नव्हती. आयुक्तांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आणि डॉक्टरांना, नर्सिंग स्टाफ ला अपेक्षे पेक्षा जास्त वेतन देण्याचा निर्णय घेतला. पांचपावली प्रसूती केंद्रामध्ये पॉझिटीव्ह महिलेची प्रसूती करण्याची सुरुवात केली.

झोनस्तरावर नियंत्रण कक्ष*कोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे क्षेत्रीय स्तरावर कोव्हिड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोव्हिड नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या किंवा अतिजोखमीच्या रुग्णांना कोणताही त्रास होत असल्यास नागरिकांनी त्वरीत संबंधित झोनच्या नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधावे.

झोनस्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक*अ.क्र.

झोन कार्यालयाचे नाव संपर्क क्रमांक१ लक्ष्मीनगर झोन क्र.०१ 0712 – 2245053२

धरमपेठ झोन क्र.०२ 0712 – 2567056३

हनुमाननगर झोन क्र.०३ 0712 – 2755589४

धंतोली झोन क्र.०४ 0712 – 2465599५

नेहरुनगर झोन क्र.०५ 0712 – 2702126६

गांधीबाग झोन क्र.०६ 0712 – 2739832७

सतरंजीपूरा झोन क्र.०७ मो.नं.7030577650८

लकडगंज झोन क्र.०८ 0712 – 2737599९

आशीनगर झोन क्र.०९ 0712 – 2655605१०

मंगळवारी झोन क्र.१० 0712 – 2599905११

केंद्रीय नियंत्रण कक्ष 0712 – 2567021

Exit mobile version