कोव्हिड पॉझिटिव्ह आईकडून गर्भातील बाळाला धोका नाही

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच गर्भवती महिलांना कोरोनाचा धोका आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत गर्भवतींना जास्त धोका असल्याचे बोलले जाते, मात्र यावर झालेल्या अभ्यासातून गर्भवतींना सर्वसामांन्याप्रमाणेच लक्षणे आढळून येत आहेत. मात्र या काळात गर्भवतींना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नियमीत तपासण्यामधील काही तपासण्या करणे आवश्यक नाही, यासाठी आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे, कुठलाही त्रास जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांना फोनवरून माहिती द्यावी. कोव्हिड झालेल्या गर्भवती महिलांची सर्व सुरक्षा बाळगून प्रसूती केली जात आहे. नुकतेच मनपाच्या पाचपावली दवाखान्यात प्रसूती झाली. कोव्हिड हा संसर्गजन्य आजार आहे. तो संसर्गातून पसरतो मात्र आईच्या गर्भातील बाळाला थेट कोव्हिड संसर्गाचा धोका नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र गर्भवती महिलांनी आवश्यक त्या सुरक्षा घेणे आवश्यक आहे, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिला.

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’मध्ये गुरूवारी (ता.२४) ‘गर्भावस्था आणि कोव्हिड’ तसेच ‘कोव्हिड काळात घ्यावयाची काळजी’ या विषयावर डॉ. शिवांगी जहागीरदार आणि कन्सल्टन्ट प्लास्टिक सर्जन व आयएमए चे सहसचिव डॉ. समीर जहागीरदार यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.’गर्भावस्था आणि कोव्हिड’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. शिवांगी जहागीरदार म्हणाल्या, गर्भावस्था ही प्रत्येक स्त्री साठी आणि तिच्या कुटुंबासाठी आनंद आणि काळजी घेण्याची बाब आहे. आजच्या कोव्हिडच्या काळात आनंदापेक्षा काळजीच जास्त वाढली आहे. कोरोनापासून आज बचाव करणे हाच एक पर्यात आहे. त्यामुळे सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबावे. गर्भवती महिलांनी गर्दीत, बाहेर निघू नये. घरी कुणी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास किंवा स्वत: गर्भवती महिला पॉझिटिव्ह असल्यास बाधित व्यक्तीची वेगळी व्यवस्था करावी किंवा गर्भवती महिलेलाच बाधित व्यक्तीपासून किंवा इतरांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था करावी. गर्भवती महिलांची साधारणात: ८ महिने पूर्ण झाल्यानंतर नववा महिना सुरू होताच कोरोना चाचणी केली जाते. त्यापूर्वी जर तिच्या संपर्कातील कुणी पॉझिटिव्ह आल्यास चाचणी करण्यात येते. गर्भावस्थेत होणा-या सर्व तपासण्या अवश्य करण्यात याव्यात. पाचव्या आणि सातव्‍या महिन्यातील चाचण्या कटाक्षाने कराव्यात. प्रसूतीनंतर आईकडून बाळाला स्तनपान करणे अत्यावश्यक आहे. आईला कोरोनाची जास्त लक्षणे असल्यास बाळाला आईचे दुध चमचाने पाजावे, ते शक्य नसल्यास ‘डोनर मिल्क बँक’मधीलही दुध देता येईल, असेही डॉ. शिवांगी जहागीरदार म्हणाल्या.डॉ. समीर जहागीरदार यांनी प्रारंभी कोव्हिड संदर्भात घ्यावयाची काळजी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली. मास्कचा योग्य वापर कसा करावा, तो का आवश्यक आहे, तो न लावल्यास काय दुष्परिणाम होतात, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली. एन ९५ मास्कचा पुनर्वापर करणे टाळावे. एकदा वापल्यानंतर तो कागदी पिशवीत ७२ तास बाजूला ठेवावा. पुनर्वापरासाठी त्रिस्तरीय कापडी मास्कचा वापर करावा. मात्र वापर झाल्यानंतर त्याला किमान अर्धा तास सोडिअम हायपोक्लोराईडच्या १ टक्के मिश्रणात भिजवून ठेवावे. त्यानंतर ७२तास ते उन्हान वाळत ठेवावे व त्यानंतरच त्याचा वापर करावा. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमीत व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक आहे.

यासंदर्भात काय औषध घ्यायची, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, व्हिटॅमीन सी आणि डी यामध्ये पोषक तत्वे आहेत. या दोन्ही व्हिटॅमीनचे सेवन केल्यानंतर आपले शरीर त्याचे अतिरिक्त जतन करून ठेवत नाही. आपल्या शरीराला जेवढी आवश्यकता आहे तेवढेच घेतो आणि उर्वरित लघवीवाटे बाहेर सोडले जाते. उन्हात जास्त फिरणा-यांना व्हिटॅमीन डी ची कमतरता भासत नाही. मात्र आपल्याकडे अनेकांमध्ये ती कमतरता दिसते. त्यामुळे व्हिटॅमीन सी आणि डी सर्वांनीच घ्यावे. झिंकचे औषध प्रमाणात घेणे आवश्यक आहे त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही ते म्हणाले. आज आपल्या गरजा बदलल्या आहेत. अन्न, वस्त्राप्रमाणेच आज प्रत्येक घरी थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल बी.पी. ऑपरेटर ही सर्व उपकरणे ठेवणे आवश्यक आहेत. सुरक्षेच्या नियमांचे योग्य पालन करा, लक्षणे असल्यास लपवू नका, चाचणी करा, असे आवाहनही डॉ. समीर जहागीरदार यांनी केले.कोव्हिडमध्ये गरोदर मातांनी घ्यावयाची काळजी या विषयावर बोलताना डॉ.अनुराधा रिधोरकर यांनी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंकांचे निरसरन केले. त्या म्हणाल्या, गरोदर मातांकडून बाळाला कोरोना होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. सुरूवातीला प्रसूतीनंतर बाळाला आईपासून वेगळे ठेवले जायचे. मात्र आता बाळाला आईजवळच ठेवले जाते, ते बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बाळाला मातेने स्तनपान करणेही बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्तनपान करताना आईने मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोव्हिड आईच्या दुधातून होत नसला तरी तो बोलताना तोंड आणि नाकातून पडणा-या तुषारांमुळे होतो. बाळाला स्तनपान करताना आईने मास्क लावणे अत्यावश्यकच आहे. याशिवाय सर्व नागरिकांनीही मास्क लावणे गरजेचे आहे. फॅशन म्हणून मास्क वापरू नका, तो गळ्यातला दागिना नाही. आपल्या सुरक्षेचे शस्त्र आहे.

त्यामुळे तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल, या पद्धतीनेच मास्क वापरा, असे आवाहनही त्यांनी केले.कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची शस्त्रक्रिया या विषयावर बोलताना डॉ. वाय.एस.देशपांडे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जातात. उशिरा करता येउ शकणा-या शस्त्रक्रिया शक्यतो टाळल्या जातात. शस्त्रक्रिया करताना ऑपरेशन थेटरमध्ये रुग्णाचा डॉक्टर आणि इतर सहायकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे डॉक्टरांसह ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी आपले सर्व शरीर सुरक्षित ठेवण्याचे कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया करताना उपयोगात आणली जाणारी साहित्य, तसेच सुरक्षेच्या सर्व वस्तूंचीही योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांनीही मास्क लावताना उपयोगानंतर त्याची योग्य विल्हेवाटही लावणे आवश्यक आहे. रस्त्यावर वा कुठेही मास्क फेकू नका, जबाबदारीने वागा, असेही आवाहन डॉ.वाय.एस.देशपांडे यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व कार्डधारकांना धान्य वाटप: पुरवठाधिकारी भास्कर तायडे

नागपूर: शहर व जिल्ह्यातील सर्व शिधापत्रधारकांना अन्नधान्याचे वाटप व केंद्र शासनाकडून प्राप्त मोफत धान्याचेही वाटप करण्यात आले आहे अशी माहिती नागपूर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली. जीवनावश्यक धान्य किट वाटपही यादरम्यान करण्यात आलं असल्याचे ते म्हणाले. ३ लाख ८१ हजार लाभार्थ्यांना प्राधान्याने हे वाटप केले गेले.

अंत्योदय मधे ७७ हजार १८३ लोक व प्राधान्य गट असे ३ लाख ५ हजार ८४६ यात कार्डधारक असे तीन लाख 25 हजार 989 १३११२७५ असे एकंदर १६ लाख 37 हजार 264 ग्रामीण नागपूर जिल्ह्याच्या लोकांत हे अन्नधान्याचे वाटप झालेले आहे. हा नियमीत लाभ आहे हे विशेष, याशिवाय आत्मनिर्भर योजनेअंतर्गत व पीएनजी योजनेअंतर्गत तांदूळ जे पाच किलो प्रती व्यक्ती होते त्याप्रमाणे वाटप केलेला आहे तसेच ज्यांचेकडे शिधापत्रिका नव्हत्यी त्यांचेसाठी सुद्धा प्रतिव्यक्ती पांच किलो तांदूळ व एक किलो चना असं धान्य वितरण केलेलं आहे, ५७,४९४ लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

मनपाचे कामात अजून सुधार आवश्यक : देवेंद्र फडणवीस

नागपूर शहरातील कोव्हिडची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सर्वांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा ओघ कमी झाल्याचे दिसून येत आहे. चाचण्यांची संख्या, बेड्सची उपलब्धता, रुग्णवाहिका, कोव्हिड केअर सेंटर आणि इतर बाबी समाधानकारक आहेत. पुढील काही दिवसात आणखी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येची चिंता न करता रुग्णांना उपचार मिळवून देणे, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर सर्व बाबींचे व्यवस्थापन कसे करता येईल, याकडे लक्ष द्या, असे सांगून शहरातील कोव्हिड संदर्भातील महानगरपालिकेचे कार्यात अजून सुधारणा करण्याची सूचना विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या कार्याचे कौतुक केले आणि सांगीतले की, महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त सोबत कार्य करत आहे. यांचा चांगला संदेश नागरिकांमध्ये गेला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२१) शहरातील कोव्हिड स्थितीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीत त्यांच्यासमवेत महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील कोव्हिडची सद्यस्थिती आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील महत्वाच्या आरोग्य सुविधा सुधारण्याकडे मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सद्या ४२ खाजगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये सेवा सुरू करण्याबाबत कार्य सुरू आहे. खाजगी रुग्णालयांकडून काढण्यात येणा-या देयकाचे बिलाचे ऑडिट (अंकेक्षण) करण्यासाठी ऑडिटर (अंकेक्षक) नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी ५ ॲम्ब्यूलन्स यासह एकूण ६५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आहेत. यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. शहरात दररोज ६५०० ते ७ हजार कोव्हिड चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आणखी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येत असलेल्या त्रुट्यांमुळे मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्याकडे कटाक्षाने लक्ष देउन आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरळीत करण्यात आले आहे. मनपाची रुग्णालये सज्ज असून वैद्यकीय कर्मचा-यांच्या अभावी ते सुरू करण्यास अडचण होती. यावरही उपाय शोधण्यात आले आहेत. रेल्वेने काही दिवसांपूर्वीच मनपाला रुग्णालय देण्याचे जाहिर केले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस ते रुग्णालय सुरू न करता येउ शकल्याने तेथील वैद्यकीय चमू मनपाच्या सदर येथील आयुष रुग्णालयात सेवा देणार आहे. त्यामुळे मनपाच्या सदर येथील रुग्णालयात कोव्हिड उपचार केले जाईल. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलची जबाबदारी शहरातील साई मंदिर ट्रस्टने घेतली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातही उपचार सुरू करण्यात आले आहे.

पाचपावली रुग्णालयात कोव्हिड पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार व त्यांची प्रसूती सुरू करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील शिक्षण पूर्ण झालेले ६० डॉक्टर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) येथून शिक्षण पूर्ण केलेल्या २०० डॉक्टरांना लवकरच नियुक्ती देण्यात येत आहे. त्यामुळे महत्वाचा वैद्यकीय कर्मचा-यांचा प्रश्न सुटला आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस मनपाकडे मनपा रुग्णालयांचे ४०० बेड्स उपलब्ध होतील, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

‘जम्बो हॉस्पिटल’ ऐवजी छोट्या रुग्णालयांवर भर द्या

नागपूर शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ तयार करणे प्रस्तावित आहे. त्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत दिली. शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ उभारण्याऐवजी २०० ते ३०० बेड्सची छोटी रुग्णालये उभारा, अशी सूचना यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकाचवेळी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त बेड्सचे ‘जम्बो हॉस्पिटल’ मध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यात अनेक अडचणी येतात. रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी, रुग्ण तसेच वैद्यकीय चमूंचे कार्य सुरळीत चालावे यासाठी छोटी रुग्णालये तयार करा. त्यात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या. शहरातील काही रिकाम्या इमारतींचा यासाठी वापर करता आल्यास त्यादृष्टीने विचार करा, त्यामुळे झटपट कार्यवाही सुरू होईल, असेही ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बेड्सच्या उपलब्धतेचे ‘एसएमएस’ पाठवा

रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मनपाच्या नियंत्रण कक्षात बेड्सच्या उपलब्धतेसाठी फोन करतात. त्यांची संबंधित रुग्णालयांची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना परत पाठविण्याचा प्रकार घडतो. यावर उपाय म्हणून ‘एसएमएस’ प्रणाली अंमलात आणावी, अशीही सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये रुग्णाने नियंत्रण कक्षात फोन करताच त्याची संपूर्ण माहिती मागवून घेणे, त्यानंतर त्याची ऑक्सिजनची स्थिती विचारणे, संबंधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज असल्यास त्याला बेड्स उपलब्ध असणा-या संबंधित रुग्णालयाची माहिती देणे व लगेच त्यासंबंधी रुग्णाच्या मोबाईल नंबरवर त्यासंबंधीचे ‘एसएमएस’ पाठवायचे. ‘एसएमएस’ हे हॉस्पिटलमध्ये रुग्ण तातडीने दाखल करण्यासाठी ‘टोकन’ची भूमिका निभावेल व संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले.

‘कोव्हिड संवाद’ स्तूत्य उपक्रम

कोव्हिड संदर्भात नागरिकांमध्ये असलेली भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी मनपामध्ये महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून ‘कोव्हिड संवाद’ हा फेसबुक लाईव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासंबंधी महापौर संदीप जोशी यांनी बैठकीत माहिती दिली. ‘कोव्हिड संवाद’मध्ये दररोज शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित केले जाते. संबंधित डॉक्टर यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करून नागरिकांच्या शंका आणि प्रश्नांचे निरसन करतात. या उपक्रमाला नागपुरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून तो पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे, असेही महापौरांनी सांगितले. आजच्या स्थितीत नागरिकांना योग्य माहिती मिळणे व त्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. यासंबंधी नागपूर महानगरपालिकेने घेतलेला पुढाकार अत्यंत स्तूत्य आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोव्हिड संवाद’ची प्रसंशा केली. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा यासाठी त्यांच्या स्वत:च्या फेसबुक पेजवरूनही प्रसारीत करण्याची सूचना ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

News Credit To NMC

कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा !

गपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद. ह्या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय.

त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, पोलिसांचे दंडे पडतील का, मनपाकडून दंड ठोठावला जाईल का हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून दोन दिवस घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जनता कर्फ्यू’दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधींचे दुकाने वगळता काहीही सुरू राहणार नाही, याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे.

अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. कोरोनाशी लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यू यशस्वी करणे आवश्यक आहे. यासाठी जनप्रतिनिधींनीही जनतेला उद्युक्त करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना कुठलिही अडचण येणार नाही :-

जनता कर्फ्यूदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी आपले प्रवेशपत्र सोबत बाळगावे, असे महापौरांनी सूचीत केले आहे.

News Credit To NMC

लक्षणे दिसताच चाचणी करा

कोरोना हा आजार सर्वसामान्यांप्रमाणेच डॉक्टरांसाठीही नवीन आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या संशोधनातून त्याचे बारकावे लक्षात येत आहे. मात्र या आजाराविषयी गंभीर राहणे आवश्यक आहे व त्यादृष्टीने काळजी घेणेही अत्यंत गरजेचे आहे. साधा ताप, सर्दी असली तरी कोव्हिडचा अहवाल पॉझिटिव्ह येतो असा अनेकांची तक्रार असते. कोव्हिडचे वेगवेगळे प्रकार आहे. प्रत्येकाला सारखी लक्षणे राहतील असे नाही. त्यामुळे साधा ताप असला तरी डॉक्टर चाचणी करायला सांगतात हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. प्रत्येक ताप हा कोरोना असू शकत नाही हे खरे असले तरी त्याचे योग्य निदान करण्यासाठी चाचणी करणे गरजेचेच आहे. त्यामुळे कोव्हिडच्या तीव्र लक्षणांव्यतिरिक्त कोणतिही सौम्य लक्षणे आढळली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्वरीत चाचणी करा. चाचणी करून योग्य निदान लागल्यास आपल्याला आवश्यक ती काळजी घेता येईल आणि स्वत:सह इतरांचेही संरक्षण करता येईल, असे आवाहन प्रसिद्ध कन्सल्टंट मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. यग्नेश ठाकर आणि प्रसिद्ध कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ.अविनाश वासे यांनी केले.नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’मध्ये गुरूवारी (ता.१७) कन्सल्टंट मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. यग्नेश ठाकर आणि प्रसिद्ध कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ.अविनाश वासे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसरन केले.यावेळी सुक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. यग्नेश ठाकर यांनी कोव्हिड संदर्भातील चाचण्या आणि त्यातील बारकाव्यांची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘टेस्ट, ट्रेस आणि ट्रीटमेंट’ हे तीन ‘टी’ महत्वाचे आहेत. कोव्हिड रुग्णाचे योग्य निदान व्हावे यासाठी सर्वात आधी चाचणी करणे आवश्यक आहे. कोव्हिड संदर्भात अँटीजेन, आरटीपीसीआर आणि अँटीबॉडी या तीन चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमध्ये कोरोनाचा ‘आरएनए’ शोधला जातो. तो रुग्णामध्ये आढळल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असतो. आजच्या स्थितीत अँटीबॉडी चाचणीचे फारसे महत्व नसल्याने ती न केल्यास फरक पडत नाही. सुक्ष्म निदानासाठी आरटीपीसीआर चाचणी केली जाते. याशिवाय झटपट निदान व्हावे यासाठी अँटीजेन चाचणी केली जाते. अँटीजेन निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी १७ दिवसाचा आयसोलेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना चाचणीची गरज नाही. कोरोनाबाधितांच्या शरीरात मृत विषाणूचे तुकडे राहतात, रुग्ण बरे झाल्यानंतर पुढील २८ दिवसात आरटीपीसीआर ही सुक्ष्म स्तरावरील चाचणी केल्यास त्यात ते तुकडे निदर्शनास येउन अहवाल पॉझिटिव्ह येउ शकतो. त्यामुळे बाधित व्यक्तीला धोका नसला तरी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. डॉ. यग्नेश ठाकर यांनी यावेळी सांगितले.डॉ.अविनाश वासे म्हणाले, कोव्हिडमध्ये ‘अँटीजेन’ हे खूप जास्त प्रमाणात ‘ॲक्टिव्ह’ होत असून त्याचा प्रभाव फुफ्फुस, किडनी, यकृत यावर पडतो. कोव्हिडचे प्रमाण किती व त्याचा धोका कितपत आहे यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या ‘सीबीसी’, ‘लिव्हर फंक्शन’, ‘किडनी फंक्शन’ यासह इतर आवश्यक चाचण्या करणे गरजेचे आहे. कोव्हिड संदर्भात नागरिकांमध्ये भीती आणि त्यापेक्षा जास्त संभ्रम आहे. साध्या तापामध्ये लोक भीती बाळगतात आणि चाचणीसाठी पुढे येत नाही. जसा प्रत्येक ताप हा डेंग्यू, मलेरिया, टायफाईड असू शकत नाही तसाच प्रत्येक ताप हा कोरोना सुद्धा असू शकत नाही. मात्र धोका टाळण्याठी चाचणी करणे आवश्यक आहे. मित्र, नातेवाई, कार्यालयात वावरताना अनेक जण मास्क व इतर सुरक्षा घेत नाही. कोरोनाला कुणालाही होउ शकतो त्यामुळे जवळच्या व दूरच्या प्रत्येक व्यक्तीपासून योग्य अंतर राखा, नियमीत मास्क लावा, सॅनिटायजरचा वापर करा. ‘लवकर निदान, त्वरीत उपचार’ हा कोव्हिडला हरविण्याचा सर्वोत्तम मंत्र आहे. त्यामुळे लक्षणे लपवू नका, चाचणी करा. कोणतिही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:ही मास्क लावा व समाजात जे लोक मास्कविना फिरत आहेत, त्यांनाही लावण्याचा सल्ला द्या, असेही डॉ. अविनाश वासे यांनी सांगितले.

कोव्हीड रुग्णांची सूचना मनपाला देणे बंधनकारक

महाराष्ट्र शासनाव्दारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांनी मनपाचे सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नर्सिंग होमचा परवाना रद्द करणे तसेच भा.दं.वि.संहिता आणि अन्य कायद्यांतर्गंत कारवाई केली जाईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहेत.मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार काही खासगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर घोषीत केले असून त्या रुग्णालयामध्ये ८० टक्के बेड्स कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. यासोबतच त्यांना कोव्हिड रुग्णांकडून शासनाव्दारे निर्धारित दराप्रमाणे दर आकारण्याचेही आदेशात नमूद केले आहे. तसेच २० टक्के बेडस नान-कोव्हीडसाठी राखीव राहतील.खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती, रिक्त बेडची संख्या हे सुद्धा मनपाला कळविण्याचे आयुक्तांनी निर्देशीत केले आहे. कोव्हिड रुग्णांना दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचित करणे आवश्यक आहे. जर कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक असेल तर रुग्णालय त्यांना दाखल करू शकतात. मात्र दाखल केल्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती एक तासाच्या आत मनपाला देणे आवश्यक आहे. तसेच शासनाव्दारे निर्धारित केलेल्या दरानुसार बिल आकारावे, असेसुध्दा निर्देश म.न.पा.ने दिले आहे.नागपूरात ६३७ खाजगी रुग्णालय आहेत पण कोव्हिड रुग्णांसाठी फारच कमी रुग्णालय समोर येत आहेत. महापौर श्री. संदीप जोशी आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी खासगी रुग्णालयांना कोव्हिड ला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतू रुग्णालयांनी या आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला नाही. महापौरांनी मनपा प्रशासनाला प्रतिसाद न देणा-या रुग्णालयांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व शहरातील स्थिती पाहता खासगी रुग्णालयांनी कर्तव्य भावनेतून पुढे येण्याची गरज आहे, अशी भावना महापौर व आयुक्तांनी व्यक्त केली आहे. BACK TO HOME PAGE

मनपाच्या निर्देशांचे पालन न करणा-या रुग्णालयांचा परवाना रद्द करणार

महाराष्ट्र शासनाव्दारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड्स आता कोव्हिड-१९ रुग्णांसाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच कोव्हिड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी संबंधित खाजगी रुग्णालयांनी मनपाला सूचना देण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयांनी मनपाचे सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नर्सिंग होमचा परवाना रद्द करणे तसेच भा.दं.वि.संहिता आणि अन्य कायद्यांतर्गंत कारवाई केली जाईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहेत.मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयामध्ये ८० टक्के बेड्स कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. यासोबतच त्यांना कोव्हिड रुग्णांकडून शासनाव्दारे निर्धारित दराप्रमाणे दर आकारण्याचेही आदेशात नमूद केले आहे. २० टक्क् बेडस नान-कोव्हीडसाठी राखीव राहतील.खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती, रिक्त बेडची संख्या हे सुद्धा मनपाला कळविण्याचे आयुक्तांनी निर्देशीत केले आहे. कोव्हिड रुग्णांना दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचित करणे आवश्यक आहे. जर कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक असेल तर रुग्णालय त्यांना दाखल करू शकतात. मात्र दाखल केल्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती एक तासाच्या आत मनपाला देणे आवश्यक आहे. तसेच शासनाव्दारे निर्धारित केलेल्या दरानुसार बिल आकारावे, असेसुध्दा निर्देश म.न.पा.ने दिले आहे.नागपूरात ६३७ खाजगी रुग्णालय आहेत पण कोव्हिड रुग्णांसाठी फारच कमी रुग्णालय समोर येत आहेत. महापौर श्री. संदीप जोशी आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी खासगी रुग्णालयांना कोव्हिड ला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतू रुग्णालयांनी या आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला नाही. महापौरांनी मनपा प्रशासनाला प्रतिसाद न देणा-या रुग्णालयांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व शहरातील स्थिती पाहता खासगी रुग्णालयांनी कर्तव्य भावनेतून पुढे येण्याची गरज आहे, अशी भावना महापौर व आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

मनपाच्या रुग्णालयात कोरोनाबाधित गरोदर मातेची प्रसूती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमध्ये गरोदर मातांच्या प्रसूतीवर ब्रेक लागला होता. केवळ इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय अथवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथेच प्रसूती करता येत होती. नागपूर महानगरपालिकेने आता मंगळवारपासून पाचपावली सुतिकागृहात कोरोना पॉझिटिव्ह स्त्रियांच्या प्रसूतीची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे आज (ता. १५) एका कोरोनाबाधित गरोदर मातेची प्रसूती यशस्वीपणे करण्यात आली. माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. गरोदर मातांच्या प्रसूतीची व्यवस्था मेडिकल अथवा मेयोशिवाय कुठेही नसल्यामुळे कोरोनाबाधित गरोदर मातांची फरफट होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची गरज ओळखून मनपाच्या रुग्णालयात व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. महापौर आणि आयुक्तांच्या या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पाचपावली प्रसूतिगृहातील स्त्री रोग तज्ञ डॉ. संगीता खंडाईत (बालकोटे) आणि डॉ. वैशाली मोहकर यांनी पुढाकार घेतला. लक्षणे नसलेल्या कोव्हिड रुग्णांची प्रसूती करण्याची व्यवस्था केली. यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयाच्या बधिरीकरण तज्ञ डॉ. आनंद कांबळे, बाल रोग तज्ञ डॉ. विंकी रुगवाणी आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. दीप्ती शेंडे यांची मदत घेतली. ह्या सर्वांच्या मदतीने मंगळवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ३० वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हे त्यांचे दुसरे बाळ आहे.पाचपावली कोरोनाबाधित गरोदर मातांसाठी सुतिकागृहात २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात मनपाच्या वतीने डॉक्टर्स आणि परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

नागपुरात शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यु: महापौर जोशी

नागपूर: शहरात वाढता कोरोनाचा फैलाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता या महामारी चा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यू शिवाय पर्याय नाही असे मत सार्वत्रिक होत असतानाच आज महापौरांनी शनिवार व रविवार दि १९ व २० रोजी नागपुरात जनता कर्फ्यू पाळावा लागेल असे आवाहन आज जनतेला केले आहे. वार्ताहरांशी बोलताना त्यांनी यासंबंधीच्या आज झालेल्या आढावा बैठकीचा हवाला दिला.

ते म्हणाले की मनपातील पदाधिकारी व माननीय आयुक्तांसमवेत ही बैठक झाली, यात जनप्रतिनिधींच्या लॉकडाउनच्या मागणीवर विचार करण्यात आला तद्नुसार कर्फ्युचे महत्व मांडले गेले मात्र आयुक्तांचे मत पूर्णपणे याविरोधी होते, रोगाचा प्रसार गंभीर प्रमाणात पसरल्यामुळे कर्फ्युत रुग्णांच्याच आरोग्यविषयक सेवांत मिळवण्यात अडचणी वाढतील याशिवाय लॉकडाऊनचा अधिकार राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा करून शनिवार आणि रविवार असा नागपुरात स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू लोकप्रतिनिधींनी ठरल्यानुसार येत्या शनिवार रविवार व त्यापुढील शनिवार-रविवारीही पाळण्यात येणार आहे, त्या पश्चातही पुढे गरज भासल्यास शनिवार रविवार असाच कर्फ्यु ठेवला जाईल मात्र तत्पूर्वी आजच्या बैठकी प्रमाणेच बैठक घेऊन त्याविषयी निश्चित काय ते ठरवण्यात येईल.

याखेरीज शहरातील आरोग्य यंत्रणेतील प्रभांवाविषयक चर्चाही आजच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य सुविधांचा पुरवठा तसेच आरोग्य यंत्रणेत ४१ नवीन डॉक्टर्स रुजू होत आहेत, सर्व शासकी रूग्णालयांत खाटांची उपस्थिती वाढण्यावर यंत्रणेत भर दिला जाणार आहे, ६३७ खाजगी रुग्णालयांनाही नोटीस जाने प्रारंभ झाल्याने त्यांच्याकडील बेडची उपलब्धताही वाढू लागली आहे अशा सकारात्मक बातम्या नागपूरच्या दृष्टीने आजच्या बैठकीत लाभल्या आहेत.

नागपुर पुलिस व मनपा, शहर में सोशल डिस्टेंसिंग बनाए रखने के लिए अतिक्रमणों पर कर रही है कार्यवाही

दरअसल नागपुर शहर में कोरोना के बढ़ते प्रसार को देखते हुए, सामाजिक दूरी सुनिश्चित करने के लिए अतिक्रमणों को हटाने की कार्यवाही शुरू कि गई है।

नागपुर पुलिस ने यह कार्यवाही की शुरुआत की है और आगे भी शहर भर में जहां जहां सड़कों पर छोटे वाहन या ढेला गाड़ी,गुमटियों आदि का फैलाव है वहां महानगर पालिका की मदद से अतिक्रमण हटा कर सोशल डिस्तंसिंग की तर्ज पर सुनिश्चित दूरी पर रखा जाएगा।यह कदम शहर में बढ़ते कोरो ना संक्रमण को देखते हुए लिया जा रहा है ताकि लोगों में उचित शारीरिक दूरी बनी रहे। और वायरस का खतरा कुछ कम हो।

Exit mobile version