स्थायी समिति सभापतिंचे सिवर व चेंबर डागडुजी कामे निविदा सुरू करण्याचे निर्देश

नागपूर:- नागपूर शहरात उत्तर, मध्य व दक्षिण सिवरेज झोन अंतर्गत सिवर लाईन व चेंबर च्या देखभाल कार्याबाबत महापौरांमार्फत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे. सोमवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात समितीची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, प्रभारी कार्यकारी अभियंता (सांडपाणी व्यवस्थापन) राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता सर्वश्री धनंजय मेंढुलकर, अनिल गेडाम,  विजय गुरूबक्षानी व दिलीप बिसेन आदी उपस्थित होते.
सदर प्रकल्प शहरातील नागरिकांना भेडसावणा-या सिवर लाईनच्या समस्या लक्षात घेवून दूरदृष्टीने तयार करण्यात आला आहे. त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे येणार आहेत. अनेक ठिकाणी सिवर लाईनवर अतिक्रमण असल्याने ते अतिक्रमण काढण्याची कारवाई आतापासून सुरू करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने झोनस्तरावरून कार्यवाही सुरू करण्यात यावी. याशिवाय ज्या प्रभागात काम करावयाचे आहे, त्या प्रभागातील संबंधित नगरसेवकांना प्रकल्पाची माहिती देण्यात यावी व आवश्यक ठिकाणी त्यांचे सहकार्य घेण्यात यावे, असे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
गपूर शहरात उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करण्यात आले आहेत. या तिनही झोनमध्ये अनेक ठिकाणी सिवर लाईन खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सिवर लाईन व चेंबर्स दुरूस्ती आणि देखभाल कामाचे प्रकल्प तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत तिनही सिवर झोनमधील मल:निस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सदर कामाची आवश्यक निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
नागपूर शहराची नॉर्थ (सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी), सेंट्रल (धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज) आणि साउथ (लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूननगर) या तीन झोनमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या तिनही झोनमधील सिवर लाईनच्या दुरूस्ती व देखभाल कार्यांतर्गत एकूण ६० किमी ची पाईपलाईन बदलविण्यात येणार आहे. या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती देताना सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले की, तिनही झोन अंतर्गत कामे मंजुरीनंतर रीतसर तीन स्वतंत्र निविदा बोलावून करण्यात येतील. नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत अस्तित्वातील व नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या सिवरलाईन व चेंबर्सचे संपूर्ण नकाशे तयार करून घेण्यात येतील. कामात गती आणि सुसूत्रता येण्यासाठी नियुक्त कंत्राटादाराला प्रत्येक प्रभागात ४ कामगार व एक सुपरवाईजर ची टिम देणे अनिवार्य राहिल. प्रत्येक झोनच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत दैनंदिन स्वरूपात देण्यात येणा-या मागणी पत्रकाप्रमाणे कंत्राटदाराकडून प्रभागनिहाय काम पूर्ण करून घेणे अनिवार्य राहिल, असेही त्यांनी सांगितले.

रूग्णवाहीकांचा तुटवडा पहाता झोननिहाय नव्या ४ वाहिका: मनपाचा तातडीचा उपक्रम

नागपूर:- बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री.विजय (पिंटू) झलके आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झंडी दाखवून ॲम्बुलन्स नागरिकांच्या सेवेत रुजू केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बर्हीरवार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रादेशीक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक (RTO) सी.एच.जमधाडे व संजय फेंडारकर, मनपा परिवहन विभागाचे रविन्द्र पागे, अरुण पिपुरडे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून २५ रुग्णवाहिका बुधवारपासून नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. महानगरपालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत असून त्यामध्ये २५ रुग्णवाहिकांची नव्याने भर पडली आहे. मा.महापौर श्री. संदीप जोशी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी जास्तीच्या रुग्णवाहिका घेण्याचे निर्देश दिले होते. अलिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत होती.

स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री. विजय झलके यांनी सांगितले की सद्या कोव्हीडचा प्रकोप वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता लक्षात घेता कोव्हीड रुग्णांसाठी ६५ ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका नागरिकांना विना मूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी संबंधितांनी झोन कार्यालयामध्ये संपर्क साधावे.

आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार कोरोना बाधितांसाठी प्रत्येक झोन मध्ये चार रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोव्हीड केअर सेंटर आणि मनपा मुख्यालयात देखील रुग्णवाहिका उपलब्ध राहतील. गरजेनुसार कोरोना बाधितांसाठी झोन कार्यालयमध्ये फोन करुन ॲम्बुलन्स मागविता येईल. पूर्वी मनपाकडे २० रुग्णवाहिका होत्या मागच्या आठवडयात त्यांची संख्या वाढवून ४० करण्यात आली आणि आता त्यामध्ये २५ ॲम्बुलन्संची भर पडणार आहे.

मनपा आयुक्तांनी रुग्णवाहिकेमध्ये पोर्टेबल ऑक्सीजन सिलेंडर, वाहन चालकासाठी मास्क, हँड ग्लोज (हात मोजे), सॅनिटायझर स्ट्रो ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. ही रुग्णवाहिका नागरिकांसाठी २४ तास (24X7) उपलब्ध राहील. ‍

झोन स्तरावर कोरोना नियंत्रण कक्षाचे फोन नंबर
अ.क्र. झोन कार्यालयाचे नांव टेलीफोन नंबर
१ लक्ष्मीनगर झोन क्र.०१ 0712 – 2245053
२ धरमपेठ झोन क्र.०२ 0712 – 2567056
३ हनुमाननगर झोन क्र.०३ 0712 – 2755589
४ धंतोली झोन क्र.०४ 0712 – 2465599
५ नेहरुनगर झोन क्र.०५ 0712 – 2702126
६ गांधीबाग झोन क्र.०६ 0712 – 2739832
७ सतरंजीपूरा झोन क्र.०७ मो.नं.7030577650
८ लकडगंज झोन क्र.०८ 0712 – 2737599
९ आशीनगर झोन क्र.०९ 0712 – 2655605
१० मंगळवारी झोन क्र.१० 0712 – 2599905

आठ महिन्यात मनपाने बुजविले शहरातील पाच हजारांवर खड्डे

नागरिकांच्या तक्रारी आणि नियमित कामांतर्गत १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात शहरातील सुमारे ५०३८ खड्डे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बुजविण्यात आले. सुमारे ९४२४० वर्ग फूट परिसर यामाध्यमातून समतल करण्यात आला. हॉट मिक्स प्लान्ट विभाग, जेट पॅचर मशीन आणि इन्स्टा रोड पॅचर मशीनद्वारे हे खड्डे बुजविण्यात आलेत.

महापौर श्री.संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही माहिती विभागा मार्फत देण्यात आली. महापौरांनी सांगितले नागपूर शहरात खडडयापासून नागरिकांना त्रास होत आहे. हॉट मिक्स प्लान्ट यांनी तात्काळ खडडे बुजविण्याची कारवाई करावी.
हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून झोननिहाय करण्यात आलेल्या कामांच्या माध्यमातून ८२५२२.८२ वर्ग मीटर क्षेत्र असलेले ३८७६ खड्डे बुजविण्यात आले. यासाठी स्क्रॅप ३४ ट्रीप, डब्ल्यूबीएम ३२८.५ ट्रीप, बीएम २० ट्रीप आसणि एस.डी.सी.सी./बी.सी. ३१५ ट्रीपचा वापर करण्यात आला. जेट पॅचरच्या माध्यमातून ४३२४.८२ वर्ग मीटर क्षेत्रातील ३१२ खड्डे तर इन्स्टा रोड पॅचरच्या माध्यमातून ७३९४.५७ वर्गमीटर क्षेत्र असलेले ८५० खड्डे बुजविण्यात आले. बैठकीत कार्यकारी अभियंता श्रीमती सोनाली चव्हाण, मॅकेनिकल इंजीनियर योगेश लुंगे, उप अभियंता कमलेश चव्हाण उपस्थित होते.

बुजविलेल्या खड्ड्यांची झोननिहाय माहिती

हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून १ जानेवारी ते ३० ऑगस्टदरम्यान बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची झोननिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये ९०६५.३४ क्षेत्रफळावरील ५२३ खड्डे, धरमपेठ झोनमध्ये ८४०२.१४ क्षेत्रफळावरील ३८५ खड्डे, हनुमाननगर झोनअंतर्गत ७४४०.४४ वर्गमीटर क्षेत्रफळावरील ३८० खड्डे, धंतोली झोनअंतर्गत ५९५५.९१ वर्गमीटर क्षेत्रफळातील २४८ खड्डे, नेहरूनगर झोनमध्ये १४९८७.८३ क्षेत्रफळावरील ६८० खड्डे, गांधीबाग झोनअंतर्गत ४६१७.९७ क्षेत्रफळावरील ३३४ खड्डे, सतरंजीपुरा झोनअंतर्गत २३५१.८ वर्गमीटर क्षेत्रफळ असलेले १३६ खड्डे, लकडगंज झोनअंतर्गत ५२८७.४९ वर्गमीटर क्षेत्रफळ असलेले २३१ खड्डे, आशीनगर झोनअंतर्गत ११३४४.७१ क्षेत्रफळावरील ३८४ खड्डे आणि मंगळवारी झोनअंतर्गत १३०६९.१९ वर्गमीटर क्षेत्रफळावरील ५७५ असे एकूण ८२५२२.८२ क्षेत्रफळावरील ३८७६ खड्डे हॉटमिक्स विभागाच्या माध्यमातून बुजविण्यात आले.

News Credit To NMC

स्कूल व्हॅन रुग्णवाहिकेत रुपांतरित करा

नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सोयी-सुविधा आणि साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असून स्कूल व्हॅन उपयोगात नाहीत. या स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रूग्णवाहिकेत रुपांतर केल्यास रुग्णांसाठी ते सोयीचे होईल. अशा स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात यावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केले.

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. वेळेवर उपचार मिळण्यास उशीर होत असल्याने मृत्यूसंख्याही वाढत आहे. यासाठी साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. नागपूर महानगरपालिका रुग्णवाहिकांसह अन्य साधनांची व्यवस्था करीत आहे. मात्र आता कोरोनाशी संघटित लढा देण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले तर अनेक रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी तातडीची सेवा मिळू शकेल. तसेच गेल्या अनेक महीन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणा-या व्हॅन चालकांना रोजगार उपलब्ध होईल. याची तात्काळ दखल घेण्याची विनंतीवजा सूचना महापौर श्री.संदीप जोशी यांनी पत्रातून केली आहे.
या सूचनेची सकारात्मक दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या सूचनेबद्दल अनुकूलता दर्शविली असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

अर्धवट सिमेंट रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा : महापौर

नागपूर:- नागपूर महानगरपालिका प्रशासनाने अर्धवट सिमेंट रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करावे, असे निर्देश महापौर श्री.संदीप जोशी यांनी सोमवारी दिले.

महापौर कक्षात सिमेंट रोडच्या कामाच्या संदर्भात आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना महापौर म्हणाले की, मागील सात महिन्यापासून कोव्हीड-१९ मुळे शहरातील अनेक सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत पडले आहे. याचा नागरिकांना बराच त्रास देखील होत आहे. विशेषत: पावसाळयामध्ये अर्धवट सिमेंट रस्त्याच्या कामामुळे अनेकांच्या घरी पाणी देखील शिरले आहे ही स्थिती अत्यंत दयनीय आहे. कोव्हीडच्या परस्थितीत कोव्हीडवर लक्ष असणे अत्यंत स्वाभाविक आहे परंतु शहरातील अर्धवट असणा-या सिमेंट रोडची कामे देखील करणे गरजेचे आहे तरी या संदर्भात पुर्ण माहिती घेऊन तीन दिवसात अधिक्षक अभियंता श्री तालेवार यांनी आपला अहवाल दयावा व तात्काळ अर्धवट सिमेंट रोडच्या कामाला प्रारंभ करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत मा.महापौर श्री.संदीप जोशी यांचेसह सभापती वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती श्री. विरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त श्री.संजय निपाणे, अधिक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी श्री. हेमंत ठाकरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

News Credit To NMC

नए नगर आयुक्त देंगे मुंढे के अधूरे कामो को पूरा अंजाम

नागपुर: नागपुर महानगरपालिका के नए आयुक्त राधाकृष्णन बी पद ग्रहण करने के बाद से ही एक्शन मोड में हैं। कुख्यात डॉन संतोष अम्बेकर के दूसरे बंगले पर कमिश्नर ने कार्रवाई की। इससे पहले, पूर्व नगर आयुक्त मुंढे ने अम्बेकर के एक बंगले के खिलाफ कार्रवाई की थी।

राधाकृष्णन बी ने  संतोष अम्बेकर के अवैध बंगले को गिराने का आदेश दिया था। आयुक्त के आदेश के बाद अम्बेकर के बंगले को कल ढहा दिया गया। नगरपालिका ने ढाई हजार वर्ग फुट के क्षेत्र में अवैध बंगले के खिलाफ कार्रवाई की। संतोष अम्बेकर की पत्नी के नाम चार मंजिला बंगला है।

इससे पहले फरवरी में तत्कालीन कमिश्नर मुंढे ने एक बंगले पर कार्रवाई की थी। गौरतलब है कि पद संभालने के बाद पहले महीने में उन्होंने अम्बेकर के किले को ढहा दिया था। संतोष अम्बेकर के ईतवारी स्थित एक अनधिकृत बंगला था। अम्बेकर इसी बंगले से अपना गिरोह चला रहा था।‌‌

नागपुर महानगरपालिका ने संतोष अम्बेकर को एक कानूनी नोटिस जारी कह इसे हटाने कहा था। हालांकि, चूंकि उन्होंने खुद अतिक्रमण नहीं हटाया, मुंढे ने बंगले को गिराने का आदेश दिया था। एक बंगला ढहाए जाने के बाद अब कमिश्नर राधाकृष्णन बी ने दूसरे बंगले पर कार्रवाई की है।

डॉन संतोष अम्बेकर, जो नागपुर सेंट्रल जेल में बंद हैं, भी कोरोना से संक्रमित थे। संक्रमण के बाद कुछ दिनों तक जेल के अस्पताल में उनका इलाज चला। बाद में उनका इलाज मेयो के कोविड अस्पताल में किया गया।

लेटलतीफोंको झटका: मुंढे की ही तरह, राधाकृष्णन ने पदभार ग्रहण करने के कुछ दिनों के भीतर अम्बेकर को झटका दिया। नागपुर नगर आयुक्त के पद से मुंढे के स्थानांतरण के बाद, निगम के कर्मचारी काम पर वापस देर से आने लगे। इसलिए, राधाकृष्णन बी भी मुंढे के नक्शेकदम पर चलते हुए, निगम के 66 कर्मचारियों को ‘कारण बताओ’ नोटिस जारी किए थे।‌‌ कल की कारवाई के बाद उन्होंने स्पष्ट कर दिया है कि नागपूर में अपराध और अनर्गल बातें अब नहीं चलने वाली।

मास्क न लावणारे, सोशल डिस्टंसिंग न पाळणा-यांविरोधात आता कडक कारवाई

नागपूर: शहराचे महापौर संदीप जोशी यांनी नागपूर शहराचे नवनियुक्त मनपा आयुक्त व नवनियुक्त पोलीस आयुक्त यांचेसोबत आज संयुक्त बैठकीस हजेरी लावली, दोघेही नव्याने आलेयत व सर्वप्रतिनिधीसह बैठकीत झालेल्या चर्चांबाबत माहिती देताना जोशी यांनी सांगितले की कोरोना लढ्यात निर्देशानुसार न वागणाऱ्या, नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील नागरिकांवर यापुढे सक्तीने कारवाई करण्यात येईल. तोंडावर मास्क न वापरता फिरणा-या, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणा-या अशा उल्लंघनकर्त्यां विरोधात कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.

कोरोना प्रसार विरोधात, रोखथामात एकत्रितपणे कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो याबाबतची या बैठकीत चर्चा झाली. महानगरपालिकेने अशी ही कारवाई सुरू केली आहे, व उद्यापासून पोलिस विभागातर्फेही अशाच कठोर कारवाईची सुरुवात होणार आहे.
याबाबत प्रसिद्धी विभाग माहिती देईलच, बैठकीत कोरोना प्रसार रोखथामात कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चाचपणी केली गेली, जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा संबंधित उपायांचेही प्रसंगी नियोजन केले जाईल याबाबत चर्चा झाली.

कोरोना विरोधातील या लढ्यात संयुक्त प्रयत्नांची शिकस्त राखण्याचा सर्व मिळून प्रयत्न करू व कोरोनास दूर सारू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोना वॉरियर्स पोलिसांनाच नाहीत शहरात बेड उपलब्ध: आयुक्त अमितेश कुमार यांची नाराजी

नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे व कोरोना रुग्ण संबंधित बातम्या व अफवांचं पेव शहरभरात पसरत आहे, अशात परवा नागपुरात खुद्द पोलिसांसाठीच बेड उपलब्ध नसल्याची वार्ता शहराचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे कानावर गेली, यासंदर्भात त्यांनी तातडीची कारवाई करत सदर बाधित पोलिस कर्मचा-यांना रूग्णालयात बेड उपलब्ध होईल यासंबंधी यंत्रणेस खडसावून जागे केले.

कोरोना बधित पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेड का उपलब्ध होत नाहीत? त्याविषयक यंत्रणेतील झोनल अधिका-यांची कान उघडणी नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना करावी लागली आहे. कोरोना वरियर्स म्हणून महत्वाची कामगिरी बजावणारे पोलिसांनाच जर अशी वागणूक मिळत असेल तर हा प्रकार अत्यंत वाईट आहे असे त्यांनी म्हटले आहे.

यासंबंधित त्यांची संभाषणाची एक ऑडिओ क्लिपच सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेली आहे, यात त्यांनी अधिकाऱ्यांस याबाबत विचारणा केली असल्याचे आढळते.
बाधित कर्मचाऱ्यांची माहिती सांगत त्यांना सायंकाळपर्यंत बेड उपलब्ध झाले नाही तर ते स्वतः जातीने मनपा आयुक्तांकडे जाऊन याबाबतची तक्रार करणार असल्याची त्यांनी सांगितले

अशाप्रकारे कोरोना लढ्यात अग्रभागी लढा देणाऱ्या व्यक्तींनाच जर बेड मिळत नाही हे चित्र दुर्दैवी आहे, कुटुंब फक्त आपल्यालाच आहे काय त्यांना कुटुंब नाहीत काय? अशी विचारणाही त्यांनी केली. अशा लोकांना प्राथमिकतेने बेड मिळणे ही भविष्यासाठीचीही तजवीज असावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवाय दाखल करतांना रूग्णालयाचे फी म्हणजे संबंधित ची रक्कम भरण्याची प्रक्रिया ही पोलिस विभागाची असेल अशी त्यांनी खात्री दिली.

एका चमूचे नेतृत्व करत असताना टिमलिडर कसा असावा याचं उदाहरणच आयुक्त अमितेश कुमार यांनी दाखवून दिले आहे.

रॅपिड रिस्पॉन्स टीमला गती वाढवायच्या मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचना

नागपूर:- कोविड केअर सेंटर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सूतिकागृह येथे चाचण्या घेतल्यानंतर पॉजिटिव्ह आढळलेल्या रूग्णांच्या संपर्काची तपासणी करणे महत्वाचे आहे. पॉजिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातल्या तपासण्यांसाठी वेगाने संपर्क ट्रेसिंग करण्यासाठी एक द्रुत प्रतिक्रिया टीम तयार केली गेली आहे. या पथकाचे कामकाज वेगात करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्देश दिले. गुरुवारी त्यांनी पाचपावली कोविड केअर सेंटर, पाचपावली पीएचसी आणि सुतिकागृहाची अचानक पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे यावेळी त्यांसह उपस्थित होते.

उच्च धोका असलेल्यांची कॉन्टैक्ट ट्रेसिंग आवश्यक: आयुक्त म्हणाले की, पॉजिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या उच्च धोका असलेल्या लोकांस प्राधान्याने तपास काढत संपर्क साधावा. कोरोनाचा सतत वाढत असलेला संसर्ग लक्षात घेता, चाचण्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील कोरोना टेस्ट सेंटरची संख्याही वाढविण्यात आली आहे.

परंतु तपासणी दरम्यान आवश्यक दक्षता ठेवली जाते की नाही, चाचणी विहित मुदतीत केली जाते की नाही, तपासणीसाठी येणार्‍या लोकांकडून याचे पालन केले जाते की नाही. याबाबत आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी गुरुवारी अचानक आढावा दौरा घेतला.

नागरिकांनी जवाबदारी पाळावी: आयुक्तांनी सांगीतले कोरोनाची चिन्हे दिसू लागतात तेव्हा लपून राहू नये, स्वत:च तपासणीचा पुढाकार घ्यायला पाहिजे. जवळच्या तपासणी केंद्राला भेट देऊन त्वरित चौकशी करावी. या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती जर एखाद्या सकारात्मक रूग्णाच्या संपर्कात येत असेल तर त्याने स्वत: मनपाच्या कोरोना इन्व्हेस्टिगेशन सेंटरमध्ये जाऊन जबाबदारीने चौकशी केली पाहिजे. सकारात्मक रूग्णात लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल होण्यासाठी केंद्रांवर संपर्क साधा आणि मार्गदर्शन मिळवा. ज्यासाठी त्यांनी 0712-2551866, 0712-2532474, 18002333764 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले.

नागपुर नगर आयुक्त ने 66 कर्मचारियों को नोटिस दिया।

नागपुर: नागपुर नगर आयुक्त के पद से आईएएस अधिकारी तुकाराम मुंधे के तबादले के बाद निगम के कर्मचारियों ने देर से कार्यालय आना शुरू किया है। इसलिए, नव नियुक्त आयुक्त राधाकृष्णन । पदभार संभालने के बाद से वह एक्शन मोड में हैं। पूर्व आयुक्त तुकाराम मुंधे के नक्शेकदम पर चलते हुए, उन्होंने निगम के 66 कर्मचारियों को नोटिस जारी किया है (नागपुर नगर आयुक्त 66 कर्मचारियों को कारण बताओ नोटिस)।
आयुक्त राधाकृष्णन ने आज (1 सितंबर) को निगम मुख्यालय में विभिन्न विभागों का औचक निरीक्षण किया। यह पाया गया कि कई कर्मचारी बिना अनुमति के अवकाश पर चले गए। उसी समय, राधाकृष्णन ने देखा कि कुछ कर्मचारी देर से आ रहे हैं। नव नियुक्त आयुक्त ने निगम कर्मचारियों के गैर जिम्मेदार प्रबंधन के खिलाफ तत्काल कार्रवाई की। 66 कर्मचारियों को कारण बताओ नोटिस जारी किए गए हैं।
आयुक्त राधाकृष्णन ने चेतावनी दी है कि यदि कोई भी कर्मचारी या अधिकारी निगम कार्यालय में देरी से आता है तो कार्रवाई की जाएगी। कर्मचारियों को हमेशा समय पर पहुंचना चाहिए। यदि आप छुट्टी चाहते हैं, तो आपको नियमानुसार स्वीकृति मिलनी चाहिए, राधाकृष्णन ने चेतावनी दी है।
तुकाराम मुंधे के नागपुर नगर आयुक्त के रूप में कार्यभार संभालने के अगले दिन, चार कर्मचारियों की पिटाई की गई। तुकाराम मुंडे ने लेखा और वित्त विभाग के चार कर्मचारियों को काम में अनियमितता पाए जाने पर कारण बताओ नोटिस जारी करने का निर्देश दिया था। उन्होंने अपनी नियुक्ति के अगले दिन ही लेखा और वित्त विभाग का निरीक्षण किया था। उसके बाद अब नागपुर निगम के नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन । ने 66 कर्मचारियों को कारण बताओ नोटिस भी जारी किया है ।

Exit mobile version