जुलैपर्यंत सर्व डिमांडचे वाटप करा

मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाहीला गती देण्याची गरज आहे. त्यानुसार येत्या जुलै २०२० पर्यंत सर्व डिमांडचे वाटप करण्यात यावे तसेच वाटप झालेल्या डिमांडच्या पोचपावतीचे फोटो आणि संबंधीत संपत्ती मालकाचे मोबाईल क्रमांक अपडेट करावे, असे निर्देश कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासंदर्भात बुधवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती महेंद्र धनविजय, उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या रेखा साकोरे, शिल्पा धोटे, सदस्य इब्राहिम तौफीक मोहम्मद, प्रभारी उपायुक्त (कर आकारणी व कर संकलन) मिलींद मेश्राम आदी उपस्थित होते.

चालू वर्षामध्ये ५ लाख ५९ हजार ४२१ डिमांड जनरेट करण्यात आलेल्या आहेत. या सर्व डिमांड संबंधित सर्व झोनला पाठविण्यात आल्या असून त्या वितरणासंबंधी झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. याशिवाय ६ लाख ३५ हजार २१ मालमत्तांचा ‘जीएसआय’ डेटा संकलीत करण्यात आलेला आहे. मात्र यापैकी एकही डिमांड जनरेट करण्यात आले नाही. त्यामुळे यादृष्टीने प्राधान्याने कार्य करीत येत्या जुलैपर्यंत सर्व डिमांडचे वितरण करावे. वितरीत करण्यात आलेल्या डिमांडचा अहवाल समितीला प्रत्येक आठवड्याला देण्यात यावा, असे निर्देश समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

वितरीत करण्यात आलेल्या डिमांडवर नागरिकांकडून आक्षेप घेण्यात येतो. नागरिकांच्या आक्षेपांचे समाधान करण्यासाठी सप्टेंबर २०२० व जानेवारी २०२१ या दोन महिन्यांमध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात यावे. समाधान शिबिरामध्ये आलेल्या आक्षेपांवर शिबिर झालेल्या महिन्यापासून एक महिन्यात त्यावर निर्णय घ्यावे, असेही सभापतींनी निर्देश दिले.

नागरिकांकडून मालमत्ता कर वसुली संदर्भातही यावेळी समितीतर्फे आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त लोकांना कर भरता यावे यासाठी झोनस्तरावर सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये कर संकलन शिबिराचे आयोजन करण्यात यावे. याशिवाय कर न भरणा-यांविरुद्ध ऑक्टोबर २०२०पासून सक्तीने जप्ती आणि लिलावाची प्रक्रिया संबंधित वरीष्ठ अधिका-यांच्या देखरेखीत सुरू करण्यात यावी. जप्ती आणि लिलावासंबंधीच्या कारवाईचा अनुपालन अहवाल प्रत्येक महिन्याला समितीकडे सादर करण्यात यावा, असेही निर्देश कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

३-डी इमेज च्या माध्यमातुन कोव्हिड – १९ ची माहिती

कोव्हिडची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्याचा उपयोग करून नागरिकांनी कोरोनापासून सतर्क राहावे या उद्देशातून नागपूर महानगरपालिकेने प्रारंभापासूनच तंत्रज्ञानाचा वापर केला. आता एक पाऊल पुढे टाकत कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च अंतर्गत असलेल्या नागपूर येथील नॅशनल एन्व्हिरॉनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इंस्टिट्यूट अर्थात नीरी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम देहरादूनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेनी गुगल अर्थ ॲप्लिकेशनचा वापर करीत एक ३-डी डिजीटल सर्विस तयार केली आहे.

तसेच नागपूर स्मार्ट सिटीने एक कोव्हिड – १९ ची माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केला आहे. याची लिंक मनपाच्या वेबसाईट www.nmcnagpur.gov.in वर उपलब्ध असून या लिंकच्या आधारे नागपुरातील कोव्हिड-१९ ची अद्ययावत माहिती ३-डी मध्ये उपलब्ध होणार आहे. ३-डी वर कोविड संबंधी अद्यावत माहिती देणारी नागपूर महानगरपालिका देशातली बहुदा पहिली ठरली आहे. नागपूर महापालिकेनी नीरी, आई.आई.पी. आणि स्मार्ट सिटी सोबत घेतलेली ही मोठी भरारी आहे.

या सर्विस चे लोकार्पण बुधवारी (ता. १७) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नीरीचे मुंबई झोनल प्रमुख आणि वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ. रितेश विजय, प्रकल्प सहायक कौस्तुभ जिचकार व स्मार्ट सिटी चे महाव्यवस्थापक शील घुले उपस्थित होते. आय. आय. पी. चे सुनील पाठक यांचेही यात सहकार्य लाभले.

संगणकाची बटन दाबून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोव्हिडसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या ३-डी डिजीटल सर्विस व डॅशबोर्ड चे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोव्हिड संदर्भातील माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रयत्नरत आहे. गुगल अर्थचा वापर करून आता एका क्लिक वर कोव्हिडची माहिती ३-डी इमेजेस मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशातील अन्य शहर या पासून प्रेरणा घेऊन कोविड – १९ चा बददल नागरिकांना माहिती देऊ शकतात. ही तर एक सुरुवात आहे. नीरीच्या सहकार्याने मनपा आपली शाळा, उद्याने, कार्यालये इ. ची माहिती अश्या प्रकारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार म्हणाले, अशा माहितीमुळे नागरिकांच्या ज्ञानात भर पडते. नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नाचा वापर करावा.

काय मिळेल माहिती ?

या प्रोग्रामच्या माध्यमातून नागपुरात कोव्हिडचे आजचे रुग्ण किती, ॲक्टिव्ह केसेस किती, प्रतिबंधित क्षेत्र कोणते, प्रतिबंधित क्षेत्राचे इपिसेंटर कोणते, जवळचे कोव्हिड हॉस्पीटल कोणते यासंदर्भातील सर्व माहितीचा ‘रिॲलिस्टीक व्ह्यू’ येथे दिसेल. ३-डी इमेज हा या सर्विसमधील महत्त्वाचा भाग असून यूजर्सला सहज समजेल, अशा पद्धतीने हे तयार करण्यात आले आहे. नागपूरकरांनी याचा अधिकाधिक उपयोग करून कोरोनाचे संक्रमण रोखण्यात मदत करावी, हाच यामागील उद्देश आहे. ही माहिती नागपूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या फेसबुक आणि व्टिटर वर पण उपलब्ध राहील.

‘त्या’ इंग्रजी माध्यमाच्या शाळा येत्या तीन दिवसात सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करा : प्रा. दिलीप दिवे

शहरात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक अशा एकूण सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निविदा मागविण्यात आली होती. यासंदर्भातील ई-निविदा तात्काळ सुरू करून येत्या नव्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्यासंबंधी पुढील तीन दिवसात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश शिक्षण विशेष समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिले.

विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शिक्षण विशेष समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, सदस्या रिता मुळे, प्रणिता शहाणे, हर्षला साबळे, सदस्य इब्राहिम तौफीक मोहम्मद, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर यांच्यासह सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीत शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही या विषयासह २०२०-२१ या नव्या शैक्षणिक सत्रात मनपातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या संदर्भात करण्यात येणारी पूर्वतयारी, मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाबाबत कार्यवाही, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पाठ्यपुस्तकांसंबंधी कार्य, शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅग, वाटर बॉटल देण्यासंबंधी घेण्यात आलेल्या ठरावानुसार केलेल्या कार्याची माहिती या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.

राज्य शासनामार्फत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासंबंधी परिस्थितीचा यावेळी समितीमार्फत आढावा घेण्यात आला. मनपाच्या प्राथमिक गटातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला असता एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ २९ टक्के विद्यार्थ्यांकडेच अँडरॉईड मोबाईल तर ३३ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी टिव्‍ही आहे.

एकूण २२ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल व टिव्‍हीची व्यवस्था आहे तर ३८ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्हीपैकी कोणतिही व्यवस्था नाही. माध्यमिक गटामध्येही (इयत्ता नववी ते बारावी) ३५.३५ टक्के विद्यार्थी मोबाईल आणि टिव्‍हीच्या व्यवस्थेपासून वंचित आहेत. माध्यमिक गटात ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुविधा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी दिली.

ऑनलाईन शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये हा मनपाचा मानस आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य पुरविण्याची गरज आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मौलिक वर्ष असून त्यांच्यांसाठी प्राधान्याने व्यवस्था होणे आवश्यक आहे. यासाठी येणा-या खर्चासंदर्भात समितीतर्फे ठराव घेण्यात आला असून हा विषय सभागृहात ठेवण्यात यावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मनपाच्या सर्व शाळांमध्ये सॅनिटाजिंग करण्यात येत आहेत. सर्व शाळा लवकरात लवकर सॅनिटाइज करून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली जावी, असेही निर्देश सभापतींनी दिले.

मनपाच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके, स्कूल बॅग, वाटर बॉटल आदी साहित्य देण्यात यावे. यासंबंधी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला असून यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.

News Credit To:- NMC

महापौरांशी चर्चा नंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला

शहरातील घराघरांमधून निघणारा कचरा संकलीत करून शहर स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांच्या वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शहरातील पाच झोनमध्ये सेवा देणा-या ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीच्या कर्मचा-यांना पगार कपात, आठवडी सुट्टी, कामाच्या तासांची निश्चिती, पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे असे अनेक अन्यायकारक समस्या भेडसावत आहेत. कर्मचा-यांच्या या समस्यांवर येत्या सात दिवसात संबंधित कंपनीद्वारे आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा कर्मचा-यांसह आपण स्वत: संपावर बसू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. महापौरांचे आश्वासनानंतर सफाई कामगारांनी आपला संप मागे घेतला.

ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीच्या सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाद्वारे महापौरांना निवेदन देण्यात आले होते. यावर महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१७) बैठक घेण्यात आली. महापौर कक्षात झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह ए.जी. एन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी नेते मुकेश शाहु आदी उपस्थित होते.

ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलीत करण्यात येत असून कंपनीद्वारे मनमानी कारभार सुरू आहे. कर्मचा-यांच्या वेतनात कपात करून दर महिन्याला अनियमितरित्या वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निवार्ह निधीची (पी.एफ.) पावती न देणे, राष्ट्रीय सणांच्या दिवशीही कामावर बोलावणे, कर्मचा-यांना वर्षभरासाठी एकच पोषाख देणे अशा अनेक समस्यांबाबत यावेळी कर्मचा-यांच्या प्रतिनिधीद्वारे महापौरांकडे तक्रार करण्यात आली.

या सर्व समस्यांवर गांभीर्याने दखल घेत दर महिन्याला ७ ते १० तारखेच्या आता नियमितरित्या कर्मचा-यांचे वेतन व्हावे. याशिवाय कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी संबंधात सर्व कागदपत्रे मनपाच्या आरोग्य अधिका-यांकडे सादर करावे, असे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेषत: १ मे कामगार दिनाच्याही दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावण्यात आल्याने कंपनीवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

येत्या सात दिवसात कंपनीप्रमुखांनी स्वत: उपस्थित राहून उपरोक्त निर्देशावर कार्यवाही करण्याचेही महापौरांनी बजावले.
कोणतिही पूर्वसूचना न देता विनाकारण ३० कर्मचा-यांना कंपनीद्वारे कामावरुन काढण्यात आल्याची माहिती विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीत दिली. संबंधित प्रकार अत्यंत गंभीर असून कर्मचा-यांचा एकाएकी रोजगार हिरवल्याने आजच्या स्थितीत त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घेत कर्मचा-यांच्या हिताशी संबंधित सकारात्म निर्णय घेण्याची मागणी यावेळी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महापौरांना केली.

संबंधित प्रकार गंभीर असून कंपनीद्वारे तात्काळ या सर्व कर्मचा-यांना कामावर नियुक्त करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

News Credit To:- NMC

कचरा संकलन कंपनीमुळे कर्मचारी त्रस्तन महापौरांची घेतली भेट

नागपूर:- शहरातील कचरा संग्रहण सुरळीत व्हावे या उद्देशाने जुनी कंपनी बदलत नव्या एजी एन्व्हिरो कंपनीला मनपाकडून 5 झोनसाठीचे कंत्राट देण्यात आले, परंतु कंपनीच्या कर्मचा-यांनीवतीने महापौर संदीप जोशी यांना निवेदन दिले गेले, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रासांचा उल्लेख करून कंपनीला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची विनंती केली गेलीय.

यावेळी मनपा विधी समितीचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने सांगितले की कोरोनाच्या या संकटातही कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा गोळा करीत आहेत. मात्र, सफाई कामगार आणि वाहनचालकांसाठी कंपनीकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत.

चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सांगितले की एजी एन्वायरो कंपनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूंगर झोनमार्गे कचरा संकलन करीत आहे. कर्मचार्‍यांच्या वतीने दररोज कचरा गोळा केला जात आहे. परंतु कंपनीकडून कधी पगार कपात केली जाते, तर काही वेळेस निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम करवले जात आहे. साप्ताहिक सुट्टीसुद्धा बर्‍याच वेळा रद्द केली जात आहे. अशा अनेक समस्यांमुळे कर्मचारी अस्वस्थ आहे. चर्चेनंतर महापौरांनी अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उपायुक्त यांना कर्मचारी नेत्यांसमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

NMC प्रमुख ने कहा कि स्कूलों को फिर से खोलने के लिए कम परिवर्तन

शहर में COVID 19 वायरस के मामले बढ़ने के साथ, NMC प्रमुख तुकाराम मुंधे को यह कहते हुए देखा गया कि स्पष्ट कारणों से निकट भविष्य में स्कूलों को फिर से खोलना संभव नहीं है। एनएमसी चीफ को यह कहते हुए मजबूती से खड़ा देखा गया कि शिक्षा शुरू हो सकती है लेकिन इस साल स्कूल खुलने की संभावना कम है। एमएस राज्य शिक्षा विभाग ने स्कूल को फिर से खोलने के बारे में सोमवार को एक परिपत्र जारी किया है जिसमें कहा गया है कि स्कूल 26 जून को फिर से खुल सकते हैं, लेकिन यह एनएमसी है जो इस पर अंतिम निर्णय लेगा।

हालांकि, स्कूल को फिर से खोलने पर NMC के मुख्य कड़े कदम के साथ, यह संभव है कि स्कूल केवल ऑनलाइन शिक्षा मोड में काम कर रहे हों और इस तरह से स्कूलों को यह बताने के लिए कहा कि वे सामाजिक भेद के मानदंडों का पालन करके स्कूलों को कैसे आगे बढ़ा सकते हैं। राज्य सरकार के विभाग के परिपत्र थे, जिनमें स्पष्ट रूप से कहा गया है कि विद्यालय तभी कार्य कर सकते हैं जब सामाजिक विचलन को सही मोड पर अभ्यास करते हुए देखा जा सकता है।

Containment ज़ोन में या सील किए गए क्षेत्रों में, स्कूलों में निवारक उपाय उच्च क्रम के होंगे। जब मीडिया के लोगों ने एनएमसी प्रमुख को फोन किया, तो उन्होंने शहर में स्कूल को फिर से खोलने की योजना के बारे में पूछा, उन्होंने कहा कि स्कूल शिक्षा पर काम कर सकता है, लेकिन फिर से स्कूलों को खोलने की संभावना कम है। उन्होंने स्पष्ट रूप से कहा कि स्कूल ऑन-लाइन काम कर सकते हैं लेकिन किसी भी तरह से ऑफ लाइन कार्य नहीं करेंगे। उन्होंने कहा कि उनका स्कूलों को बंद करने का कोई नजरिया नहीं है, लेकिन फिर से खुलने का इंतजाम नहीं है.

सफाईकर्मियों और घंटा गाडी चालकों की समस्याओं का निवारण करें

नागपुर:- हर दिन घर-घर से कचरा इकट्ठा करने वाले चौकीदारों और कचरा ट्रक चालकों की समस्याओं के समाधान के लिए आवश्यक उपाय किए जाने चाहिए। महापौर को एन्व्‍हायरो कंपनी के एक कर्मचारी प्रतिनिधिमंडल से संपर्क किया गया था। मंगलवार  को प्रतिनिधिमंडल ने मेयर संदीप जोशी से मुलाकात की और उनसे अपनी समस्याएं प्रस्तुत कीं। इस समय, ॲड. धर्मपाल मेश्राम उपस्थित थे।

ए.जी. एन्व्‍हायरो लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली और नेहरू नगर से अपशिष्ट एकत्र करता है। कंपनी के लिए काम करने वाले क्लीनर और ड्राइवरों को कई समस्याओं का सामना करना पड़ता है। कर्मचारी वेतन कटौती, साप्ताहिक अवकाश, काम के घंटे तय करने जैसी समस्याओं से जूझ रहे हैं। इस समय इस संबंध में आवश्यक उपाय करके कर्मचारियों को राहत देने की मांग की गई थी।

प्रतिनिधिमंडल में कर्मचारी नेता मुकेश शाहू, रितेश तंगडे, गौरव मेश्राम, सुरेश खोबरागड़े, सतीश हटवार और अन्य शामिल थे।महापौर संदीप जोशी ने बुधवार (17) को कर्मचारी नेताओं के साथ बैठक करने और सफाईकर्मियों और कचरा ट्रक ड्राइवरों की समस्याओं के बारे में एक निर्णायक रिपोर्ट प्रस्तुत करने के लिए नगर निगम के अतिरिक्त आयुक्त, स्वास्थ्य उपायुक्त को निर्देश दिया।

 

नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर

नागपूर:- पिली व पोहरा या तिन्ही नद्या नागपूर शहराचे वैभव. ऐतिहासिक नाग नदी तर नागपूरवासीयांची ओळख. मात्र निसर्गाने दिलेला हा वारसा नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे विस्मृतीत जाऊ लागला. परिणामी एकेकाळी शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तीनही नद्यांच्या पुजरुज्जीवनाचा विडा उचलला आणि आज या नद्या आपल्या मूळस्वरुपात येऊ लागल्या आहेत. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनामुळे नागपूरला गतवैभव तर मिळालेच, शिवाय या वैभवात भरही पडली आहे.नाग नदीच्या काठावर असलेल्या नागपूर शहराची संस्कृती ओळख जपणारी नाग नदीला मागच्या काही वर्षात नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नावलौकिक असलेल्या नागपूरच्या महत्त्वपूर्ण वारस्याला, शहराच्या धमन्यांना पुन्हा नद्यांचे स्वरुप देण्याचे कार्य मनपातर्फे केले जात आहे.

या तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेले अतिक्रमण ‍तिची मूळ ओळख मिटवणारे आहे. उद्योगांचे घाण पाणी, सांडपाणी या नदीला सोडल्याने दुर्गंधी सोबत आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे.

नागनदी, पिली नदी किंवा पोहरा नदीची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली जाते. मात्र या वर्षी नद्यांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे. काढलेला गाळ नदीच्या संरक्षण भिंतीला लावून न ठेवता तो इतरत्र पाठविण्यात आला. प्रवाह मोकळा झाल्याने या नद्या कधी नव्हे इतक्या खळाळून वाहू लागल्या आहे. नदीतून काढलेल्या गाळ पुन्हा त्याच नदीत वाहून जाणार नसल्याने यावर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे.

नदीची संपूर्ण स्वच्छता विविध कंपन्या आणि शासकीय विभागांच्या सी.एस.आर. निधीतून करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम ‍विभाग, वेकोलि, मॉईल, एन.एच.ए.आय. आदींच्या सहकार्यातून हे कार्य करण्यात आले आहे. मनपाने विविध मशीन आणि वाहनांसाठी लागणारे डिझेल पुरविले आहे.

तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे त्यांची वास्तविक रुंदी कमी झालेली आहे. नाग नदीची एकूण लांबी १७.०५ किमी आहे. हा सर्व भाग साफ करण्यात आला आहे. नाग नदी अंबाझरी ते पंचशील चौक ते मोक्षधाम घाट जवळून अशोक चौक ते सेंट झेव्हियर्स कॉन्व्‍हेंट ते पारडी पूल अशी ती वाहते.
पिली नदीची लांबी १६.७ किमी आहे. या नदीचाही सर्व भाग स्वच्छ झालेला आहे. पिली नदी गोरेवाडा ते मानकापूर स्टेडियम ते कामठी रोड ते जुना कामठी रोड नाका ते नदीच्या संगमापर्यंत पुढे वाहत जाते. पोहरा नदी शंकर नगर ते नरेंद्र नगर ते पिपळा फाटा ते नरसाळा, विहिरगाव अशी वाहते. या नदीची लांबी १३.२० कि.मी. आहे. सद्यस्थितीतील नदीचा संपूर्ण भाग साफ करण्यात आलेला आहे.

नागरिकांची कृतीच जपू शकते वारसा : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नद्यांची आता गाळ काढून व रुंदीकरण करुन स्वच्छता झाली असून पुढे नागनदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरु झाले आहे. लवकरच आपल्याला नागनदीचे स्वच्छ पाणी वाहताना दिसेल, याप्रकारचे नियोजन सुरु झाले आहे. भविष्यात नागनदीच्या किनाऱ्यावर बगीचे तयार होतील.

या बगिच्यांमध्ये नागरिक व्यायाम करतील, जॉगिंग करतील हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कृती सुरू झाली आहे. त्यातून पर्यटनाला बळ मिळेल. नाग नदी पुनरुज्जीवित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.

कधी नव्हे इतक्या नागपुरातील तीनही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. दुर्गंधी नाहिसी झाली आहे. त्यानंतर हा ठेवा नागरिकांनी कसा जपून ठेवायचा, हे त्यांच्या हातात आहे. नागरिकांनी यात कचरा टाकू नये, बांधकाम साहित्याचा कचरा टाकू नये, जनावरे सोडू नये, जेणेकरून या नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास, दुर्गंधी टाळण्यास आणि प्रवाह असाच बाराही महिने मोकळा राहण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाचा कृतीतून सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांची कृतीच हा वारसा, ही संस्कृती जपून ठेवण्यास मदत करू शकते, असेही ते म्हणाले.

 

उपराजधानी की नदी संरक्षा, सफाई को आदित्य ठाकरे का समर्थन

नागपुर:- शहर कि नदी एक नाले में बदल गई थी। हर साल कीचड़ तो हटा दिया जाता था, पर इसे नदी के किनारे पर फेंक दिया जाता। लेकिन इस बार कमिश्नर मुन्ढे ने नदी सफाई मे ईस मिट्टी को शहर के गहराई वालो हिस्सों में डाल दिया। इसलिए इस साल बाढ वाले कोई हालात नहीं बन सकेगे। उन्होंने ट्विटर पर ईसे वीडियो में शेयर कर साझा किया और पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे को टैग किया। मुन्ढे की प्रशंसा करते हुए, ठाकरे ने नागनदी स्वच्छला पहल को अपना समर्थन जताया।

शहर में नाग नदी हर साल साफ कि जाती है। हालांकि, इस बार नाग नदी का पाट न केवल विस्तृत, बल्कि गहरा भी किया गया। इसलिए बरसात के मौसम में, बारिश का पानी नागरिकों के घरों तक पहुंचने के बजाय सीधे बाहर तक पहुंच जाएगा। इसलिए, तट किनारे बसे नागरिकों को इस साल राहत मिलेगी। लॉकडाऊन का लाभ उठाते हुए, आयुक्त मुंडे ने मार्च से ही शहर में नदियों की सफाई मुहिम शुरू की। पिछले दो महीनों में, सफाई ने नाग नदी का चेहरा बदल दिया है। यह सफाई फिल्माई भी गई।

नदी की सुंदरता अब कई लोगों को लुभा भी रही है। आयुक्त मूंढे ने ट्विटर पर वीडियो साझा किया।‌‌ जिसमें पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे को भी ‘टैग’ किया। एक घंटे के भीतर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ने नाग नदी की सफाई और निखरी सुंदरता का वीडियो देखा। उन्होंने कहा कि सरकार नाग नदी को पुनर्जीवित करने के लिए प्रतिबद्ध है, जिसे इस साल की शुरुआत में मंजूरी दी गई थी। नाग नदी के पुनरुद्धार पर पर्यावरण मंत्री के ट्वीट के कारण, मुंबई और पुणे के नागरिकों ने भी अपने शहरों में नदियों का मुद्दा उठाया। मुंबई के नागरिकों ने उल्हास और मीठी नदियों के बारे में सवाल उठाए जबकि पुने के लोगो ने मुला और मुथा नदियों के बारे में सवाल उठाए।

पर्यटन की दृष्टि से समृद्ध होगा नागपुर: नदी के रूप में नागपुर की संस्कृति कोही संरक्षित करने और तटिय पर्यटन बढ़ाने के मामले में नदी के किनारों को समृद्ध करने के लिए, निगम ने नदी सफाई अभियान शुरू किया। हटाए गए कीचड़ को नदी के संरक्षण की दीवार से जुड़े बिना कहीं और फेंक दिया गया था। इसलिए, इस साल बाढ़ जैसी स्थिति पैदा होने की संभावना नहीं है, फेसबुक पर एक पोस्ट में आयुक्त मुंडे ने यह दावा किया। और यह बस सफाई थी। अब, नदी की सुंदरता बढ़ाने के लिए काम शुरू हो गया है।‌‌ ऐसा भी जोड दिया।

मुंढेंची बदली? नागपूरकर भडकले: ऑनलाइन पेटेशन वर धड़ाकेदार प्रतिसाद

नागपूर:- गेले काही दिवस महानगरपालिकेचे आयुक्त मुंढे यांच्या संभावित बदलीच्या चर्चेवर नागपूरकर आक्रामक झाल्याचे चित्र आहे. नागपूरकरांनी मुंढेंच्या समर्थनार्थ ‘जनतेचा विश्वासदर्शक ठराव’ या आशयाची ऑनलाईन पिटीशन सुरु केली. पहिल्याच दिवशी याचिकेला भरघोस प्रतिसाद मिळाला. अवघ्या 24 तासात 15 हजारांपेक्षा जास्त नागपूरकरांनी यावर स्वाक्षरी केलीय.

महानगर पालिकेत सत्ताधारी व विरोधी पक्ष दोन्ही पक्षांनी मुंढेंविरोधात अभद्र युती केल्याचे दिसते. मुंढेंमुळे फाईली अडल्या, जनप्रतिनिधींना ते विश्वासात घेत नाहीत, नगरसेवकांना मान नाही अशा तक्रारी करत सर्वपक्षीय नगरसेवक मुंढेंविरोधात एकवटले.
महापौरांनीही पहिल्याच दिवसापासून आयुक्तांविरोधात प्रसारमाध्यमांत मोर्चा उघडला होता. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व सत्तारुढ पक्षाचे संदीप जाधव यांनी एकत्र येऊन पत्रपरिषद घेत मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचाही ईशारा दिला, कांग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जावून आयुक्तांविरोधात आंदोलन केले. याशिवाय सत्तारूढ काही आमदार व नगरसेवकांनी महापालिकेच्या रोगप्रतिरोधक कामात अडथळ्यांचाच पुरेपूर यत्न केला. महानगरपालिकेतील भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांमार्फत मुंढे यांच्याविरोधात पोलिस तक्रारी सुरु केल्या. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात, उर्जामंत्री नितीन राउत, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार व सुनील केदार यांनी मुंढेंच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवल्याच्या बातम्याही पुढे आल्या. तर या पार्श्वभूमीवर नागपूरकरांनीही मुंढे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत हि मोहिम उघडली.

आयुक्त म्हणून जानेवारीत मुंढे महानगरपालिकेत रुजू झाले. कार्यभार सांभाळताच महापालिकेची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचे प्रयत्न सुरु केले. अधिकारी व कर्मचारी वर्गास शिस्तीत आणून महापालिकेच्या कार्य संस्कृृृतीत बदल घडवले. पावसाळ्याच्या तोंडावर नाग, पोहरा व पिवळी नद्यांच्या व शहरातील नाल्यांच्या साफसफाईचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला. हे सगळे करतांना पैशाचा काटेकोरपणे वापर करत या सर्व बाबींवर होणारा खर्च निम्म्यावर आणला.
अनावश्यक खर्च कमी करत पैशाची उधळपट्टी थांबवली. दरम्यान मार्चपासून कोरोनाचे थैमान आले. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला दिसतोय. मात्र मुंबई, पुणे, औरंगाबाद यांचे तुलनेत नागपूरची स्थिती आटोक्यात असल्याचे दिसते. नोडल ऑफिसर म्हणून तुकाराम मुंढे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे काम केले.

सतरंजीपूरा परिसरात 70 वर्षीय इसमाच्या मृत्यूनंतर जवळपास 150 लोकांना कोरोना लागण झाली. अशांना हूडकून काढणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. भीती व गैरसमजूतीपोटी स्थानिक प्रशासनाला माहिती देत नव्हते. अनेक ठिकाणी सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकावर हल्ले झाले. अशा वेळी परिस्थिती हाताबाहेर जावू न देता मुंढे यांनी सतरंजीपू-यात रहाणा-या जवळपास 1700 नागरीकांना विलगीकरणात दाखल करण्याचा निर्णय घेतला. हीच परिस्थिती मोमिनपूरा वस्तीतही होती. याठिकाणी जवळपास 2000 विलिगीकरण कक्षात पाठवण्यात आले यातील 200 च्या आसपास व्यक्तींना कोरोनाबाधा झाली. विशेष म्हणजे दोन्ही अल्पसंख्यांक समाजाच्या वस्त्या म्हणून ओळखल्या जातात. रमझान सुरु असतांनाही या भागातून संशयितांना विलगीकरणात आणण्याचे धाडस मुंढेनी दाखवले.

मुंढेच्या पुढाकाराने कोरोनाबाधित वस्त्यांत दैनंदिन सर्वेक्षण, काॅन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, आयडेंटिफिकेशन व विलगीकरण या सा-याच बाबतीत उत्तम कामे सुरु आहेत. याशिवाय क्षयरोग, उच्च रक्तदाब, हदयविकार, मधुमेह व इतर आजार असलेल्यांची माहिती महानगरपालिकेने गोळा केली. अवघ्या दीड महिन्यात 25 लाख लोकांचे आरोग्य सर्वेक्षण महानगरपालिकेतर्फे करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे नागपूरात समुह संक्रमण वेळीच थांबवता आले. त्वरीत आयडेंटिफिकेशनमुळे मृृृृत्यूदरही कमी राखला शिवाय कोरोनामुक्तांची संख्याही वाढली. मुंढे यांनी निर्णय घेण्यात जी धडाडी दाखवली त्यामुळेच नागपूरची स्थिती आटोक्यात आल्याची भावना नागपूरकरांत आहे.

मुंढेंनी नागपूरात 5000 खाटांचे कोविड केयर सेंटर व शहरात 5 मोठी कोविड रुग्णालये उभारली. महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असतांना नियोजनाने मुंढेंनी हे सारे करवून दाखवल्याचे नागपूरकरांचे म्हणणे आहे. नागपूरकरांनी जी ऑनलाईन पिटीशन सुरु केली आहे त्यात सविस्तरपणे हे मुद्दे मांडले आहेत. नागपूरच्या सुरक्षेसाठी मुंढे महानगरपालिकेत कायम हवे असा नागपूरकरांचा आग्रह आहे. व्यक्तिगत हित धोक्यात आल्याने सर्वपक्षीय मुंढेंविरोधात एकवटल्याचा आरोप या याचिकेत आहे. कोरोना महामारीच्या काळात नागपूर सुरक्षित रहावे यासाठी मुंढेंची नागपूरातून बदली करण्यात येऊ नये असे आवाहन नागपूरकरांनी या याचिकेनिमित्ताने केले आहे.

Exit mobile version