मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात संधीचे सोने करत नागपूर महानगरपालिकेने सर्व सुविधा युक्त सुसज्ज दोन नवीन रुग्णालय तयार केले आणि तीन रुग्णालयामध्ये क्षमता वाढ केली आहे. नागपूर महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अवघ्या ४५ दिवसात आरोग्य सेवेबाबत ही किमया घडवून आणली आहे.

पहिल्यांदा नागपूर महापालिकेनी शहराच्या जनतेसाठी ४५० खाटा असलेली पाच रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सुविधासह उपलब्ध करुन दिली आहे. याच्यातून ३०० खाटांचे रुग्णालय तयार आहे आणि उर्वरीत १५० खाटांचे रुग्णालय पुढच्या ७ दिवसात सज्ज होतील.

महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोरोना कंट्रोल रुम मध्ये या संदर्भात घोषणा केली होती त्यानुसार केवळ ४५ दिवसांत हे शक्य झाले आहे. इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालय चा पूर्ण कायापलट झाला आहे.

कुठल्या ही खाजगी रुग्णालय आणि कार्पोरेट कार्यालयांना लाजवेल, असे या रुग्णालयाचे रुप पलटले आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाची क्षमता केवल ३० खाटांची होती, आज ती वाढून १३० झाली आहे. येथे आई.सी.यू. आणि ऑक्सीजनची सुध्दा व्यवस्था केली गेली आहे. तळ मजला सोबत तीन माळयाचे हे रुग्णालय कित्येक वर्षापासून दुर्लक्षीत होते पण आता पूर्णपणे कायापालट झाला आहे.

२० खाटांची क्षमता असलेले आयसोलेशन हॉस्पीटल ३२ खाटांची सुविधा तयार झाली आहे. याची क्षमता ६० पर्यंत करण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा सुध्दा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. पूर्वीचे पाचपावली सूतिकागृह आता पाचपावली स्त्री रुग्णालय झाले असून पूर्वी त्याची क्षमता २० खाटांची होती आता हे रुग्णालय आता ११० खाटांचे झाले आहे. के.टी.नगर हॉस्पीटल आणि आयुष हॉस्पीटल सदर हे पूर्णत- नवीन असून त्यांची क्षमता अनुक्रमे १२० आणि ३० खाटांची आहे.

पाचही रुग्णालये मिळून ४५० खाटांची क्षमता तयार केली आहे. प्रत्येक बेडला सेन्ट्रल आक्सीजन आणि सेन्ट्रल सक्शनाची सोय आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पांचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी.नगर रुग्णालयात ५० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या सर्व रुग्णालयामध्ये नवीन बेडस लावण्यात आले आहे. टाइल्स, बाथरुम, टॉयलेटस, लिफट आदीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मल्टीपॅरा कार्डियक मॉनिटर, ई.सी.जी., सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीनची सुविधा राहणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी.नगर मध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपूर महापालिकेकडे नगरवासियांसाठी उत्तम आरोग्य सेवेची सुविधा अगोदर नव्हती. लॉकडाऊनमध्ये भेटलेल्या संधीचा लाभ घेत मनपानी पाच रुग्णालयांचे निर्माण कार्य केले आहे. या रुग्णालयांमध्ये ४५० खाटांची व्यवस्था केली आहे. यापैकी ३०० खाटांचे रुग्णालय तयार आहे आणि १५० खाटांचे रुग्णालय पुढच्या ७ दिवसात तयार होतील.

या रुग्णालयांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उध्दव ठाकरे यांनी एस.डी.आर.एफ मधून ‍निधी उपलब्ध करुन दिला आहे. याव्यतिरिक्त डी.पी.सी आणि मनपा निधी ही खर्च करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेचे एवढी क्षमता असणारे रुग्णालय नव्हते. माननीय मुख्यमंत्री यांनी संस्था उभी करण्याचा मंत्र दिला होता त्याची परिपूर्ति आम्ही केली आहे. आयुक्तांनी नागरिकांना या आरोग्य सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

महापौरांनी घेतली स्मार्ट सिटी ची झाडाझडती

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कार्याची गुरूवारी (ता.१८) महापौर तथा स्मार्ट सिटीचे संचालक संदीप जोशी यांनी ‘इन कॅमेरा’ झाडाझडती घेतली. यावेळी महापौरांसह स्मार्ट सिटीचे सर्व संचालक स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बहुजन समाज पक्षाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या कंपनी कायद्यानुसार महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते व सर्व गटनेते स्मार्ट सिटीचे संचालक आहेत. कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालक मंडळातील कुणालाही कुठलिही माहिती देण्यात आली नाही. यासंबंधी आढावा घेण्यासाठी स्वत: महापौर संदीप जोशी व इतर पाच संचालकांनी मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कार्यालयात बैठकीत झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे संपूर्ण बैठकीचे व्हिडिओ रेकर्डिंग करण्यात आले.

या बैठकीत एनएसएससीडीसीएल चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे, कंपनी सचिव अनुप्रिया ठाकुर, एच.आर.प्रमुख अर्चना अडसड, लेखाधिकारी अमृता देशकर, सोनाली गेडाम, विधी अधिकारी मंजित नेवारे, ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक शील घुले आदी उपस्थित होते.

नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीमध्ये कोणताही गैरप्रकार होउ नये किंवा गडबड होउ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथे जर कोणतिही गडबडी झाली तर त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे नाव बदनाम होईल, त्यामुळे नियमानुसार व शासनाच्या

निर्देशाप्रमाणेच सर्वांची वागणूक असावी, अशी अपेक्षा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेले कार्य या सर्वांची आवश्यक कागदपत्रे येत्या २४ तासात सादर करण्याचे सक्त निर्देशही यावेळी महापौरांनी दिले.

शाळा नाही, शिक्षण सुरू करा !

सद्या सर्वत्र कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर शहरही रेड झोनमध्ये आहे. अशा स्थितीत शहरातील कोणतिही शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. कोरोनाच्या या काळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जात आहे. मात्र यासाठी शाळा सुरू करण्यास परवानगी सद्यातरी नाही. त्यामुळे शाळांनी स्वत: ऑनलाईन शिक्षणासाठी ‘प्लॅटफॉर्म‘ तयार करून शाळा सुरू न करताही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार मनपा हद्दीतील शाळा सुरू करण्यासंदर्भात विशेषत: प्रतिबंधीत क्षेत्रातील शाळा सुरु करण्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यापूर्वी शाळांद्वारे करावयाच्या तयारीसंदर्भात गुरूवारी (ता.१८) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील खासगी शाळा संचालक, सचिव व मुख्याध्यापकांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे संवाद साधला. याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटर उपस्थित होत्या. शहरातील सुमारो एक हजार शाळांच्या प्रतिनिधींनी यावेळी मनपा आयुक्त यांच्याशी झालेल्या ऑनलाईन चर्चेत सहभाग घेतला.

\आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, दरवर्षी २६ जूनला राज्यातील सर्व शाळा सुरू होतात. मात्र यावर्षी सर्वत्र कोव्हिडच्या संसर्गाचा धोका आहे. अशा स्थितीत शाळांमध्ये सद्यातरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देणे शक्य नाही. सर्व शाळांनी येत्या २६ जूनला शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेउन या बैठकीत शाळा सुरू करण्यापूर्वी करावयाची तयारी, शाळेच्या प्रसाधनगृहांची स्वच्छता, शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांची गर्दी होउ नये याकरिता करावयाचे नियोजन तसेच शाळा सुरु करणे व कशाप्रकारे चालू करणे, आदीबाबत विचार विनीमय करावा.

शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक वर्गखोली, प्रसाधनगृह, दारे, खिडक्या सर्वांचे निर्जंतुकीकरण करावे. विद्यार्थ्यांना आधीच स्वच्छतेचे धडे देण्यात यावे. हात कसे धुवायचे, मास्कचा नियमीत वापर, सोशल डिस्टंसिंग कसे राखायचे आदीबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देणे या सर्व बाबींवरही बैठकीत सविस्तर चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

कोव्हिडचा संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. मात्र यामध्ये काही अडसर निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार अंदाजे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांकडे अँडरॉईड मोबाईल व सेट टॉप बॉक्ससह टिव्‍हीची व्यवस्था आहे. उर्वरित २२.४१ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था नाही. इयत्ता सहावी ते आठवीच्या ६५ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था आहे तर ३२ टक्के विद्यार्थी वंचित आहेत. माध्यमिक गटात इयत्ता ९ ते १२ वी च्या ७२ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही सुविधा आहेत तर २१.३७ टक्के विद्यार्थ्यांकडे नाहीत. अशा स्थितीत प्रत्येक शाळांमधील तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्याचे आवाहन आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे हे अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. या विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना ऑनलाईन व इतर दुरस्थ पद्धतीने शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

आजच्या स्थितीत विद्यार्थ्यांना शाळेपेक्षा शिक्षणाची जास्त गरज आहे. त्यादृष्टीने सर्व शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावे. महाराष्ट्र शासनातर्फे ऑनलाईन शिक्षणासाठी विविध ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खासगी शाळांनीही एकमेकांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून काही ‘प्लॅटफॉर्म’ निर्माण करता येतील का, याबाबत विचार करावा. शाळा सुरू करताना आधी प्राधान्याने इयत्ता ९ ते १२ चे वर्ग सुरू करावयाचे आहेत.

राज्यशासनाच्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलै, २०२० पासुन तर सहावी ते आठवी चे वर्ग ऑगस्ट २०२० पासून, तिसरी ते पाचवी चे वर्ग सप्टेंबर, २०२० पासून आणि इयत्ता दहावीच्या निकालाच्या आधारावर अकरावीचे वर्ग सुरु करता येईल. असे असले तरी कोव्हिड – १९ ची परिस्थीती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना टि.व्ही किंवा रेडीओवर उपलब्ध होणारे शैक्षणीक कार्यक्रम दाखविण्यासाठी किंवा ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे.

कोव्हिड संदर्भातील दिशानिर्देशांचे पालन करून सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याबाबत शाळांमार्फत कार्यवाही करण्यात यावी, असेही यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आवाहन केले.

मनपा आयुक्तांचे भाषणांचे प्रमुख मुददे

  • सर्व शाळांनी २६ जून ला स्कूल मैनेजमेंट कमेटी ची मीटिंग बोलवावी आणि पालकांना कोव्हिड – १९ च्या दिशा निर्देशांची माहिती दयावी.
  • सर्व शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु करावे. जर शाळा सुरु करावी लागली तर सामाजिक अंतर ठेवून वर्ग घ्यावे लागतील. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वर्ग घ्यावे. एका वर्गात २० पेक्षा जास्त विद्यार्थी नसावे. त्यातही सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे. एका बेंचवर एकच विद्यार्थी असावा.
  • जर शाळांकडे व्यवस्था नसली तर सम, विषय तारखांना एकेका वर्गाला शाळेत बोलवावे.
  • महाराष्ट्र शासनाचे निर्देशाप्रमाणे नववी- दहावी आणि बारावी चे वर्ग जुलै मध्ये सुरु होईल. सहावीं ते आठवी पर्यंतचे वर्ग ऑगस्ट मध्ये सुरु होणार. तिसरी ते पाचवी पर्यंतचे वर्ग सप्टेंबर मध्ये सुरु होतील आणि पहली व दूसरी वर्ग सध्या सुरु करावयाचे नाहीत. असे असले तरी तेव्हाची कोव्हिड-१९ बाबतची परिस्थीती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल.
  • शाळांनी लवकरात – लवकर विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके उपलब्ध करुन घ्यावे. पाठयपुस्तके वाटप करीत असतांना विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करावे तसेच पालकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत माहिती दयावी.
  • शाळांना दररोज सेनीटायइजेशन करावा लागेल. शाळेचा आवारात साबुण आणि पाणीची व्यवस्था करुन हाथ धुण्याची व्यवस्था करावी. सगळयांना त्रिस्तरीय मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. नाकाला, तोंडाला किंवा डोळयांना शक्यतो हात लावू नये. लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
  • पूर्वीप्रमाणे आता ऑटोमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी बसू शकत नाही. बस मध्ये एक विद्यार्थी एका सीटवर बसू शकतो. चारचाकी मध्ये दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परवानगी नाही आणि दुचाकी वाहनमध्ये पण एकच व्यक्तीला परवानगी आहे.
  • कोव्हिड च्या प्रादुर्भाव असेल तरी शिक्षण योग्य प्रकारे देणे ही शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक, शासन यांची जबाबदारी आहे.
  • शाळांनी पालकांना एकाचवेळेस शुल्क भरण्यास जबरदस्ती न करता त्यांच्या आर्थिक परीस्थीतीचा विचार करुन त्यांचेकडून टप्प्या-टप्प्याने शुल्क वसूल करावे.

News Credit To:- NMC

समस्या नव्हे, ही तर संधी…!

कुठल्याही कठीण प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर त्या प्रसंगातून निघणारे मार्ग आणि मिळणारा निकाल अवलंबून असतो. कोव्हिड-१९ आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले लॉकडाऊन हा प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेसाठी कठीण प्रसंग होता आणि आहे. मात्र या कठीण प्रसंगाकडे नागपूर महानगरपालिकेने संधी या दृष्टीकोनातून बघितले आणि आरोग्य सेवेचा कायापालट करून संकटरुपी संधीचे सोने केले. ही संधी हेरून नागपूर महानगरपालिकेने पाच रुग्णालयांचा क्षमता वाढीसोबतच केलेला कायापालट विस्मयकारक आहे. अवघ्या 45 दिवसात ही किमया घडली. कुठल्याही खासगी रुग्णालयांना आणि कॉर्पोरेट कार्यालयांना लाजवेल, असे या रुग्णालयांचे रूप पालटले आहे.

इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालय पाचपावली या तीन रुग्णालयांचा पूर्णतः कायापालट झालेला आहे. के.टी. नगर रुग्णालय आणि आयुष हॉस्पिटल, सदर ही दोन रुग्णालये नव्याने तयार करण्यात आली आहेत.

ही पाचही रुग्णालये मिळून एकूण ४५० बेड्स असलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बेडला सेंट्रल ऑक्सिजन आणि सेंट्रल सक्शनची सोय आहे. ४५० बेड्सपैकी इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी. नगर हॉस्पिटलमध्ये ५० बेड्सचा अतिदक्षता विभाग आहे.

के.टी. नगर आणि सदरचे आयुष हॉस्पिटल वगळता अन्य तीन रुग्णालयातील 300 बेड्स सेवेसाठी सज्ज झाले आहेत. पुढील सात दिवसात उर्वरीत १५० बेड्सही सज्ज होतील. लॉकडऊनच्या काळात संधी समजून या रुग्णालयांचा केलेला कायापालट हा केवळ आणि केवळ नागरिकांच्या सेवेसाठीच आहे. आम्ही केवळ बदलावर नाही तर संपूर्ण परिवर्तनावर विश्वास ठेवतो. हे परिवर्तन आपल्यासाठी आहे. नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि परिवर्तनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे.

जुलैपर्यंत सर्व डिमांडचे वाटप करा

मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाहीला गती देण्याची गरज आहे. त्यानुसार येत्या जुलै २०२० पर्यंत सर्व डिमांडचे वाटप करण्यात यावे तसेच वाटप झालेल्या डिमांडच्या पोचपावतीचे फोटो आणि संबंधीत संपत्ती मालकाचे मोबाईल क्रमांक अपडेट करावे, असे निर्देश कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासंदर्भात बुधवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती महेंद्र धनविजय, उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या रेखा साकोरे, शिल्पा धोटे, सदस्य इब्राहिम तौफीक मोहम्मद, प्रभारी उपायुक्त (कर आकारणी व कर संकलन) मिलींद मेश्राम आदी उपस्थित होते.

चालू वर्षामध्ये ५ लाख ५९ हजार ४२१ डिमांड जनरेट करण्यात आलेल्या आहेत. या सर्व डिमांड संबंधित सर्व झोनला पाठविण्यात आल्या असून त्या वितरणासंबंधी झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. याशिवाय ६ लाख ३५ हजार २१ मालमत्तांचा ‘जीएसआय’ डेटा संकलीत करण्यात आलेला आहे. मात्र यापैकी एकही डिमांड जनरेट करण्यात आले नाही. त्यामुळे यादृष्टीने प्राधान्याने कार्य करीत येत्या जुलैपर्यंत सर्व डिमांडचे वितरण करावे. वितरीत करण्यात आलेल्या डिमांडचा अहवाल समितीला प्रत्येक आठवड्याला देण्यात यावा, असे निर्देश समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

वितरीत करण्यात आलेल्या डिमांडवर नागरिकांकडून आक्षेप घेण्यात येतो. नागरिकांच्या आक्षेपांचे समाधान करण्यासाठी सप्टेंबर २०२० व जानेवारी २०२१ या दोन महिन्यांमध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात यावे. समाधान शिबिरामध्ये आलेल्या आक्षेपांवर शिबिर झालेल्या महिन्यापासून एक महिन्यात त्यावर निर्णय घ्यावे, असेही सभापतींनी निर्देश दिले.

नागरिकांकडून मालमत्ता कर वसुली संदर्भातही यावेळी समितीतर्फे आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त लोकांना कर भरता यावे यासाठी झोनस्तरावर सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये कर संकलन शिबिराचे आयोजन करण्यात यावे. याशिवाय कर न भरणा-यांविरुद्ध ऑक्टोबर २०२०पासून सक्तीने जप्ती आणि लिलावाची प्रक्रिया संबंधित वरीष्ठ अधिका-यांच्या देखरेखीत सुरू करण्यात यावी. जप्ती आणि लिलावासंबंधीच्या कारवाईचा अनुपालन अहवाल प्रत्येक महिन्याला समितीकडे सादर करण्यात यावा, असेही निर्देश कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

३-डी इमेज च्या माध्यमातुन कोव्हिड – १९ ची माहिती

कोव्हिडची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्याचा उपयोग करून नागरिकांनी कोरोनापासून सतर्क राहावे या उद्देशातून नागपूर महानगरपालिकेने प्रारंभापासूनच तंत्रज्ञानाचा वापर केला. आता एक पाऊल पुढे टाकत कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च अंतर्गत असलेल्या नागपूर येथील नॅशनल एन्व्हिरॉनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इंस्टिट्यूट अर्थात नीरी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम देहरादूनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेनी गुगल अर्थ ॲप्लिकेशनचा वापर करीत एक ३-डी डिजीटल सर्विस तयार केली आहे.

तसेच नागपूर स्मार्ट सिटीने एक कोव्हिड – १९ ची माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केला आहे. याची लिंक मनपाच्या वेबसाईट www.nmcnagpur.gov.in वर उपलब्ध असून या लिंकच्या आधारे नागपुरातील कोव्हिड-१९ ची अद्ययावत माहिती ३-डी मध्ये उपलब्ध होणार आहे. ३-डी वर कोविड संबंधी अद्यावत माहिती देणारी नागपूर महानगरपालिका देशातली बहुदा पहिली ठरली आहे. नागपूर महापालिकेनी नीरी, आई.आई.पी. आणि स्मार्ट सिटी सोबत घेतलेली ही मोठी भरारी आहे.

या सर्विस चे लोकार्पण बुधवारी (ता. १७) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नीरीचे मुंबई झोनल प्रमुख आणि वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ. रितेश विजय, प्रकल्प सहायक कौस्तुभ जिचकार व स्मार्ट सिटी चे महाव्यवस्थापक शील घुले उपस्थित होते. आय. आय. पी. चे सुनील पाठक यांचेही यात सहकार्य लाभले.

संगणकाची बटन दाबून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोव्हिडसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या ३-डी डिजीटल सर्विस व डॅशबोर्ड चे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोव्हिड संदर्भातील माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रयत्नरत आहे. गुगल अर्थचा वापर करून आता एका क्लिक वर कोव्हिडची माहिती ३-डी इमेजेस मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशातील अन्य शहर या पासून प्रेरणा घेऊन कोविड – १९ चा बददल नागरिकांना माहिती देऊ शकतात. ही तर एक सुरुवात आहे. नीरीच्या सहकार्याने मनपा आपली शाळा, उद्याने, कार्यालये इ. ची माहिती अश्या प्रकारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार म्हणाले, अशा माहितीमुळे नागरिकांच्या ज्ञानात भर पडते. नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नाचा वापर करावा.

काय मिळेल माहिती ?

या प्रोग्रामच्या माध्यमातून नागपुरात कोव्हिडचे आजचे रुग्ण किती, ॲक्टिव्ह केसेस किती, प्रतिबंधित क्षेत्र कोणते, प्रतिबंधित क्षेत्राचे इपिसेंटर कोणते, जवळचे कोव्हिड हॉस्पीटल कोणते यासंदर्भातील सर्व माहितीचा ‘रिॲलिस्टीक व्ह्यू’ येथे दिसेल. ३-डी इमेज हा या सर्विसमधील महत्त्वाचा भाग असून यूजर्सला सहज समजेल, अशा पद्धतीने हे तयार करण्यात आले आहे. नागपूरकरांनी याचा अधिकाधिक उपयोग करून कोरोनाचे संक्रमण रोखण्यात मदत करावी, हाच यामागील उद्देश आहे. ही माहिती नागपूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या फेसबुक आणि व्टिटर वर पण उपलब्ध राहील.

‘त्या’ इंग्रजी माध्यमाच्या शाळा येत्या तीन दिवसात सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करा : प्रा. दिलीप दिवे

शहरात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक अशा एकूण सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निविदा मागविण्यात आली होती. यासंदर्भातील ई-निविदा तात्काळ सुरू करून येत्या नव्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्यासंबंधी पुढील तीन दिवसात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश शिक्षण विशेष समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिले.

विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शिक्षण विशेष समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, सदस्या रिता मुळे, प्रणिता शहाणे, हर्षला साबळे, सदस्य इब्राहिम तौफीक मोहम्मद, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर यांच्यासह सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीत शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही या विषयासह २०२०-२१ या नव्या शैक्षणिक सत्रात मनपातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या संदर्भात करण्यात येणारी पूर्वतयारी, मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाबाबत कार्यवाही, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पाठ्यपुस्तकांसंबंधी कार्य, शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅग, वाटर बॉटल देण्यासंबंधी घेण्यात आलेल्या ठरावानुसार केलेल्या कार्याची माहिती या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.

राज्य शासनामार्फत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासंबंधी परिस्थितीचा यावेळी समितीमार्फत आढावा घेण्यात आला. मनपाच्या प्राथमिक गटातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला असता एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ २९ टक्के विद्यार्थ्यांकडेच अँडरॉईड मोबाईल तर ३३ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी टिव्‍ही आहे.

एकूण २२ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल व टिव्‍हीची व्यवस्था आहे तर ३८ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्हीपैकी कोणतिही व्यवस्था नाही. माध्यमिक गटामध्येही (इयत्ता नववी ते बारावी) ३५.३५ टक्के विद्यार्थी मोबाईल आणि टिव्‍हीच्या व्यवस्थेपासून वंचित आहेत. माध्यमिक गटात ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुविधा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी दिली.

ऑनलाईन शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये हा मनपाचा मानस आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य पुरविण्याची गरज आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मौलिक वर्ष असून त्यांच्यांसाठी प्राधान्याने व्यवस्था होणे आवश्यक आहे. यासाठी येणा-या खर्चासंदर्भात समितीतर्फे ठराव घेण्यात आला असून हा विषय सभागृहात ठेवण्यात यावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मनपाच्या सर्व शाळांमध्ये सॅनिटाजिंग करण्यात येत आहेत. सर्व शाळा लवकरात लवकर सॅनिटाइज करून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली जावी, असेही निर्देश सभापतींनी दिले.

मनपाच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके, स्कूल बॅग, वाटर बॉटल आदी साहित्य देण्यात यावे. यासंबंधी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला असून यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.

News Credit To:- NMC

महापौरांशी चर्चा नंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला

शहरातील घराघरांमधून निघणारा कचरा संकलीत करून शहर स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांच्या वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शहरातील पाच झोनमध्ये सेवा देणा-या ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीच्या कर्मचा-यांना पगार कपात, आठवडी सुट्टी, कामाच्या तासांची निश्चिती, पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे असे अनेक अन्यायकारक समस्या भेडसावत आहेत. कर्मचा-यांच्या या समस्यांवर येत्या सात दिवसात संबंधित कंपनीद्वारे आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा कर्मचा-यांसह आपण स्वत: संपावर बसू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. महापौरांचे आश्वासनानंतर सफाई कामगारांनी आपला संप मागे घेतला.

ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीच्या सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाद्वारे महापौरांना निवेदन देण्यात आले होते. यावर महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१७) बैठक घेण्यात आली. महापौर कक्षात झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह ए.जी. एन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी नेते मुकेश शाहु आदी उपस्थित होते.

ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलीत करण्यात येत असून कंपनीद्वारे मनमानी कारभार सुरू आहे. कर्मचा-यांच्या वेतनात कपात करून दर महिन्याला अनियमितरित्या वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निवार्ह निधीची (पी.एफ.) पावती न देणे, राष्ट्रीय सणांच्या दिवशीही कामावर बोलावणे, कर्मचा-यांना वर्षभरासाठी एकच पोषाख देणे अशा अनेक समस्यांबाबत यावेळी कर्मचा-यांच्या प्रतिनिधीद्वारे महापौरांकडे तक्रार करण्यात आली.

या सर्व समस्यांवर गांभीर्याने दखल घेत दर महिन्याला ७ ते १० तारखेच्या आता नियमितरित्या कर्मचा-यांचे वेतन व्हावे. याशिवाय कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी संबंधात सर्व कागदपत्रे मनपाच्या आरोग्य अधिका-यांकडे सादर करावे, असे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेषत: १ मे कामगार दिनाच्याही दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावण्यात आल्याने कंपनीवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

येत्या सात दिवसात कंपनीप्रमुखांनी स्वत: उपस्थित राहून उपरोक्त निर्देशावर कार्यवाही करण्याचेही महापौरांनी बजावले.
कोणतिही पूर्वसूचना न देता विनाकारण ३० कर्मचा-यांना कंपनीद्वारे कामावरुन काढण्यात आल्याची माहिती विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीत दिली. संबंधित प्रकार अत्यंत गंभीर असून कर्मचा-यांचा एकाएकी रोजगार हिरवल्याने आजच्या स्थितीत त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घेत कर्मचा-यांच्या हिताशी संबंधित सकारात्म निर्णय घेण्याची मागणी यावेळी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महापौरांना केली.

संबंधित प्रकार गंभीर असून कंपनीद्वारे तात्काळ या सर्व कर्मचा-यांना कामावर नियुक्त करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

News Credit To:- NMC

कचरा संकलन कंपनीमुळे कर्मचारी त्रस्तन महापौरांची घेतली भेट

नागपूर:- शहरातील कचरा संग्रहण सुरळीत व्हावे या उद्देशाने जुनी कंपनी बदलत नव्या एजी एन्व्हिरो कंपनीला मनपाकडून 5 झोनसाठीचे कंत्राट देण्यात आले, परंतु कंपनीच्या कर्मचा-यांनीवतीने महापौर संदीप जोशी यांना निवेदन दिले गेले, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रासांचा उल्लेख करून कंपनीला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची विनंती केली गेलीय.

यावेळी मनपा विधी समितीचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने सांगितले की कोरोनाच्या या संकटातही कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा गोळा करीत आहेत. मात्र, सफाई कामगार आणि वाहनचालकांसाठी कंपनीकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत.

चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सांगितले की एजी एन्वायरो कंपनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूंगर झोनमार्गे कचरा संकलन करीत आहे. कर्मचार्‍यांच्या वतीने दररोज कचरा गोळा केला जात आहे. परंतु कंपनीकडून कधी पगार कपात केली जाते, तर काही वेळेस निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम करवले जात आहे. साप्ताहिक सुट्टीसुद्धा बर्‍याच वेळा रद्द केली जात आहे. अशा अनेक समस्यांमुळे कर्मचारी अस्वस्थ आहे. चर्चेनंतर महापौरांनी अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उपायुक्त यांना कर्मचारी नेत्यांसमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

NMC प्रमुख ने कहा कि स्कूलों को फिर से खोलने के लिए कम परिवर्तन

शहर में COVID 19 वायरस के मामले बढ़ने के साथ, NMC प्रमुख तुकाराम मुंधे को यह कहते हुए देखा गया कि स्पष्ट कारणों से निकट भविष्य में स्कूलों को फिर से खोलना संभव नहीं है। एनएमसी चीफ को यह कहते हुए मजबूती से खड़ा देखा गया कि शिक्षा शुरू हो सकती है लेकिन इस साल स्कूल खुलने की संभावना कम है। एमएस राज्य शिक्षा विभाग ने स्कूल को फिर से खोलने के बारे में सोमवार को एक परिपत्र जारी किया है जिसमें कहा गया है कि स्कूल 26 जून को फिर से खुल सकते हैं, लेकिन यह एनएमसी है जो इस पर अंतिम निर्णय लेगा।

हालांकि, स्कूल को फिर से खोलने पर NMC के मुख्य कड़े कदम के साथ, यह संभव है कि स्कूल केवल ऑनलाइन शिक्षा मोड में काम कर रहे हों और इस तरह से स्कूलों को यह बताने के लिए कहा कि वे सामाजिक भेद के मानदंडों का पालन करके स्कूलों को कैसे आगे बढ़ा सकते हैं। राज्य सरकार के विभाग के परिपत्र थे, जिनमें स्पष्ट रूप से कहा गया है कि विद्यालय तभी कार्य कर सकते हैं जब सामाजिक विचलन को सही मोड पर अभ्यास करते हुए देखा जा सकता है।

Containment ज़ोन में या सील किए गए क्षेत्रों में, स्कूलों में निवारक उपाय उच्च क्रम के होंगे। जब मीडिया के लोगों ने एनएमसी प्रमुख को फोन किया, तो उन्होंने शहर में स्कूल को फिर से खोलने की योजना के बारे में पूछा, उन्होंने कहा कि स्कूल शिक्षा पर काम कर सकता है, लेकिन फिर से स्कूलों को खोलने की संभावना कम है। उन्होंने स्पष्ट रूप से कहा कि स्कूल ऑन-लाइन काम कर सकते हैं लेकिन किसी भी तरह से ऑफ लाइन कार्य नहीं करेंगे। उन्होंने कहा कि उनका स्कूलों को बंद करने का कोई नजरिया नहीं है, लेकिन फिर से खुलने का इंतजाम नहीं है.

Exit mobile version