व्यवस्थापनासाठी ₹80 कोटी जुळविण्याचेच लक्ष्य : आयुक्त मुंढे

नागपूर : मनपा आयुक्तांनी काहि काळापुर्वी विकास कामांना ब्रेक लावला. आता पायाभूत सुविधांतही हात आखडता घेत असल्याचे एलएडी पथदिव्यांची फाईल रोखल्यावरून स्पष्ट होते आहे. परिणामी शहरातील रस्ते काही दिवसांत अंधारात राहण्याची चिन्हे दिसताहेत.

कोवीड१९ व पश्चातचे सलग लॉकडाऊनमुळे मनपाचे उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय. महिन्याच्या ₹80 कोटी खर्चासाठीही ओढाताण होतेय त्यामुळे ईतर कामे ठप्प झाली, शिवाय पथदिवे वगैरे सारख्या पायाभूत सुविधांवर खर्च करने महापालिकेस जड जातेय. राज्य सरकारने जीएसटी अनुदानात 43 कोटींची कपात केली असताही 2 महिन्यांपासून उत्पन्नच जवळपास ठप्प आहे. राज्य सरकारने फक्त 50 कोटी जीएसटी अनुदान दिले व पुढीलही काही महिन्यांत ते यापेक्षा अधिक मिळेल हि अपेक्षा करता येत नाही.

अशात लॉकडाऊनमुळे अनेकांची कामे, दुकाने सलग बंद असल्याने मालमत्ता कर वसुलीही अपेक्षेनुसार नाही. पण पालिकेला निवृत्ती वेतन, वेतन, प्रशासकीय खर्च तर करावेच लागतात, जे महिन्याकाठी ₹80 कोटींचे घरात आहेत व हीच जुळवाजुळव करतांनाचे प्रचंड आव्हान सध्या भेडसावत असल्याचे आयुक्तांनी फेसबुक लाईव्हद्वारे व्यक्त केले. त्यामुळे काटकसरीला प्राधान्य देत 56 कंत्राटी अभियंत्यांस कामावरून कमी केलेय. तसेच ज्यांच्या नियुक्‍त्या अवैध आहे, अशा कर्मचाऱ्यांनाही नोटीस दिल्या आहेत.

मनपाची आर्थिक स्थिति जोवर पुर्ववत होत नाही, तोवर विकास कामांवर परिणाम होईल. पालिकेला वेतन, निवृत्तीवेतन, स्वच्छता, वीज, कचरा विल्हेवाट यासाठी दरमहा 70 ते 80 कोटीं खर्च येतो. ही रक्कम जुळविण्यावरच तुर्त भर आहे. यातून शिल्लकीत आरोग्यविषयक खर्चास्तव प्राधान्य दिले जाईल, असे आयुक्त तुकाराम मुंढे आज म्हणाले.

आयुक्तांचे वाढदिवसानिमीत्त मनसे जिल्हाध्यक्षांची सदिच्छा भेट

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना नागपुर जिल्हा अध्यक्ष दिनेश ईलमे तर्फे आज मनपा आयुक्त मा.श्री तुकाराम मुंढे साहेब ह्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांची भेट घेऊन त्यांना तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या जीवन चारित्रावर आधारित पुस्तक भेट देण्यात आली,या वेळी मुंढे साहेबांनी चर्चा करतांना सांगितले की तथागत गौतम बुद्धांचा इतिहास upsc च्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमा मध्ये थोड्या प्रमाणात माहिती मिळाली होती पण ह्या पुस्तका मुळे संपूर्ण माहिती मिळेल अश्या शब्दांत आपला आनंद व्यक्त केले व मनसे चे आभार व्यक्त केले ह्या वेळी श्याम पुनियनी(शहर सचिव मनसे नागपुर),आणि मनोज काहलकर (विधानसभा अध्यक्ष मनवीसे उत्तर नागपूर) उपस्थित होते.

मनपा मुख्यालयात थर्मल स्कॅनिंग सुरु

नागपूर महानगरपालिकेतर्फे सिव्हील लाईन्स मुख्यालयात येणारे नागरिकांची थर्मल स्कॅनिंग सोमवारी (1 जून) ला प्रारंभ करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर थर्मल स्कॅनिंग करुन कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेश व्दारावरच सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची शरीराचे तापमानाची चाचणी करुन नोंद घेण्यात आली.

महापौर श्री. संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे,‍ वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती अध्यक्ष श्री. पिंटू झलके, स्वास्थ समिती सभापती श्री. विरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक श्री. दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे यांनी सुध्दा स्वत:ची चाचणी करुन घेतली. तसेच मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे यांच्यासह मनपाचे अन्य अधिकारी व कर्मचारी आणि बाहेरुन येणारे नागरिकांनी पण स्वत:ची तपासणी करुन घेतली. दररोज 1000 ते 1500 लोकांची तपासणी केली जात आहे.

News Credit To:- NMC

सतरंजीपुरा येथील प्रतिबंधित क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा

सतरंजीपुरा झोनमधील बहुतांशी भाग प्रतिबंधित असून या भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या क्षेत्रात नागरिकांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून सदर भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा, असे निर्देश स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

पाणी समस्येबाबत स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी सोमवारी (ता.१) गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज या तिनही झोनचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या झोननिहाय बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, नगरसेविका यशश्री नंदनवार, नगरसेवक सर्वश्री प्रदीप पोहाणे, दिपराज पार्डीकर, पुरुषोत्तम हजारे, नितीन साठवणे, रमेश पुणेकर, संजय चावरे, शेषराव गोतमारे, नगरसेविका चेतना टांक, वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, तिनही झोनचे सहायक आयुक्त, ओसीडब्ल्यूचे अधिकारी व तिनही झोनचे डेलिगेट प्रामुख्याने उपस्थित होते.

गांधीबाग झोनमध्ये पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नसल्याबद्दल यावेळी झोनच्या संबंधित नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले. सतरंजीपुरा आणि लकडगंज झोनमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लकडगंज भागामध्ये बहुतांशी भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र अपु-या टँकरच्या संख्यामुळे नागरिकांना पुरेशे पाणी मिळत नाही. यावर गांभीर्याने दखल घेत स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी लकडगंज झोनमध्ये तातडीने टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. सतरंजीपुरा झोनमध्येही पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे त्यांनी निर्देशित केले.

News Credit To:- NMC

नाग नदी प्रकल्पासंदर्भात ना. नितीन गडकरींशी चर्चा करून निर्णय महापौर संदीप जोशी : प्रकल्पांचा घेतला आढावा

नागपूर:- नाग नदी हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात येणा-या अडचणी, त्रुट्या दूर करून आवश्यक कार्यवाही संदर्भात त्यांच्याशी संबंधित सर्व अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

नागपूर शहरांतर्गत येत असलेल्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्प व तलावांचे सौंदर्यीकरण, पुनरूज्जीवन या प्रकल्पांची सद्यस्थिती संदर्भात सोमवारी (ता.१) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, राजेश भूतकर, महादेव मेश्राम आदी उपस्थित होते.

नाग नदी प्रकल्पासाठी ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसहाय्य करणार आहे. यासाठी ‘जिका’कडे २५०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार शहरातील नाग नदीच्या उत्तर व मध्य झोनमध्ये ५०० किमी सिवर लाईन बदलण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय नितीन गडकरींनी संकल्पना मांडलेली होती. त्यामुळे त्यांच्याशी या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर संदीप जोशी म्हणाले.

शहरातील नउ तलावांचे सौंदर्यीकरण व पुनरूज्जीवन करण्याचा प्रस्ताव होता. या नउ तलावांसाठी ७० कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र ४० लाख रुपये एवढीच तरतूद आता करण्यात आली आहे. सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून निधीच आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय सक्करदरा तलाव प्रकल्पा संदर्भात कार्यादेश होउनही निधी आला नाही. यासंदर्भात संबंधित अधिका-यांनी सविस्तर माहिती ना. नितीन गडकरी यांच्या बैठकीत सादर करावी, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपुरातही ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत 30 जूनपर्यंत लॉकडाऊन

नागपूर:- कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महानगरपालिकेने कायम ठेवले असून प्रतिबंधित क्षेत्र वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्यात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. 1 जूनपासून हे आदेश लागू होणार असून 30 जूनपर्यंत कायम राहतील.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1 जून रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार, 3 जून पासून नागपूर शहरात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. हे करताना नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोव्हिड-१९ संदर्भातील सर्व दिशा-निर्देशांचे पालन करायचे आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ चा प्रारंभ होत आहे.

पहिल्या टप्प्यात 3 जून पासून राहील या बाबींना परवानगी

सायकलिंग, जॉगिंग, धावणं, चालणं यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे या ठिकाणी सकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी

गॅरेज तसंच वर्कशॉप यांना काम करण्याची परवानगी अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालय वगळता इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचारी वर्ग अथवा 15 कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.

दुसरा टप्पा 5 जूनपासून, बाजारातील दुकानांना परवानगी

सर्व मार्केट, दुकाने यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सम-विषम पध्दतीने परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट उघडण्यास मनाई.कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था अनुज्ञेय असणार नाही.सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असेल. त्याकरता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी. लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये शक्यतो चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी.सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान/मार्केट तात्काळ बंद करण्यात येईल. जीवनाश्यक बाबींसंदर्भात वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसेच कॅब- 1+2, रिक्षा-1+2, चारचाकी- 1+2, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी )

टप्पा तीनची सुरुवात 8 जूनपासून

खाजगी ऑफिसेस 10 टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छते संदर्भात माहिती देणं अनिवार्य.या आदेशानुसार परवानगी असलेल्या बाबींना पुन्हा वेगळ्या परवानगीची गरज नाही.

कोणत्या गोष्टी बंद राहतील ?

  • शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक (MHA व्दारा अनुज्ञेय असलेल्या वगळता)
  • मेट्रो रेल्वे
  • ट्रेन्सची नियमित वाहतूक व घरगुती हवाई वाहतुक (विशेष आदेशाव्दारे अनुज्ञेय वगळता)
  • सिनेमाघरं, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणं.
  • कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यास विषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
  • विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळं
  • सलून, स्पा, ब्युटी पार्लर
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र

काय पाळणे आवश्यक ?

  • सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क घालणं बंधनकारक
  • सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच सहा फूटांचं अंतर पाळणं आवश्यक
  • लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना परवानगी नाही
  • अंत्यसंस्कार विधींसाठी 20 हून अधिक लोकांना परवानगी नाही
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणं हा गुन्हा असेल.
  • सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू यांच्या सेवनावर प्रतिबंध
  • ज्यांना शक्य आहे त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ करावं. कार्यालयं, कामाच्या ठिकाणी, शॉप, मार्केट, औद्योगिक केंद्र याठिकाणी गर्दी किंवा एकत्र येण्यास मनाई
  • कामाच्या ठिकाणी नियमितपणे सॅनिटायझेशन करणं अनिवार्य. डोअर हँडल्ससारख्या सर्वाधिक व्यक्तींचा संपर्क होणाऱ्या ठिकाणी नियमित स्वच्छता
  • कामावर असणाऱ्या लोकांनी एकमेकांदरम्यान, लंचब्रेकदरम्यानही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक

रात्र संचारबंदी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सूचना

या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टींना शिथिलता देण्यात आली असली तरी रात्री 9 ते पहाटे 5 या काळात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पूर्णपणे संचारबंदी लागू राहील. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि 10 वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक कार्य अथवा वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, घरातच राहावे, असेही आदेशात नमूद केले आहे. नागपूर शहरातील प्रतिबंधित भागात जीवनावश्यक वस्तूंशिवाय अथवा सेवांव्यतिरिक्त काहीही सुरू ठेवण्यास परवानगी नाही.

सिमेंट रस्त्याची अर्धवट कामे तात्काळ सुरू करा : महापौर संदीप जोशी

कोव्हिडमुळे जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाउन आहे. या काळात सिमेंट रोडचे बांधकामही बंद होते. पावसाळा सुरू होणार असल्याने अर्धवट अवस्थेतील सिमेंट रस्ते धोकादायक ठरू शकतात. प्रशासनाने तात्काळ सिमेंट रस्त्याची अर्धवट कामे सुरू करा तसेच काम सुरू न केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपूर शहरात सध्या सुरू असलेल्या सिमेंट रोड टप्पा १, २ आणि ३ च्या बांधकामाच्या सद्यस्थितीचा शुक्रवारी (ता.२९) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत माजी महापौर व आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकुर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अमीन अख्तर, अविनाश भूतकर, मनोज गणवीर, ए.एस.मानकर, धनंजय मेंडुलकर आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ च्या कामाचा आढावा घेतला. यासंबंधी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सविस्तर माहिती सादर केली. टप्पा १ मधील बहुतांशी सिमेंट रोडची कामे पूर्ण झालेली आहेत. तर टप्पा २ मध्ये एकूण ५९ रस्त्यांचे काम प्रस्तावित असून त्यापैकी ५२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर तीन रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही माहिती अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी दिले. टप्पा २ मधील अर्धवट कामे ताबडतोब येत्या सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. जी कामे सुरू झाली नाहीत त्या कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

टप्पा ३ मध्ये ३९ रस्त्यांचे बांधकाम प्रस्तावित असून १० रस्त्यांचे दोन्ही बाजूने तर आठ रस्त्यांचे एका बाजूने पीपीसी करण्यात आले आहे. यापैकी १२ रस्त्यांचे काम अद्याप सुरूच झाले नसल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सादर केली. यावर महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ संदर्भात प्रशासनाचे अभिमत मुख्य अभियंत्यांनी येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले.

News Credit To:- NMC

मनपाने नाही तर केंद्राने बनवलेयत नियम: आयुक्तांचे नगरसेवकांना स्पष्टीकरण

नागपूर:- कोवीड पॉझिटिव्ह रूग्न आढळल्यानंतर मनपाचे वतीने शहरातील काही भागांस संचारबंदी क्षेत्र घोषित केले गेलेय, मात्र दिर्घकाळ प्रतिबंधित असल्याने होत असलेल्या दैनंदिन समस्यांमुळे आधी पांढराबोडी व पश्चात पार्वतीनगर येथील जनतेने नगरसेवकांसह जोरकसपने याविरोधात प्रदर्शन केले होते परंतु आता मनपा आयुक्तांनी अशा क्षेत्रासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचेच दिशानिर्देशानुसार कार्यप्रणाली लागू असल्याचे सांगीतलेय, लोकांस अावाहन करत त्यांनी सांगितले की या संदर्भात मनपा आयुक्तांचे अखत्यारीत नियम नव्याने निर्मीती केले गेलेले नाहीत. लोकांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावरच कार्य केले जातेय, करिता  कुठल्याही चुकीच्या माहितीने भ्रमित न होता प्रशासनास सहकार्य करावे.

पॉझिटिव्ह रूग्न आढळताच 28 दिवसांपर्यंतचे भाग सील:

आयुक्तांनी सांगितले की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशादर्शक निर्देशानुसार प्रथम रूग्नाच्या निगेटिव्ह झाल्यानंतर पुढील 28 दिवसांपर्यंत संबंधित क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ठेवावे लागत असे. मात्र आता 17 मे रोजी नवीन दिशानिर्देशानुसार पॉझिटिव रूग्न मिळाल्यापासून 28 दिवस त्या भागास प्रतिबंधित ठेवले जात आहे. शहरात याच तत्वप्रणालीस राबवीले जात आहे. सरकारकडून   नियम निर्धारित असतात जे वैद्यक व वैज्ञानिक मिमांसे नंतरच ठरतात, 28 दिवसांना 14-14 दिवसांत विभागून आधीचे 14 दिवस अॅक्टिव्ह आणि नंतरचे 14 पॅसिव्हच्या रूपात निर्धारन करत प्रतिबंधित क्षेत्रांत राबवले जातात.

28 व्या दिवशी बाधित होण्याची शक्यता:

ते म्हणाले की कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या परिसरात 95 टक्के लोकांना 2 ते 14 दिवसांत संसर्गाची शक्यता असते, तर उर्वरीत 5 टक्के लोकांपैकी 2.5 टक्के लोक 0 ते 2 दिवस आणि इतर 2.5 टक्के लोक 14 व्या दिवसानंतर 28 व्या दिवसापर्यत संसर्गाची शक्यता असते. या 2.5 टक्के शक्यतेमुळेच 28 दिवसांपर्यंत संबंधित परिसर प्रतिबंधित ठेवणे जरूरीचे आहे. वैद्यक आणि वैज्ञानिक कारणांमुळेच केंद्र सरकारतर्फे दिशानिर्देश तयार केलेले आहेत, ज्यांचा विपरीत अर्थ लावने योग्य नाही. शहरास लवकरच कोरोना-मुक्त व कायमस्वरुपी ग्रीन झोनमध्ये आणण्यास प्रशासनाची प्रयत्न चालू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

’तो’ खड्डा पूर्वीपासूनच

घराघरातून संकलीत केलेल्या कच-यामध्ये माती मिश्रीत करून जास्तीचे वजन वाढवून मनपाकडून पैसे उकळण्यात येत आहे व त्यासाठी बीव्‍हीजी या कंपनीद्वारे पार्कींग स्थळाजवळ खड्डा करण्यात आला असल्याच्या आरोपावर रविवारी (ता.२४) घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी घटनास्थळी पाहणी केली.

पाहणीनंतर या संदर्भातील सत्यता पडताळण्याकरिता सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये बीव्‍हीजी कंपनीचे काम सुरू होण्यापूर्वीचे त्या परिसराचे फुटेज शोधण्यात आले. यामध्ये बीव्‍हीजी कंपनीच्या पार्कींग स्थळालगत असलेला खड्डा कंपनीला जागा उपलब्ध करून देण्याच्या आधीपासूनच असल्याचे निदर्शनास आले आहे.

कचरा संकलन करणा-या बीव्‍हीजी कंपनीला मनपातर्फे भांडेवाडी येथे पार्कींगसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेजवळ खड्डा खणून त्यातील माती कच-यात मिश्रीत करून वजन वाढवून महानगरपालिकेकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली. बीव्‍हीजी कंपनीद्वारे शहरातील गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर आणि मंगळवारी झोनमधून कचरा संकलीत करण्यात येतो.

लॉकडाउनमुळे कचरा कमी निघत असल्याने कंपनीद्वारे माती मिश्रीत करून कच-याचे वजन वाढविण्यात येत असल्याचाही आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला. यासंबंधी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाउन चौकशी केली.

चौकशीमध्ये निदर्शनास आले की, नोव्हेंबर २०१९मध्ये बीव्‍हीजी कंपनीला भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे पार्कींगसाठी जागा देण्यात आली. यापूर्वी २८ ऑगस्ट २०१९मध्ये संपूर्ण परिसराचे ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आले. सर्व्‍हेमध्ये घेण्यात आलेल्या फुटेजमध्ये तक्रारदाराने नमूद केलेल्या खड्ड्याबाबतचे सुद्धा फोटो तपासण्यात आले असता त्यामध्ये तो खड्डा बीव्‍हीजी कंपनीचे काम सुरू होण्यापूर्वीचाच असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सत्यता असल्याचे दिसून येत नाही.

तरीही भविष्यात अशा तक्रारी प्राप्त होउ नये याची खबरदारी घेण्याकरिता व तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीचे पूर्णत: समाधान करण्याकरिता मनपाद्वारे कच-याच्या वजन काट्यावर येणा-या वाहनांची तपासणी करण्यासाठी उपद्रव शोध पथकाचे दोन कर्मचारी तैनात करण्यात आले.

हे कर्मचारी आलेल्या गाडीचे वजन तपासतील त्यामध्ये काही शंका आल्यास गाडीतील कचरा तपासून बघतील व त्यानंतर ती गाडी एका विशिष्ठ ठिकाणी रिकामी करण्यास सूचना देतील. यामध्ये जर माती आढळून आल्यास संबंधित गाडीचे वजन रद्द केले जाईल व कंत्राटदारावर करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली.

News Credit To:- NMC

 

अवैध टिल्लू पंपाविरुध्द कडक कारवाई करा : झलके

नागरिकांनी अवैधरित्या लावलेल्या टिल्लू पंपाविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश मनपाच्या स्थायी समिती सभापती तथा जलप्रदाय समितीचे सभापती श्री.विजय (पिंटू) झलके यांनी दिले आहेत. गुरुवारी (ता.२८) त्यांनी पाणी समस्येबाबत नेहरुनगर झोन, हनुमाननगर झोन आणि धंतोली झोन मध्ये बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, जलप्रदाय समितीचे उपसभापती भगवान मेंढे आणि झोनचे नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होते.

पाणी समस्येबाबत आढावा घेतल्यानंतर श्री.झलके यांनी नेहरुनगर झोन मध्ये प्रभाग २६, २७, २८ आणि ३० मध्ये पाणी पुरवठा वाढविण्याचे निर्देश दिले. हनुमाननगर झोन मधील प्रभाग ३४ मध्ये सुरु असलेल्या अमृत योजनेचे काम लवकरात-लवकर पूर्ण करणे आणि नागरिकांना नळाचे कनेक्शन देण्याचे निर्देश दिले. तसेच रामबाग आणि रेशीमबाग येथील पाणी पुरवठयाबाबत तक्रारी तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले.

आढावा बैठकीत धंतोली झोन सभापती लता काडगाये, डॉ.रविन्द्र भोयर, हर्षला साबळे, ‍विजय चुटेले, प्रमोद चिखले, मनोज गावंडे, भारती बुंदे, नेहरुनगर झोन मध्ये प्रतोद दिव्या धुरडे, समिता चकोले, मंगला गवरे, स्नेहल बिहारे, रेखा साकोरे, हनुमाननगर झोनमध्ये हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, बांधकाम समिती अध्यक्ष अभय गोटेकर, राजेन्द्र सोनकुसरे, मंगला खेकरे, कल्पना कुंभलकर, नागेश मानकर, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्लू चे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा आणि डेलीगेट उपस्थित होते.

News Credit To:- NMC

Exit mobile version