नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून नागपूर शहरात येणा-या प्रवाशांना शासनाच्या दिशानिर्देशानुसार १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गृह विलगीकरणाचा शिक्का मारलेली कोणतिही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्याला मनपातर्फे ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

लॉकडाउनमध्ये शहराबाहेर अडकलेले किंवा कामानिमित्त शहरात येउ पाहणारे लोक आता नागपुरात परतत आहेत. विविध माध्यमातून हे प्रवासी शहरात दाखल होत आहेत. मात्र शहरात आल्यानंतर त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करणार की ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करणार हा अनेकांमध्ये संभ्रम आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाने दिशानिर्देश जारी केले असून त्यानुसार शहरात येणा-या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यात येणार असून त्याला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. यासाठी मनपातर्फे संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर पोस्टर लावले जाईल.

त्यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव नमूद करून ‘ही व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’ असून बाहेर कुठेही फिरताना आढळल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१ आणि ०७१२-२५५१८६६ या क्रमांकावर नागरिकांनी माहिती दयावी, तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तीला मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये नेण्यात येईल, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

गृह विलगीकरणामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वत:सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी घराबाहेर निघू नये. त्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास असा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास त्यांनी तात्काळ मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आपल्या जवळच्या खाजगी किंवा शासकीय दवाखान्यात जाउन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्येही नागरिकांना उपचार घेता येणार आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये ताप, खोकला, निमोनिया किंवा तत्सम लक्षणे असलेले रुग्ण आल्यास संबंधित डॉक्टरांनी त्या रुग्णाचे ‘स्वॅब’ घ्यावे व त्याचा अहवाल येईपर्यंत रुग्णाला आयसोलेशनमध्येच ठेवावे. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती तात्काळ मनपाला देण्यात यावी. संबंधित रुग्णावर त्वरीत उपचार केले जाईल, असेही आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

News Credit To:- NMC

विमान प्रवाशांसाठी राज्य शासनाचे दिशानिर्देश जाहीर

महाराष्ट्र सरकारने सोमवारी (ता.२५) संध्याकाळी राज्यातल्या सर्व विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. या दिशानिर्देशामध्ये विमानतळ प्रशासन आणि प्रवाशांसाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्यात आहेत. त्यानुसार राज्यातील विमानतळावर येणा-या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक आहे. 

या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. राज्य शासनाच्या या दिशानिर्देशाची नागपुरातही अंमलबजावणी करण्यात येत असून मनपाच्या आरोग्य पथकामार्फत येणा-या व जाणा-या प्रत्येक प्रवाशाची ‘थर्मल स्क्रिनींग केली जात आहे.

राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक दिशानिर्देशानुसार, विमान प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाला ‘आरोग्य सेतू’ ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे. प्रवास सुरु होण्यापूर्वी विमानतळ व्यवस्थापनाद्वारे प्रत्येक प्रवाशाची थर्मल चाचणी केली जात असून कोणतेही लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश दिले जाते. सर्व प्रवाशांसह एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करणे तसेच प्रस्थान आणि आगमनानंतरही सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी केली जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही येणा-या व जाणा-या सर्व प्रवाशांची थर्मल चाचणी केली जात असून यासाठी मनपाचे आरोग्य पथक तैनात आहे. थर्मल तपासणीमध्ये लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवाशाला नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेउन यासंदर्भात केंद्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

विमानतळावर येताना किंवा विमानतळावरून निवासस्थानी जाताना प्रवाशांना स्वत:च्या वाहनातून निवासस्थान ते विमानतळ किंवा विमानतळ ते निवासस्थान असा प्रवास करावा लागेल. विशेष म्हणजे, प्रतिबंधित क्षेत्र ते विमानतळ किंवा विमानतळ ते प्रतिबंधित क्षेत्र अशा प्रवासांना परवानगी नाही.

प्रत्येक प्रवाशाने विमानतळावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) भरुन घेणे बंधनकारक आहे. स्वयं घोषणापत्रात (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) संबंधित प्रवाशी प्रतिबंधित क्षेत्रातील नाही, तो कोणत्याही प्रकारच्या विलगीकरणात नाही, त्याला कोणतिही लक्षणे नाहीत, कोरोनाची चाचणी केली असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्हच आहे ही सर्व माहिती सादर करणे अनिवार्य आहे.

वरील नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील. विमानप्रवासांनंतर प्रत्येक प्रवासी हा स्वताचे घरातच १४ दिवसाचे विलगीकराणत राहील. याबाबतीत कुठलीही हयगय संबंधीतां कडून होणार नाही यांची दक्षता संबंधीताने घ्यावयाची आहे. व 14 विलगीकरणाचे अत्यंत काटेकोरपणे व न चुकता पालन करावयाचे आहे.

मनपा ने संपत्ती व पाणी करात सवलत द्यावी मनसे चे अति. आयुक्त जोशी यांना निवेदन

नागपूर:- कोविड -१९ संक्रमणास आळा म्हणून  उपाययोजनांत संपूर्ण देशात २४ मार्चपासून तर शहरात त्या ही आधीपासून लॉकडाउन घोषित झाले. यादरम्यान रोजंदारी करणारे श्रमिक, इतर व्यावसाईक आणि नोकरदार नागरिकांचे अर्थाजनावर यांचा गंभीर परिणाम झाला.

सलग वाढत असलेल्या लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक स्थिती काय असेल, याविषयक आकलन करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मालमत्ता आणि पाणी करांत पुढील 2 महिन्यांपर्यंत सवलत देण्याची मागणी मनसेच्या वतीने केली गेली. या संदर्भात अति. आयुक्त राम जोशी यांना निवेदन सोपविले गेले. मनसे प्रांत महासचिव हेमंत गडकरी यांचे मार्गदर्शनात विशाल बडगे, घनश्याम निखाडे, शशांक गिरडे, आशिष पांढरे, सुमित वानखेडे, अन्ना गजभिये आणि अरविंद सावरकर यावेळी उपस्थित होते.

जप्ती नोटिस देऊ नये

चर्चेवेळी शिस्तमंडळाने सांगितले की कोणत्याही मालमत्ताधारकास जप्ती नोटिस देऊ नये. त्यासह मालमत्ता करभरनी न केल्यास दरमहा 2 टक्के बसणारा दंड आणि पाणी कराची विलंब राशीही लावू नये. कोरोनाच्या या संकटकाळात मनपातर्फे मालमत्ताधारकांस याप्रकारे दिलासा दिल्या जाऊ शकतो. ते म्हणाले की, मनपाकडे जीएसटीचे माध्यमातून, आवकाचा स्त्रोत आहे, ज्यातून पूर्ण करमाफी तर्कसंगत नाही. म्हणून किमान २-३ महिने करसंकलनास सक्ती करू नये, या संदर्भात महापौर, स्थायी समिति सभापति आणि आयुक्तांनी सहानुभूतीने विचार करण्याची मागणीही त्यांनी केली.

मिळकतीचे स्रोत निर्मितीस प्राथमिकता

त्यांनी सांगितले की मनसे वतीने नेहमीच वेगवेगळ्या निवेदनांद्वारे मिळकतीचे ईतर स्रोत निर्मितीसाठीची विनंती केली गेलीय. कोरोना प्रभावाने आंतरराष्ट्रीय पर्यटनावर परिणाम  संभवतो, अशात स्थानिक स्तरावर पर्यटनाचा प्रचार प्रसारात वाढ करणे शक्य आहे. या दृष्टिकोनातून आता मनपाचे बाजूने योग्य पाऊले उचलली जावी, ज्यायोगे शहरातही पर्यटन स्थळांचा विकास करता येईल, मनपासाठी पर्यटन हेदेखील मिळकतीचा एक प्रमुख मार्ग बनण्याची अपेक्षा त्यांनी केली. चर्चेदरम्यान पर्यटन हेतुने नागपूर दर्शन बस पुढिल फक्त काही दिवसांतच सुरू करण्याचे आश्वासन जोशी यांनी दिले.

NMC turns 5 hospitals, bungalow into Covid-19 centres

Nagpur:- The Nagpur Municipal Corporation (NMC) is all set to treat productive patients, after achieving fair progress in producing Covid-19. Five shambles hospitals and health centers are being converted into Dedicated COVID Health Centers (DCHC) with a capacity of 450-465 beds, including 50 in the ICU.

The Surana Maternity Home in Sadar, which was used for more than a decade as the official bungalow, is set to be used again for patients. Going through central government communication, the state government had projected 11,114 cases in the city between May 15-31 and directed the administration to be ready with as many beds as possible.

The administration will also plan COVID Care Centers (CCC) for asymptomatic positive corona patients, DCHCs for moderately serious patients, and a Dedicated COVID Hospital (DCH) for severe patients. Municipal commissioner Tukaram Mundhe, chief medical officer Dr. Yogendra Savai, and additional chief medical officer Dr. Praveen Gantawar decided to establish NMC’s own DCHCs to reduce pressure on state-run hospitals and rely entirely on private ones.

Surana Maternity Home had become vacant after the retirement of the additional Municipal Commissioner. Work is nearing completion to develop it as a 35-bed DCHC. The Unani Hospital and Physiotherapy Center of the NMC is located in the adjacent building and serving the same purpose. Another important task assumed by the NMC is to transform a health center at KT Nagar into a 130-bedded DCHC. The ICU facility is being built here too. Residents have turned against the move.

The three hospitals in NMC Indira Gandhi Rugnalaya (IGR) at LAD Square, Panchpaoli Maternity Home and Rambagh Isolation Hospital were in shambles. Work is nearing completion to convert IGR into a 130 bedded-DCHC including ICU. The hospital is set to look a little new.

Similarly, the Panchpaoli Maternity Home is set to be a 110-bedded DCHC and will probably be ready soon. In a short time, the Isolation Hospital will be converted to a 60-bedded DCHC. The ICU facility is being developed in this area too.

In case of a sudden increase in cases, the five hospitals, situated in various parts of town, will come handy.”The Urban primary health centers run by the civic body are in good condition. Recently they were developed under the scheme of the central government. The hospitals were in poor condition and lacked adequate facilities.

 

 

 

शहरातील रोडची अर्धवट कामे तात्काळ सुरू करा

शहरातील लॉकडाऊनचे नियम हळुहळू शिथिल होत असल्याने शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळही वाढत आहे. लॉकडाऊनमुळे शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आ हेत. लवकरच पावसाळा सुरू होण्याचे संकेतही हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. अशा स्थितीत अर्धवट बांधकाम झालेले रस्ते धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य जपून अर्धवट स्थितीतील रस्त्यांची सर्व कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी प्रशासनाला दिले.

मंगळवारी (ता.१९) कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांच्यासह स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संयुक्तरित्या शहरातील विविध ठिकाणच्या अपूर्णावस्थेतील रस्त्यांची पाहणी केली.

शहरातील अनेक ठिकाणच्या सिमेंट व डामरी रस्त्याच्या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे. मात्र ती कामेही बंदच आहेत. याशिवाय जी कामे सुरू होती ती सुद्धा लॉकडाऊनमुळे बंदच आहेत. मागील दोन महिने नागरिक घरात होते. त्यामुळे या अपूर्णावस्थेतील मार्गांमुळे काही बाधा निर्माण झाली नाही. मात्र आता अनेक बाबींना परवानगी मिळाल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. अशा स्थितीत ही अपूर्ण कामे सुरू होणे अत्यावश्यक आहे. दत्तात्रय नगर येथील सिमेंट रोडचे अपूर्ण काम तसेच जरीपटका येथील दुर्गे पिठ गिरणी समोरील रस्त्याचेही काम अर्धवट आहे.

शहरातील अशा अनेक ठिकाणी हिच स्थिती आहे. पावसाळा सुरू झाल्यास हे अपूर्ण बांधकाम झालेले रस्ते नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाद्वारे या अपूर्ण रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करून ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी दिले.

शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व भागातील अपूर्णावस्थेतील रस्त्यांची यादी त्वरीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांना दिले.

नागपूर शहरात २२ मे पर्यंत जुनेच आदेश लागू

महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउनमध्ये शिथिलता संबंधिचे नवीन आदेश मंगळवारी (ता.१९) निर्गमीत करण्यात आले आहेत. हे आदेश राज्यात २२ मे पासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे सद्यातरी नागपूर रेड झोनमध्ये आहे. मागील चार ते पाच दिवसात शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजूनही अनेक ‘हॉटस्पॉट’ आहेत. 

राज्य शासनाने १९ मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये रेड झोनमधून नागपूरचे नाव वगळले असले तरी शहरातील स्थिती पाहता अजुनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे व उचित दक्षता घेणे आवश्यक आहे. सद्यातरी नागपूर शहरामध्ये लागू असलेल्या मनपाच्या १७ मे रोजीच्या आदेशात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे २२ मे पर्यंत नागपूर शहरात जुनेच आदेश लागू राहणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

यासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, लॉकडाउन संबंधी महानगरपालिकेचे १७ मे आणि त्यापूर्वी काढलेले आदेश सद्या अस्तित्वात आहेत. नवीन आदेश २२ मे रोजी शहरातील परिस्थिती पाहून निर्गमीत करण्यात येईल. नागपूर शहराला कायमस्वरूपी रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी सद्या आहे त्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे.

१७ मे रोजी देण्यात आलेलेच आदेश लागू असून कुणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्रशासनीक कायदा आणि भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे परवानगी दिलेल्या बाबींव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये.

यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेने घरपोच मद्यविक्री, नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील.

याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

News Credit To:- NMC

कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी केली पाणी पुरवठा केंद्राची पाहणी

शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये भेडवणा-या पाणी समस्येसंदर्भात सोमवारी (ता. १८) कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी कन्हान येथील पाणी पुरवठा केंद्राला भेट देउन पाहणी केली. 

शहरात भेडसावत असलेल्या पाणी समस्येबाबत पाणी पुरवठा केंद्रातील प्रत्यक्ष स्थितीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेविका सरीता कावरे, माजी नगरसेवक महेंद्र राउत, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कनिष्ठ अभियंता श्री. भस्मे, ओसीडब्ल्यूचे प्रवीण शरण, दिनेश अटाळकर आदी उपस्थित होते.

कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमधील रहिवासी भागात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. शहरातील पाण्याच्या समस्येबाबत गांभीर्य बाळगत कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी प्रत्यक्ष कन्हान नदीवरील पाणी पुरवठा केंद्राला भेट दिली.

पाणी समस्येमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जलसंपदा विभागाशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार नवेगाव खैरी येथील जलाशयातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्यात आले आहे. नवेगाव खैरी ते कन्हान नदी असा ४४ किमी अंतराचा प्रवाह असून कन्हान नदीत ते पाणी पोहोचायला ४८ तासाचा कालावधी लागणार आहे. पाण्याबाबत यावेळी संबंधित अधिका-यांकडूनही आढावा घेण्यात आला.

पाणी टंचाईमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नवेगाव खैरी येथून करण्यात आलेल्या पाणी पुरवठ्यामुळे लवकरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरात ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्या संदर्भात अडचणी येत आहेत त्या सर्व ठिकाणी तातडीने उपाययोजना करून तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश यावेळी कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी दिले. पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता संबंधीत अधिका-यांनी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिलेत.

News Credit To:- NMC

घाऊक भाजी विक्रीसाठी १९ मे पासून कॉटन मार्केट सुरू होणार

घाऊक भाजी विक्रीसाठी येत्या १९ मे पासून महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (१७ मे रोजी) जारी केले आहेत. पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. नागपूर बाहेरून येणा-या भाजीपाल्याच्या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहिल. विशेष म्हणजे नागरिकांना किरकोळ खरेदीसाठी येथे बंदी करण्यात आली आहे.

महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वाचा भाजी बाजार असून येथे व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या व सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने हे मार्केट बंद करण्यात आले होते. सद्यस्थितीत लॉकडाऊन कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत घाऊक विक्रीला मंगळवार दि.

१९ मे, पासून दररोज पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत कॉटन मार्केटमधील विविध सेक्टर्समधील प्रत्येक दुकानदाराला आठवडयात एकच दिवस दुकान उघडून व्यवसाय करता येईल अशी व्यवस्था वेळापत्रकान्वये करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला वगळता या मार्केटमधील इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू राहतील.

या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार कॉटन मार्केट सुरू ठेवताना काही महत्वाच्या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार कोरोना विषाणू विषयक शासनाने निर्गमित केलेल्या आदेश व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच मास्क व सॅनिटायजरचा वापर बंधनकारक राहिल. खरेदी करिता येणा-या ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील, दुकानदाराला नेमून दिलेली जागा किंवा दुकानातच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल, त्याला अतिरिक्त जागेचा वापर करता येणार नाही.

एका दुकानदाराला भाजी विक्रीकरिता एकाच वाहनाची परवानगी राहील व सदर वाहन शहीद मैदान येथील वाहनतळावरच पार्क करावे लागेल. दुकानदारांना व सर्व संबंधितांना आपले वाहन भाजी मार्केटच्या क्षेत्रात नेता येणार नाही. सर्व घाऊक विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागा निर्धारित वेळेतच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल. अटी व शर्तीचा उल्लंघन झाल्यास त्यांचा विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आपातकालीन स्थिति के लिए तैयार रहें: तुकाराम मुंडे

नागपुर: जल्द ही बारिश होने लगेगी इसलिए, आने वाली आपदाओं के बारे में सतर्क रहना आवश्यक है। कोरोना नागरिकों को बहुत कष्ट पहुंचा रहा है। इस तरह के बरसात के मौसम में अधिक ध्यान रखना आवश्यक है। नागरिकों की सुविधा के लिए, सभी दस क्षेत्रों में नियंत्रण कक्ष स्थापित किए जाएंगे और नागरिकों की सुविधा के लिए टीम को चौबीसों घंटे तैयार रहना चाहिए।

संपूर्ण प्रणाली के लिए एक योजना तैयार करना और उसके अनुसार कार्रवाई करना आवश्यक है।कमिश्नर तुकाराम मूंढे ने कहा कि इसके लिए निगम के हर अधिकारी को किसी भी आपातकालीन स्थिति का सामना करने के लिए तैयार रहना चाहिए।

नागपुर नगर निगम के छत्रपति शिवाजी महाराज प्रशासनिक भवन के आयुक्त कक्ष में शुक्रवार (15 फरवरी) को प्री-मानसून समीक्षा बैठक आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता नगर आयुक्त तुकाराम मूंधे ने की। अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त और निदेशक ठोस अपशिष्ट प्रबंधन डॉ.प्रदीप दशरवार, प्रभारी उपायुक्त और बागवानी अधीक्षक अमोल चौरागर, अधीक्षण अभियंता श्वेता बनर्जी, चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके,शिक्षा अधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, एएस मानकर, शकील नियाजी, सहायक आयुक्त प्रकाश वरडे, राजू भिवाडे, अशोक पाटिल, सुभाष जयदेव, गणेश राठौड़, हरीश राउत, स्नेहा करपे, किरण बागडे आदि उपस्थित थे।

बैठक के दौरान, आयुक्त तुकाराम मुंडे ने विभिन्न मुद्दों पर चर्चा की और संबंधित विभाग द्वारा की जा रही तैयारियों की समीक्षा की। निगम मुख्यालय में आपातकालीन कक्ष की योजना, जोन स्तर पर नियंत्रण कक्ष, नदी और नाली की सफाई की प्रक्रिया, तूफान के पानी की निकासी, इमारतों का तहखाना, मैनहोल कवर और Outdated मकान पर कार्रवाई,कमिश्नर ने नदियों और नालों के किनारों पर अतिक्रमण, पंपिंग वॉटर के लिए उपलब्ध पंप, आपातकाल के मामले में समाज भवन और नगरपालिका स्कूलों की उपलब्धता, अग्निशमन विभाग की तैयारी, सड़कों पर खतरनाक पेड़ों की कटाई, संचारी रोगों की तैयारी, सुचारू जल आपूर्ति की विस्तार से समीक्षा की।

शहर में किसी भी आपातकालीन स्थिति के मामले में, यह ध्यान रखना आवश्यक है कि निगम की सेवा उस क्षेत्र में किसी भी तरह से बाधित न हो। आपदा प्रबंधन योजना यह सुनिश्चित करने के लिए तैयार की जानी चाहिए कि सेवा तुरंत बाधित हो जाए और निर्बाध रूप से जारी रहे। इसके अलावा, नागरिकों की सुविधा के लिए, निगम मुख्यालय सहित सभी दस क्षेत्रों में नियंत्रण कक्ष स्थापित किए जाएंगे और त्वरित प्रतिक्रिया प्राप्त करना आवश्यक है।उस क्षेत्र तक पहुंचना आवश्यक है जहां निगम टीम को कम से कम समय में शिकायत मिली और समस्या पर कार्रवाई की जाए।

नागरिकों को उनकी सुविधा के लिए तत्काल सहायता प्रदान करने के लिए एक ‘त्वरित प्रतिक्रिया दल’ का गठन किया जाना चाहिए। इसके अलावा, शहर में जर्जर मकानों और इमारतों की एक सूची तैयार की जानी चाहिए और सरकार के निर्णय के अनुसार कार्रवाई की जानी चाहिए। आयुक्त तुकाराम मूंधे ने शहर की तीन नदियों के आसपास के गहरे इलाकों में अतिक्रमण हटाने की कार्रवाई करने का भी निर्देश दिया।

नए नियम और शर्तें लॉकडाउन 4.0 के लिए अमित शाह की बैठकों में लागू होने की संभावना है.

बारिश से पहले गहरे जलमार्ग, सीवर लाइन, ट्रंक लाइनों को साफ करना आवश्यक है। शहर के माध्यम से बहने वाले नालों के विवरण का पता लगाने के लिए एक सूक्ष्म स्तर की योजना भी तैयार की जानी चाहिए, भारी बारिश के मामले में नाले का कौन सा हिस्सा सबसे अधिक प्रभावित हो सकता है, और पहले से क्या उपाय किए जा सकते हैं।आयुक्त तुकाराम मुंधे ने स्वास्थ्य विभाग द्वारा आवश्यक दवाओं की तैयारी, आपात स्थिति के मामले में सामाजिक भवनों, स्कूलों के गहन अध्ययन के बाद अगली बैठक में उठाए जाने वाले आवश्यक कदमों पर एक विस्तृत रिपोर्ट प्रस्तुत करने का निर्देश दिया।

नागपुरातील गड्डीगोदामचा काही परिसर सील

नागपूर:- नागपूर महानगरपालिका हद्दीतील मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत येणा-या गड्डीगोदाम प्रभाग क्रमांक ०९ या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरु नये व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता काही परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ०९ च्या दक्षिण पूर्वेस युवराज साखरे यांचे घर, दक्षिण- पश्चिमेस जयस्वाल रेशन शॉप, दक्षिण -पश्चिमेस किशोर शाहू यांचे घर, पश्चिमेस अन्नपूर्णा मंदीर, पश्चिमेस गड्डीगोदाम चौक, उत्तरेस गुरुव्दारा जवळील रेल्वे अंडर ‍ब्रिज, पूर्वेस फेमस लायब्ररी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाची सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राचे बाहेर जाण्यास व सदर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्षेत्रात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

News Credit To:- NMC

Exit mobile version