नागपुर में COVID-19 स्वास्थ्य केंद्र की स्थापना की जाएगी

नागपुर:- जिला प्रशासन नागपुर नगर निगम की स्वास्थ्य प्रणाली को सक्षम करने के लिए नगरपालिका अस्पतालों को विकसित करने पर विचार कर रहा था। इस काम के लिए लगभग 1 करोड़ 90 लाख की आवश्यकता थी। कोविद -19 की पृष्ठभूमि के खिलाफ, अभिभावक मंत्री नितिन राउत ने इस निधि को नगर निगम को देने की स्वीकृति दी है।

इसलिए, पचपावली डिस्पेंसरी, सदर डिस्पेंसरी, केटी नगर डिस्पेंसरी, इमामवाड़ा सेपरेशन सेंटर, इंदिरा गांधी अस्पताल जैसे कुल पांच औषधालय विकसित किए जाएंगे। विशेष रूप से, स्थानीय स्व-सरकारी अस्पतालों को जिला वार्षिक योजना से धन प्रदान करने के लिए कोई योजना नहीं थी। लेकिन 28 अप्रैल, 2020 को महाराष्ट्र सरकार के नियोजन विभाग द्वारा जारी सरकारी संकल्प के अनुसार कोविद -19 के प्रकोप के खिलाफ अनुमेय उपचारात्मक उपायों के लिए वित्तीय वर्ष 2020-21 में राज्य सरकार और स्थानीय स्व-सरकार के सभी स्वास्थ्य संस्थानों को मंजूरी देने का प्रावधान किया गया है। यह वित्तीय मंजूरी नागपुर के नागरिकों को नगरपालिका के अस्पतालों में बेहतर सुविधाएं प्रदान करने में एक लंबा रास्ता तय करेगी।

 

आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा : आयुक्त तुकाराम मुंढे

लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे उद्भवणा-या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून चोविस तास नागरिकांच्या सुविधेसाठी चमू तत्पर असायला हवी. एकूणच संपूर्ण यंत्रणेबाबत प्लान तयार करून त्या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिका-याने येणा-या कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षामध्ये शुक्रवारी (ता.१५) नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, प्रभारी उपायुक्त तथा उदयान अधिक्षक अमोल चौरपगार, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, ए.एस.मानकर, शकील नियाजी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरीश राउत, स्नेहा करपे, किरण बगडे आदी उपस्थित होते.

बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध विषयावर चर्चा करून संबंधित विभागाद्वारे करण्यात येणा-या तयारीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आपात्कालीन कक्षाचे नियोजन, झोन स्तरावरील नियंत्रण कक्ष, नदी व नाले सफाई संदर्भातील कार्यवाही, स्ट्रॉम वाटर ड्रेन, इमारतींचे बेसमेंट, मेनहोलवरील झाकण, जीर्ण व अतिजीर्ण घरांबाबत कार्यवाही, नदी व नाल्याच्या काठावरील अतिक्रमण, पाणी उपसण्याकरिता उपलब्ध पम्प, आपात्कालीन परिस्थितीत समाज भवन व मनपा शाळांची उपलब्धता, अग्निशमन विभागाची पूर्वतयारी, रस्त्यावरील धोकादायक झाडांची कटाई, साथरोगांबाबत पूर्वतयारी, सुरळीत पाणी पुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा करून तयारीचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला.

शहरात कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागात कोणत्याही प्रकारे मनपाची सेवा खंडीत होउ नये याची कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. सेवा खंडीत झाल्यास ती तात्काळ सुरू करून पुढे अविरत सुरू राहावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे प्लान तयार करून ठेवण्यात यावे. याशिवाय नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा मुख्यालयासह दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून त्याद्वारे त्वरीत प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. मनपाच्या चमूद्वारे तक्रार प्राप्त झालेल्या भागात कमीत कमी वेळेत पोहोचून समस्येवर कार्यवाही करणे आवश्यक आहे.

नागरिकांच्या सुविधेकरिता त्यांना त्वरीत मदत उपलब्ध व्हावी यासाठी ‘इंन्स्टंट रिस्पॉन्स टिम’ तयार करण्यात यावी. याशिवाय शहरातील जीर्ण घरे व इमारतींची यादी तयार करून त्यावर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. तसेच शहराच्या तिनही नदीच्या आजूबाजूच्या खोल परिसरात असलेले अतिक्रमण काढण्याबाबतही कार्यवाही करा, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

पावसाळ्यापूर्वी खोल भागातील जलवाहिनी, सिवर लाईन, ट्रंक लाईन या सर्वांची स्वच्छता होणे अत्यावश्यक आहे. शहरातून वाहणा-या नाल्यांची सविस्तर माहिती काढून जास्त पाउस आल्यास नाल्याशी संबंधित कोणता भाग जास्त बाधित होउ शकतो, याचा अभ्यास करून आधीच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही ‘मायक्रो लेव्हल प्लान’ तयार करण्यात यावा.

आपात्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात येणारे समाज भवन, शाळा यांचीही यादी करणे, आरोग्य विभागाद्वारे गरजेच्या वेळी आवश्यक असणा-या औषधांचीही तयारी ठेवणे या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भात सुक्ष्मस्तरावर काम करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचेही निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ स्पर्धेच्या प्रवेशासाठी आता २५ पर्यंत मुदतवाढ

लॉकडाऊनचा वेळ सत्कारणी लागावा, लोकांना मनोरंजनाचे साधन मिळावे या हेतूने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून ‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ या उपक्रमांतर्गत ‘महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ जाहीर करण्यात आली होती. यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ मे होती. ती वाढवून आता २५ मे करण्यात आली आहे.

ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर नागपुरातून शेकडो प्रवेश अर्ज यासाठी प्राप्त झालेत. मात्र, काहींना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे सदर स्पर्धेच्या प्रवेशाची तारीख वाढविण्यात यावी, अशी स्पर्धकांची विनंती होती. याच विनंतीवरून या स्पर्धेसाठी आता मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका आणि संस्कारभारती या स्पर्धेचे आयोजक आहेत. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण गायकच असावे, असे बंधन नाही. ही स्पर्धाच मुळात प्रत्येक कुटुंबासाठी असून कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त आठ व्यक्ती यात सहभागी होऊ शकतील.

काय आहे स्पर्धा?
‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ या संकल्पनेखाली केवळ नागपूर महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबासाठीच ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड महिन्यापासून घरी बसलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी विरंगुळा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये भक्तीगीत, सिनेगीत अथवा देशभक्ती गीत गाता येईल. एका कुटुंबाला तीन वर्गवारीपैकी कुठल्याही दोन वर्गवारीमध्ये सहभागी होता येईल.

मात्र त्यासाठी वेगवेगळे प्रवेश अर्ज दाखल करावे लागतील. ही स्पर्धा पूर्णपणे डिजीटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने असलेला प्रवेश अर्ज भरायचा आहे. त्याच अर्जात आपण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार केलेला व्हिडिओ जोडायचा आहे.

व्हिडिओ हा १०० एमबी पेक्षा अधिक आकाराचा नसावा, याची काळजी घ्यावयाची आहे. एका वर्गवारीसाठी एक प्रवेश अर्ज आणि एक व्हिडिओ जोडायचा आहे. दुसऱ्याही वर्गवारीत भाग घ्यायचा असेल तर दुसरा प्रवेशअर्ज भरून त्यात तो व्हिडिओ अपलोड करावा लागेल. स्पर्धेत कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत आठ सदस्य सहभागी होऊ शकतील. गीते ही हिंदी अथवा मराठी भाषेतील असावी. व्हिडिओतील गीतांचा कालावधी पाच मिनिटांपेक्षा अधिक नसावा.

स्पर्धकांनी गायलेले गीत समूहगीतच असावे. यामध्ये आपल्या कुटुंबातीलच सदस्यांचा समावेश असेल. बाहेरचा व्यक्ती नसावा. गायनाचा व्हिडिओ तयार करताना सोशल डिस्टंसिंगचे नियम कटाक्षाने पाळावेत. समूहगान करताना ऑडिओट्रॅक बॅकग्राऊंड म्युझिकचा वापर करता येईल.

मात्र स्वतंत्र वाद्यवृदांचा समावेश केलेली गीते स्पर्धेत सहभागी केली जाणार नाहीत. गीतांची निवड, त्यातील सकारात्मक संदेश, एकूण सादरीकरण, वेशभूषा या बाबींचा परिक्षणादरम्यान विचार करण्यात येईल. तीनही गटातील विजेत्या पारिवारिक चमूंना प्रथम महापौर चषक व रु. २१ हजार रोख, द्वितीय रुपये १५ हजार रोख, तृतीय रु. ११ हजार रोख तसेच रु. एक हजारचे पाच प्रोत्साहन पुरस्कार प्रमाणपत्रासह नागपूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येतील.

प्रवेश कसा घ्यावा…?
प्रवेशासाठी आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि संस्कार भारतीच्या वतीने गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. https://forms.gle/nRVcxPgUJ21tibky8 या लिंकवर गुगल फॅर्म उपलब्ध आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज, अधिकृत ट्विटर हॅण्डल आणि इंस्टाग्रामवर ही लिंक उपलब्ध राहील. याव्यतिरिक्त

९५९४८९२१०८, ९४२२१५९९५७, ९८२३७२४३२६ या क्रमांकावर आपण मेसेज केल्यास लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. नागपूरकरांसाठी नागपूरकरांच्या मनोरंजनासाठी नागपूरकरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत नागपुरातील प्रत्येक कुटुंबांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिका आणि संस्कार भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

News Credit To:- NMC

अनोख्या सायकलिंगद्वारे डॉ.अमित समर्थ यांची मनपाच्या सेवाकार्याला ‘मैत्री’पूर्ण साथ

कोरोनाच्या संकटात कुणीही उपाशी राहू नये यासाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेकांची साथ मिळत आहे. कुणी ‘कम्युनिटी किचन’मधून जेवण पुरवित आहे तर कुणी जेवणाची सामुग्री पुरवून मनपाचे हात बळकट करत आहेत. या सेवा कार्याला आता क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सहकार्य दर्शविले आहे. १३०० किमीची सलग ४८ तास इनडोअर सायकलिंग करून डॉ.अमित समर्थ यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झालेले दोन लाख रुपये सेवा कार्यासाठी दिले आहेत. 

यामधील निधीचा धनादेश त्यांनी गुरूवारी (ता.१४) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका डॉ.परिणीता फुके, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रो-हेल्थ फाऊंडेशनचे संस्थापक आणि माईल्स एन माईलर्स एड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ.अमित समर्थ मनपाच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसॅडर आहेत. जगातील अनेक कठीण शर्यत पूर्ण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी आपल्या विक्रमी कामगिरीद्वारे साथ दिली आहे. डॉ. समर्थ यांनी ४८ तास ‘नॉनस्टॉप’ इनडोअर सायकल चालवून १३०० किमी अंतर पूर्ण केले. घरीच ‘ट्रेनर’ आणि ‘ॲप’च्या माध्यमातून ‘व्हर्च्यूअल’ पद्धतीचा उपयोग करून त्यांनी सायकल चालविली. त्यांच्या या इव्हेन्टचे फेसबुक लाइव्ह करण्यात आले. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत जनजागृतीचा संदेशही दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याकडे दोन लाख रुपयांचा निधी जमा झाला.

या निधीपैकी काही भाग त्यांनी महाराष्ट्र पोलिसांतर्फे करण्यात येत असलेल्या सेवा कार्याला दिला. मनपाच्या सेवा कार्यालाही सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांच्याकडे व्यक्त केली व त्यांच्या माध्यमातून त्यांनी उर्वरित रक्कम मनपाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या ‘कम्युनिटी किचन’साठी दिली आहे. डॉ. अमित समर्थ यांनी मैत्री परिवार, सीएजी आणि मल्हार फाउंडेशनला त्यांनी या माध्यमातून मदत केली.

मैत्री परिवाराच्या माध्यमातून दररोज पाच हजारावर ‘फूड पॅकेट्स’चे वितरण
लॉकडाउनमध्ये नागपूर शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गरजू, बेघरांना अन्नपुरवठ्यासाठी मनपाने पुढाकार घेताच शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याला सहकार्य दर्शविले. मनपाच्या सहकार्याने शहरात २७ ‘कम्युनिटी किचन’ सुरू आहेत.

तर ५०च्या वर स्वयंसेवी संस्था, सेवाभावी लोक नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कार्य करत आहेत. या सर्व कार्यामध्ये मैत्री परिवार संस्थेने घेतलेले सेवा कार्याचे व्रत आजही अविरत सुरू आहे. सर्वसामान्य, गरीब, गरजू, बेघर, निराधारांच्या मदतीसाठी संस्थेने मैत्रीचा सेतू निर्माण केला आहे.

शहरात लॉकडाउन जाहीर होताच २७ मार्चपासून मैत्री परिवार संस्थेद्वारे दररोज गरजूंपर्यंत जेवणाचे डबे पोहोचविले जात आहेत. सुरूवातीला संस्थेच्या सुरेंद्रनगर येथील छात्रावासातून हे डबे पुरविण्यात येत होते. मात्र गरजूंची वाढती संख्या लक्षात घेता कुणीही उपाशी राहू नये या हेतूने धरमपेठ येथील वझलवार लॉन येथेही एक किचन सुरू करण्यात आली. त्यानंतर अत्रे लेआउटमधील राजेश्वरी मंदिर परिसरात तिसरे किचन सुरू करण्यात आले.

सुरूवातीला सुरेंद्रनगर आणि वझलवार लॉन येथील किचनमधून प्रत्येकी एक हजार तर अत्रे लेआउटमधील किचनमधून पाचशे जेवणाचे डबे तयार करून वितरीत करण्यात येत होते. आज वाढत्या गरजेनुसार ही संख्या दररोज वाढतच आहे. आजघडीला आजघडीला दररोज पाच हजारावर ‘फूड पॅकेट्स’चे वितरण केले जात आहे. या अखंड सेवाकार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा.प्रमोद पेंडके यांच्यासह संपूर्ण चमू अहोरात्र कार्य करीत आहे. मैत्री परिवार संस्थेच्या या उपक्रमामध्ये दोनशेच्या वर स्वयंसेवक सेवा देत आहेत.

लॉकडाउन संदर्भातील नव्या आदेशाचे पुनर्विलोकन करून सुधारणा करा

कोरोनामुळे लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. चौथ्या लॉकडाउनमध्ये शहरामध्ये अनेक बाबतीत काही अंशी शिथिलता प्रदान करण्यात आली आहे. मात्र या आदेशात ‘कन्टेमेंट झोन’ आणि ‘कन्टेमेंट एरिया’मध्ये देण्यात आलेल्या सुविधांमध्ये विरोधाभास दिसून आहे. त्यामुळे या आदेशाचे पुनर्विलोकन करून त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली आहे.

नागपूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा व आस्थापना सुरू करण्याबाबत बुधवारी (ता.१४) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी केले. या आदेशानुसार ऑनलाईन मद्यविक्री, बांधकाम, आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप, ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरणे यासह १५ टक्के उपस्थितीत खासगी कार्यालये तसेच ३३ टक्के उपस्थितीत सर्व शासकीय कार्यालय सुरू करण्याचे नमूद करण्यात आले आहे.

आदेशामध्ये प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ऑनलाईन मद्यविक्री सुरू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात ज्या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो तो संपूर्ण परिसर प्रतिबंधित करून सील करण्यात येतो. या भागात कुणालाही बाहेर निघण्यास व आत येण्यास परवानगी नाही. त्यामुळे या भागात म्हणजे ‘कन्टेमेंट एरिया’मध्ये ऑनलाईन मद्यविक्री वगळता अन्य अत्यावश्यक सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्ण आढळलेला ठराविक परिसर वगळता अन्य ठिकाणी मात्र ही सेवा दिली जाईल, असे या आदेशावरून निदर्शनास येत आहे.

मात्र याउलट १५ टक्के उपस्थितीत खाजगी कार्यालय सुरू करण्याला ‘कन्टेमेंट झोन’मध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. शहरात चार ‘कन्टेमेंट झोन’ घोषित करण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार या चार झोनमध्ये कोणतेही खाजगी कार्यालय सुरू होणार नाहीत. एकीकडे ठराविक छोटासा परिसर वगळता अन्य ठिकाणी ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देण्यात येत आहे.

तर दुसरीकडे संपूर्ण झोनमध्येच खाजगी कार्यालये बंदच ठेवण्यात येत आहेत. हा विरोधाभास असून यामुळे सर्वसामान्य खाजगी नोकरदारांची वाताहत होणार आहे. त्यामुळे या आदेशाचे पुनर्विलोकन करून त्यात सुधारणा करण्यात यावी, अशीही मागणी विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

कोविड केअर सेंटर संदर्भात भ्रम पसरविणाऱ्या वृत्तांवर जनतेने विश्वास ठेवू नये

कोरोना विषाणूसंदर्भात भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करता यावे यासाठी नागपूर महानगरपालिकेने पाच हजार खाटांची क्षमता असलेले ‘कोव्हिड केअर सेंटर’ कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास परिसरात सुरू केले. सध्या ५०० बेडची व्यवस्था असलेल्या या केंद्रातील बेड एका रात्रीतून गायब झाले या आशयाचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले. मात्र हे वृत्त दिशाभूल करणारे असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

कळमेश्वर मार्गावरील कोव्हिड केअर सेंटर हे सर्वात मोठे केंद्र उभारण्यात नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाची भूमिका निभावली. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना नागपुरात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयामुळे त्यावर नियंत्रण मिळविता आले आहे. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

असे असतानाही भविष्यात कुठल्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास संपूर्ण तयारी असावी यासाठी राधास्वामी सत्संग न्यासच्या सहकार्याने नागपुरात पाच हजार बेड क्षमता असलेल्या कोव्हिड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. याची वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानेही दखल घेतली. सदर केंद्रात सध्या ५०० बेड ठेवण्यात आले असून वेगवेगळे कम्पार्टमेंट करण्यात आले आहेत.

आवश्यकतेनुसार त्या कम्पार्टमेंटमध्ये बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ ५०० बेडसाठी आवश्यक कम्पार्टमेंटमध्ये बेड आहेत. शिवाय इतके मोठे केंद्र उभारताना सर्वच तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आहेत. वायुविजन, वीज, पाणी या सर्वच बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे.

एका वर्तमानपत्राने ज्या कम्पार्टमेंटमध्ये बेड नाहीत, त्या कम्पार्टमेंटचे छायाचित्र काढून प्रकाशित केले. अशा आपतकालिन परिस्थितीत असे दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित करून जनतेमध्ये भ्रम आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे संपूर्ण वृत्त वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे. नागपूर महानगरपालिका कोव्हिड-१९ ची साखळी खंडित करण्यासाठी आणि येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

New Credit To:- NMC

नागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता

राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.

नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल.

आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील.

याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरू करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावे लागतील. सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील.

लॉकडाऊनकाळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

हे राहणार सुरू
– केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा‌ वापर – एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.
– दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.
– आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणं, त्यासाठी लागणारे साहित्य
– नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था
– आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन
– नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)
– कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल
– प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.
– इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)
– ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)
– ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)
– ऑनलाईन मद्यविक्री
– ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)
– खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत
– सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)
– मान्सूनपूर्व सर्व कामे
– २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.

हे राहणार बंद – सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)
– प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)
– आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)
– मेट्रो रेल्वे सेवा
– सर्व शाळा, महाविद्यालाये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)
– सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी
– सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम
– सर्व धार्मिक स्थळे
– सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा
– टॅक्सी आणि कॅब सेवा
– जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा
– सलून आणि स्पा
– सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग.

News Credit To:- NMC

मलवाहिनीच्या कामाकरिता हिंगणा टी पॉईंट

नागपूर महानगरपालिकेतर्फे हिंगणा टी पॉईंट ते रिंग रोड, संभाजी चौकापर्यंत मलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावित कामाकरिता रिंग रोड संभाजी चौकातील वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. यासंबंधी लक्ष्मीनगर झोनच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत वाहतूक पोलिस उपायुक्तांना परवानगी पत्र सादर करण्यात आले होते. या कार्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे परवानगी देण्यात आली आहे.

उपरोक्त कामाकरिता रिंग रोडवरील वाहतूक बंद करून वळती करण्यात येणार आहे. हिंगणा टी पॉईंट ते रिंग रोड, संभाजी चौकापर्यंत ११ मे ते २५ मे २०२० या कालावधीमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजुची वाहतूक बंद करून डाव्या बाजुने वळती करण्यात आली असल्याची माहिती लक्ष्मीनगर झोनचे कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर यांनी पत्राद्वारे दिली आहे.

News Credit To:- NMC

मलवाहिनीच्या कामाकरिता हिंगणा टी पॉईंट

नागपूर महानगरपालिकेतर्फे हिंगणा टी पॉईंट ते रिंग रोड, संभाजी चौकापर्यंत मलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावित कामाकरिता रिंग रोड संभाजी चौकातील वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. यासंबंधी लक्ष्मीनगर झोनच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत वाहतूक पोलिस उपायुक्तांना परवानगी पत्र सादर करण्यात आले होते. या कार्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे परवानगी देण्यात आली आहे.

उपरोक्त कामाकरिता रिंग रोडवरील वाहतूक बंद करून वळती करण्यात येणार आहे. हिंगणा टी पॉईंट ते रिंग रोड, संभाजी चौकापर्यंत ११ मे ते २५ मे २०२० या कालावधीमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजुची वाहतूक बंद करून डाव्या बाजुने वळती करण्यात आली असल्याची माहिती लक्ष्मीनगर झोनचे कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर यांनी पत्राद्वारे दिली आहे.

News Credit To:- NMC

‘त्यांना’ हिणवू नका, ‘त्यांच्या’ कुटुंबाला आधार द्या…! महापौर संदीप जोशी यांनी केले भावनिक आवाहन

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे नागपूरसह संपूर्ण देश महासंकटातून जातोय. या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना जर या रोगाने ग्रासले तर त्यांच्या कुटुंबियांना हीन वागणूक देऊ नका. कारण आपल्याला सुरक्षित करण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्यांच्या कुटुंबियांना आधार द्या, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले आहे. नागपुरात कोव्हिडची साखळी खंडित करण्यासाठी आणि बाधित रुग्णांवर उपचार करून पूर्णतः बरे करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती दिवसरात्र राबत आहेत. नागरिकांनी शिस्त पाळावी यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी कडक उन्हात बंदोबस्तात आहेत.

स्वच्छता कर्मचारी या संकटकाळात पुन्हा रोगराई पसरू नये म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कर्तव्यावर असणाऱ्या यातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या युद्धात गेल्या दीड महिन्यापासून कुटुंबापासून दूर राहणाऱ्या त्या व्यक्तींने नागपूर सुरक्षित राहावे म्हणून आपला जीव धोक्यात घातला तो व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचे प्रकरण समोर आले.

ही बाब अत्यंत गंभीर आहे. फ्रंटवर लढणाऱ्या या सर्वांनी जर म्हटले आम्हाला बरे वाटत नाही. आम्ही कर्तव्यावर जाणार नाही, तर या शहराची परिस्थिती काय असेल, याचा जरा विचार करा, असे म्हणत ‘विचार करा, मानसिकता बदला. तो आपल्यासाठी देवदूत बनला. आता त्याच्या कुटुंबाचा आधार बना’, असे भावनिक आवाहन महापौर संदीप जोशी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

News Credit To:- NMC

Exit mobile version