Crop loans for waiving up to 2 lakh: Uddhav

The scheme will be called Mahatma Jyotirao Phule loan waiver scheme. Maharashtra’s chief minister, Uddhav Thackeray, announced on Saturday that crop loans will be waived to a maximum of 2 lakh until September 30, 2019. While the government has not revealed the exact amount of the package and the number of farmers benefiting from the scheme, Finance Minister Jayant Patil said the amount could be more than some 20,000 crores. Uddhav The scheme will be renamed Mahatma Jyotirao Phule loan waiver scheme Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray declared on Saturday that crop loans up to 02 lakh will be waived until September 30th.

The Common Minimum Program (CMP), announced last month by the government of Maha Vikas Aghadi (MVA), listed farm loan waivers as one of its agenda’s main points. The decision of Saturday is seen as the first step towards the fulfilment of the CMP promises.

The chief minister said the waiver of the loan would be a straightforward scheme and the money would be transferred directly to farmers ‘ accounts.

“The farmer is not going to suffer from any restrictions and the government is planning to free loan as many farmers as possible,” he said. Mr Thackeray said that the new loan will also be restructured, which will be pending next June.

“Those who pay the crop loan regularly without fail will receive the benefits of a new scheme to be announced in the next 15 days,” he added.

Mr Patil later told the sources that it would soon be announced the actual number of beneficiaries and the total amount of the loan.

“But the sum would surpass more than 20,000 crore that the previous government claims to have disbursed. There will be no forms, no spouse interview, no online system as the previous government has done. We are going to do it in a transparent way. The scheme’s specifics will be announced soon, “he said. The Opposition BJP alleged that the government of the state had assured full waiver of loans and had backstabbed the farmers by not doing so. Opposition Leader Devendra Fadnavis staged a walk-out in protest while Mr. Thackeray was congratulated by the treasury benches MLAs.

Maharashtra CM says meal for Rs 10 at 50 centers in the state

NAGPUR: As stated in its pre-poll manifesto by Shiv Sena, CM Uddhav Thackeray announced on Saturday, the last day of the winter session, the ‘ Shiv Bhojan (meal) scheme at Rs 10. The scheme will initially be implemented in the state at 50 centres.

At Rs 10, Shiv Sena had vowed to provide the poor with a subsidized nutritious meal. The pledge of the Sena survey, also endorsed by its two allies — Congress and NCP, is part of the ‘ simple minimum system ‘ tri-party.

The scheme will be introduced in the first phase with 1,000 Shiv Bhojan centers offering meal worth Rs 40, at a subsidized rate of Rs 10, whereas the government would bear a grant of Rs 30 per plate.

नागरिकत्व कायदा धर्म किंवा जातीच्या विरोधात नाही: फडणवीस

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना आज नागपुरात या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. लोकाधिकार मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील सामील झाले आहेत.

हायलाइट्स
  • नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात भव्य मोर्चा
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही मोर्चात उपस्थिती
  • ‘जागो जागो हिंदू जागो, घुसपैठियों जल्दी भागो’, ‘देश को बचना है, सीएए लाना है’, अशी घोषणाबाजी
नागपूर

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना आज नागपुरात या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. लोकाधिकार मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील सामील झाले आहेत.

‘नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संपूर्ण नागपूरकर एकजूट झाले आहेत. हा कायदा कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या विरोधी जाणार नाही’, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. काही राजकीय पक्ष आणि लोकांद्वारे या कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरविण्यात येत असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला. अशा अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्यांच्या निषेधार्थ नागपूरकर रस्त्यावर उतरले असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्हे उलगडतात त्यांच्या पदाची ओळख!

आर्मी आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा फरक आढळून येतो त्यांच्या युनीफॉर्म मध्ये! आम्ही यापूर्वी तुम्हाला आर्मी अधिकाऱ्यांच्या युनीफॉर्मवर असणाऱ्या सन्मानचिन्हांचा अर्थ सांगितला आहे.

 सैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्हांमध्ये!

आज जाणून घेऊया पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या युनीफॉर्मवर असणाऱ्या सन्मानचिन्हांचा अर्थ! आर्मी मधील अधिकाऱ्यांप्रमाणे पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या युनीफॉर्म वर त्यांच्या हुद्द्यानुसार सन्मानचिन्हे प्रदान केली जातात. पण त्यांचा अर्थ माहित नसल्याने बहुतेक वेळा आपल्याला ठराविक पोलीस अधिकारी कोणत्या पदावर आहे हे समजण्यात गोंधळ उडतो. आज हाच गोंधळ दूर करून घेऊ.

पोलीस खात्यामध्ये खालील प्रमाणे दोन श्रेण्या असतात.

१) गॅझेटेड ऑफिसर्स

या श्रेणीमध्ये ऑल इंडियन पोलीस सर्विस (IPS) अधिकाऱ्यांचा समावेश होतो. जे कॅडरचे क्लास वन मधील अधिकारी म्हणून ओळखले जातात. तसेच या श्रेणीमध्ये स्टेट पोलीस सर्विसच्या इन्स्पेक्टर रँकपेक्षा वरच्या पदावरील अधिकाऱ्यांचा देखील समावेश होतो. जे क्लास टू गॅझेटेड ऑफिसर्स म्हणून ओळखले जातात.

२) नॉन-गॅझेटेड ऑफिसर्स

या श्रेणीमध्ये उर्वरित सर्व पोलीस खात्याचा समावेश होतो.

गॅझेटेड ऑफिसर्स

इंडियन पोलीस सर्विस (IPS)

IPS हा बॅच प्रत्येक IPS अधिकाऱ्याच्या खांद्यावर प्रदान केला जातो.

डायरेक्टर ऑफ इंटेलीजन्स ब्युरो (DBI, भारत सरकार).

डायरेक्टर ऑफ इंटेलीजन्स ब्युरो पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ असतो. त्या खालोखाल एक स्टार, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार-दंडुका आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.

 

 

कमिशनर ऑफ पोलीस किंवा  डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (CP किंवा DGP, राज्य).

कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार-दंडुका आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.

 

जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (JCP किंवा IGP).

जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर एक स्टार, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार-दंडुका आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.

अॅडीशनल कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस.

(ADL.CP किंवा DIG)’अॅडीशनल कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या नंतर त्रिकोणावस्थेत असलेले तीन स्टार आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.

 

डेप्युटी  कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SSP).

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या खाली एक स्टार आणि सगळ्यात शेवटी IPS चा बॅच असतो.

 

 

  अॅडीशनल  डेप्युटी  कमिशनर ऑफ पोलीस किंवा अॅडीशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ADL.DCP किंवा ASP).

अॅडीशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये अशोकस्तंभ आणि IPS चा बॅच असतो.

 

 

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ACP किंवा DSP)

 

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि IPS चा बॅच असतो.

 

 

 

असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (प्रोबेशनरी रँक : २ वर्षांचा अनुभव) (ASST.SP)

असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस  (प्रोबेशनरी रँक : २ वर्षांचा अनुभव) पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये दोन स्टार आणि IPS चा बॅच असतो.

 

 

 

असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (प्रोबेशनरी रँक : १ वर्षाचा अनुभव) (ASST.SP).

 

असिस्टंट सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (प्रोबेशनरी रँक : १ वर्षाचा अनुभव)  पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये एक स्टार आणि IPS चा बॅच असतो.

 

 

स्टेट पोलीस सर्विस

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SSP).

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड)  पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ आणि त्या खाली दोन स्टार असतात.

 

 

 

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस ( DCP किंवा SP).

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये सर्वात वर अशोकस्तंभ आणि त्या खाली एक स्टार असतो.

 

 

 

अॅडीशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा अॅडीशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ADL.DCP किंवा ASP)

अॅडीशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये केवळ अशोकस्तंभ असतो.

 

 

 

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ACP or DSP)

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार असतात.

 

 

 

नॉन-गॅझेटेड ऑफिसर्स

इंडियन स्टेट पोलीस

इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (INS).

इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.

 

 

असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (API).

असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल रंगाची पट्टी असते.

 

 

 

सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (SI).

सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये दोन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.

 

 

 

असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस  (ASI).

 

असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये एक स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.

 

 

पोलीस हेड कॉन्स्टेबल (HPC).

पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये उलट्या व्ही आकारातील लाल रंगाचे तीन बाण खालच्या दिशेने असलेले आढळतात किंवा नेव्ही ब्ल्यू रंगाची इफॉलेटस् आढळते, ज्यावर तीन सोनेरी रंगाच्या पट्ट्या असतात.

 

 

 

 

सिनियर पोलीस कॉन्स्टेबल (SPC).

सिनियर पोलीस कॉन्स्टेबल पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये उलट्या व्ही आकारातील लाल रंगाचे दोन बाण खालच्या दिशेने असलेले आढळतात किंवा नेव्ही ब्ल्यू रंगाची इफॉलेटस् आढळते, ज्यावर दोन सोनेरी रंगाच्या पट्ट्या असतात.

 

 

 

 

पोलीस कॉन्स्टेबल (PC).

पोलीस कॉन्स्टेबल पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर कोणत्याही प्रकाराचे सन्मानचिन्ह नसते. त्यांच्या अंगावर केवळ खाकी युनीफॉर्म असतो.

“स्वच्छ भारत” अभियानात दुर्लक्षित राहिलेला स्वच्छता कामगार…

मॅन्युअल स्कॅवेन्जर्स म्हणजे हाताने काम करणारे स्वच्छता कामगार. ह्यांच्या कामाचे स्वरूप बघितलं तर आपल्या अंगावर काटा येतो.वाईट वास लांबून जरी आला तरी घरात आपण उदबत्त्या लावतो, रूम फ्रेशनर मारतो, रस्त्यावरून जाताना नाला किंवा उघडे गटार दिसले तर लगेच नाकावर रुमाल लावतो, पण आपल्या स्वच्छता कामगार भावांना मात्र ह्याच घाणीत उतरून चक्क हाताने काम करावे लागते.त्यांच्या कामाविषयी नुसते ऐकले तरी सर्वसामान्य माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. कुठलेही गटार तुंबले किंवा नाला तुंबला तर सर्वसामान्य माणूस काय करतो? तक्रार करतो आणि तिथे त्याचे काम संपते.मात्र ते तुंबलेले गटार किंवा नाला किंवा ड्रेनेज, सीवेजची पाईपलाईन परत दुरुस्त करून सुरु करणे हे ह्या स्वच्छताकामगारांना करावे लागते. तेही ऑटोमॅटिक मशिनरी वापरून नव्हे तर मॅन्युअली म्हणजेच हाताने.प्रसंगी त्यांना त्या घाणीत उतरून सुद्धा काम करावे लागते. विकासाच्या घाईत ह्या बांधवांच्या व्यथा मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिल्या आहेत.त्यांचे आरोग्य, त्यांना कामासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू ह्या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. काम करता करता त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. हे काम करताना काही कामगारांचा जीव देखील गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

मागच्या वर्षी, अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच, मुंबईच्या पवई येथील एक नऊ मित्र लांबीची सीवेजलाईन दुरुस्त करीत असताना चार कामगारांचा मृत्यू झाला. हे काम करताना जी क्रेन वापरली होती तिची केबल तुटल्यामुळे हे कामगार मॅनहोलमध्ये पडले व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यानंतर एका आठवड्याने तीन स्वच्छता कामगारांचा (मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स) काम करताना गुदमरून मृत्यू झाला. आजवर जितक्या स्वच्छता कामगारांचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे त्यापैकी गुदमरून मृत्यू होण्याऱ्या कामगारांची संख्या खूप जास्त आहे.स्वच्छ भारत अभियान जितके यशस्वी झाले आहे त्याचे श्रेय ह्याच बांधवांना जाते जे आपल्या जीवाची, आरोग्याची पर्वा न करता कुठल्याही संरक्षक आयुधांशिवाय मॅनहोल मध्ये उतरून काम करतात.

हेच स्वच्छ भारत अभियानाचे खरे शिलेदार आहेत. आपल्या देशात हे महत्वाचे काम पूर्वीपासूनच एक समाज करीत आला आहे. इतके कठीण काम करणे खरंच इतरांना शक्य नाही.तरीही ह्या समाजाला कायम उपेक्षाच मिळाली आहे. कुणीही आवडीने हे काम करत नाही. पूर्वीपासूनच हे काम ह्या लोकांवर समाजाने लादले आहे.

काळाच्या ओघात हे बंद व्हायला हवे होते पण ही अमानुष प्रथा आजही सुरुच आहे. मॅन्युअल सॅनिटेशनचे हे असुरक्षित आणि अप्रशस्त काम पूर्णपणे बंद होऊन ह्या बांधवांच्या हाताला एखादे चांगले काम मिळणे ही काळाची गरज आहे.

पद्मश्री सुधारक ओलवे ह्या छायाचित्रकारांनी ह्या स्वच्छता कामगारांचे भयावह आयुष्य जगापुढे आणण्याचे मोठे काम केले.मुंबईतील ३८ हजार स्वच्छता कामगारांच्या आयुष्यातील व्यथा त्यांनी “इन सर्च ऑफ डिग्निटी आणि जस्टीस- द अनटोल्ड स्टोरी ऑफ कॉन्झर्व्हंसी वर्कर्स” ह्या फोटो डॉक्युमेंटेशन प्रोजेक्टमधून जगापुढे आणल्या.

फोटोजर्नालिस्ट म्हणून काम करणाऱ्या ओलवे ह्यांनी १९९४ साली ह्या कामगारांचे रोजचे आयुष्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले तेव्हाच ह्या प्रोजेक्टला सुरुवात झाली.

हृदयाला घरं पाडणारी ही छायाचित्रे बघितल्यानंतर वीस वर्षांनी २०१४ साली जून महिन्यात मिशन गरिमा सुरु करण्यात आले. हे मिशन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट, मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आले आहे.

ह्या कामगारांना मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगदरम्यान (हाताने घाणीत काम करणे) जे असुरक्षित काम करावे लागते ते संपूर्णपणे बंद करणे किंवा कमी करणे हा ह्या मिशनचा उद्देश आहे.ह्या मिशनची उद्दिष्टये पूर्ण करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ह्यांना एक बेसलाईन सर्व्हे करण्याची विनंती करण्यात आली होती. ह्या सर्व्हेचे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती.

  • मुंबईत कोणत्याही स्वरूपाच्या मॅन्युअल कंझर्वन्सी कार्य करणार्या कामगारांची नेमकी संख्या निश्चित करणे.
  • वॉर्ड्स, कामाचे प्रकार, वर्क प्रोफाईल आणि विभाग ह्या चार गोष्टींवर आधारित कामगारांची एकूण संख्या श्रेणीबद्ध करणे.
  • ह्या बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ह्या कामगारांना मॅन्युअली काम का करावे लागते हे शोधून काढणे.

अशारीतीने, ह्या सर्व्हेमध्ये कामगारांच्या वर्किंग कंडिशन्स, त्यांना उपलब्ध असणारी साधने, त्यांचे आरोग्य, गृहनिर्माण, मद्यपानाच्या सवयी, चौकीची अवस्था आणि त्यांच्यावर असणारे कर्ज ह्या बाबी जाणून घेण्यात आल्या.ह्या आधारभूत सर्वेक्षणाची पद्धत अशाप्रकारे डिजाईन करण्यात आली होती की, त्यातील डेटा कलेक्शनमध्ये एमसीजीएमच्या घनकचरा व्यवस्थापन, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आणि सीवरेज ऑपरेशन ह्या विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व कॉन्झर्व्हंसी कामगारांचा त्यात समावेश होईल.

ह्या सर्व्हेमध्ये असे लक्षात आले की सीवरेज ऑपरेशन आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन्स ह्या विभागातील कर्मचाऱ्यांचे काम जवळपास सारखेच आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांचे काम ह्यापेक्षा वेगळे असते.इतर विभागांच्या तुलनेत घनकचरा व्यवस्थापन ह्या विभागातच सर्वात जास्त कर्मचारी काम करतात. ह्या सर्वेक्षणात एकूण ३९७२९ कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी ३२५८८ कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली.३९७२९ पैकी ८०.३% हे पुरुष कर्मचारी आहेत तर १९.७% ह्या स्त्री कर्मचारी आहेत. ह्यापैकी २८,८४७ हे कायमस्वरूपी सेवेत आहेत तर उरलेले कंत्राटी पद्धतीने काम करतात.

ह्या सर्व्हेत ह्या कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की त्यांच्या वर्किंग कंडिशन्समध्ये गेल्या अनेक वर्षांत काहीच मोठे बदल घडले नाहीत.२००० सालानंतर जेव्हा ओलवे ह्यांनी ह्या कर्मचाऱ्यांची भयावह परिस्थिती जगापुढे आणली तेव्हा थोडेबहुत बदल झाले इतकेच. पण त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्यासाठी ते वापरत असलेली साधने इतक्या वर्षांतही बदललेले नाही. त्यांचे काम कमी तर झाले नाहीच, उलट ते इतक्या वर्षात वाढलेच आहे.

मुंबईत जुन्या भागात आजही विकास घडलेला नाही. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या ह्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप सुद्धा इतक्या वर्षांत बदललेले नाही. हीच परिस्थिती मॅनहोल कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे.त्यांच्या कामाच्या स्वरूपात सुद्धा काहीच बदल झालेले नाहीत. आता विविध प्रकारची यंत्रे आहेत. पण त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांच्या कामात काहीच मदत होत नाही.

अजूनही ह्या बांधवांना मॅनहोलमध्ये उतरुनच काम करावे लागते. त्यांना जी आयुधे किंवा साधने मिळतात ती सुद्धा इतक्या वर्षात तशीच आहेत. अजूनही हे बंधू बांबू, रॉड, बकेट, कुदळ आणि फावडे घेऊन हातानेच काम करतात.पी एल लोखंडे मार्गावर काम करणारे मोटर लोडर आणि सफाई कर्मचारी म्हणून काम करणारे गोविंद हे भाऊ सांगतात की, “बेस्टच्या कर्मचाऱ्यांना खूप सुविधा मिळतात. पण आम्हाला मात्र कुठलीही सुविधा मिळत नाही. आम्हाला साबण, गणवेश आणि संरक्षणाची साधने सुद्धा मिळत नाहीत.आम्हाला ज्या खोल्या दिल्या जातात त्या बऱ्याचवेळा घाणेरड्या असतात, त्यात प्रसाधनगृहांची सोय नसते. तिथले पंखे बिघडलेले असतात आणि बसायला डेस्क सुद्धा नसतात. फार थोड्या कर्मचाऱ्यांना लॉकरची सोय दिलेली आहे. आमची कमाई कमी आणि खर्चच जास्त होतो.”स्वीपर कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की, ते इतक्या वर्षांपासून त्याचप्रकारे काम करीत आहेत. रोज रस्ते झाडून, कचरा एकत्र करून तो कचरा कचरापेटीत जमा करणे किंवा कलेक्शन पॉइंटला जमा करणे ह्याच प्रकारे ते लोक काम करीत आहेत.त्यांचे झाडू, लाकडी पाटी, हातगाडी किंवा चाकांची कचरापेटी ही साधने भरपूर वर्षांपासून ते वापरत आहेत. त्यांना नवी साधने दिली गेलेली नाहीत.

गेल्या काही वर्षांत मुंबईत कचऱ्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. पण स्वच्छता कामगार मात्र तेवढेच आहेत. त्यांच्या संख्येत आवश्यक तेवढी वाढ झालेली नाही.

तसेच इतक्या वर्षांत मुंबईत भरपूर प्रमाणात इमारतींचे बांधकाम होत आहे. पण स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात मात्र काहीही बदल झालेला नाही. त्यांना अजूनही जुन्याच पद्धतीने त्यांचे काम करावे लागते.

सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये पाणी साठवण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही त्यामुळे ह्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना खूप त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच नालेसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात सुद्धा काहीच बदल झाले नाहीत. त्यांच्या कामात तर आता आणखी अडथळे उभे राहिले आहेत.

झोपडपट्ट्यांत बांधकामे स्थिर स्वरूपाची नसतात. गल्ल्या दिवसेंदिवस लहान व अरुंद होत आहेत, पाण्याचे पाईप आणि केबल ड्रेनेज लाईनमधूनच जातात.

काही झोपडपट्ट्यांमध्ये ड्रेनेज लाईन्सवरच सिमेंट लावलेले असते. त्यामुळे असे सगळे असताना ह्या लाईन्स स्वच्छ करणे अतिशय कठीण काम आहे. नालेसफाई करणाऱ्या कामगारांना नागरिकांकडून सुद्धा त्रास होतो. तसेच त्यांना संरक्षक आयुधे, साधने दिली जात नाहीत. जी साधने मिळतात ती अतिशय निकृष्ट दर्जाची असतात.“आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच माणसेच आहोत. आम्हालाही भावना आहेत .पण आमच्याकडे ना साधे बाथरूम आहे ना साधे टॉयलेट, आम्हाला चेंजिंग रूमची सुद्धा सुविधा नाही.”अजय हे बीएमसीमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांना ग्लोव्जशिवाय, नुसत्या हातांनी गगटर स्वच्छ करावे लागते. ते म्हणतात की, “आमची पिढी हेच काम करत होती. पुढे सुद्धा हेच काम करणार आहे. आम्हाला लोक कचरेवाला किंवा गटरवाला असे म्हणतात.ते म्हणतात की तुम्हाला महानगरपालिका ह्या कामाचे पैसे देते. आम्हाला माहितेय की आम्ही स्वच्छता करतो. कचरा उचलतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही आम्हाला ह्याच नावाने हाक मारावी.

आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसेच आहोत. आम्हालाही भावना आहेत. पण आमच्याकडे ना साधे बाथरूम आहे ना साधे टॉयलेट, आम्हाला चेंजिंग रूमची सुद्धा सुविधा नाही. आम्हाला जेवायला जागा नाही आणि आराम करण्यासाठी सुद्धा जागा नाही हे तर ह्या लोकांना माहितीच नाहीये.”

थोडक्यात अजय स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आयुष्य कसे असते ह्याची आपल्याला कल्पना देतात. स्वच्छ भारत मिशनमध्ये फक्त स्वच्छतेवर लक्ष केंद्रित झाले आहे. पण ह्या मिशनची खरी जबाबदारी ह्या कर्मचाऱ्यांवरच आली आहे. हा सगळा भार तेच उचलत आहेत.ह्या मिशनचा कणा तर हेच स्वच्छता कामगार आहेत, पण दुर्दैवाने स्वच्छ भारत मिशन हे नेत्यांनी हातात झाडू घेऊन सेल्फी काढण्यापर्यंतच मर्यादित राहिले आहे.ह्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग थांबवण्यासाठी काहीच केले जात नाही. त्याबद्दल साधी चर्चाही होत नाही. जी साधने हे कर्मचारी स्वच्छतेसाठी वापरतात ती जुनी, खराब आणि अपुरी असतात. त्यांचे काम करताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल अशी साधनेच नसतात.

त्यांना घाणीच्या, कचऱ्याच्या साम्राज्यात काम करावे लागते. त्यांना सेफ्टी मास्क, ग्लोव्ज, सेफ्टी बेल्ट (मॅनहोल कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक), सेफ्टी शूज मिळत नाहीत.

ज्यांची मुलाखत घेतली त्यापैकी २२,५०८ कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ज मिळाले, पण त्यांची क्वालिटी अतिशय खराब होती तसेच ते वापरायला सोपे नसल्यामुळे बरेच कर्मचारी ह्या गोष्टींचा वापर करू शकत नाहीत.तसेच त्यांना ह्या गोष्टी कधीही वेळेत मिळत नसल्याचे ह्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुंबईत एकूण नऊ डायव्हर्स आहेत पण एकच डायव्हिंग सूट उपलब्ध असल्याचे कळले.

खरेतर, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमितपणे वैद्यकीय चाचणी करणे ही नागरी संस्थांची जबाबदारी आहे. पण असे घडत नाही. मोटर लोडर आणि मॅनहोल कर्मचाऱ्यांना त्वचाविकार आणि श्वसनाचे आजार होतात.तसेच त्यांना डेंग्यू, मलेरिया, पाठदुखी, गुढघेदुखी, अर्धांगवायू, उच्चरक्तदाब, क्षयरोग आणि ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा ह्या आजारांना सामोरे जावे लागते. ह्या सर्व्हेक्षणादरम्यान एकूण १०,१२२ कर्मचाऱ्यांनी तब्येतीच्या काही ना काही तक्रारी असल्याचे सांगितले.अमृतनगर येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारे सुशांत ह्यांनी सांगितले की, “रोज कुठल्या ना कुठल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला ड्युटीवर असताना काम करताना दुखापत होते, पण बीएमसीच्या हॉस्पिटलला ह्याच्याशी काही देणे घेणे नसते.

जेव्हा बीएमसी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना लक्षात येते की ही व्यक्ती स्वच्छता कर्मचारी आहे, तेव्हा ते त्या कर्मचाऱ्याला अतिशय अमानवी आणि वाईट वागणूक देतात.”हे कर्मचारी आपली जबाबदारी पार पडून शहर स्वच्छ ठेवतात. पण त्यासाठी त्यांना त्यांच्या आरोग्याची किंमत चुकवावी लागते. २००४ ते २०१३ दरम्यान एमसीजीएमचे २६१४ कर्मचारी ड्युटीवर असताना काही ना काही कारणाने मरण पावले आहेत.म्हणजेच दर वर्षी जवळजवळ २६१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो. ८००३ म्हणजेच एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की त्यांच्या घरची किमान एक व्यक्ती हे काम करताना मरण पावली आहे. कर्मचारी ड्युटीवर असताना जखमी झाल्यास त्यांना मूलभूत भरपाई सुद्धा मिळत नाही.

नुसते लांब उभे राहून ह्या कर्मचाऱ्यांविषयी कणव बाळगणे सोपे आहे. परंतु जेव्हा हे बांधव मॅनहोल मध्ये उतरून किंवा नाल्यात उतरून काम करीत असतात, नुसत्या हातांनी इतरांनी केलेला कचरा उचलत असतात तेव्हा त्यांच्या मनात काय भावना असतील ह्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.नुसते ह्याबद्दल लिहून किंवा बोलून किंवा चर्चा करून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यावर काहीतरी थोडं निर्णय आणि त्यांची सर्व स्तरांवर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तरच हे बांधव सुरक्षितपणे त्यांचे काम करू शकतील.

 

 

 

विमानांचा रंग पांढराच का असतो? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे.

जगभरात जवळपास सर्वच प्रवासी आणि मालवाहक विमाने ही पांढऱ्या रंगाची असतात. खुप कमी अशी विमाने असतात जी रंगीबेरंगी असतात.पण कधी तुमच्या डोक्यात हा विचार आला आहे की ही विमाने नेहेमी पांढऱ्या रंगातच का असतात एअरलाईन्स सर्व गोष्टींवर एवढा खर्च करू शकते तर मग ते आपल्या विमानांना चांगल्या रंगाने पेंट नाही करू शकत?

पण विमान पांढऱ्या रंगाचा असणे ह्यामागे अनेक महत्वाची कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाच कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाला सर्वात चांगल्या प्रकारे परावर्तीत करू शकतो. जे इतर गडद रंग करू शकत नाही. जसे की काळा किंवा इतर कुठला गडद रंग सूर्याच्या प्रकाशाला उब शोषतो.

जसे आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे घालणे पसंत करतो कारण तो सूर्याच्या उष्णतेला परावर्तीत करतो, हेच तथ्य येथे वापरले जाते. जर विमानाला कुठल्याही गडद रंग असेल तर तो रंग सूर्याची उष्णता जास्त प्रमाणत शोषून घेईल त्यामुळे  विमानातील मशिनरी खराब होण्याची संभावना असते.

विमानांना पांढरा रंग देण्यामागे केवळ हे एकच कारण नाही आहे. पांढरा रंग यासाठी देखील फायद्याच असते कारण, ह्या रंगामुळे जर विमानावर कुठेही क्रॅक, डेंट आले तर ते सहजपणे दिसते.पांढऱ्या रंगामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान लवकर दिसून येते. कारण विमानातील एखादा छोटासा क्रॅक देखील दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. म्हणून हे स्पष्टपणे दिसणे अतिशय महत्वाचे असते.तसेच जर कधी कुठले विमान दुर्घटनाग्रस्त झाले तर त्याच्या पांढऱ्या रंगामुळे त्याला समुद्र, जंगल, जमिनीवर स्पष्टपणे बघितल्या जाऊ शकते. रात्रीच्या काळोखात देखील पांढऱ्या विमानाला बघणे सहज सोपे आहे.

तसेच जर विमानाच्या कुठल्या भागातून तेल वगैरे सांडत असले तर ते देखील ह्याच्या पांढऱ्या रंगामुळे सहज नजरेस पडते.

ही तर झाले वैज्ञानिक कारणे, पण त्यासोबतच विमानाचा रंग पांढरा असण्यामागे काही व्यावहारिक कारणे देखील आहेत. ज्यामुळे विमानांचा रंग पांढरा असणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते.विमान हा खूप विशाल असतो, त्यामुळे त्याला पेंट करणे म्हणजे काही खायचे काम नाही. कुठल्याही जम्बोजेट प्लेनला पेंट करण्यासाठी विमान कंपनीला खूप खर्च करावा लागतो. तसेच ह्यासाठी खूप वेळ देखील लागतो.रंगबिरंगी रंगत रंगलेला आणि विविधी कलाकृती असलेला विमान जर विकायला काढला तर त्याची किंमत पांढऱ्या विमानाच्या तुलनेत कमी असते. म्हणून विमान कंपनी विमानाचा रंग पांढराच ठेवतात.विमानाला सतत ऊन, वारा, पाऊस ह्यांचा मारा सहन करावा लागतो. ह्यात जर विमानाला इतर कुठला रंग दिला गेला तर तो खूप लवकर फिक्कट पडायला लागतो.कारण कुठलाच रंग उन, वारा आणि पाऊस ह्यांचा मारा सहन करून जास्त काळ टिकू शकत नाही. मग अश्यात त्याला वारंवार पेंट करण्याची गरज पडते. ह्याउलट पांढरा रंग हा बराच काळ टिकून राहतो.आता जेव्हा केव्हा तुम्ही विमानात बसाल तेव्हा त्या विमानाच्या पांढऱ्या रंगामागे इतकी सगळी कारणे असतात हे तुमच्या नक्की लक्षात येईल.

 

क्रेडिट कार्ड वापरताय? या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार !

आजच्या काळात क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे पैसे सोबत ठेवायची गरज भासत नाही.

आपल्या खिशामध्ये आत्ता पूर्ण पैसे नसले तरी देखील आवश्यक गोष्टीसाठी क्रेडिट कार्ड कंपनीकडून उरलेले पैसे लगेच वापरायला मिळतात आणि हे पैसे ४०-४५ दिवस बिनव्याजी वापरता येतात पण ह्या क्रेडीट कार्डचे जेवढे उपयोग आणि फायदे आहेत तेवढेच त्याचे तोटे देखील आहेत.म्हणजे जर क्रेडीट कार्ड वापरत असताना काही गोष्टींचे भान ठेवले नाही तर तुम्हाला खूप मोठ्या समस्येला समोर जावे लागू शकते.त्यामुळे क्रेडीट कार्ड वापरत असताना कुठले नियम पाळायला हवे ते जाणून घेणे गरजेचे आहे.

आपल्या क्रेडीट कार्डची माहिती कुणाही बरोबर कधीही शेअर करू नये. फोन वरून किंवा ऑनलाईन पेमेंट करत असताना सावधानता बाळगणे खूप गरजेचे आहे. कारण ह्या दरम्यान थोडी देखील चूक झाली तर तुमचे खूप नुकसान होऊ शकते.सध्याच्या जगात पासवर्ड हॅकिंग आणि डेटा चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणून आपले क्रेडीट कार्ड सावधपणे वापरणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की एकाहून जास्त क्रेडीट कार्ड सोबत ठेवल्याने तुम्हाला फायदा होतो, परंतु खोलवर विचार केला तर यामध्ये जास्त नुकसान आहेत.सर्वात पहिली समस्या म्हणजे, अनेक क्रेडीट कार्ड असल्या कारणाने आपल्याला हे लक्षात रहात नाही की कुठल्या क्रेडीट कार्डचे पेमेंट किती आणि कधी करायचे आहे.

जर पेमेंट करायला उशीर झाला तर तुमचा क्रेडीट स्कोर खराब होईल, क्रेडीट स्कोर खराब असला तर बँक आपल्याला आणखी क्रेडीट कार्ड किंवा लोन देत नाही.भारतामध्ये आता सिबिल नावाची क्रेडिट रेटिंग एजन्सी सुरू झाली आहे, ही संस्था प्रत्येक माणसाची पत म्हणजेच क्रेडिट स्कोअर मोजत असते.सिबिल स्कोर जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची पत अधिक, त्यामुळे त्या व्यक्तीला कोणतेही लोन (हाऊसिंग लोन, पर्सनल लोन) मिळताना कमी अडचणी येतात, आणि जितका स्कोर कमी त्यानुसार त्या व्यक्तीला कोणतेही लोन घेण्यास जास्त अडचण अथवा जास्त व्याजदर द्यावा लागतो.तसेच तुमची क्रेडीट लिमिट कमी केली जाते.जर प्रवासादरम्यान तुम्ही एकाहून अधिक क्रेडीट कार्ड सोबत ठेवत असाल तर ते हरविण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे देखील तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.ज्यांनी नवीनच क्रेडीट कार्ड वापरायला सुरवात केली आहे अश्या लोकांसोबत एक गोष्ट नेहमी घडते, ती म्हणजे हे लोक क्रेडीट कार्डचे पेमेंट करायला विसरतात.

क्रेडीट कार्ड वापरणे हे जरी सोप्पे वाटत असले तरी त्याच्या काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. जसे की, पेमेंट टायमिंग आणि इंटरेस्ट.

अनेक बँका ह्या पेमेंट करिता ५० दिवसांचा कालावधी देतात पण जर क्रेडीट कार्डचे पेमेंट करायला विसरलो तर बँक आपल्याकडून अतिरिक्त इंटरेस्ट आकारते.ड्यू डेट आणि आउटस्टॅडिंग बॅलन्स यांच्याशी संबंधित माहिती बँक संदेश पाठवून देत असते. ज्यामध्ये बँक कमीत कमी शिल्लक देण्याचा पर्याय देते. एखादेवेळी पैसे कमी असले तर कमी अमाउंट देऊन पेमेंट टायमिंग वाढवता येते. पण नेहमी असे केल्याने पेमेंट चे पैसे त्यावर लावण्यात आलेल्या व्याजामुळे नेहमी वाढत राहील.प्रत्येक बँक आपल्या क्रेडीट कार्ड धारकाला हा अधिकार देते की, तो क्रेडीट कार्डच्या मदतीने देखील एटीएममधून पैसे काढू शकेल. पण तुम्ही एकावेळी जेवढे पैसे काढाल त्यावर बँकेकडून रोज व्याज घेतले जाईल. जे तुम्हाला खूप महागात पडू शकते.त्यामुळे क्रेडिट कार्डवर एटीएम मधून कॅश काढणे ही सुविधा जरी दिलेली असली तरी ती अत्यंत इमर्जन्सी च्या वेळेसच वापरणे हितकर राहते.अशा पद्धतीने काढलेल्या पैशांवर क्रेडिट कार्ड कंपनी आपल्याला दर दिवशी दोन ते तीन टक्के व्याजदर लावते याचा अर्थ महिन्याचे 40 ते 60 टक्के व्याज! आणि हे आपल्याला एटीएम मधून काढलेल्या पूर्ण रकमेवर भरावे लागते.जर तुम्ही क्रेडीट कार्डाने कुठले मोठे पेमेंट करत असाल किंवा इएमआयवर कुठली मोठी वस्तू खरेदी करत असाल तर त्याचे पेमेंट देताना द्याव्या लागणाऱ्या व्याजाबाबतही एकदा विचार करा आणि ती वस्तू त्याच्या दर्शनी किंमती सोबतच त्यावर भरलेल्या व्याजा नंतर केवढ्याला पडेल याचे गणित एकदा नक्की समजून घ्या आणि मगच ती वस्तू आता घ्यायची की नाही ते ठरवा.अमेरिकेसारखी आर्थिक महासत्ता, परंतु त्या देशातील लक्षावधी लोक हे क्रेडिट कार्डवर असलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या कर्जामध्ये दबलेले आहेत.क्रेडिट कार्ड महिन्याचे पेमेंट हे दोन स्वरूपात असतात, एक – किमान भरावयाची रक्कम आणि दोन – त्या महिन्यात देण्याची पूर्ण रक्कम.क्रेडिट कार्ड कंपनी आपल्याला 45 ते 50 दिवसांचा कालावधी देते या कालावधीनंतर आपण पूर्ण रक्कम भरणे हेच हितावह कारण त्यापुढे गेलेला एक एक दिवस आपल्यावर 20 ते 30 टक्क्यांच्या व्याजाचा डोंगर उभा करत असतो.क्रेडीटकार्डने जरी आपले जीवन सुखकर आणि सोयीस्कर केले असले तरी त्याचे फायदे आणि तोटे नीट जाणून मगच ते वापरणे गरजेचे आहे.

 

वय? १६ वर्षे. कर्तृत्व? एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन? भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे!

भारतीयांनी आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली बुध्दीमत्ता सिध्द केली आहे. त्यामुळे भारतीयांना जगभरातील विविध देशांमध्ये नेहमीच मानाचे स्थान मिळत असते. परिणामी, देशाची गौरवशाली वाटचाल दिमाखात सुरू आहे.याच वाटचालीचा दाखला देणारे एक संशोधन एका १६ वर्षीय भारतीय मुलाने केले असून केवळ देशच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे राहणाऱ्या हर्षवर्धन झाला असे या अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याने भूसुरूंगाचा शोध घेऊन ते नष्ट करणारे ड्रोन विकसित केले आहे.कसे आहे नेमके हे ड्रोन ते या लेखातून जाणून घेऊया.

भारतात ड्रोनचा वापर होणे ही आता तशी विशेष बाब राहिलेली नाही. त्यामुळे सीमा सुरक्षेपासून अगदी लग्नांमध्ये फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीपर्यंत ड्रोनचा वापर होतांना दिसतो.परिणामी, केंद्र सरकार ड्रोनच्या वापरासंदर्भात लवकरच काटेकोर नियमावली अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे.पण गुजरातमधल्या हर्षवर्धन सिन्हा या १६ वर्षाच्या मुलाने स्वतःच्या कंपनीतच हे ड्रोन विकसित केले आहे जे सीमेवर हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ही अनोखी व महत्त्वपूर्ण उपयोगिता असल्यामुळेच या ड्रोनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हर्षवर्धनसिन्हाने तयार केलेल्या या ड्रोनला “इगल ए सेव्हन” असे नाव दिले आहे.

या ड्रोनच्या तंत्रज्ञानाबदृल बोलतांना तो म्हणाला की, या ड्रोनमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आतापर्यंत कुठेही उपलब्ध नसून ते वापरात आलेले नाही.रिमोटच्या सहाय्याने वापरल्या जाणाऱ्या या ड्रोनमुळे भूसुरूंग शोधून काढून ते निकामी करणे शक्य होणार आहे.भारतीय लष्कर आपल्या छावणीतून या ड्रोनचा वापर करू शकणार असून ड्रोनला भूसुरूंग सापडला की तो छावणीतील अधिकाऱ्याना माहिती पाठवेल. शिवाय ड्रोनवर असलेल्या कॅमेऱ्यामुळे अधिकाऱ्यांना तो भूसुरूंग पाहता येईल व ड्रोनच्याच सहाय्याने तो लागलीच निकामी देखील करता येईल.हे ड्रोन कुठल्याही प्रकारच्या जमिनीखालील सुरूंग शोधून काढू शकते. त्यामुळे भूसुरूंगांचे स्फोट घडवून आणल्यामुळे होणारी सैन्याची जिवीनहानी रोखणे शक्य होईल.विशेष म्हणजे हर्षवर्धन सिन्हाने केलेल्या या संशोधनाला दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, दुबई व थायलंड या देशांकडून देखील मागणी असून या देशांमधील कंपन्यांनी त्याला भागिदारी करण्याची आॅफर दिल्याचेही तो म्हणाला.

एवढेच नव्हे तर आमच्या देशात येऊन कंपनी सुरू करा, आम्ही आर्थिक पाठबळ देऊ असेही काही परदेशी कंपन्यांनी सांगितल्याचे त्याने स्पष्ट केले.

पण आपल्या देशात भूसुरूंगाचा स्फोट झाल्याने अनेक जवान शहीद होतात. त्यामुळे मला भारतीय लष्कर आणि सीआरपीएफसारख्या सुरक्षा दलांसाठी ते तंत्रज्ञान आणखी विकसित करायचे आहे. म्हणून परदेशी कंपन्यांच्या सर्व आॅफर्स नाकारल्याचे हर्षवर्धन म्हणाला.हर्षवर्धनसिन्हा हा वयाच्या दहाव्या वर्षापासूनच अशा नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी प्रयत्नशिल असतो. त्याला रोबोटिक्सची देखील आवड असल्याने त्याने “अॅरोबाॅटिक्स सेव्हन” या कंपनीची स्थापना केली आहे.या कंपनीच्या माध्यमातून सर्वांचे जीवन सोपे करण्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा शोध घेतला जाईल, असे तो म्हणतो.

भूसुरूंगाचा धोका

देशाच्या शत्रू राष्ट्रांकडून सैनिकांवर हल्ले होण्याच्या घटना तशा नवीन नाही. पण अनेकदा अशा घटनांमध्ये भूसुरूंगांचा वापर केला जातो. त्यामुळे कुठलीही पूर्वकल्पना येण्यापूर्वीच स्फोट घडवून आणत मोठी जिवीतहानी करणे शक्य होते.

भूसुरूंगाचा वापर नक्षलवादी देखील करू लागल्याचे गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांमध्ये दिसून आले आहे.

नक्षलवाद्यांनी झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये असलेल्या वनक्षेत्रात ठिकठिकाणी भूसुरूंग व आयईडी पेरून सुरक्षा यंत्रणांची वाहने स्फोटांमध्ये उडवून देत मोठया प्रमाणात जिवीतहानी घडवून आणली आहे.निमलष्करी दले व स्थानिक पोलीसांना पेरलेले भूसुरूंग शोधून ते निकामी करण्याचा अनुभव नसल्याने हा धोका अधिकच वाढत चालला होता.परिणामी, केंद्र सरकारने नक्षलवादी प्रभावित क्षेत्रात सुरक्षा दलांसाठी घातक ठरणारे भूसुरूंग शोधून ते निकामी करण्यासाठी लष्करी तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. यावरून भूसुरूंगांचा धोका अधोरेखित होतो.

भूसुरूंग हे केवळ सुरक्षा यंत्रणांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर देखील बेतले आहेत.

नक्षलवाद्यांनी २०१० मध्ये भूसुरूंग पेरून रेल्वेरूळ उडवून दिल्याने हावडा-मुंबई या एक्सप्रेसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात सुमारे १५० नागरिकांनी प्राण गमावले होते.त्यानंतरही भूसुरूंगांचा वापर करून जिवीतहानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. एका अहवालानुसार जगातील ७८ देशांमध्ये भूसुरूंग स्फोटांचा धोका सर्वाधिक असून या देशांमध्ये वर्षाला १५ ते २० हजार लोक मरण पावत असून त्यात ८० टक्के सर्वसामान्य जनता असते.त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून भूसुरूंग शोधून ते नष्ट करण्याचे तंत्रज्ञान निश्चितपणे देशाच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरू शकते.

गेल्या चार वर्षात सरकारकडून सुरक्षा यंत्रणांची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. शिवाय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर देखील भर दिला गेला आहे.

त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात योगदान देण्याची प्रेरणा तरूणाईला मिळत असून पर्यायाने संशोधनालाही प्रोत्साहन मिळत आहे व त्यातून हर्शवर्धनसारखी मुले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.तंत्रज्ञानाचे संशोधन काही दिवसांपूर्वी नाशिक येथील एका १९ वर्षीय युवक अजिंक्य जाधव याने सियाचिनसारख्या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युध्दभूमीवर तैनात राहणाऱ्या भारतीय जवानांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनात खास पोशाख तयार केल्याचे समोर आले होते.हा पोशाख जवानांना थंडीसह शत्रूपासूनही संरक्षित करणारा असून त्याला संरक्षण मंत्रालयाने देखील अनुकूलता दर्शविली.

तर पुण्यातील हाकिझ काझी या १२ वर्शीय मुलाने “ईआरव्हीआयएस” हे अनोखे जहाज तयार केले असून ते समुद्रातील प्रदूषण कमी करण्याबरोबरच समुद्री जीवांचा बचाव करणार आहे.

समुद्रातील जीव प्लास्टिक कचरा खात असून त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे एकाचवेळी समुद्री जीव, पाणी व कचरा वेगळा करणारे हे जहाज या मुलाने तयार केले आहे.एकूणच हर्षवर्धन झाला, अजिंक्य जाधव व हाकिझ काझी या तिन्ही लहान मुलांनी गेल्या काही दिवसांत केलेली संशोधने ही भारतीय बुध्दीमत्तेची उदाहरणे जगासमोर मांडणारी आहेत.अशाप्रकारच्या तंत्रज्ञानांच्या शोधाचा फायदा भविष्यात केवळ भारतालाच नव्हे तर जगभरातील विविध देशांना होणार आहे.

 

नदीत फेकलेले निर्माल्य गोळा करून ते दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी!

व्यवसाय करणे कधी सहज शक्य होत नाही, त्यासाठी खूप मेहनत आणि त्याचबरोबर पैशांचे पाठबळ असणे गरजेचे असते. व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना नेहमीच अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येतात, काही त्यामध्ये यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात.

तुम्ही एखादा व्यवसाय करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा खर्च आणि भविष्यात होणार फायदा व तोटा यांचा अंदाज लावणे गरजेचे आहे.

कधी – कधी लोक जास्त भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत नाहीत. कारण जास्त भांडवल  लागणाऱ्या व्यवसायामध्ये फायदा जरी जास्त असला, तरी त्याचे नुकसान देखील तेवढेच भारी पडू शकते.त्यामुळे लोक कमी भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करतात. पण व्यवसायाची कल्पना चांगली नसली, तर ते चालणे खूपच अवघड असते.

पण जर तुमच्या व्यवसायाची संकल्पना चांगली असेल, तर तुम्ही कमी भांडवलामध्ये खूप नफा मिळवू शकता. याचेच एक उत्तम उदाहरण कानपूरमधील दोन युवकांनी दिले आहे.

त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे खूप कमी भांडवलामध्ये त्यांनी  एक व्यवसाय सुरु केला आणि ते आज कोटींमध्ये नफा मिळवत आहेत.

नदीमध्ये फेकली जाणारी फुले पाहून दोन मित्रांना एक अशी कल्पना सुचली, ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलले. कचऱ्यामध्ये फेकले जाणाऱ्या या फुलांच्या मदतीने त्यांनी एक कंपनी उभी केली. ज्या कंपनीची सध्याची उलाढाल वर्षाला  जवळपास दोन कोटींची आहे.

त्यांनी ‘हेल्प अस ग्रीन’ नावाची कंपनी सुरु केली आहे. ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनीबद्दल कंपनीचा फाउंडर अंकित अग्रवालने सांगितले कि, कानपुरपासून २५ किमी दूर असलेल्या भौंती गावामध्ये त्यांचे ऑफिस आहे.

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत शहरातील २९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकून दिलेली फुले एकत्र केली जातात आणि त्यांना अगरबत्ती आणि जैविक वर्मी कंपोस्टमध्ये बदलले जाते.यामुळे नदी-नाल्यांमध्ये घाण पसरत नाही. यातूनच या कंपनीचा व्यवसाय सुरु झाला.

अंकितने याबद्दल सांगितले की,“मी माझ्या मित्राबरोबर २०१४ मध्ये बिठूर (कानपुर ) मध्ये मकर संक्रातीच्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर बनलेल्या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र निघालो होतो.

“गंगेच्या किनाऱ्यावर सडलेल्या फुलांना आणि त्याच्यामुळे अशुद्ध झालेल्या नदीचे पाणी पिताना लोंकाना पाहिलेले होते.ही गोष्ट फक्त नदीमध्ये सडणाऱ्या फुलांचीच नाही, तर त्यावर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची देखील आहे. जे पाण्यातील जीवनावर वाईट परिणाम करू करतात”

यापुढे सांगताना अंकित म्हणाला की,

“माझा मित्र गंगेकडे पाहताना मला म्हणाला, तुम्ही लोक यासाठी काही करत का नाहीत. तेव्हाच मनामध्ये एक कल्पना आली की,

काहीतरी असे करूया ज्याच्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होणे आणि लोकांना हे खराब पाणी पिण्यापासून वाचवणे ही  दोन्ही कामे होतील.

यानंतर आपल्या गंगेच्या तटावर शपथ घेतली की, आम्ही गंगेमध्ये टाकाऊ फुले पडू देणार नाही. यामुळे पंतप्रधान मोदींचे स्वच्छता अभियान देखील यशस्वी करता येईल.”

लोक वेडे म्हणत हसले होते.

अंकितने अकरावीमध्ये त्याच्याबरोबर शिकलेल्या करण रस्तोगी या २९ वर्षीय मित्राबरोबर याबद्दल चर्चा केली. त्यावेळी करण फॉरेनमधून शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आला होता. त्या दोघांनी गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल.जेव्हा त्यांनी लोकांना सांगितले की, ते नद्यांना फुलांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही वेगळे करू इच्छित आहेत. तेव्हा लोकांनी त्यांना वेडे म्हणून त्यांची मस्करी केली. पण त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही.

७२ हजारांमध्ये सुरु केली कंपनी

अंकितने सांगितले की,“२०१४  पर्यंत मी पुण्यामधील एका सॉफ्टवेयर कंपनीमध्ये ऑटोमेशन साइंटिस्टच्या स्वरूपात काम करत होतो.  तर करण हा मास्टर्सच्या शिक्षणानंतर भारतामध्ये येऊन आपले स्वतःचे काम करत होता.”

अंकित आणि करण यांनी आपली जुनी कामे सोडून २०१५ मध्ये ७२ हजार रुपयाच्या भांडवलामध्ये ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनी लॉंच केली. या दरम्यान त्यांना ओळखणारे लोक त्यांना वेडे म्हणत होते. दोन महिन्यानंतर ते आपले पहिले वर्मी कंपोस्ट उत्पादन घेऊन आले. ज्याला त्यांनी ‘माती’ असे नाव दिले. या कंपोस्टमध्ये १७ नैसर्गिक वस्तू आहेत. ज्यामध्ये कॉफीच्या स्थानिक दुकानांमध्ये फेकण्यात आलेल्या कॉफीचा गाळ देखील आहे. काही काळानंतर आयआयटी कानपुर देखील आर्थिक सहाय्यासह यांच्याबरोबर जोडली गेली.

काही काळानंतर त्यांची ही कंपनी कानपूरच्या सरसौल गावामध्ये पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या उदबत्त्या बनवायला लागली.

उदबत्तीच्या डब्ब्यांवर देवांचे फोटो असल्याने त्यांना कचरपेटीमध्ये फेकण्यास श्रद्धाळूंना अडचण येत असे. त्यामुळे हेल्प अस ग्रीनने उदरबत्ती या तुळशीच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या पेपरमधून  विकण्यास सुरुवात केली.

आज आहे २ कोटींपेक्षा जास्त उलाढाल

अंकित अग्रवालने सांगितले की, “त्यांची कंपनी २०,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. त्यांच्या कंपनीमध्ये ७० पेक्षा जास्त स्त्रिया काम करतात आणि त्यांना दररोज कमीत कमी २०० रुपये मजूरी  मिळते.

या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सध्या जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त आहे. कानपूर, कन्नौज, उन्नाव यांच्या व्यतिरिक्त इतर काही ठिकाणी देखील त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे.

२९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकाऊ फुले एकत्रित केली जातात आणि त्यानंतर त्यांना अगरबत्ती व जैविक वर्मी कंपोस्टमध्ये रुपांतरीत येते.

पहिल्यांदा त्यांच्या टीममध्ये दोन लोक होते. आज नऊ लोक आहेत. आज त्यांच्या ‘हेल्प अस ग्रीन’ या कंपनीला आयआयटीकडून चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

 

साखर उत्पादकांच्या लाभासाठी साखरेच्या उप उत्पादनांच्या विक्री वरील बंधने शिथिल करण्याची गरज

पॉलिसी थिंक टँक असलेल्या पहले इंडिया फाऊन्डेशन ने नुकत्याच जारी केलेल्या रिपोर्ट नुसार देशातील साखर क्षेत्र हे खूप दबावाखाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.  फाऊन्डेशन ने दिलेल्या रिपोर्ट मध्ये असे सूचवण्यात आले आहे की साखर उत्पादन करतांना निर्माण होणार्‍या उप उत्पादनांना म्हणजेच मळी आणि ईथेनॉल सारख्या उत्पादनां च्या विक्रीचे नियम शिथिल केल्याने  कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकेल.

“ ॲन इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन ॲप्रोच टू ईझ ऑफ डुईंग बिझनेस: अ केस स्टडी ऑफ शुगर, अल्को-बेव्ह ॲन्ड टुरिझम” नामक जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट मध्ये महाराष्ट्र सरकारला आपल्या योजनांमध्ये बदल करण्यासाठी काही शिफारशी करण्यात आल्या असून २७ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका  गोलमेज सभेत सरकारच्या उच्च समिती कडे या शिफारशी  करण्यात आल्या.

उपयोग कशा प्रकारे केला जातो त्यानुसार मळीच्या वाहतुकीचे नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकार दोघांकडून केले जाते.  रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे की “ मळी आणि ईथेलॉल सारख्या साखरेच्या उप उत्पादनांना नियंत्रण मुक्त केल्यास त्या साखर क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल.”  

महाराष्ट्रात सर्वाधिक  प्रमाणात मळीचे उत्पादन केले होते- हे उत्पादन साखर उत्पादन क्षेत्रातील सर्वांत आर्थिक दृष्ट्या लाभदायक उत्पादन आहे.  २०१७-१८ मध्ये संपूर्ण भारतातील मळीचे उत्पादन हे १२ दशलक्ष टन इतके होते,  त्यापैकी महाराष्ट्राचे यांतील योगदान हे ३,६६३,००० टन इतके आहे.

क्षेत्राला भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे ऊसाचे दर ही आहे. सध्या ऊसाच्या दरासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलने करत आहेत.  

सध्या केंद्रा तर्फे वसूलीच्या दरानुसार ऊसाची फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस (एफआरपी)  निश्चित केली जाते. तरीही राज्य सरकार कडून स्टेट ॲडव्हाईस्ड प्राईस (एसएपी) म्हणून  त्यांची स्वत:ची अशी किंमत ठरवते जी एफआरपी पेक्षा अधिक असते, यामुळे बाजारपेठेत द्विधा मनस्थिती निर्माण होते.

पीआयएफ रिपोर्ट ने दिलेल्या शिफारशींनुसार “  एसएपी च्या ऐवजी राज्यातील एफआरपी नुसार ऊसाचे दर ठरवल्यास आणि कारखान्यांना या एफआरपी च्या वर आपल्या क्षमतेनुसार पैसे देण्याची मुभा देण्याची गरज आहे.  त्याचबरोबर  असेही  नमूद करण्यात आले आहे की शेतकर्‍यांना सर्व रक्कम एकरकमी द्यावी व एफआरपी वर आधारीत ही रक्कम ६० दिवसात अदा केली जावी.”   

वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन चे कार्यकारी संचालक श्री अजित चौगुले यांनी सांगितले “ एफआरपी अंतर्गत (फेअर ॲन्ड रेम्युनरेटिव्ह प्राईस) आणि सध्याच्या पैसे देण्याच्या पध्दतीनुसार १४ दिवसात शेतकर्‍यांचा देणी द्यावी लागतात,  हे खूपच कठीण काम आहे कारण साखरेचे उत्पादन करून तिची विक्री होण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी जातो.”  

पीआयएफ रिपोर्ट मधील महत्वपूर्ण शिफारशीं मध्ये साखरेच्या वेगवेगळ्या म्हणजेच व्यावसायिक आणि रिटेल वापरासाठी वेगवेगळे दर ठेवणे, साखरेसाठी सर्व समावेशक  विक्री योजना  आणि त्याच बरोबर ऊसाची खरेदी विक्री प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शेतकर्‍यांची साखर कारखान्यां बरोबर नोंदणी करणे इत्यादींचा समावेश आहे.

महाराष्ट्र सरकारच्या नागरी उड्डयन, एक्साईज जी ए डी चे प्रमुख सचिव वत्सला नायर सिंग-आयएएस “या रिपोर्ट मधील अधिकतर शिफारसींची नोंद घेतली गली असून सरकार द्वारे गठीत करण्यात आलेल्या कृती समितीने सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन हे बदल केल्यास ईओडीबी मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सुधारण्यास मदत होईल.”   

Exit mobile version