कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे जम्बो हॉस्पिटल

नागपूर:- विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे ‘जम्बो रुग्णालय’ मानकापूर येथे उभारण्यात येणार असून सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा येथे उपलब्ध होईल, अशी माहिती आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात नागपूर येथे ‘जम्बो कोविड हॉस्पिटल’साठी शहरातील योग्य जागा सुलभ होईल, यादृष्टीने डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

एएए हेल्थ कन्संटन्सी सर्विसेसचे डॉ. अहमद मेकलाई, डॉ. अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विदर्भातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणे तसेच शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची निर्मिती करण्यात येत आहे.’ जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

कोवीड रुग्णांसाठी मुंबई तसेच पुणे येथे ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शहरात देखील एक हजार रुग्णांसाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने राधास्वामी सत्संग (कळमेश्वर), शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.

सर्व मिळून कोरोनाविरुद्ध एकत्रित लढा देऊया : महापौर संदीप जोशी

कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. कधीपर्यंत राहणार हे सांगता येत नाही.त्यामुळे या विषाणूच्या गडद छायेतच आपल्याला जगण्याची सवय करायची आहे. हा लढा कुण्या एकट्याचा नाही. त्यामुळे यापुढे सर्वांनी शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करीत एकत्रितपणे लढा देऊन कोरोनावर मात करू, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजवंदनानंतर आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त तुकाराम मुंढे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने,

नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, नागपूर शहराच्या विकासात लोकसहभाग वाढावा या उद्देशातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. यातून पुढे आलेल्या नागरिकांच्या सूचनांच्या आधारे विकासकामांचा आढावा तयार करण्यात आला. महापौर निधीतून शहरभरात सुलभ शौचालय उभारण्याचा संकल्प केला.

मात्र याच काळात कोरोनाचे संकट समोर उभे राहिले आणि विकासकामांना ब्रेक लागला. जीव वाचविणे ही प्राथमिकता झाली. मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, मेयो, मेडिकल, पोलिस, जिल्हा प्रशासन यांनी या काळात केलेले आणि करीत असलेले कार्य इतिहासात नोंद व्हावे असेच आहे, असे म्हणत त्यांनी या सर्व योद्धांना मानाचा मुजरा केला.

तत्पूर्वी महापौर संदीप जोशी यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या परेडचे निरीक्षण केले. नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे,, उपायुक्त निर्भय जैन, सुभाष जयदेव, डॉ. प्रदीप दासरवार, अमोल चोरपगार, सहायक आयुक्त महेश धामेचा, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, श्वेता बॅनर्जी, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह सर्व झोन सहायक आयुक्त, विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एनएसएसडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपायुक्त महेश मोरोणे यांनी केले.

आशा वर्कर्सचे मानधन वाढावे

कोरोनाकाळातील कार्यात आशा वर्कर्सचे कार्य दखल घेण्याजोगे आहे. आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून तळागाळात जाऊन, स्वतःचा जीव धोक्यात घालून अगदी तुटपुंज्या मानधनावर त्या आजही कार्य करीत आहे. त्यांचे मानधन डिसेंबर महिन्यापर्यंत एक हजार रुपयांनी वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

‘कोरोना योद्धांचा सत्कार

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांचा यावेळी महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त तुकाराम मुंढे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या योद्धांमध्ये डॉ. मिनाक्षी सिंग, डॉ. स्वाती गुप्ता, डॉ. विजय जोशी, डॉ. बालाजी मंगम, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू, डॉ. मिनाक्षी माने, डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. दानिश इकबाल, डॉ. शीतल गोविंदवार, डॉ. टिकेश बिसेन, सुकेशिनी मून, जया कांबळे, छाया मेश्राम, अंकिता बरडे, वर्षा चव्हाण, सोहेल अली, राहुल निनावे, ईश्वर चहांदे, आकाशचंद्र समुद्रे, संदीप बनसोड, शेखर रामटेके, महेंद्र वानखेडे यांचा समावेश आहे.

News Credit To NMC

 

20 लाख करोड़ कहां गए? यूथ कांग्रेस का आंदोलन

नागपुर:- मोदी सरकार द्वारा कोरोना और लॉकडाउन द्वारा प्रभावित हुई अर्थव्यवस्था को मजबूत करने के लिए घोषित 20 लाख करोड़ रुपये के पैकेज की जो घोषणा की थी वह पॅकेज गया कहा? इसका जवाब देने की मांग करते शहर युवा कांग्रेस ने शुक्रवार को बीजेपी के गणेशपेठ कार्यालय के सामने आंदोलन किया।

आंदोलन का नेतृत्व राष्ट्रीय युवा कांग्रेस सचिव बंटी शेलके, शहर युवा कांग्रेस अध्यक्ष तौसीफ खान, प्रदेश युवा कांग्रेस सचिव सागर चव्हाण और वसीम शेख ने किया। घोषित पैकेज कहां गया, 18,700 करोड़ रुपये किन किसानों के बैंक खातों में जमा किए गए? डेयरी व्यवसाय पर घोषित 15,000 करोड़ रुपये और मत्स्य पालन पर घोषित 2500 करोड़ रुपये कहा खर्च किए गए? यह सवाल केंद्र सरकार को किए गए।

इस आंदोलन में स्वप्निल ढोके, हेमंत कातुरे, राज बोकड़े, राज संतापे, मुबाशिर अहमद, फिरोज खान, अतुल मेश्राम, कुणाल खड़गी, अभिषेक पाटिल, विजय मिश्रा, शोएब अंसारी, आदित्य जेठे, शोएब खान, केदार गुप्ता, प्रथम उइके, आशीष ब्राह्मणे, योगेश वहाणे, अमन लुटे आदि शामिल थे।‌‌

आयुक्त के प्रति क्यों बढ़ रहा व्यापारियों में गुस्सा?

नागपुर:- आयुक्त मुंढे ने व्यापारियों को 18 अगस्त तक कोरोना परीक्षण करने का आदेश जारी करने के बाद, परीक्षण के लिए केंद्र में जाने वाले व्यापारियों और उनके कर्मचारियों को किट उपलब्ध नहीं होने के कारण वापस भेज दिया गया। तो व्यापारियों ने कहना है, “पहले परीक्षण की सुविधाए रखे, फिर धमकी दें।” कुछ व्यापारियों ने नाराजगी व्यक्त करते हुए कहा कि आयुक्त के निर्णय का स्वागत है, लेकिन उनको तथ्यो से अवगत भी होना चाहिए।

मुंढे ने व्यापारियों को 18 अगस्त तक कर्मचारियों के साथ खुद का परीक्षण करने के निर्देश दिए है। अन्यथा कार्रवाई की चेतावनी भी दी। कोरोना के मद्देनजर, कुछ महीनों की आय पहले ही कम हो गई है, और अब ऑड इवन से यह जारी ही है जिससे असंतुष्ट व्यापारी आयुक्त के फैसले से नाराज हैं।

परीक्षण केंद्र पर परीक्षण किट की अनुपलब्धता से यह गुस्सा और अधिक बढ़ गया। कमिश्नर के आदेश के बाद, व्यापारियों ने कल से परीक्षण के लिए निगम के परीक्षण केंद्र जाना शुरू कर दिया। लक्ष्मीनगर जोन में आरपीटीएस परीक्षण केंद्र पर क्षेत्र के कुछ व्यापारी और कर्मचारी भी परीक्षण के लिए गए। लेकिन वहां मौजूद महिला चिकित्सा अधिकारी ने व्यापारियों को बताया कि परीक्षण के लिए आवश्यक किट उपलब्ध नहीं।‌‌

निर्देशों का पालन करने वाले व्यापारियों को परीक्षण की सुविधा नहीं होने के कारण वापस लौटना पड़ा। कल भी, कुछ व्यापारी इस केंद्र पर गए। उन्हें भी किट नहीं बताया गया। इसलिए, चूंकि लगातार दो दिनों तक परीक्षण केंद्र में कोई किट नहीं, तो 18 अगस्त तक परीक्षण कैसे होगा? इस सवाल ने व्यापारियों की नींद उड़ा दी है। व्यापारी आयुक्त के निर्देशों का पालन करने के लिए तैयार है। पर प्रशासन कि भी कुछ जिम्मेदारियां हैं जो पुरी होती दिखाई नहीं दे रही।

इधर 18 अगस्त नजदीक आ रहा, व्यापारियों ने आयुक्त को तथ्यों के आधार पर निर्णय लेने की आवश्यकता व्यक्त की। अगर कोई सुविधा नहीं है, तो 18 वीं तक कैसे जांच करवाए? व्यापारियों द्वारा इस तरह के सवालो से गुस्सा जाहिर किया जा रहा है।

आयुक्त का दावा झूठा: आयुक्त ने 3 अगस्त को शहर में 21 स्थानों पर कोरोना परीक्षण के लिए सेवा केंद्रों का लाभ उठाने के लिए नागरिकों से अपील की थी। हालांकि, पिछले दो दिनों से आरपीटीएस परीक्षण केंद्र में किटों की कमी के कारण आयुक्त का यह दावा फेल होता दिख रहा है।

पूर्व पार्षद, गोपाल बोहरे कहते हैं व्यापारियों के तकरारें आने पर परीक्षण केंद्र का दौरा किया। वहा अधिकारियों ने कोई किट नहीं होने की बात बताई थी। नगर निगम को दुकानदारों के साथ-साथ उनके कर्मचारियों का परीक्षण करने के लिए एक वैन में एक मोबाइल परीक्षण केंद्र शुरू करना चाहिए।

एएसआय संदीप शर्मा यांना राष्ट्रपति पदक

नागपूर:- ७४ व्या स्वातंत्र दिन औचित्यावर सहाय्यक उपनिरीक्षक संदीप मनोहर लाल शर्मा यांना पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले आहे. या व्यतिरिक्त गडचिरोलीच्या १४ पोलिस कर्मचा-यांना विशेष कामगिरीसाठी पोलिस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे संदीप शर्मा यांच्यासह विदर्भातील ४ पोलिस अधिका-यांना राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे.

३९ वर्षांच्या सेवेत २७० पुरस्कार व प्रमाणपत्रे:

संदीप शर्मा सध्या गुन्हे शाखेत (शोध) कार्यरत आहेत. क्राईम डेटा, क्राईम अ‍ॅनालिसिस आणि गुन्हेगारीशी संबंधित सर्व बाबींत त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. १९८२ मध्ये त्यांची पोलिस हवालदार म्हणून नियुक्ती झाली. यासह शहरातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्यांना क्राईम संबंधि उल्लेखनीय कामांसाठी अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. २००६ साली झालेल्या अखिल भारतीय पोलिस ड्यूटी मिट मेळाव्यात त्यांनी भाग घेतला. त्याच वर्षी महाराष्ट्र पोलिस ड्यूटी मीट गुन्हे निरीक्षणामध्ये सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

2012 मध्ये त्यांनी मानवाधिकार

आयोगाच्या वादविवाद स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र पोलिस महाव्यवस्थापक राज्यात मुंबईला इन्सिग्निआ पदक देण्यात आले. ३९ वर्षांच्या सेवेत त्यांना २७० हून अधिक पुरस्कार व प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. या कर्तृत्वावर सी.पी. उपाध्याय, माजी जॉइंट सीपी रवींद्र कदम, जॉइंट सीपी निलेश भरणे, डीसीपी गजानन राजमाने, मकणीकर, संभाजी कदम, श्वेता खेडकर, एसीपी नंदनवार, जाधव यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांवतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

निती आयोगाने स्वीकारला जलसंधारणाचा गडकरी पॅटर्न: देशभरात अंमलबजावणीचा सल्ला

नागपूर:- देशात जलसंपदा, नदी विकास व गंगा कायाकल्प मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्धा, बुलढाणा जिल्ह्यातील महामार्गाच्या बांधकामादरम्यान राबविण्यात येणा-या पाण्याच्या जलसंधारण पद्धतीचा नीती आयोगाने स्वीकार केला आहे. जलसंधारणाबाबत समान पध्दती लागू करण्यासाठी आयोग देशातील सर्व राज्यांनाही याची शिफारस करणार आहे. निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही गडकरी यांना कौतुकाचे पत्र पाठवून या नव्या पद्धतीची प्रशंसा केली आहे.

तमस्वाडा हे वर्धा जिल्ह्यातील एक दुर्गम आदिवासी गाव आहे. महामार्ग बांधताना या गावाजवळ मुरुम व माती काढल्याने मोठे खड्डे झाले होते. याशिवाय नद्यांच्या तळातून वाळू व माती देखील काढली गेली ज्यामुळे त्यांचा तळ खूप खोल झाला. पावसाळ्यात पावसाचे पाणी या दोन्ही प्रकारच्या खड्ड्यांमध्ये भरले गेले आणि त्यामुळे ते पाणी साठवणुकीची मोठी ठिकाणे बनली. हे पाणी भरल्याने, आजूबाजूच्या सर्व पाण्यात नैसर्गिक पाण्याचे साधन सजीव झाले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरीत सिंचनाचे पाणी उपलब्ध असून गावक-यांना पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

बुलढाण्यातील 152 गावात 1,525 हेक्टेयर जमीन संचयनाखाली: या कामासाठी आवश्यक  माती मिळविण्यासाठी, रस्त्यालगतच्या तलावांमध्ये आणि नद्यांमध्ये खोदकाम केले गेले. परिणामी, तलाव तयार होतात. ज्या नद्यांमधून वाळू उपसा केली गेली, ती खोल झाली आहे. या खड्ड्यांमध्ये आता पावसाचे पाणी साचले आहे. 491 किमी लांबीचे बुलडाणा जिल्ह्यात एकूण 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहेत. या प्रदीर्घ कामासाठी जवळपास तलाव, नद्या व नाल्यांमधून 65.59 लाख घनमीटर खडी काढून टाकली गेली. यामुळे 6,559 टीसीएम पाण्याची बचत झाली असून 152 गावांना याचा फायदा झाला.

बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या गडकरी पॅटर्नने पाणीटंचाईवर मात केली आहे. पाणीटंचाईमुळे सुमारे 5 लाख लोकांना दिलासा मिळाला आहे. महामार्गाचे खोलीकरण तसेच संकलनामुळे 22,800 विहिरींना मुबलक पाणी मिळाले आहे. 1,525 हेक्टर जमीन बागायती झाली आहे. महामार्गांच्या बांधकामासह पाणीही समृद्ध झाले. महामार्गाचे बांधकाम आणि तलाव, नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण यामध्ये सुसूत्रता आली. या पॅटर्नमध्ये सरकारला पाणी कायम राखण्यासाठी कोणताही पैसा स्वतंत्रपणे खर्च करावा लागला नाही.

खामगाव तहसीलमधील लंजुड सिंचन तलावाचे खोलीकरण झाले, त्यामुळे तहसीलच्या 12 गावांना पाणी मिळाले . बाळापूर, खामगाव, मलकापूर, चिखली खुर्द, चिखली बुद्रुक, लांजुड, सुजातपूर, आंबोडा, आम्सारी, सुतला, सुतला खुर्द, पहुरजीरा, मोरगाव, पार्कड, पिंपरी, घाटपुरी, वाडी अशा 12 गावातील 42 हजार लोकवस्तीस 272 हेक्टर शेती सिंचनासाठी उपयुक्त होईल, त्याकरिता 1737 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

नागपूर, औरंगाबाद, मुंबई येथे अंमलबजावणी: राष्ट्रीय महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यात एकूण 491 कि.मी.च्या 12 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या कामांमुळे 65.59 लाख घनमीटर म्हणजेच 6559 टीसीएम अतिरिक्त भूजल पृष्ठभाग पाण्याचा संग्रह खर्च न करता तयार आहे. यामुळे 10 हजार टीसीएम पाणी भूजल भरती होणार आहे. राज्यात, विदर्भाच्या नागपूर विभागात 34 प्रकल्प, कोकणच्या मुंबई विभागात 3 प्रकल्प, पुणे विभागातील 5 आणि मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील 18 प्रकल्प बुलढाणा पँटर्न धर्तीवर राबविण्यात येत आहेत.

टेकडी फ्लायओव्हर अद्याप उभाच: कोरोनाचा व्यत्यय

नागपूर:- पश्चिम व पूर्व नागपूरला जोडणार्‍या रामझुलाच्या बांधकामाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानकाजवळील जयस्तंभ चौकात वाहतुकीची आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी टेकडी उड्डाणपूल तोडण्याची सूचना मनपा प्रशासनाला केली होती. आत्तापर्यंत हा उड्डाणपूल तोडण्याची कारवाई मनपाने सुरू केलेली नाही. वास्तविक, टेकडी उड्डाणपुलाखालील दुकानदारांच्या विनंतीनुसार त्यांना प्रथम कॉम्प्लेक्स बनवून नंतर टेकडीपूल तोडावा लागेल. परंतु दुकानदारांना स्थलांतरीत करण्यात मनपा अद्याप अपयशी आहे.

जयस्तंभ चौकातील टेकडी उड्डाणपुलाची मोडतोड करुन वाहतूक सुरळीत करण्याच्या योजनेसाठी गडकरी यांनी महामेट्रोला जबाबदारी दिली. महामेट्रोच्या एका अधिका नूसाक, टेकडी उड्डाणपुलाखालील दुकानदारांचे हस्तांतरण मनपा करू शकली नाही, त्यामुळे ही योजना पुढे सरकली नाही. त्याचवेळी मनपाच्या एका अधिका्याने या उशिराचे खापर कोरोनावर फोडले आहे.

गडकरी फक्त शहरातच नव्हे, तर संपूर्ण देश आणि जगात आपल्या बांधिलकी आणि कामांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या स्वतःच्या शहरातच त्यांचे सुचनांना गंभीरतेने घेतले नसल्याचे चित्र दिसतेय. याखेरीज मनपात सत्तापक्ष म्हणून भाजप बसून आहे तरी असे घडतेय. टेकडी उड्डाणपुलामुळे रेल्वे स्थानकासमोर अरुंद रस्ता शिल्लक आहे. त्या रस्त्यावरही बारा महिने गडर वाहातोय. त्याउपर ऑटोवाले जागा अडवून त्यास अधिक अरुंद करतात. कडेला काही विक्रेतेही दुकाने थाटून बसतात, एकंदर गोंधळाचे वातावरण नेहमी कायम असते.

टेकडी उड्डाणपूल तोडून स्टेशनसमोर सहा लेन सिमेंट रस्ता बनवण्याची योजना आखली गेली आहे. यासाठी गडकरी यांनी सेंट्रल होड्स फंडकडून 232 कोटी रुपयांच्या निधीसही मान्यता दिली आहे. ब्रेकओव्हर आणि सहा लेन बांधकामात समाविष्ट आहे. टेकडीपूल तोडल्यानंतर प्रथम तेथे चौपदरी सिमेंट रस्ता बनविला जाईल आणि जेव्हा डिफेंसलगतची जमीन ताबा दिला जाईल तेव्हा आणखी दोन-लेन तयार होतील. मनपा अधिका-याचे म्हणणे आहे की महामेट्रो तेथील दुकानदारांसाठी 70 दुकाने बांधणार आहे, परंतु कोरोनामुळे याक्षणी कामांना उशीर होत आहे.

१७ तारखेपासून शाळांमधून मार्कशीट होतील उपलब्ध

नागपूर:- शिक्षण मंडळ पुणे द्वारा आयोजित फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल गेल्याच महिन्यात जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालये किंवा इतर शाळांमध्ये प्रवेशासाठी मार्कशीट, टीसी आदी कागदपत्रांची आवश्यकता असते. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे विद्यार्थ्यांना अद्याप शाळेतून आवश्यक कागदपत्रे दिली गेली नाहीत. हे लक्षात घेता, मंडळाने सर्व शाळा आणि त्यांच्या प्रतिनिधींना सांगितले की ते आपल्या जिल्हा व तालुका संकलन केंद्रातून दहावी निकाल आणि आवश्यक कागदपत्रे मिळवू शकतात.

तथापि, संबंधित शाळांनी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपासून विद्यार्थ्यांना गुण प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले पाहिजे. त्याच वेळी, विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट दिवशी निकाल घेण्यास भाग पाडले जाऊ नये. या व्यतिरिक्त एकाच वेळी पालक व विद्यार्थ्यांची जमवाजमव होऊ नये यासाठी शाळेने उपाययोजना केल्या पाहिजेत अशा सुचना दिल्यायत.

दिवसभर पावसाची रिमझिम: थंडाव्यात वाढ

नागपूर:- शहरात सतत रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे वातावरण चांगलेच थंड झाले आहे. गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. मधेच ढग बरसायचे, मधेच थांबायचे पण लवकरच पुन्हा रिमझिम सुरू होत असल्याचा सर्वांनी अनुभव घेतला. सततच्या पावसामुळे सूर्य देवताही ढगाआडच दडून होता.

गुरुवारी पहाटे ते सायंकाळ 5.30 या वेळेत शहरात हवामान खात्याने 15 मिमी पावसाची नोंद केली. यापूर्वी बुधवारी सायंकाळपासून सकाळी 8:30 वाजेपर्यंत शहरात 30.5 मिमी पावसाची नोंद झाली. कधी हलका, कधी मध्यम पाऊस पडल्यामुळे शहरातील अनेक गल्लीबोळांत आणि रस्त्यावरही पाणी दिसले. विभागाने शहरातील कमाल तापमान 25.8 अंश नोंदविले, जे सरासरीपेक्षा 4.9 अंश कमी होते. किमान तापमान 23.3 अंश नोंदविले गेले.

उद्या मुसळधार: हवामान खात्याने येत्या 24 तास म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी बहुतांश भागात हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे, परंतु 15 ऑगस्ट रोजी एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी बर्‍याच भागात हलका पाऊस होईल आणि 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर विभागाने 16 ऑगस्टला हलका पाऊस आणि 17 रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

92.43 टक्के भरला तोतलाडोह: सतत पडणा-या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा बराच वाढला आहे. 12 ऑगस्टपर्यंत जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार पेंच तोतलाडोह प्रकल्पात 92.43 टक्के पाणीसाठा झाला आहे. नवेगावखैरी प्रकल्पात ज्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो तेथे 91.69 टक्के क्षमतेचा साठा झाला आहे. इतर प्रकल्पांमध्ये विभागाने पुरेसे पाणी साचल्याची माहिती दिली आहे.

शहरात आता गुन्हेगारांनी थारा नाही: गृहमंत्री अनिल देशमुखांचे कठोर कारवाईचे संकेत

नागपूर:- राज्याखेरीज देशातही नागपूर शहरास क्राइम कॅपिटल म्हणून ओळखले जात असे, परंतु गृहमंत्री म्हणून मी शहराची बदनामी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्ध गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले आहे. आता शहरात गुन्हेगारांना थारा नाही.

पुढेही अशीच सक्त कार्यवाही करत रहाण्याचे पोलिस विभागास कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

ते म्हणाले की सीपी बी.के. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उत्कृष्ट काम केले जात आहे. शहरातील 118 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करत आतापर्यंत 51 आराेपींवर कारवाई झाली. संतोष आंबेकर असो वा साहिल सय्यद, कोणीही पोलिसांच्या तावडीतून सुटलेला नाही. पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांचे भव्य बंगले नष्ट केले आहेत.

याशिवाय रोशन शेख, प्रीती दास, मंगेश कडव, तपन जयस्वाल आणि मादकपदार्थ गॅगस्टर अबू अण्णा यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जात आहे. मी स्वतःहून अनेक वेळा शहरात घडणार्‍या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला आहे. शहरात मोकळेपणाने फिरणा-या बदमाशांची माहिती पोलिस अधिका-यांकडून मागवली गेली आहे, उत्तम गोष्ट म्हणजे आता शहरात असे गुन्हेगार उरले नाहीत.

अनिल देशमुख यांनी नागरिकांना आवाहन करत गुन्ह्यांविषयी, दोषींविषयी मला माहिती द्या अये सांगितले, परिसरामध्ये असा कुणी गुंड असेल तर त्यांची कुंडली घेऊन माझ्याकडे या. आरोपींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. जर एखादा गुन्हेगार तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही रविभवनच्या कक्ष क्र .११ मधील शिबीर कार्यालयात ठाम पुराव्यांसह तक्रार देऊ शकता. 20 ते 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत विशेष कार्य अधिकारी डॉ.संजय धोटे यांच्याकडे तक्रार करून पुरावे सादर करु शकता. तक्रारदाराची माहिती, पुरावे आणि त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. संबंधित प्रकरणांचा बारकाईने तपास करून आरोपींना तुरुंगात पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Exit mobile version