ध्वज जाळून निषेध: भाजप चे आंदोलन तिव्र

नागपूर:- पुर्व नागपूर भाजप युवा मोर्चातर्फे चीन च्या कुटनीतीक भ्याड हल्ल्याचे विरोधात तिव्र प्रदर्शन म्हणून टेलिफोन एक्सचेंज चौक येथे ध्वज जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. सिमारेषेवर या भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली गेली, चिनलाही पाकिस्तान प्रमाणे अद्दल घडवीली जावी यास्तव मा पंतप्रधानांस अपील करण्यात आली, पाठीत खंजिर खुपसणा-या या अनितीसाठी चिन मधील निर्मीत उत्पादनांवर सर्व नागरिकांद्वारे बहिष्कार टाकला जावा याबाबत जनजागृति व आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. सामान्य नागरिकही अशाप्रकारे यात सहभागिता घेऊ शकतात हे दाखवून दिले जाऊ शकते.

निदर्शनांत नागपूर शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शिवानी दाणी, पुर्व नागपूर अध्यक्ष सचिन करारे, सनी राऊत, गोविंदा काटेकर, आशिष मेहर, हर्षल मालांवार, एजाज शेख प्रदिप भुजाडे, शंकर विश्वकर्मा, व कार्चकर्ते आदी उपस्थित होते.

वीज मीटरचे वाचन सुरू: महावितरण ग्राहकांना आता बिल मिळेल

नागपूर:- कोरोना लॉकडाऊनमुळे महावितरणने मीटरचे वाचन प्रक्रीयाही बंद केलेली होती परंतु आता प्रशासनाच्या परवानगीने कंटेनमेंट क्षेत्र वगळता उर्वरित भागात मीटर रीडिंग सुरू केली जात आहे. तब्बल 23 मार्चनंतर आता मीटर रीडिंगनंतर ग्राहकांना बिल दिले जाईल. दोन ते अडीच महिन्यांसाठीचे एकच बिल असेल. ज्या ग्राहकांनी एप्रिल आणि मे महिन्याचे बिल भरले आहे त्यांची रक्कम समायोजित केली जाईल.

महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले की, 1 जूनपासून लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बिल संकलन केंद्र सुरू करण्याबरोबर मीटर रीडिंगद्वारे बिले वाटण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. अडीच महिन्यांचे बिल एकत्रितपणे पाहून ग्राहकांनी घाबरू नये. लॉकडाऊन दरम्यान सरासरी युनिटचे बिल ग्राहकांना देण्यात आले होते.

ज्या ग्राहकांनी स्वत: वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅप्सवरून मीटर रीडिंग पाठविले त्यांना त्यानुसार बिल दिले गेले. आता देण्यात येणा-या बिलात ग्राहकांना स्लॅबच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. जर 2 महिन्यांत 330 युनिट वापरले गेले तर 330 युनिटचा स्लॅब रेट न आकारता प्रत्येक महिन्यात 165 युनिटचा स्लॅब रेट आकारला जाईल. ज्यांनी सरासरी बिल जमा केले आहे, त्यांच्या बिलातील कायम शुल्क, वीज शुल्क वगळता उर्वरित शुल्क समायोजित केले जातील.

क्या 12 साल का हिसाब देंगे कमिश्नर?

नागपुर:- जितनी आय उतना व्यय रूप में आयुक्त ने ज्यादा खर्च न करने की भूमिका ली है। परिणामस्वरूप, विकास कार्य प्रभावित हुए। मनपा में पैसा नही और पुराने कर्जे भी चुकाने है तो नए काज मुश्किल है ऐसा कमिश्नर के कहने के बाद भी महासभाद्वारा अनुरोध किए गए 12 साल के खाते का अभी भी इंतजार है क्योंकि बिते कई महीनों में सभा भी नही हुई हैं और 12 साल के हिसाब को लेकर नगरसेवकों में उत्सुकता बढ़ गई है।‌‌

सत्तारूढ़ नगरसेवक इस बात से बहुत नाराज हैं कि आयुक्त मुंढे ने विकास कार्य रोक दिए। इसलिए, फरवरी में, सत्तारूढ़ और विपक्षी दोनों दलों ने आयुक्त को विकास कार्य रोकने को लेकर प्रश्न किया था। उस समय आयुक्त ने निगम की अधिक जिम्मेदारी और फंडिंग से यह स्पष्ट रूप से कह दिया था कि कार्यों को मंजूरी देना उचित नहीं।

हालांकि, आयुक्त ने इस बात पर विस्तार से नहीं बताया कि प्रतिवर्ष कितना बकाया है। इसलिए, सदस्यों ने मांग की थी कि आयुक्त को हर साल बकाया के आंकड़ों के साथ निगम की वित्तीय स्थिति को स्पष्ट करना चाहिए। वरिष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी ने मांग की थी कि पिछले 12 वर्षों के ऋणों को आयुक्त द्वारा आगे रखा जाना चाहिए।

विकास को रोकने के लिए वित्तीय कठिनाइयों का हवाला दिया जा रहा है। IRDP को सरकार की शेष राशि नहीं मिली है। राज्य सरकार, नागपुर सुधार प्रन्यास, नागपुर महानगरपालिका के पास सीमेंट सड़क के कामों में प्रत्येक में 100 करोड़ रुपये की हिस्सेदारी है। क्यों EPF, GPF प्रदान नहीं किया गया। इसकारण गत 12 सालो का लेखा जोखा आगे रखे तब तक काज को जारी रखे यह मांग वरिष्ठ पार्षद और विधान परिषद के विधायक प्रवीण दटके द्वारा की गई थी, जिस पर आयुक्त ने पिछले 12 वर्षों का अध्ययन करने के लिए मेयर संदीप जोशी से 30 दिनों के लिए वक्त लिया है। पर कोरोनाकाल के चलते कोई बैठक बाद में नहीं हुई है, इसलिए निगम पार्षदो को 12 साल के हिसाब का बेसब्री से इंतजार है।‌‌

विदर्भातील शाळा सुरू करण्यासाठीची बैठक 26 जून रोजी

लॉकडाऊनमधे शिथिलता झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना शाळा व्यवस्थापन समितीची बैठक बोलण्यास सांगितले आहे. यानुषंगे विदर्भातील शाळा व्यवस्थापन समितीची बैठक 26 जून रोजी बोलविण्यात येणार आहे.

बैठकीत शाळा सुरू करण्याच्या तयारीवर चर्चा करण्यात येईल. उर्वरित महाराष्ट्रातील शाळांच्या व्यवस्थापन समितीची बैठक 15 जून रोजीच घेण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या मुख्य शिफारसी आणि तज्ञांच्या शिफारशीनुसार जिल्हा दंडाधिकारी किंवा मनपा कमिश्नरला कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या शाळा सुरू करण्यासंबंधीचा अधिकार असेल. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ऑनलाईन आणि डिजिटल पद्धती पायलट प्रकल्प म्हणून त्वरित सुरू केल्या पाहिजेत. जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तेथील व ग्रामीण आणि शहरांपासून दूरच्या शाळा सुरू केल्या जाव्या. मुख्यमंत्री म्हणाले की ज्या भागात शाळा सुरू होताहेत तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जावी.

ते म्हणाले की मी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचेशी दूरदर्शन व रेडिओच्या माध्यमातून राज्यात शिक्षण सुरू करण्याविषयीची चर्चा करेन. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, सरकारने ऑनलाइन अभ्यासाबाबतच्या पालकांच्या मतांचा विचार केला आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार, इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार नाही, परंतु या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना टीव्ही व रेडिओवर शैक्षणिक व कार्यक्रम दर्शविले आणि कथन केले जाऊ शकतात.

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेतर्फे कोरोना योद्धे सत्कारीत

नागपुर:- कोरोना रोगाने संपुर्ण देशात थैमान घातलेले असताना ह्या संकट प्रसंगी देशासाठी व जनतेसाठी आपले कर्तृत्व जोमाने बजावणाऱ्या व पांचपावली विलगीकरण केंद्राचा उत्तम रीतीने भार उचलणाऱ्या पांचपावली पोलीस स्टेशनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किशोर नगराळे व आसीनगर झोन चे सहायक आयुक्त श्री गणेश राठोड साहेब ज्यांनी आपल्या झोन अंतर्गत असलेल्या परिसराची धुरा चांगल्या रीतीने सांभाळली असल्यामुळे या दोन्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व मनवीसे नागपुर जिल्हाध्यक्ष दिनेश ईलमे ह्यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह व तुळशी रोप देऊन सत्कारीत करण्यात आले.

दोन्ही जनसेवक अधिकाऱ्यांनी या सत्कारादाखल आभार व्यक्त करतांना आपल्या भावना मोकळ्या केल्या, सत्कार हुरूप वाढवणारा व सहका-यांत विश्वास, अभिमान वाढवणारा आहे तसेच ह्यामुळे भविष्यात काम करण्याकरीता आमच्या आत्मविश्वासात आणखी वृद्धी होईल असे सांगितले

याप्रसंगी शहर सचिव श्याम पुनियनी, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, (उत्तर विभाग अध्यक्ष मनवीसे मनोज काहलकर, सुमित जांभुळकर आदींची उपस्थिती होती.

21 दिवसांपासून वाघिनीचा शेतताबा: मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी वनविभागाचा अलर्ट

नागपूर:- दक्षिण उमरेड वनक्षेत्राच्या मौजा बेसूर परिसरात उसाच्या शेतावर वाघाने गेल्या 21 दिवसांपासून ताबा घेतला आहे. मानवी-वन्यजीव संघर्ष परिस्थिती रोखण्यासाठी उमरेड वनविभाग आणि एसटीपीएफचे पथक दिवसाचे 24 तास पहारा देत आहेत. अलीकडेच वाघिनीने 2 शेतकर्‍यांवर हल्ला केला. या घटनेनंतर आसपासच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. वाघिनीने ऊसाचे शेतीत 4 शावकांना जन्म दिलाय, बचावाचे संभवात वाघिनीने 23 मे रोजी दोन शेतक-यांवर हल्ला केला. जखमी केल्यानंतर वाघीण जवळच्या उसाच्या शेतात लपली. वेळेवर केल्या गेलेल्या उपचारामुळे दोन्ही शेतकर्‍यांची प्रकृती स्थिर आहे.

वनाधिका-यांनी केलेल्या तपासणीत असे दिसून आले की या वाघिनीने 4 शावकांना जन्म दिला असून ती ऊस शेतात आपल्या मुलांचे संरक्षण करीत आहे. मानवी-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती रोखण्यासाठी आणि वाघ आणि शावकांना संरक्षण देण्यासाठी उमरेड वन अधिका-यांची टीम गेल्या 21 दिवसांपासून कार्यरत आहे. वास्तविक बेसूर वनक्षेत्र आरक्षित वनक्षेत्र आहे. उमरेड करांडला आणि ताडोबाला जोडणार्‍या या कॉरिडॉरमधून वन्यप्राणी प्रवास करतात. या वन कॉरिडॉरच्या सभोवताल काही गावे आहेत आणि लोक जंगलासगतच लागवड करतात.

जिव धोक्यात घालून काम:

व्याघ्रहल्ल्यानंतर शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघ शेतात असल्याने शेतकर्‍यांना शेतात काम करणे कठीण झाले आहे. काही शेतक-यांनी भीतीपोटी काम बंद केलेय. शेती करता येत नसल्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक पेच वाढत आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन वन अधिकारी त्यांना सुरक्षा देताहेत. मानवी-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती उद्भवू नये आणि शेतकर्‍यांचेही नुकसान होऊ नये म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतक-यांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी तैनात असतात.

दिवसरात्र 30 कर्मचारी तैनात: 

आरएफओ वैष्णवी जरे सांगतात शावक सोबत असल्याने कुणाही व्यक्तीने आसपास जाणे धोकादायक आहे. वाघाने 4 शावकांना जन्म दिला असून त्यापैकी 2 नर व 2 मादी आहेत. शावकांचे अद्याप डोळेदेखील उघडलेले नाहीत. वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आवारात 19 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाघिण शेताकडे जाऊ नये म्हणून सौर कुंपण केले गेलेय. शावकं खूपच लहान असल्याने तिला सध्याच शेत सोडणे कठीण आहे. वाघाचे परीक्षण करण्यासाठी वन कर्मचार्‍यांनी आवारात 5 के 6 मचान उभारून 24 तास तैनाती राखली आहे. 15 एसटीपीएफसह एकूण 30 वन कर्मचारी एकजुटीने कार्यरत आहेत.

ड्रोनद्वारे निरीक्षण:  शावकांवर ड्रोनद्वारे निरीक्षण ठेवले जात असल्याचे उपवनसंक्षक प्रभुनाथ शुक्ला सांगतात. एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाघिन आणि तिचे पिलांची देखभाल केली जात आहे.शेतात काम करणा-यांसाठी ढाल म्हणून वनरक्षक कर्तव्य करून शेतक-यांना मदत करीत आहे. शावकांच्या आवाजाची व आजूबाजूला बसविलेल्या कॅमे-यांत वाघिनीची अनेक छायाचित्रे कैद झाली आहेत. याशिवाय वाघिणीने शेतकर्‍यांवर हल्ला करु नये, म्हणून त्यांना समुहानेत शेतिकाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, काम करतेवेळी मोठ्याने संवाद राखणे व रात्री शेतात काम न करण्याचा सल्ला दिला आहे.

तिस-यांदा टोळधाड, रामटेकमध्ये ड्रोनमधून कीटकनाशक फवारणी

नागपूर:- कोरोना साथ, लॉकडाऊनमुळे मंदी, यादरम्यानच शेतकर्‍यांना टोळधाड रूपात आणखी नवी समस्या उभी आहे, मध्यप्रदेशातील पिकांचे नुकसानीनंतर तिस-यांदा टोळांनी नागपूरच्या रामटेक मनसर भागात काल हल्ला केला. आठवडाभरापुर्वी मध्य प्रदेशातील पिपरियामार्गे नागपूरच्या पवनी परिसरात आढळलेल्या टोळांनी आज रामटेक तालुक्यात प्रवेश केला.  रामटेकच्या अजनी भागात कृषी विभागाने टोळांवर ड्रोनने कीटकनाशकाची फवारणीही केली.

नागपूरचे कृषी अधिकारींचे मते रामटेक येथे यांचा नमुना घेतला गेला, अग्निशमन दल पोहोचत नाही तेथे ड्रोन वापरून फवारणी करतात पण लगेच त्याचा परिणाम दिसून येत नाही.

25 मे रोजी टोळधाड प्रथम नागपुर जिल्ह्यात आली दोनच दिवसानंतर पुन्हा आढळली तर 8 दिवसानंतर तिसरा हमला पुन्हा झाला. हवेच्या प्रवाहावर यांचा प्रवास अवलंबून असतो, मौदा येथे कृषी विभाग त्यांचा मागोवा घेत आहे, तरी कृषी विभागाने शेतक-यांना सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे.

Locust swarms spotted in Maharashtra, Pench Reserve

Nagpur:- Locust swarms descended Tuesday in Maharashtra’s Pench Tiger Reserve, a forest official said. The swarms flew in from the west of Koltimara and descended to the east over Borban, Chor Bahuli, Silari, and Pipriya forest areas, said Pench Tiger Reserve director Ravikiran Govekar.

The reserve is scattered across the Maharashtra and Madhya Pradesh border. The forest and agriculture departments of Maharashtra kept a watchful eye on the movement of locusts but there was no spraying of pesticide as the reserve is a protected area, he added.

Swarms shifted toward Mansar after it rained on Tuesday afternoon, and no significant damage to crops or trees was reported, Govekar said.

लर्निंग लायसन्ससाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

नागपूर:- कोरोना संसर्गप्रतिबंधक संचारबंदी मुळे शिकाऊ परवानाधारकांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. ज्यांचे परवान्याची तारीख एप्रिल, मे मध्ये संपणार होती. त्यांना आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देऊन दिलासा मिळाला आहे. म्हणजेच लर्निंग लायसन्सधारकांना पुन्हा ऑनलाईन चाचणीला सामोरे जावे लागणार नाही.

अधिकृत आकडेवारी बघता शहरात 12 लाखाहून अधिक वाहने आहेत. ती वाहने चालविण्यासाठी परवाना आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकांना आरटीओ कार्यालयात कागदपत्र इत्यादींची प्रक्रिया पूर्ण करून परवाना घ्यावा लागतो. या प्रक्रियेत प्रथम, परवान्यासाठी ऑनलाईन तारीख घ्यावी लागते. मग या तारखेला ऑफिसमध्ये जाऊन  परीक्षा ऑनलाइन द्यावी लागते. यानंतर कार्यालयाद्वारे 6 महिने शिकाऊ व नंतर कायम परवाना दिला जातो.

वाहनधारक चाचणी उत्तीर्ण झाला तरच त्याला परवाना देण्यात येतो. शिकाऊ परवाना 6 महिने टिकतो. पण बर्‍याच काळापासून कोविड19 मुळे संपूर्ण देश ठप्प झाला. तसे आरटीओ कार्यालयही बंद आहे. यामुळे, शिकाऊ परवाने कालबाह्य होणार होते. व पुर्वनियमाने अशांना  पुन्हा ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली असती. पण आता अशांसाठी दिलासादायी बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा सर्वांना दिलासा दिला आहे. शिकाऊ परवानाधारकांना 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मास्कविना फिरणा-या 9 जणांवर गुन्हा दाखल

नागपूर:- कोरोना संसर्गकाळात शासनाने ईतरांची व स्वनिगा राखण्यावर काही नियमावलीचे पालनाची व दक्षतेची जवाबदारी सर्वांकडून अपेक्षीली असतांना काहि बेजबाबदार मात्र याविषयी बेपर्वाई दाखवत असल्याचे चित्र आहे, असेच काही तरूणांस काल पोलिसांनी चांगलाच हिसका दिलाय.

फुटाळा व अंबाझरी तलाव परिसरात मास्क न घालता फिरणार्‍या 9 तरुणांवर अंबाझरी पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप आहे की हे लोक मास्क न लावता फुटाळा तलाव आणि अंबाझरी भागात फिरत असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी 3 वाहनेही जप्त केली. पोलिस उपायुक्त विनिता साहू यांना याबद्दल प्रथम माहिती मिळाली.

त्यानंतर त्यांनी अंबाझरी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय करे, सहायक निरीक्षक अरविंद घोडके, सहायक उपनिरीक्षक दीपक अवचित आदींनी ही कारवाई केली.

Exit mobile version