कर्मचाऱ्यांची वाणवा, बिलांची अडचण

कोव्हिड-१९ चा सामना करण्यासाठी, रुग्णांना लवकर उपचार मिळावे, यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. बिलांच्या बाबतीत अनेक तक्रारी आहे. मनपाने तयार केलेले कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड चाचणी केंद्रात मात्र उत्तम कार्य सुरू असल्याचा अहवाल यासाठी तयार करण्यात आलेल्या उपसमितीने दिला

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपुरात असलेल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी पदाधिकारी-प्रशासनाच्या चार समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने संबंधित विषयाचा अभ्यास करून, दौरा करून एक अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी (ता. ३१) या सर्व समितींचा महापौरांनी आढावा घेतला.

सदर आढावा बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष उपनेते वर्षा ठाकरे, नरेंद्र बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, राकाँचे गटनेते दुनेश्वर पेठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने उपस्थित होते.

कोव्हिड हॉस्पीटल, कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड चाचणी केंद्र आणि मेडिकल, मेयो, एम्स येथील व्यवस्थेची पाहणी त्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपसमितीने केली. खासगी कोव्हिड हॉस्पीटलसाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख उपमहापौर मनीषा कोठे यांनी अहवालातील तथ्य मांडताना सांगितले की, काही हॉस्पीटलमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनामत रक्कम अधिक घेण्यात येत आहे. एका रुग्णालयात केवळ औषधींचे बिल २,३६,००० आणि उपचाराचे बिल १,९६,००० देण्यात आले. त्यामुळे खासगी रुग्णालयांवर मनपाचा वचक असणे आवश्यक असल्याची सूचना अहवालातून मांडली.

कोव्हिड केअर सेंटरचा अहवाल उपसमितीचे प्रमुख तथा स्थायी समिती सदस्य विजय झलके यांनी मांडला. या उपसमितीने आमदार निवास, पाचपावली आणि व्हीएनआयटी कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली. तीनही ठिकाणी व्यवस्था उत्तम असल्याचे सांगितले. केवळ आमदार निवासात मनपाचा कुणीही समन्वयक नसल्याने तेथे समन्वयक नेमण्याची सूचना समितीने केली.

शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेचा अहवाल उपसमितीचे सदस्य ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी मांडला. बेड उपलब्ध असतानाही अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे केवळ ५० टक्के बेडचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यू झाल्यानंतर शववाहिका वेळेवर पोहचत नाही. एम्समध्ये मनपातर्फे गाद्या व इतर साहित्य पाठविल्यास बेड्‌सची संख्या वाढू शकते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात संपर्कासाठी फोन क्रमांक आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली.

कोव्हिड चाचणी केंद्राचा अहवाल उपसमितीच्या प्रमुख सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी मांडला. ३४ पैकी ३० चाचणी केंद्राला उपसमितीने भेट दिली असून सर्व केंद्रांवर व्यवस्था उत्तम आहे. इंदोरा केंद्रावर सर्व महिला अधिकारी-कर्मचारी असल्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी पुरुष कर्मचारी नेमण्याची सूचना त्यांनी मांडली.

आमदार प्रवीण दटके यांनी यावेळी गंगाबाई घाट येथील वास्तव मांडले. तेथे कोव्हिड रुग्ण दहन करण्याची संख्या अधिक झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अन्य मृत व्यक्तीचे दहन करताना बऱ्याच अडचणी येत आहे. मोक्ष काष्ठची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मानेवाडा डिझेल शववाहिनी तातडीने सुरू केल्यास मृत कोव्हिड बाधित व्यक्तीचे दहन तेथे करता येईल, अशी सूचना त्यांनी मांडली.

उपसमितीने केलेल्या सर्व सूचना महापौर संदीप जोशी यांनी स्वीकारल्या असून त्यावर तातडीने अंमल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

 

मार्गदर्शक तत्त्वे जारी: 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन परंतु प्रवासात सुट, खासगी बसेस धावतील

नागपूर: कोरोना कालावधी दरम्यान सुरू असलेल्या मिशीन बिगिन अगेन अंतर्गत महाराष्ट्र सरकारने सोमवारी लोक आणि वस्तूंच्या वाहतुकीवरील विविध जिल्ह्यांमधील बंदी उठविली आणि कार्यालयांतही लोकांची उपस्थिती वाढण्याविण्यासह अनेक सवलती दिल्यामुळे राज्यात कोविड -१९ साठी लागू सामान्य लॉकडाउन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविला.

शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हॉटेल व लॉजेस 2 सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सक्षम असतील, परंतु शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे आणि जलतरण तलाव 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठ्या प्रमाणात प्रकरणे आढळून येत आहेत आणि त्यामध्ये कोणतीही घट झाली नाही अशा वेळी या निर्बंधांमध्ये ही सुट देण्यात आली आहे.

आता ई-पासची गरज नाही: सरकारने जाहीर केले की 2 सप्टेंबरपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात लोकांच्या प्रवासावर आणि माल वाहतुकीवर कोणतेही बंधन असणार नाही. आता लोकांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी किंवा ई-परमिट दाखविण्याची गरज भासणार नाही. याव्यतिरिक्त, खासगी बस, मिनी बस आणि इतर ड्रायव्हर्सद्वारे प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.

राज्य परिवहन आयुक्त यासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी करतील. सरकारने म्हटले आहे की ज्या बाह्य हालचालींवर पूर्वी बंदी होती ती तशीच राहील परंतु जिम आणि मंदिरे पुन्हा सुरू करण्याचा यात कुठलाही उल्लेख नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून महाराष्ट्र सरकारच्या गट अ आणि गट ब चे 100 टक्के अधिकारी कार्यालयात येऊ शकतील. सरकारने म्हटले आहे की खाजगी कार्यालये त्यांच्या 30 टक्के कर्मचारी क्षमतेसह त्यांच्या गरजेनुसार काम करू शकतात.

दर शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू? लोकप्रतिनिधींची मागणी, मनपामध्ये आढावा बैठक

नागपूर: कोरोनाशी सामोरे जाण्यात सर्व प्रयत्न करूनही शहरात बाधीतांची संख्या सातत्याने वाढतीच आहे, याशिवाय मृतांची संख्याही वाढत आहे. ज्यामुळे खासदार आणि आमदारांनी दर शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, विजय झलके, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, संदीप जाधव, तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी, वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे , डॉ विजय जोशी आदी उपस्थित होते. चर्चेनंतर महापौरांनी लोकप्रतिनिधींच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या.

सम-विषम नियमांत शिथिलता द्यावी: लोकप्रतिनिधींचे मते की शहरातील व्यावसायिक कार्यांसाठी सम आणि विषम नियम लागू केला आहे. दुकाने कमी खुली असल्याने चालू दुकानांमध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी असते. जर आणखी जास्त दुकाने खुली राहिली तर लोकांच्या गर्दीत फरकामुळे कोरोना वाढीवर काही प्रमाणात निर्बंध लागू शकतील. किमान 9 मीटर रुंदीच्या रस्त्यांवर हा नियम शिथिल करावा. चर्चेदरम्यान महापौर म्हणाले की कोरोना रुग्णांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. याची गंभीरपणे दखल घेत खासगी रुग्णालयांमधील रुग्णांची लूट आणि आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांनी बिलांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देशही दिले.

चाचणी केंद्रे वाढवा: या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दटके म्हणाले की, शहरातील विविध भागात चाचणी केंद्रे वाढवावीत. जेणेकरून केंद्रांवरील गर्दीवरही नियंत्रण लाभेल. चाचणीनंतर जिथे अहवाल उपलब्ध होईल तेथे ओपीडी व समुपदेशन सेंटरची व्यवस्था असल्यास रुग्णांना त्रास कमी होईल. खोपडे म्हणाले की खासगी रुग्णालयांमधील रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जाते. गरिबांवर अन्याय केला जात आहे. हे नियंत्रित करण्यासाठी उपायुक्त स्तरावरील समिती तयार करण्याची मागणीही त्यांनी केली. आयुक्त म्हणाले की सद्यस्थितीत 34 चाचणी केंद्रे आहेत. लवकरच 16 केंद्रे सुरू केली जातील. प्रत्येक केंद्रात किमान 100 चाचण्या होतील. खासगी रुग्णालयांबाबतच्या तक्रारींवर कारवाईची खात्रीही त्यांनी दिली.

बेड उपलब्धतेसाठी कॉल सेंटर: रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना कोठे दाखल करावे याबद्दल नातेवाईकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे. महानगरपालिकेकडून केंद्रीय स्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. आपण या मध्यवर्ती कॉल सेंटरच्या 0712-2567021 या क्रमांकावर संपर्क साधून बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती मिळवू शकता. यासह खासगी रुग्णालयांच्या निश्चित दराबाबतही माहिती इथे उपलब्ध होईल. जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर जोशी आणि आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केले.

श्रीगणेश विसर्जन: कडेकोट सुरक्षा व्यवस्था, अडिच हजाराहून अधिक पोलिस तैनात

नागपूर: गणेशोत्सवानिमित्त शहरातील दहा ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी परिस्थिती हाताळण्यास शहर पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांचे मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाईल. बंदोबस्तात एकूण 2528 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. त्यापैकी 7 डीसीपी, 14 एसीपी, 63 पीआय, 193 एपीआय आणि एएसआय, 1445 पुरुष आणि 229 महिला पोलिस कर्मचारी, 580 पुरुष आणि महिला होमगार्डही तैनात असतील.

फुटाळा, गांधीसागर वर खास लक्ष: यावेळी सुमारे 377 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिकांचे घरचे गणपतीमध्येही मोठ्या संख्येने विसर्जन केले जाणार आहे. यासाठी शहर पोलिसांनी विसर्जन मार्गावर 1 ते 12 सेक्टर तयार केले आहेत. त्यापैकी फुटाळा तलाव, गांधीसागर, नाईक तलाव, कळमना तलाव, सक्करदरा कृत्रिम टँक, सोनेगाव तलाव, कोराडी तलाव, महादेव घाट कामठी, वेना नदी, हिंगणा इत्यादी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

याशिवाय 31 महत्त्वाच्या विसर्जन स्थळांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाईल. दरवर्षीप्रमाणे फुटाळा तलावावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात 2 डीसीपी, 2 एसीपी, 6 पीआय, 12 एपीआय आणि एएसआय, 130 पुरुष आणि 45 महिला पोलिस, 65 महिला आणि पुरुष होमगार्ड आणि एसआरपीएफचे 2 सेक्शन तैनातीवर असतील. 27 महिला व पुरुष गृहरक्षकांव्यतिरिक्त क्यूआरटी आणि आरसीपी पथकही राखीव ठेवण्यात आले आहे.

नागरिकांनी गर्दी वाढवू नका: शहर पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शहरातील रहिवाशांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनस्थळी गर्दी वाढवू नये, असे आवाहन केले आहे. विसर्जनादरम्यान, नागरिकांनी तोंडाला मास्क, सॅनिटायझर वापर हे उपाय देखील वापरावेत. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीचे अनुसरण करा.

महाराष्ट्र मे अब ई-पास की जरूरत नहीं, फैसला दो सितंबर से लागू होगा‌‌: गृहमंत्री देशमुख

मुंबई: राज्य सरकार ने अनलॉक 4 के लिए दिशानिर्देश जारी कर दिए हैं। केंद्रीय गृह मंत्रालय के सुचनाओ के बाद राज्य सरकार ने भी लोगों को बड़ी राहत दी है। चौथे चरण का अनलॉक 1 सितंबर से शुरू होगा। ई-पास की शर्त को राज्य सरकार ने रद्द कर दिया है। हालांकि, स्कूल और कॉलेज बंद रहेंगे।

राज्य द्वारा जारी दिशा-निर्देशों अनुसार, मुंबई में उड़ानों की संख्या 1 सितंबर से दोगुनी होगी। जिले के भीतर यात्रा हेतु ई-पास की आवश्यकता नहीं होगी। होटल और लॉज भी खोले जाएंगे और मेट्रो और सिनेमाघर बंद रहेंगे।‌‌

स्कूल, कॉलेज के साथ-साथ अन्य शैक्षणिक संस्था और कोचिंग 30 सितंबर तक बंद रहेंगे। इसके अलावा, सिनेमा, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, मॉल में थिएटर, बार, ऑडिटोरियम आदि अगले आदेश तक बंद रहेंगे। अंतर्राष्ट्रीय उड़ानें भी बंद हो रहेंगी।

2 सितंबर से अनावश्यक दुकानें भी खुली रहेंगी। शराब दुकानें भी खुली रहेंगी। होटल और लॉज 100 फीसदी की क्षमता से शुरू हो सकेंगे। इसके अलावा, मुंबई और एमएमआर में सरकारी कार्यालय 30 % की क्षमता पर चलते रहेंगे। शेष महाराष्ट्र में, 50 % कर्मचारी सरकारी कार्यालयों में उपस्थित होंगे।

क्या शुरू और क्या बंद:
∆ 30 सितंबर तक नियंत्रण क्षेत्र में लॉकडाउन
∆ राज्य में होटल और लॉज 100 फीसदी शुरू होंगे
∆ हालांकि, स्कूल और कॉलेज 30 सितंबर तक बंद रहेंगे
∆ 30 सितंबर तक मेट्रो नहीं चलेगी
∆ निजी बसों और मिनी बसों को यात्रा करने की अनुमति है
∆ सिनेमाघर 30 सितंबर तक बंद रहेंगे
∆ मंदिरों और जिमों के बारे में अभी तक कोई घोषणा नहीं हुई है‌‌

कोरोना: वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांचे मातोश्री, ५ कुटुंबीय कोवीड पॉझिटिव्ह

नागपूर: पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या मातोश्री व कुटुंबातील इतर पाच सदस्य काल 29 ऑगस्ट रोजी कोविड१९ परीक्षणांत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे परीक्षणाचे अहवाल आज जाहीर झाले, तिवारी यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सर्व कुटुंबीय दहा दिवसांसाठी घरातच विलगीकरणात राहतील. सदर वृत्त स्वतः तिवारी यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर केलेले आहे

आमदार मोहन मते यांचे निधीतून कोवीड रूग्णांसाठी १० लाखांचे साहित्य

नागपूर: दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांचे निधीतून शासकीय रूग्णालयांतील कोवीड रूग्णांसाठी आज १० लाखांचे साहित्य देण्यात आले.

यात प्रामुख्याने फेस मास्क, पी पी ई किट, कापड, सॅनिटायझर इत्यादी स्वरूपातील हे साहित्य मेडिकलच्या अधिकाऱ्यांचे सुपूर्द करण्यात आले.

मेडिकल चे अधिष्ठाता डॉ सजल मित्रा, दक्षिण नागपूर अध्यक्ष देवेंद्र दस्तूरे, अमर टिचकुले, तुषार फडणवीस, श्रीकांत गुप्ता, प्रमोद चेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

दारूविक्री दुकाने, मॉल उघडले, तर मंदिरेच का बंद: कोराडी मंदिरात घंटानाद आंदोलन

नागपूर:- या कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्व मंदिरे, गुरुद्वारे, मशीदी सा-या बंद आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि भाजपाने आज महाराष्ट्रभर विविध मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले, नागपूरचे कोराडी श्रीमहालक्ष्मी मंदिरही कोरोनामुळे मार्चपासून सलग बंद आहे, आता मंदिर उघडण्यास्तव श्रीमहालक्ष्मी भक्तांनी चळवळीची भुमिका निवडली आहे, त्यासाठी आज घंटानाद आंदोलन मातेच्या मंदिरासमोर आयोजित करण्यात आले होते, या आंदोलनात भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते सहभागी होते. येथे सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आणि गाणी भजन गाऊन सरकारला जागवण्याचे कार्य करण्यात आले.

 

विरोध प्रदर्शन करणा-या भाविकांनी सांगीतले की सर्वजण मातेला भेटायला येत आहेत पण मंदिर बंद आहे, राज्य सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे, राज्यात दारूची दुकाने उघडली आहेत, मॉल्स उघडली आहेत, परंतु धार्मिक स्थळे उघडली गेली नाहीत ज्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाताहेत. आंदोलकांचा असा विश्वास आहे की मंदिरे उघडली जावीत व त्यासाठी शासनाने वेगवेगळे मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.

कार्यालय से नदारद सरकारी कर्मचारी! क्या है वजह?

नागपुर:- नगर निगम और नागपुर पुलिस ने संयुक्त रूप से सभी सरकारी कार्यालयों के कर्मचारियों को शहर के नागरिकों के ऑक्सीजन परीक्षण प्रक्रीया में भाग लेने का आदेश दिया है। नतीजतन, कर्मचारियों की कमी के कारण शुक्रवार को लगभग सभी सरकारी कार्यालय के कामकाज बंद थे।

कोरोना के कारण, पहले ही केवल 15 प्रतिशत कर्मचारियों को काम करने की अनुमति है। उसपर ऑक्सीजन परीक्षण के लिए उन्हें काम में लगाया जा रहा है। परिणामस्वरूप, दिनभर लोक निर्माण विभाग में कोई कर्मचारी मौजूद नहीं था। पुलिस स्टेशन के सभी कर्मचारियों को उपस्थित रहने का निर्देश दिया गया है। सभी को फोन करके थाने बुलाया जा रहा है।

लगातार फोन आने के कारण कर्मचारियों को अपना काम छोड़कर थाना पहुँचना पड़ा। शहर में कुल 28 पुलिस स्टेशन हैं। सुबह, सरकारी कार्यालयों में किसको कौनसा थाना मिला यही चर्चाए हुई। विश्वविद्यालय के कर्मचारियों को भी बुलाया गया है। उन लोगों के लिए भी आदेश जारी किए गए हैं, जो स्थानांतरित हुए उनके बदले जो आए उन्हें ऑक्सीजन परीक्षण के लिए बुलाया गया है।

कोरोना की बढ़ती घटनाओं को रोकने के लिए, मधुमेह, उच्च रक्तचाप आदि के साथ वरिष्ठ नागरिकों को की ऑक्सीजन स्तर का परीक्षण किया जाएगा। नगर निगम, जिला कलेक्टर कार्यालय और गैर-सरकारी संगठनों  के प्रतिनिधि घर-घर जाकर जांच करेंगे।

सुरक्षा का क्या?

हमें घर-घर जाकर ऑक्सीजन की जांच करने कहा गया है । यह अपील की जा रही है कि कोरोना के समय आवश्यक कार्यों के अलावा कोई भी घर से बाहर नहीं निकले। दूसरी ओर, लोगों को समूह बनाकर घर घर जाने के लिए कहा जा रहा है। इसके लिए कोई सुविधाए भी नहीं दी जा रही है। स्टाफ सवाल कर रहा है कि इस बीच, अगर कोई कोरोना से संक्रमित होता है तो कौन जिम्मेदार होगा।‌‌

गणेशोत्सव: तलावांमध्ये विसर्जनावर निर्बंध: मूर्ती घरीच विसर्जित कराव्यात~ महापौर

नागपूर:- कोरोना साथीच्या संकटाकाळामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. महामारी कायदा लागू आहे, रोगप्रसार रोखण्यास्तव जमावबंदी आहे त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी लोकांना त्यांच्या घरी मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, नागपूरातील सर्व तलावांमध्ये विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार कृत्रिम तलावांची व्यवस्था मनपाने जागोजागी केली आहे.

शुक्रवारी त्यांनी या व्यवस्थेचा आढावा घेतला. फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर तलाव येथे जाऊन अधिका-यांकडून याबाबत व्यवस्थेची व यंत्रणेची माहिती घेतली. उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती पिंटू झलके, संदीप जाधव, वीरेंद्र कुकरेजा, प्रकाश वराडे, हरीश राऊत, किरण बगडे, आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कृत्रिम तलावांची संख्या 50 टक्क्यांनी कमी: 

कोरोना संसर्गामुळे विसर्जनस्थळावर गर्दी होऊ नये, यास प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांची संख्या यंदा 50 टक्क्यांनी कमी केली गेली आहे. आवश्यकतेनुसारच कृत्रिम तलाव वापरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले आणि विसर्जनाच्या वेळी फक्त 2 जणांनाच परवानगी असेल असे सांगीतले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही तलावांवर विसर्जन करण्यास येऊ नये, संबंधित जवळचे जागेत मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले. यावर्षी “विसर्जन तुमच्या दारात” ही संकल्पना मनपाद्वारे राबविली जात आहे. 10 झोनमध्ये विसर्जन रथाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे संपर्क क्रमांकही मनपाच्या अधिकृत सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Exit mobile version