+92 ने सुरू होणाऱ्या क्रमांकाचे व्हाट्सअँप कॉल टाळा, लुटारू शोधताहेत सावज

भारतात ऑनलाईन खरेदी आता अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे, फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डे आणि ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेल वर भारतीयांच्या उड्यांनी त्यांचे सर्वर ठप्प झाल्याचे प्रताप आपणा भारतीयांच्याच नावावर आहेत, परिणामी आता कुटुंबात सर्वांकडेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत व प्रत्येक स्मार्ट फोनवर बॅंक कार्ड डिटेल व चॅटसाठी व्हाट्सअप हे अँपही आहेच.

व्हाट्सअप वर नेट कॉलिंग सुविधा हे उपयुक्त फिचर आलेलं आहे पण हेच फिचर सद्ध्या सर्वांसाठी डोकेदुखी बनत आहे कारण +92 क्रमांकावरून सुरू होणाऱ्या फोन नंबर वरून फोन येणे सुरू झालेले आहेत व हा क्रमांक पाकिस्तानचा कोड आहे.

पाकिस्तानी हॅकर्स आकर्षक डिस्काउंट व अन्य भुलावण्या देत आपले अकौंट रिकामे करण्याच्या सतत प्रयत्नात असतात, गेले ४ महिने असे कॉल आल्याचे रिपोर्ट देशभरात सर्वच ठिकाणी नोंदले गेलेयत. आपणास +92 पासून सुरू होणार्‍या नंबरवरुन कॉल आला तर तो कोणत्याही परिस्थितीत टाळा, गृह मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सायबर सुरक्षेसाठी असे आवाहन काहि महिनेआधीच केले आहे.

हे कॉल, ऑनलाईन फसवणूक करणार्‍यांकडून येऊ शकतात, जे आपले पैसे हडपू शकतात आणि कोणताही पुरावा मागे न ठेवता गडप होऊ शकतात. मोबाइलचा ताबा घेऊन बॅंक अकौंट डिटेल चोरने अथवा सिम क्लोनिंग करून दुरूपयोग हाच त्यांचा उद्देश्य असतो.

हे नंबर आपणाला लोकप्रिय नावाने सेव्ह दाखवतील, जसे: केबिसी इ. पण या फसवणूकीस आपण कदापी बळी पडू नये, याचा वापर संवेदनशील माहिती मागण्यासाठीही केला जाऊ शकतो, हे नंबर वापरणारे कॉलर्स आपले बँक तपशिल हडण्यासाठी आवश्यक ओटीपी किंवा बँक लॉगिन तपशिल यासारखे गोपनीय डेटा मिळवू पहातात.

तुम्हास भुलवण्यासाठी ते भिन्न तंत्र वापरतात, ते एखाद्या बँकेचे प्रतिनिधी, एखाद्या कंपनीच्या अधिकारी म्हणून विनामूल्य सहल वा भेटवस्तू देण्यास्तव तपशील मागतात एकदा आपण तो दिल्यास, मग काहीच करता येत नाही, आपला तपशील सामायिक केला तर मागे फिरता येत नाही. ते थेट दुसर्‍या (बनावट) खात्यात पैसे हस्तांतरन वा ऑनलाइन खरेदी करून आपले खाते साफ करू शकतात. नंतर कोणत्याही परिस्थितीत, पैसे परत मिळविणे जवळजवळ अशक्य आहे.

आपल्या व्हाट्सअपवरही असा कॉल आल्यास घाबरण्याची गोष्ट नाही पण असं झाल्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी करायच्या त्या अशा:
√ तो कॉल कदापि रिसीव्ह करू नये
√ पुर्ण रिंग वाजू देऊन बंद होऊ द्या अथवा कॉल कट करावा
√आपण चुकून उत्तर दिल्यास लक्षात ठेवा की आपल्याला आपले क्रेडेन्शियल्स, लॉग इन केलेला तपशील आणि कॉलवर ओटीपी कधीही सामायिक करायचा नाही.
√ काही उत्सुक असा कॉल एक्सेप्ट करतात, या नंबर वर कदापि कॉलबॅक करू नये अथवा मेसेज चॅट करून “तु कोन?” हे विचारू नये.
कारण एकदा का आपण चॅट सुरू केली की ते काहि ना काही बहाण्याने आपणास भुलवतील
√ यावर रिप्लाय ने आपणांस लिंक पाठवली जाते अथवा फोटो असतो जो क्लिक करणे घातक ठरते
√ उत्तम आहे की त्या नंबरला तुम्ही व्हाट्सअप वरून ब्लॉक करावे
√ ब्लॉक केल्यानंतर त्या नंबरच्या वापरकर्त्याकडून पुन्हा तुम्हाला मेसेज व कॉल येण्याची शक्यता संपते
√ याखेरीज ब्लॉक केल्यानंतर त्या क्रमांकाला रिपोर्ट करण्याची सुविधाही व्हाट्सअप मध्ये उपलब्ध आहे त्या सुविधेचाही वापर करावा जेणेकरून व्हाट्सअप त्या नंबर विषयी चौकशी करत त्याद्वारे मिसयुज होत असेल तर त्याला कायमचा रद्द/ ब्लॉक करू शकतो

या माध्यमाने हॅकर्स स्पॅमर्स फ्रॉडस्टर व्हॉट्सअॅप च्या एन्क्रिप्टेड कॉल सुविधेचा फायदा घेत सरकारी सुरक्षेपासून वाचू बघतात त्यामुळे असे कॉल फक्त रिपोर्ट नव्हे तर कंपनीस मेल करूनही कळवावे ज्यायोगे त्यांवर कारवाई होऊन ईतरांचीही लुबाडणूक थांबेल.

वेब आणि ईमेलनेही घोटाळे शक्य: कॉलसह, फसवणूक करणारे आपली फसवणूक करण्यासाठी वेब, ईमेल देखील वापरू शकतात. बनावट वेबसाइट्सद्वारे किंवा ईमेलद्वारे आपले क्रेडेन्शियल, आपली माहिती/ पैसे स्वेच्छेने देण्याच्या उद्देशाने – जसे कॉलच्या बाबतीत तसेच.
असे हल्ले टाळण्यासाठी विश्वासू साइटवरच व्यवहार करावेत. लक्षात घ्या आपली सुरक्षा आपल्याच हाती.

धोका अद्याप टळला नाही, कोरोना साखळी कमजोर होते आहे मात्र तुटलेली नाही आहे

नागपूर: कोरोनाचा कहर आता जरा कमी होताना दिसत आहे. शनिवारी बाधित रूग्णांची संख्या 627 होती. तसेच मरण पावणारेही फक्त 9 होते. तर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 86090 वर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यू 2767 झाले आहेत. डॉक्टरांच्या अंदाजानुसार रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण धोका टळलेला अजिबात नाही. पुढील महिन्यापासून थंडी वाढू लागल्यावर कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे.

शनिवारी 832 रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. यासह, आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 74717 पर्यंत पोहोचली आहे. 24 तासात जिल्ह्यात 6462 लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 2895 अँटीजेन चाचणींचा सर्वाधिक समावेश होता.

आता जिल्ह्यातील रिकवरी प्रमाण वाढून 86.77 टक्के झाले आहे. जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. एकूण 8606 सक्रिय प्रकरणे आहेत. ज्यामध्ये अर्ध्याहून अधिक लोक घरातच विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. जरी संक्रमित रूग्ण कमी होत आहेत, परंतु डॉक्टरांचा अंदाज आहे, धोका पूर्णपणे टळलेला नाही. पुढील महिना अधिक थंडीचा येईल. या स्थितीत, सर्दी, पडसे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कोरोना रूग्णांची संख्याही पुन्हा एकदा वाढू शकते. म्हणूनच डॉक्टरांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

86090 एकूण संक्रमित.
2767 चा मृत्यू
74717 बरे होऊन घरी
शनिवारी 627 सकारात्मक

‘बाबा का ढाबा” तर चमकला आता लक्ष द्या नागपूरच्या ‘डोसा आजी’कडे व तिच्या सह्रदयतेकडे

नागपूर: सोशल मीडिया ची ताकत काय असते ते गेल्या ४ दिवसापासून सर्व लोक विविध चॅनेलवर दिल्लीतल्या “बाबा का ढाबा” या स्टॉल चालवणाऱ्या वृद्धाच्या पालटलेल्या परिस्थितीतून पाहत आहेतच, यापूर्वीही गायिका राणू मंडल सोबत असा प्रसंग घडलेला आपण अनुभवलाय व सर्वसामान्य जनतेची साथ व सदिच्छा कशा कायापलट करतात याचे उदाहरणच सर्वांनाच दिसले असेल.

आपल्या नागपुरातही बरीचशी अशी स्थळे आहेत ज्यांत असे कैक ढाबेवाले बाबा आपल्या सदिच्छांची, मदतीची वाट पाहत आहेत. आज आम्ही आपणाला “डोसा आजी” विषयी सकाळी माहिती दिली होती, तिच्याचविषयीची सखोल माहिती अशी:

₹१० ला ४ डोसे विकणा-या 61 वर्षांच्या शारदा चोरघडे यांना “डोसा आजी” संबोधतात. सात वर्षापूर्वी गरीबी आणि उपासमारीस कंटाळून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय सुरू केला होता.

शारदा आजी तिच्या डोसा स्टॉलद्वारे कामगार आणि शाळकरी मुलांना ताजे आणि गरम डोसे खाऊ घालते आहे. जेव्हा केव्हा डोसा आजी कोणत्याही अडचणीत येते तेव्हा ती स्वत:ला सर्व काही ठीक होईल असे सांगून धीर देते.

लग्नानंतर तिने पतीचे अत्याचार सहन केले, आईचे निधनानंतर एकटेपण सोसले, अनेक दिवस उपाशी राहून काढले तरी तिची विचारसरणी सकारात्मक राहिली. सात वर्षापूर्वी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी डोसा विक्री सुरू केली. तेव्हा ती ₹२ मधे डोसा विकत असे.

जेव्हा लोकांनी तिला कमी किंमतीत डोसा विकण्याचे कारण विचारले तेव्हा ती हसू लागायची. म्हणायची मी इतकं दारिद्र्य पाहिलय मी आणि माझा मुलगा दोघेही भुकेले झोपलो. मला माहित आहे भूक म्हणजे काय. जेव्हा आपल्याला भुकेले राहावे लागते तेव्हा मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो.

ती स्वतःचे बळावर स्वतःचे घर चालवते. परंतु तरीही त्यांना वाटते की ते इतरांपेक्षा चांगले मिळवतात. म्हणून इतरांना मदत म्हणून कमी पैशात डोसा खायला घालने आवडते. अशी सह्रदयता असणा-्या या आजीस मदत करत पर्यायाने गरिब मजूर व शाळकरींना सहाय्य करूया व आपल्यातील माणुसकिचाही परिचय देऊया.

आमदार निवास कोविड केंद्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रिकामे

नागपूर: हिवाळी अधिवेशनाचे सत्र पाहता आमदार निवास इमारत क्र. २०१ मध्ये निर्मिलेले कोविड केअर सेंटर रिकामे केले गेले आहे. या इमारतीचे सॅनिटाईजेशन करण्यात आले आणि आता इमारत आठवडाभर बंद राहील.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून आमदार निवास इमारत क्र.२ व ३ चे कोविड केअर सेंटर बनवले गेले. येथे कोविड रूग्णांसाठी २२० खोल्या आरक्षित होत्या. ७ डिसेंबरपासून असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा प्रशासनाला एक महिन्यापूर्वी एक पत्र देऊन कोविड केअर सेंटर रिकामे करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे वर्क फ्रॉम होम स्थितीत असल्यामुळे या पत्रावर तातडीने प्रक्रिया होऊ शकली नाही. जिल्हा प्रशासनाने बुधवारी आमदार निवासस्थानाची इमारत क्र. 3 मधील केंद्र रिकामे करण्यास परवानगी दिली. 

यानंतर इमारत क्र. ३ कोविड केअर सेंटर रिकामे केले गेले. येथे 70 बेड आरक्षित होते. इमारत क्र. 2 ऑक्टोबर 15 पर्यंत रिक्त करण्यास सांगितले गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) इमारत क्र. २ येथे सॅनिटायझेशन करून कोणाच्याही प्रवेशावर बंदी घातली आहे. एका आठवड्यानंतर ही इमारत आतून रंगविली जाईल. देखभाल व दुरुस्तीची कामेही सुरू केली जातील.

महामेट्रो: सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण

नागपूर: महामेट्रोच्या रिच-4 चे 87% काम पूर्ण झाल्याने रिच-4 (मेट्रो रेल्वे ट्रॅक स्ट्रक्चर) साठी अखेरचा टप्पा पूर्ण झाला आणि प्रजापती नगर येथे 2329 क्रमांकाची उभारणी करण्यात आली. महा मेट्रोचे चार टप्प्यात बांधकाम सुरू असून रिच -1 आणि रिच -3 मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अन्य स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

रिच 4 या 8.30 कि.मी. मार्गावर (सीताबर्डी ते प्रजापती नगर) 9 मेट्रो स्थानकं प्रस्तावित आहेत. यात कॉटन मार्केट, रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओली, टेलिफोन एक्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक आणि प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा सेंट्रल एव्हेन्यू हा मुख्य मार्ग आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गावर अंदाजे 16 किमी (अप आणि डाऊन लाइन) पैकी 10 किमी. मेट्रो मार्गावर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 292 पैकी 281 पायवे पूर्ण झाली आहेत. या मार्गातच आनंद टॉकीज कॅम्पसमध्ये 231 मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम सुरू झाले असून भारतीय रेल्वे ट्रॅकवर 100 मीटर स्पॅन (3 मीटर गर्डर) ठेवण्यात येणार आहे.

या मार्गाचे व्यावसायिक महत्त्व पाहता या मार्गावर विविध प्रकारच्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. एकीकडे नागपूर शहर विस्तारत असताना, दुसरीकडे या मार्गावरील रहदारीही वेगाने वाढत आहे. या मार्गावर काम करत मेट्रोने चांगली खबरदारी घेतली आहे. येथे मेट्रो मार्ग सुरू झाल्यास मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, कॉटन मार्केट, इतवारी बाजार व अशा इतर भागात जाणे खूपच सोयीचे होईल.

मास्क न लावणा-या २२२ नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवार (९ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११००६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३८,६२,०००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४१, धरमपेठ झोन अंतर्गत ६०, हनुमाननगर झोन अंतर्गत १४, धंतोली झोन अंतर्गत १३, नेहरुनगर झोन अंतर्गत ९, गांधीबाग झोन अंतर्गत १६, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २०, लकडगंज झोन अंतर्गत १६, आशीनगर झोन अंतर्गत १६, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ५५३६ बेजबाबदार नागरिकांकडून रु २७ लक्ष ६८ हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. 

बिनामास्क भटक्यांची संख्या वाढतीच: 237 च्या विरोधात पथकाची कारवाई

नागपूर.: कोरोनाशी सामना करण्यासाठी लागू मनपाच्या सर्व उपाययोजना सक्ती असूनही, काही लोकांचे त्यांत समर्थन मिळत नाही. त्याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे बाहेर पडताना मास्क लागणे आवश्यक असूनही बरेच लोक मास्क न घेता बाहेर पडत आहेत. वेळ तर अशी आली आहे की या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

गुरुवारी मनपाच्या उपद्रव संशोधन पथकाच्या वतीने स्वतंत्र भागात वेगवेगळ्या कारवाई करून एकूण 237 लोकांना दंड ठोठावण्यात आला. 500 रु प्रति व्यक्ती एकूण ₹1.18 लाख दंड वसूली केला गेलेला आहे, आतापर्यंत एकूण 10784 लोकांवर उपद्रव संशोधन पथकाने कारवाई केली आहे. ज्यामध्ये ₹37,51,000 दंड वसूली केला गेलेला आहे

मनपा मुख्यालयातही कारवाई: उल्लेखनीय आहे की काही काळापूर्वीपर्यंत मास्क न घालण्यासाठी ₹200 दंड वाढवून तो ₹500 पर्यंत वाढविण्यात आला. असे असूनही नियम तोडणा-यांची संख्या कमी करता आलेली नाही. गुरुवारी केलेल्या कारवाईत लक्ष्मीनगर झोनमध्ये 42, धरमपेठ झोनमध्ये 45, हनुमाननगर झोनमध्ये 29, धंतोली झोनमध्ये 14, नेहरू नगर झोनमध्ये १२, गांधीबाग झोनमध्ये १६, सतरंजीपुरा झोनमध्ये १८, लकडगंज झोनमध्ये १२, आसिनगर झोनमध्ये 23, मंगळवारी झोनमध्ये 20 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. मनपा मुख्यालयात मास्क न घेता फिरणार्‍या ब-याच जणांवरही कारवाई करण्यात आली.

९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात

नागपूर, ता. ९ : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता येते असे पदमाकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पदमाकर चवडे यांना कोव्हीड – १९ चे लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेयो रुग्णालयमध्ये ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले. आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना ऑक्सीजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटटी देण्यात आली. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केला जात आहे. सध्या ४१ रुग्णांना उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.

सक्रिय प्रकरणं होताहेत कमी, परंतु खबरदारी घेणे फार महत्वाचे

नागपूर: आता याघडीला कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. एकीकडे मृत्यूसंख्या कमी झालेली आहे, तर दुसरीकडे पॉजिटिव्ह रुग्णही कमी झाले आढळत आहेत. परंतु असे असूनही प्रशासनाने मात्र कोरोना रोखथामासाठी खबरदारी घेण्याचे व लक्षणे आढळल्यास त्वरित तपासण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी 636 रुग्णांमध्ये संसर्ग होण्याची पुष्टी झाली. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण सक्रिय प्रकरणे 8828 झाले आहेत. यापैकी 5670 रूग्णांवर घरातच विलगीकरणात उपचार सुरु आहेत.

कोरोना विषाणूची तीव्रता कमी होत असल्याचे दिसते आहे. शुक्रवारी 24 तासांत एकूण 6809 लोकांची चाचणी केली गेली. यामध्ये, 636 लोकांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. यासह जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 85463 वर पोहोचली आहे. दरम्यान, 26 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 7 ग्रामीण आणि 13 शहरी रुग्णांचा समावेश आहे. तर 6 रुग्ण इतर जिल्ह्यातील होते. यासह आता मृतांची संख्या 2750 वर पोहोचली आहे.

निष्काळजीपणा नको: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 50594 चाचची करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही तपासाची गती कमी आहे. असे समजते की ग्रामीण भागात तपासणीची सुविधा पुरविली गेली आहे, परंतु लोक पहिल्या टप्प्यात त्या घ्यायला येत नाहीत. शुक्रवारी ग्रामीण भागात एकूण 234 रुग्ण पॉजिटिव्ह आढळले आहेत. 1271 लोकांना सुट्टी देण्यात आली. यासह आतापर्यंत 73885 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळेच आता जिल्ह्यातील रिकवरी दर वाढून 86.45 टक्के झाला आहे. जरी रुग्णांची संख्या कमी होत आहे. तरी डॉक्टरांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. थोडीशी निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबासाठी समस्या बनू शकते.

85463 एकूण संक्रमित.
2750 चा मृत्यू
73885 बरे होऊन घरी
शुक्रवारी 636 पॉझिटिव्ह

ट्रैफिक व्यवस्था सुचारू रूप से चलाने के लिए हाईकोर्ट ने लगाई विभाग को फटकार

शहर में यातायात नियोजन एक अहम चिंता का विषय बना हुआ है यातायात व्यवस्था अस्त व्यस्त होने के कारण हर दूसरे दिन कोई न कोई नागरिक  दुर्घटनाओं का शिकार हो रहा है।लेकिन पुलिसकर्मी  इन मुद्दों को नजरंदाज किए हुए है।

अवैध हॉकर्स के साथ बहुत से रास्तों व चौराहों पर अवैध पार्किंग के कारण सालों से वाहन चालकों को यातायात में कई तरह की मुसीबतों का सामना करना पड रहा है। छोटे-मोटे वाहनों के साथ ट्रक व बस वालों की मनमर्ज़ी चलती है।जहां रोड़ खाली दिखी वहीं ट्रकों व बसों का पार्किंग अड्डा बन जाता हैं।

ट्रैफिक व्यवस्था सुचारू रूप से चलाने के लिए हाईकोर्ट ने जिस तरह से बुधवार को पुलिस प्रशासन को फटकार लगाई।उसके बाद अब जनता के मन में एक ही प्रश्न उठ रहा है कि क्या सड़कों का ट्रैफिक परिचालन करने के लिए भी अब हाईकोर्ट को खुद को सड़कों पर उतरना होगा। शहर के कई महत्वपूर्ण मुद्दे है जो कि हाईकोर्ट में लंबे समय से अटके है लेकिन यातायात की चरमराती व्यवस्था व पुलिस प्रशासन की बेपरवाही के चलते हाईकोर्ट को विवशतापूर्वक खुद ही संज्ञान लेते हुए मामले को अपने हाथों में लेना पड़ा।

सिग्नल बंद होने पर भी कई वाहन चालक सिग्नल तोड़ के गाड़ियां आगे बढ़ाते रहते हैं।इतना होने पर भी  पुलिस कर्मचारी टस से मस नहीं हुए।चौराहों पर ट्रैफिक नियंत्रित करने के लिए एक पुलिस कर्मी जबकि चालान की कार्रवाई के लिए पूरा काफिला शामिल हो जाता है।कार्रवाई के दौरान कोई भी सिग्नल तोड़े या इससे किसी को कोई फर्क नहीं पड़ता है।

शहर के बहुत सारे परिसरों में फुटपाथ व सड़कों पर अवैध हॉकर्स ने अपनी दूकाने सजा कर कब्ज़ा जमा लिया है।इन अवैध हॉकर्स का इंतजाम मनपा भी अभी तक नहीं कर पायी है। धरमपेठ हो,सीताबर्डी मेन रोड हो या इतवारी,या नंदनवन अधिकांश परिसर में वैध हॉकर्स की आड़ में अवैध हॉकर्स ने सड़कों व फुटपाथ पर अपना रोब जमा लिया है।

महानगर पालिका व पुलिस प्रशासन इन अतिक्रमणकर्ताओं के खिलाफ कार्रवाई होती तो है लेकिन अतिक्रमण दस्ते के गुजरने से पहले ही स्थिति वहीं की वहीं हो जाती है।अतिक्रमणकर्ताओं को इतना साहस प्रशासन के अधिकारियों से मिलता है।एक छोटे दूकानदार की पहचान पुलिस कर्मी से लेकर महानगर पालिका अधिकारी तक होती है।यही कारण है कि अधिकारियों की मिली भगत से शहर में अतिक्रमण बढ़ता ही जा रहा है।

वेस्ट हाईकोर्ट रोड, रामदासपेठ, जरीपटका , इतवारी, मुंजे चौक, की तरह कई परिसरों में यातायात के साथ पार्किंग व्यवस्था को लेकर कोई नियोजन ही नहीं है। अतिक्रमण और पार्किंग से 40 फूट की सड़क भी 4 फूट की बन जाती है।इस स्तिथि में नागरिकों को हर परिसर में लंबे ट्रैफिक जाम की समस्या से जूंझना पड़ता है।तो भी प्रशासन अवैध पार्किंग पर कार्रवाई करने में आना कानी करती है।

आरटीओ का पुलिस प्रशासन और पुलिस प्रशासन का महानगर पालिका से कोई समन्वय नहीं होने पर शहर में सड़क दुर्घटनाए बढ रही है।

पहले साप्ताहिक बाजार हफ्ते में एक दिन लगता था, लेकिन अब साप्ताहिक बाजार के नाम पर हर दिन सड़कों पर सजे हुए सब्जी-भाजी दूकानों ने नागरिकों का सड़क पर चलना मुश्किल कर दिया है।अब सड़कों पर सब्जी मार्केट ही नहीं बल्कि बिरयानी सेन्टर और फास्ट फूड का भी मेला लगा रहता है।

प्रशासन की बेपरवाही के कारण हाई कोर्ट के न्यायाधीश पिछले कुछ माह से स्वयं ऐतिहासिक स्थानों के संरक्षण, सौंदर्यीकरण और यातायात व्यवस्था को सुधारने के लिए सड़कों पर उतरना पड़ रहा है।यदि हाईकोर्ट को ही शहर के विकास और देखरेख पर ध्यान देना है तो अनेक विभाग में हाई पोस्ट पर बैठे अधिकारी को किस काम का वेतन दिया जा रहा यह सवाल जनता पूछ रही है। 

पहले कस्तूरचंद पार्क, फिर जीरो माईल और अब ट्रैफिक व्यवस्था को सुचारू करने के लिए हाईकोर्ट आगे आया। अब शहर की किस प्रॉब्लम को लेकर अधिकारियों को फटकार लगाएगी यह कुछ कहा ही नहीं जा सकता।

Exit mobile version