सतरंजीपुऱ्यातील नागरिकांची विलगीकरण कक्षात रवानगी

नागपुर:- कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉट स्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवित असल्याने तेथील बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहचेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती.

त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी १००, आजच्या तारखेत ४५० नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून उद्यापर्यंत हा आकडा १२०० च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चमूला खरी माहिती पुरवा. समाजाचे शत्रू बनू नका. मानवतेचे दूत बना, असे आवाहन पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

News credit to:- NMC

सहा रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी

नागपूर:-कोरोनाच्या महासंकटात नागपूर शहरासाठी एक आनंददायी बातमी आहे. कोरोनाची लागण झालेले आणि उपचार घेत असलेले सहा रुग्ण पूर्णतः बरे झाले असून सोमवारी (ता. २७) त्यांना सुटी देण्यात आली.

पूर्णतः बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये एक रुग्ण कामठी, एक सतरंजीपुरा आणि ४ जबलपूरचे ज्यांचे वास्तव्य सध्या मोमीनपुरा येथे होते, यांचा समावेश आहे.या सर्व सहाही रुग्णांना १२ एप्रिल रोजी आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.

उपचारानंतर १४ व्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी आणि १५ व्या दिवशी म्हणजे २६ एप्रिल रोजी त्यांचे नमुने घेण्यात आले. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्व सहाही जणांना आज घरी पाठविण्यात येत असल्याचे मेयो रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले.सर्व रुग्णानी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्याचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले. उपचार करणाऱ्या चमूनेही त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

News credit to:- NMC

गरोदर महिलांच्या तपासणीसाठी मनपाची विशेष चमू

नागपूर:- लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी होणे तसेच आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष चमू निर्धारित केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून यासाठी विशेष रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेद्वारे स्त्री रोग तज्ज्ञ गरोदर महिलांच्या रहिवासी क्षेत्रात जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. रविवारी (ता.२६) शहरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा भागामध्ये चमूद्वारे गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रतिबंधीत क्षेत्रातील अती धोकादायक गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून या ठिकाणच्या गरोदर महिला शोधून त्यांची आरोग्य तपासणी मनपाद्वारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तपासणीसाठी या महिलांना कोणत्याही रुग्णालयात जायची गरज नाही. त्या राहत असलेल्या ठिकाणी मनपाची चमू येईल व स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या जातील. गरोदर महिलांची रक्त, लघवी तपासणी किंवा लसीकरण आणि आवश्यक औषधोपचार या सर्व सुविधा मनपाद्वारे घरपोच देण्यात येत आहेत. रविवारी (ता.२६) कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागात जाऊन येथील गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जन्माला येणा-या बाळाला कोणत्याही धोका राहू नये, आई आणि बाळाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने मनपाद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य तपासणीसह घेणार ‘स्वॅब’
गरोदर महिलांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांचा कोरोना चाचणीसाठी ‘स्वॅब’ही घेण्यात येणार आहे. यासाठी महिलांना विलगीकरण कक्षात राहण्याची गरज नाही. ‘स्वॅब’चा अहवाल निगेटिव्ह राहिल्यास त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जातील. अत्यंत सुरक्षितरित्या हे ‘स्वॅब’ घेण्यात येते. रुग्णवाहिकेमध्ये कोरोना ‘स्वॅब’ घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ‘स्वॅब’ घेणारे डॉक्टरचे फक्त दोन्ही हात बाहेर येतात व चाचणी केली जाते. संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षितरित्या ही चाचणी केली जात आहे. आई आणि होणा-या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चाचणी होणे आवश्यक आहे. स्वतःला आणि येणा-या बाळाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी शहरातील सर्व ठिकाणच्या महिलांनी तपासणीसाठी पुढे यावे व मनपाच्या आरोग्य चमूला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

News Credit To:- NMC

NMC Strict on People Posting False Messages on Social Media

Nagpur:- In the case of false messages circulating on social media about the spread of the virus, the civic body in the town seems to be very strict. As mentioned, in the name of NMC chief Mr. Tukaram Mundhe, false news about Nag river being clean in the city was circulated over social media. According to sources, the fake message first appeared on 23 April with the NMC chief’s name informing the same.

The message came in the form of memes generated on NMC claiming that the low rate of contamination has made the city’s sewage water potable to everyone. It further said the NMC’s supply water will, therefore, be supplied from the city’s Nag River. On the other hand, when this message reached the NMC and its president, everyone found it to be fake news because none of those decisions were taken in the city to supply water from the Nag river as it is still polluted.

And NMC was swift to file a complaint against the man who posted this message to the Police on social media. According to sources, the complaint has been recorded at Sadar Police Stations against this fake news message with different parts of the IPC. The Police have earlier warned people not to spread the fake news on social media. They had said they would seriously punish anyone who indulges in the same. Stay tuned only with us to learn more about them, and others.

कुटुंबांची माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे/कोरोना संसर्गात संबंधित व्यक्ति:- तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची आरोग्य विभागाची चमू अहोरात्र प्रयत्न करत आहे. सतरंजीपुराच्या त्या एक रुग्णामुळे २३५ च्या वर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने आपल्या वतीने तेथील ३० घरांमध्ये राहणा-या १५० नागरिकांना ‍विलगीकरण कक्षात पाठविले आहे.

तथापि लोक याबददल माहिती देत नाही किंवा प्रशासनाची दिशाभूल करीत असल्यामुळे या कामात अडचण निर्माण होत आहे. नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

मनपाला सहकार्य करा : आयुक्त
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशाप्रकारे माहिती लपविणे हे दुर्देवी आणि क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भावनिक आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी पलायन करण्याऐवजी मनपाच्या चमूला सहकार्य करावे आणि आपला उपचार करुन घ्यावा. ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाईल जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येईल. जर कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचा उपचार केला जाईल. त्यांनी आवाहन केले की नागरिकांनी समोर येऊन मनपाच्या चमूला सहकार्य करावे. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. नागरिकांनी नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आयुक्त म्हणाले.

असेच एक प्रकरण शुक्रवारी रात्री (ता. २४) झाले. कळमना क्षेत्राच्या एका गोदामामध्ये लपून बसलेल्या १२ नागरिकांना मनपाच्या चमूने पोलिस विभागाच्या मदतीने पकडून त्यांना आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.

विजयनगर, कळमना येथील ज्या गोदामामध्ये त्या परिवाराने आसरा घेतला होता. त्याचा दिवा रात्रीच्या वेळेस सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली. त्यांनी पोलिसांना याबददलची सूचना दिली.

शुक्रवारी रात्रीला उशिरा आरोग्य विभाग मनपाची चमू आणि पोलिस विभागानी संयुक्तरित्या तेथे धाड टाकली आणि तिथे लपून बसलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात पाठविले. ही कारवाई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात लकडगंज झोनचे झोनल अधिकारी डॉ.उमेश मोकाडे यांच्या उपस्थितीत झाली. कळमना पोलिस स्टेशनचे अधिकारी सुध्दा यावेळी उपस्थित होते.

सतरंजीपुराच्या एका नागरिकाला दोन दिवसापूर्वी त्याच क्षेत्रात आरोग्य विभागाच्या चमूने विलगीकरण कक्षात पाठविले. त्याला त्याच्या परिवाराबददल माहिती विचारली तर त्याने आरोग्य विभागाची दिशाभूल केली की त्याचा परिवार बिहारमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या चमूने जेव्हा अधिकची माहिती घेतली तर माहिती मिळाली की त्याचा परिवार नागपूर मध्ये कुठेतरी दडून बसलेला आहे.

सतरंजीपुराच्या ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोघे उपचारानंतर घरी परतले

शहरात कोविड-१९ रुग्ण संख्येने शतक गाठल्याने एकीकडे चिंता वाढली असतानाच कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘त्या’ रुग्णाच्या संसर्गाने बाधित दोघे पूर्णपणे बरे झाल्याने कोरोना विरोधात लढा देणा-या प्रत्येकाचे मनोबलही उंचावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) प्रशासनाने टाळ्या वाजवून या दोन्ही रुग्णांना निरोप दिला.
शहरातील ५६ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरण्याचे कारण बनलेल्या आणि २३५ जणांच्या संसर्गासाठी धोका ठरलेल्या सतरंजीपुरा येथील ‘त्या’ मृत कोरोनाग्रस्ताचे मुलगा आणि मुलगी आज (ता.२४) कोरोनामुक्त होउन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) घरी परतले.
५ एप्रिलला मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा बडी मस्जीद परिसरातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या रुग्णामुळे शहरातील २३५ जणांना कोविड-१९च्या संसर्गाचा धोका निर्माण झाला तर ५६ कोरोनाबाधित ठरले. ‘त्या’ रुग्णाच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनपाच्या ‘कोविड कंट्रोल सेंटर’मध्ये नेण्यात आले. ७ एप्रिलला ‘त्या’ रुग्णाची ३५ वर्षीय मुलगी व ३० वर्षीय मुलाचे ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आले. तेव्‍हापासून दोघांवरही मेडीकलमध्ये उपचार सुरू झाले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह डॉ.कांचन वानखेडे, डॉ. फैजल, डॉ. स्नेहल, डॉ. मुरारी सिंग, डॉ.श्याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ.विपुल मोदीख डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट श्री.चक्रबर्ती यासर्वांसह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. चौदाव्‍या दिवशी २१ एप्रिलला आणि पंधराव्या दिवशी २२ एप्रिलला देण्यात आलेले दोघांचेही दोन्ही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आले. 
त्यानंतर इतर आवश्यक सर्व तपासण्या करून शुक्रवारी (ता.२४) दोघांनाही सुट्टी देण्यात आली व सुखरूप घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे.

News credit:- NMC

 

NMC scans all patients with TB, finds 4 unwell

Nagpur Updates: The Nagpur Municipal Corporation (NMC) examined 2,246 persons suffering from tuberculosis (TB) to contain deaths and spread of Covid-19 cases from one relation as in Satranjipura case. The first and only death of Covid-19 in City so far, the 68-year-old resident of Satranjipura, was a patient with TB. His 56 members of his family and related associates have so far tested positive.

Municipal commissioner Tukaram Mundhe and his team including chief medical officer Dr. Yogendra Savai, additional medical officer Dr. Praveen Gantawar and others have already protected 25 lakh of the city’s 30 lakh population under a door-to-door survey of high-risk patients.

Mundhe told that “our team will track patients with TB on a regular basis. If required, we can easily isolate them, as we have their address and phone numbers. The next step is to reach out to all chronic obstructive pulmonary disease (COPD) sufferers. Patients with TB and COPD are people at high risk for Covid-19. In the case of Satranjipura we have witnessed the effects, “he said.

Dr. Savai said, “In the last nine days our drive has covered 2,246 patients with TB. The remaining 1,245 TB patients are registered with the government and 1,001 are private registered patients. Our teams reached all of them into their homes and directed them to regularly take medicines to protect them from Covid-19. They found four patients suffering from fever and cough.

We advised them to get immediately handled what they are doing. “Dr. Savai added,” NMC will start driving from Friday to reach out to patients with COPD. In our door-to-door survey of high-risk people, we have found people with COPD. “Dr. Savai also said TB and COPD patients are the ones who will need oxygen in case they get infected with coronavirus, so we leave nothing to chance.

नागपुरातील भालदारपुरा परिसर सील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

नागपूर: शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत मनपातर्फे सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसर, गांधीबाग महाल झोन मधील बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२, आसीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर, सतरंजीपुरा झोन अंतर्गत दलालपूरा प्रभाग क्रमांक २१, मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ अंतर्गत प्रभाग १२ आदी भाग सील करण्यात आले आहेत. या सर्व भागांमध्ये मनपाद्वारे दैनंदिन अत्याआवश्यक सामुग्रीही पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग महाल झोन अंतर्गत भालदारपुरा प्रभाग क्रमांक १९ या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.या आदेशानुसार गांधीबाग महाल झोन क्रमांक ६ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ च्या निश्चित केलेल्या कॅटेनमेंट एरिया दक्षिण-पूर्वेस चिटणीस पार्क (घाटे रेस्टॉरेंट), उत्तर-पूर्वेस अग्रसेन चौक, उत्तर-पश्चिमेस तारेकर भवन पोस्ट ऑफिस, दक्षिण-पश्चिमेस टाटा पारसी स्कूल हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला सहकार्य करा!

कामासाठी शहरात आलेले अनेक लोक लॉकडाउनमुळे शहरात अडकले आहेत. या लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. दररोज हजारो गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था मनपाच्या माध्यमातून करीत आहेत, हे अभिनंदनीय कार्य आहे. आजच्या स्थितीत जास्तीत जास्त गरजूंपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. या कार्यासाठी शहरातील नागरिकांनी पुढे येउन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत. बुधवारी (ता.२२) महापौर संदीप जोशी व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मैत्री परिवार संस्था व लॉयन्स क्लब या दोन संस्थांच्या वतीने सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट दिली. यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, मैत्री परिवार संस्थेचे प्रा.संजय भेंडे, प्रा.प्रमोद पेंडके, रोहित हिमटे, सीएजी ग्रुपचे विवेक रानडे, लॉयन्स क्लबचे विनोद वर्मा, श्री.कौशिक, श्रवण कुमार उपस्थित होते.
महापौरांनी दोन्ही संस्थांमार्फत सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ची आणि त्यामार्फत केल्या जाणा-या कार्याची माहिती जाणून घेतली. मनपाच्या माध्यमातून होत असलेल्या सेवा कार्याबद्दल मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या कार्याचे कौतुक करीत महापौर संदीप जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
महापौर म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउनला सहकार्य करीत आहे. आज शहरात विदर्भातील आणि परराज्यातील अनेक विद्यार्थी, नोकरदार, विस्थापित कामगार अडकले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि रेशन कार्ड नसलेल्या अनेकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत या नागरिकांच्या मदतीकरीता, त्यांना दोन वेळचे जेवण किंवा अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. दीनदयाल थालीच्या माध्यमातूनही अनेकांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आजघडीला रोज ४५ हजार लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. यासाठी अहोरात्र काम करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास पात्र आहे. मात्र गरजूंना मदत पोहोचविण्यासाठी मनपाचे हात अधिक बळकट करण्याची गरज आहे. या सेवा कार्यासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छिणा-यांनी पुढे यावे, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
मैत्री परिवार संस्थेच्यावतीने शहरात सुरेंद्रनगर, वझलवार लॉन धरपेठ आणि अत्रे लेआउट या तीन ठिकाणी ‘कम्यूनिटी किचन’ चालविले जात आहेत. सुरेंद्रनगर आणि वझलवार येथील किचनमधून शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, भाड्याने राहणा-या व्यक्ती आदींना दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक हजार असे दोन्ही किचनमधून दररोज चार हजार जेवणाचे डबे पोहोचिण्यात येत आहेत. तर अत्रे लेआउट येथील किचनमधून सकाळी ५०० व सायंकाळी ५०० असे दररोज एक हजार लोकांपर्यंत जेवण पोहोविण्यात येत आहे.
लॉयन्स क्लबच्या माध्यमातून मानवसेवा नगर सेमीनरी हिल्स टीव्‍ही टॉवर येथे ‘कम्यूनिटी किचन’ सुरू करण्यात आली आहे. या किचनमधून हजारीपहाड, पांढराबोडी, सुदामनगरी, फुटाळा या वस्त्यांमध्ये दररोज १६०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. रेशन कार्ड नसणा-यांनाही लॉयन्स क्लबद्वारे जीवनावश्यक साहित्यांची किट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

४४ स्वयंसेवी संस्था, १५ दानदाते, नउ जणांकडून आर्थिक मदत
लॉकडाउनमध्ये गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला ४४ स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या स्वयंसेवी संस्था ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणारे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. तर ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणा-या अन्नासाठी शहरातील १५ समाजसेवींची मदत प्राप्त झाली आहे. हे दानदाते जेवणाची आवश्यक सर्व साहित्याची मदत करीत आहेत. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था स्वत:च्या खर्चातून जेवण तयार करतात किंवा अन्न साहित्याची मदत करतात. या संस्थांना मदतीसाठी नउ सेवाभावी नागरिक सरसावले आहेत. या नागरिकांमार्फत संस्थांना परस्पर आर्थिक मदत करण्यात आली आहे. यासर्व संस्थांच्या कार्यावर नियंत्रण, त्यांचा लेखाजोखा आणि पाठपुरावा मनपातर्फे केला जातो. या सर्व सेवाभावी स्वयंसेवी संस्था, समाजसेवी नागरिकांच्या मदतीने आजघडीला ४५ हजार लोकांना मदत पोहोचविली जात आहे. आजच्या स्थितीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत.

शहराबाहेरील १३७५ नागरिक बेघर निवा-यात आश्रयीत
लॉकडाउनमुळे शहरात अडकलेले नागपूर बाहेरील १३७५ नागरिक मनपाच्या शहरी बेघर निवा-यामध्ये आश्रयाला आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या मध्यप्रदेशातील नागरिकांची आहे. मध्यप्रदेशातील ६९३ नागरिक बेघर निवा-यात निवास करीत आहेत. तर नागपूरच्या जवळच्या भागातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, तुमसर, बुलडाणा आणि पुणे या सर्व भागातील २९६, छत्तीसगढ येथील ३५, उत्तरप्रदेश १२९, बिहार ८, तेलंगना १६, आंध्रप्रदेश ४, कर्नाटक १, राजस्थान १५९, झारखंड १३, हरियाणा १२, ओडिशा ४ आणि इतर ५ असे एकूण १३७५ नागरिक मनपाच्या शहरी निवारा केंद्रात वास्तव्यास आहेत.
२७ ‘कम्यूनिटी किचन’साठी सरसावलेल्या संस्था व व्यक्ती
अ.क्र. —— जेवण तयार करणा-या संस्था ——– संबंधित व्यक्ती
१ ———-ग्रुप ऑफ नागपूर फ्रेन्ड्स-मॉ———–आकाश काटोले
२———अन्न अमृत फाउंडेशन व इस्कॉन——–राजेंद्र रमन
३———-छत्तरपूर फॉर्मस्, लॉफ्टर क्लब———श्री. अभिषेक
४———-लॉफ्टर क्लब————————–किशोर ठुठेजा
५———-पूर्वा ऑटोमोबाईल मित्र परिवार व जागरण फाउंडेशन —–अशोक बंब (जैन)
६———-जलाराम मंदिर ट्रस्ट—————–दिलीप ठकराल
७———-लॉयन्स क्लब————————विनोद वर्मा
८———–सुसंस्कार बहुद्देशिय शिक्षण संस्था दिव्यानी अभिनव सहकारी संस्था———-चंद्रशेखर भिसीकर
९———–प्रियदर्शनी बहुद्देशिय सहकारी संस्था————–भास्कर पराते
१०———नागपूर महिला मंडळ—————श्री. नारनवरे
११———-शगुन महिला मंडळ—————श्री. राय
१२———मैत्री परिवार संस्था (सुरेंद्र नगर)—–चंदु पेंडके
१३———मैत्री परिवार संस्था (अत्रे लेआउट)—–चंदु पेंडके
१४———स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट————–प्रवीण पटेल
१५——–राष्ट्रीय सेवा योजना, नागपूर विद्यापीठ——–केशव वाळके १६——–रतन पॅलेस सोसायटी——————-गणेश गांधी १७——-मैत्री परिवार संस्था आणि सीएजी ग्रुप (वझलवार लॉन)——चंदु पेंडके १८———बडी मारवाड माहेश्वरी पंचायत भवन, हिवरी नगर———-दिनेश सारडा १९———एमएसआरटीसी एम्प्लॉई सोसायटी गणेशपेठ————-एमएसआरटीसी एम्प्लॉई सोसायटी गणेशपेठ २०——–लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळ————–रमण सेनाड २१———हॉटेल राजधानी————————-संजय जवाहारानी २२———पॉवर ऑफ वेलफेअर फाउंडेशन——शिल्पी बागडी २३———सरिता कौशिक————————-सरिता कौशिक २४——–श्री सतगुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट———श्री. महाजन २५——–निरजा पठनिया/नेहा पटेल————निरजा पठनिया/नेहा पटेल २६——-प्रफुल्ल देशमुख—————–प्रफुल्ल देशमुख २७——-शालिनी सक्सेना—————-शालिनी सक्सेना

मेयर संदीप जोशी यांनी नागपूरच्या पत्रकारांची विशेष कोरोना टेस्ट घेण्यासाठी स्तुत्य उपक्रम केले

नागपूर महानगरपालिका, नागपूर(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक                                                         ता. २० एप्रिल २०२०

नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी

महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार

नागपूर, ता. २० : मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसार माध्यम क्षेत्रात काम करणा-या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.

महापौरांच्या पुढाकारातून शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी २१ आणि २२ एप्रिलला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेण्यात येणार आहे. मंगळवारी २१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची सकाळी ९.३० वाजता तर बुधवारी २२ एप्रिलला प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींची चाचणीही सकाळी ९.३० वाजतापासून करण्यात येणार आहे.

नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार दिवस रात्र कार्य करीत आहेत. सर्वत्र कोरोनाचा धोका असतानाही हे प्रतिनिधी जीवाची पर्वा न करता अनेक ठिकाणी जाउन जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.

अशा स्थितीत त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांच्या परिवाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो हॉस्पीटल) जाउन ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Exit mobile version