दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना अटींच्या अधीन राहून परवानगी

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता.४) घेतला आहे. 

शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय मनपा झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही मनपा झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खाजगी कार्यालयासह दारुची दुकाने, वाईन शॉप, पानठेले, शॉपींग मॉल, सलून, स्पा आदी सर्व बंदच राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपूर शहरामध्येही १५ मे पर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना केवळ काही गोष्टींसाठीच शिथिलता देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही त्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

नागपूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे. मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या निर्णयामध्ये तीन महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी शिथिलता दिली आहे. शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सहा झोनमध्ये रहिवासी क्षेत्रातील, निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नमूद क्षेत्रातील इन सीटू बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे.

यासाठी बांधकामस्थळी कामगारांच्या निवासाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय नमूद क्षेत्रातील शासकीय कार्यालये १० टक्के उपस्थितीसह सुरू करण्याबाबत सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व संबंधितांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शहरातील कोणत्याही भागात दारूची दुकाने किंवा वाईन शॉप, पानठेले, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाबत कोणतिही परवानगी नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतिही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बुध्द पौर्णिमा दिनानिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत

‘बुध्द पौर्णिमा’ दिनानिमित्त गुरुवार दि. ०७ मे, २०२० ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दि.०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगीत साधारण सभेतील मंजूर ठराव क्रं.२४० दि. ०२/०७/२०१८ अन्वये मा. आयुक्त यांचे दि. ०३/०८/२०१८ चे मंजूरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. 

त्यानुसार गुरुवार दि. ०७ मे, २०२० ला ‘ बुध्द पौर्णिमा’ दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

News Credit To:- NMC

शहरातील ‘हॉटस्पॉट’ कोरोनामुक्त करण्यासाठी मनपा आयुक्तांचा ‘मास्टर प्लॉन’

नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॉन’ तयार करण्यात आला आहे. या ‘मास्टर प्लॉन’ नुसार ‘हॉटस्पॉट’मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येणा-या लोकांचा शोध घेउन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे व सर्वांचे कोरोना ‘स्वॅब’ घेतले जात आहे. 

मनपा आयुक्तांच्या या ‘मास्टर प्लॉन’ नुसार कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा भागात कार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत सतरंजीपुरा भागातील १७०० पेक्षा जास्त जणांना ‘क्वारंटाईन’ करून मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’ मध्ये आणण्यात आले आहे.

आजघडीला शहरात कोरोनाचे १३४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी बहुतांशी रुग्ण हे सतरंजीपुरा भागातीलच आहेत. त्यामुळे या भागातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मनपातर्फे केले जात आहेत. सतरंजीपुरा परिसरात एका कोरोनाबाधित व्यक्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाची मोठी साखळी निर्माण झाली.

ही साखळी खंडीत करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या परिसरातील २८० घरांमधील १७०० पेक्षा जास्त लोकांना ‘क्वारंटाईन’ करून त्यांना मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. यासर्वांचे ‘स्वॅब’ घेण्याचे काम सुरू आहे. ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह येणा-या रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारही सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत १४५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुण आढळले असून यापैकी ४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे ९६ ‘ॲक्टिव्ह’ केसेस असून त्यापैकी ८८ रुग्ण फक्त सतरंजीपुरा परिसरातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे अहोरात्र काम सुरू आहे. नागरिकांनीही कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

News Credit To:- NMC 

दोन हजारांवर नागरिकांनी स्वगृही जाण्याकरिता मनपाकडे केला अर्ज

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेनेही त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला दाद देत नागपुरातून बाहेर जाण्यासाठी सुमारे दोन हजार व्यक्तींनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज केले आहेत.

यासाठी नागपूर महानगरपालिकेने https://forms.gle/ra3cySfPtBeVBvzi6 ही लिंक जारी केली आहे. त्या लिंकवर गेल्यानंतर असलेला फॉर्म नागरिकांना भरायचा होता. नागपूर महानगरपालिकेने जाहीर केल्यानंतर शनिवारी (ता. २) दिवसभरात सुमारे एक हजारांवर नागरिकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले.

याव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या बेघर निवाऱ्यातही परराज्यातील अनेक मजूर आहेत. त्यातील ज्या मजुरांना त्यांच्या स्वगृही जायचे असेल त्यांची माहिती देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निवारा व्यवस्थापकांना दिले होते. तेथून आणि अन्य ठिकाणाहून ऑफलाईन अर्जाची संख्या ही सुद्धा एक हजारांच्या घरात आहे.

ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांचा आकडा मिनिटामिनिटाला वाढत असून सायंकाळी ६ वाजतापर्यंत १०५२ व्यक्तींनी अर्ज केले होते. ज्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांना नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी संपर्क करून त्यांच्या जाण्यासंदर्भातील व्यवस्थेची माहिती देतील. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या सुविधेबद्दल अनेक नागरिकांनी मनपाचे आभार मानत मनपाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर आभार मानले आहे.

News Credit To:- NMC

नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू

नागपूर:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र भाजी बाजारात या निर्देशाचे ग्राहक आणि दुकानदारांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय वाढीव दरामध्येही भाजी विक्री होत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. 

त्यामुळे शेतकऱ्यांकडून माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावा या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून आठ रस्ता चौकातील लक्ष्मीनगर मैदानात शहरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ साकारण्यात आले असून त्याचा गुरूवारी (ता.३०) शुभारंभ झाला. यावेळी महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ला भेट देउन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व शेतकरी आणि ग्राहकांशीही संवाद साधला.

दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गुरूवारी (ता.३०) सकाळी ६ वाजता ‘कम्युनिटी मार्केट’ला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या बाजारात सोशल आणि फिजिकल डिस्टंसिंगची पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. भाजी, फळांचे स्टॉल्स योग्य अंतरावर लावण्यात आले असून त्यापुढे पाच फुटाच्या अंतरावर चौकोन आखण्यात आले आहेत.

या चौकोनामध्ये खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत. शिस्तीमध्ये सुरक्षितरित्या भाजी खरेदी करता यावी यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांच्यासाठी रांगेत खुर्च्याही लावण्यात आल्या आहेत. बाजार संपल्यानंतर संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे.

दररोज सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत नागरिकांच्या सुविधेसाठी बाजार लावण्यात येत आहे. या ‘कम्युनिटी मार्केट’मुळे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत माफक दरात पोहोविले जात आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा मिळत आहे. भाजी विक्री करताना किंवा खरेदी करताना कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टसिंगची पायमल्ली होउ नये किंवा संसर्गाचा धोका निर्माण होउ नये यासाठी दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. नागरिकांना आवश्यक मदत त्यांच्यामार्फत केली जाते. बाजारात भाजी खरेदी करायला येताना प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक आहे.

तर शहरात इतर ठिकाणीही सुरू होणार ‘कम्युनिटी मार्केट’
लक्ष्मीनगर मैदानातील ‘कम्युनिटी मार्केट’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मास्क लावून, सोशल डिस्टसिंगचे पालन करून सर्वच भाजी विक्रेते शेतकरी आणि ग्राहकांनीही मनपाला उत्तम सहकार्य केले आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना माफक दरात चांगल्या व ताज्या भाज्या, फळे मिळावेत या उद्देशाने शहरात प्रायोगिक तत्वावर हे पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू करण्यात आले आहे. येत्या दिवसांत या ‘कम्युनिटी मार्केट’चा प्रतिसाद कायम राहिल्यास शहरातील अन्य ठिकाणीही याच संकल्पनेनुसार संपूर्ण सुरक्षितरित्या असे मार्केट सुरू करण्यात येतील, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

News Credit To:- NMC

Keeping 3.75L in slums secure a major challenge for NMC

Nagpur:- The Nagpur Municipal Corporation (NMC) has a daunting task at hand to protect the more than 3,75 lakh population living in 458 slum dwellings from coronavirus in crowded spaces and unhygienic conditions. Most of the slums are assembly constituencies in the North, South, and East.

“The slums with the most insecurity are in North Nagpur. Many hutments here measure only 8×8 ft and 5-8 people in the house. While NMC had built toilets in most houses under Swachh Bharat Mission, still scores of families share common toilets and public taps. The probability of transmission of coronavirus here is strong, “said Leena Buddhe, director of Center for Sustainable Development. NMC has installed roughly 60 community toilets in slum areas of the city.

Central Nagpur, which is the current hotspot of Covid-19, has the highest slum population in town. The population of slum dwellers here is 1,11,275 according to slum department data from NMC. The appeal of NMC to the slum dwellers to stay home has been largely ignored at 72,322 and 67,411, respectively, by West and North Nagpur.

Here has found flagrant violations of the lockout and social distancing requirements. There were at least 30 kids playing cricket on an open terrain near Dipty Signal. The general refrain of slum dwellers was “Our houses are so crowded that we prefer to stay outdoors.”

Buddhe attributed a rise in corona cases to the slums in the city and cited examples of the Takia Deewanshah areas of Satranjipura and Mominpura. NMC’s greatest obstacle is touch tracking in a highly congested environment where social distancing is almost impossible.

The two immediate challenges before the municipal corporation are rapid and mass testing and having bigger isolation and medical services in the city.

Municipal commissioner Tukaram Mundhe said NMC had used institutional quarantine as a method to suppress Covid-19’s spread. “We’re working on different aspects and finding high-risk pockets around town,” the civic chief said.

The interesting thing about the NMC approach is that it proactively monitors both Covid patients and non-Covid patients. The civic body had done a 23-lakh odd Nagpurians health survey. A campaign has also been initiated by the municipal corporation to meet senior citizens with other medical problems and ask about their health.

नागपुरात केली ‘ही’ कारवाई,तुकाराम मुंढेचा मास्टरस्ट्रोक

यामुळे पुढील धोका लक्षात घेता आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी १००, आजच्या तारखेत ४५० नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून उद्यापर्यंत हा आकडा १२०० च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली आहे.

कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर महानगरपालिका क्षेत्र कोरोना मुक्त करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी नागपुरात हॉट स्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवित असल्याने तुकाराम मुंडे यांनी इथल्या बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहोचेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चमूला खरी माहिती पुरवा. समाजाचे शत्रू बनू नका. मानवतेचे दूत बना, असे आवाहन पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपुरात साकारणार आता ‘कम्युनिटी मार्केट’

नागपूर:- भाजी बाजारात होणारी गर्दी, स्पष्ट निर्देश असतानाही नागरिकांकडून होणारी सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली आणि लॉकडाऊनमुळे जादा दराने मिळत असलेला भाजीपाला या सर्व समस्यांवर आता रामबाण उपाय मिळाला आहे. महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ची अभिनव संकल्पना मांडली असून यामाध्यमातून आता थेट शेतकऱ्यांकडून माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घरासमोरच उपलब्ध होणार आहे.

ही अभिनव संकल्पना दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ‘कम्युनिटी मार्केट’ या संकल्पनेतून साकारण्यात येणारा पहिलावहिला भाजीबाजार आठ रस्ता चौकातील पूर्व लक्ष्मीनगरमधील मैदानात गुरुवार ३० एप्रिलपासून नागरिकांच्या सेवेत येणार आहे. सकाळी ६ ते ८.३० या वेळेत नागरिक अगदी माफक दरात ताजी भाजी घेऊ शकेल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना उत्तम दर्जाची व माफक दरातील भाजी व फळे घेण्यासाठी घरापासून दूर जावे लागते. तेथे गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नाही. नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता अधिक असते. दारावर आलेल्या विक्रेत्याकडून महागात भाजी व फळे विकत घ्यावी लागतात.

ह्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आता महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ ही अभिनव संकल्पना मांडली. यासंदर्भात मंगळवारी (ता. २८) मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषि उपसंचालक नागपूर विभाग अरविंद उपरिकर, उपायुक्त (बाजार) महेश मोरोणे, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य यांच्यासह अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

काय आहे ‘कम्युनिटी मार्केट’
कम्युनिटी मार्केट ही संकल्पना ठराविक परिसरातील नागरिकांसाठी मांडण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कॉटन मार्केटसारखे मुख्य मार्केट बंद झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली. ज्या भाज्या नागरिकांना मिळत आहे, त्यांचा दर्जाही उत्तम नाही आणि दरही चढलेले आहेत.

यावर मात करण्यासाठी तीन चार वस्त्या, परिसर वा प्रभाग मिळून एक छोटासा भाजीपाला बाजार तयार करून थेट विक्रेता व ग्राहक यांचा संपर्क करून देण्यात येत आहे. यामुळे नागपूरच्या जनतेला घराच्या अगदी जवळ, माफक दरात उत्तम दर्जाची भाजी व फळे मिळतील, ही यामागील संकल्पना असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

पाळावे लागतील हे नियम
नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ पूर्व लक्ष्मीनगरमधील मैदानात सुरू होतेय. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील अन्य भागातही ते सुरू होईल. मात्र या मार्केटमध्ये लॉकडाऊनसाठी असलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. ‘कम्युनिटी मार्केट’मध्ये येताना चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील. या नियमांचे पालन होते की नाही यासाठी स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. अर्थात हा संपूर्ण उपक्रम लॉकडाऊनच्या काळात नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येणार आहे.

News Credit To:- NMC

आणखी तिघांनी दिली कोविडला मात

नागपुर:- मुळचे जबलपुरचे असलेले व सद्या नागपुरातील मोमीनपुरा परिसरात राहणारे तिघे मंगळवारी (ता.२८) कोविड-१९ला हरवून पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कोरोना कक्षातून तिघांनाही ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर सर्व डॉक्टर, नर्स, परिचारीकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

दिल्लीवरून परतलेल्या नागरिकांचा शोध घेउन मनपातर्फे त्यांना ‘कॉरंटाईन’ करण्यात आले. यामध्येच ३४ वर्षीय व्यक्ती] २४ वर्षीय आणि १७ वर्षीय तरुणांचा समावेश होता. या तिघांनाही आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १३ एप्रिलला या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले.

१४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. २६ व २७ एप्रिलला तिघांचेही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मंगळवारी (ता.२८) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून वेळावेळी आवश्यक उपचार करण्यात आले. प्रशासनातर्फे वेळेवर उपचार मिळाल्याने आज आम्ही पूर्णपणे बरे झाले आहोत.

कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. कोणतेही लक्षण आढळल्यास माहिती न लपवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या तिन्ही रुग्णांमार्फत करण्यात आले आहे.

News Credit To:- NMC

कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास मनपा तयार : महापौर संदीप जोशी

नागपूर:- कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नागपूर महानगरपालिकेने कंबर कसली असून कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तत्पर आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील १० दिवसात सुमारे ३०० ते ४०० खाटांची ऑक्सीजनसह व्यवस्था उभी करण्यात येईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

नागपूर शहरातील मनपाद्वारे संचालित पाच रुग्णालयांचा कायपालट करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यामध्ये पाचपावली सुतिकागृह, पाचपावली हॉस्पिटल, सदर हॉस्पिटल, के. टी. नगर येथील एस.आर.ए. इमारत आणि आयसोलेशन हॉस्पिटलचा समावेश आहे. महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता. २७) आयसोलेशन हॉस्पिटलला भेट देऊन सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. अत्याधुनिक सोयींनी युक्त आणि सुसज्ज हॉस्पिटल पुढील काही दिवसात तयार होणार आहे.

कोरोना विषाणू प्रसारासंदर्भातील नागपूरची स्थिती बघता भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून ह्या सोयी करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच नागपूर महानगरपालिकेने हे पाऊल उचलले असून कोव्हिड -१९ च्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी येथे करण्यात येत आहे. महापौर या नात्याने आपण या सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहोत.

नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसंदर्भात मनपा दक्ष असून नागपूरकरांना संपूर्ण उपचार येथेच उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत. यापेक्षा अजून काय चांगले करता येईल, यावरही आम्ही विचार करीत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाची साखळी इथेच तुटावी, असे तुम्हा-आम्हा सर्वांना वाटते. त्यासाठी नागपूरकरांचे संपूर्ण सहकार्य लॉकडाऊनदरम्यान अपेक्षित आणि आवश्यक आहे. बुहान ते सतरंजीपुरा हे अंतर साडेसहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मात्र, सतरंजीपुरा आपल्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी आता निर्णय घ्यायला हवा. घरात राहून कोरोनाची साखळी तोडा, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.

News credit To NMC

Exit mobile version