Coronavirus lockdown: Garbage generation decreases by 25%

NAGPUR: The lockdown due to coronavirus scare has drastically reduced the waste generation of the area. About 1,185.23 metric ton of garbage generation per day, the city generates almost 300MT less garbage post lockdown.

The data compiled by the solid waste management department of Nagpur Municipal Corporation show that the city generates about 894MT of garbage every day after March 15, compared with 1,185MT the day before that, stated a senior Bhandewadi dumping yard official.

AG Enviro eliminates door-to-door garbage from zone 1 to 5 including Laxmi Nagar, Dharampeth, Hanuman Nagar, Dhantoli and Nehru Nagar, while BVG India collects waste from the Gandhibagh, Satranjipura, Lakadganj, Ashi Nagar and Mangalwari districts.

All the garbage generated from the city is transported to the Bhandewadi dumping yard, where NMC owns approximately 77 acres of land, 52 acres of which are used for the dumping of garbage, while 25 acres are used for the treatment of waste. The dumping areas are already full to their potential.

“Post coronavirus alert, all 10 zones have seen a dramatic drop in household garbage. The Nehru Nagar district has seen a sharp decline in the collection of garbage. Against 134.89MT of garbage per day, the residents of this southern Nagpur locality are now producing about 43.37MT of waste per day, “the data revealed. This was followed by the Mangalwari sector. It has also experienced a decrease in the collection of door-to-door garbage. Against the annual collection of around 107.20MT, the private agency collects just 67.20MT of waste per day, the officer explained.

Even areas with commercial areas have also seen a decline in the disposal of garbage. The Gandhibagh district, which has the majority of commercial establishments, now generates almost 35.98MT less waste per day, down from 131.22MT per day earlier.

The official attributed the lesser generation of garbage to the lockout. “With all business hubs closed, the production of garbage from commercial markets like Itwari, Sadar, Gaddigodam, Jaripatka, etc. has been zero. We’re just going to get garbage from household residents now, “the official said.

The environmental specialist and founder of the Green Vigil Foundation Kaustav Chatterjee said: “Humans are the only waste producers. We’re in the quarantine, stores are closed, work has stopped. Therefore, the garbage generated is an only domestic waste.

मच्छर वाढले; फवारणी करण्याचे महापौरांचे आदेश

शहरात मागील काही दिवसात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून तातडीने सर्व झोन कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्र परिसरात फवारणी (फॉगिंग) करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांना दिले आहेत.

शहरात ‘कोरोना’चा प्रसार वाढत असतानाच संपूर्ण आरोग्य यंत्रणा त्याचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे. याच दरम्यान शहरात मच्छरांचाही प्रादुर्भाव वाढत असून यामुळे मलेरिया आणि इतर रोगांची शक्यताही बळावली आहे. ‘कोरोना’चे संकट डोक्यावर असतानाच अधेमध्ये बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी डबकी साचतात. यामुळे मच्छरांची संख्या वाढते आहे. धंतोली, रामदासपेठ या भागात सर्वाधिक रुग्णालये आहेत. या भागालाही वाढत्या मच्छरांचा त्रास सतावित आहे. भांडेवाडी परिसरात डम्पिंग यार्ड असल्याने दुर्गंधीसोबतच मच्छरांचाही त्रास नागरिक सहन करीत आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांसोबतच झोपडपट्टी परिसरातही हा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये फवारणीसाठी मलेरिया-फायलेरिया विभागाकडे फॉगिंग मशीनची मागणी केली. मात्र, पेट्रोल-डिझेल नसल्याचे कारण पुढे करून विभागाने फॉगिंग मशीन देण्यास नकार दिला, ही गंभीर बाब असल्याचे सांगत संपूर्ण झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात, मच्छरांच्या उत्पत्ती स्थानांवर औषध फवारणी करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आरोग्य विभाग (स्वच्छता) तसेच मलेरिया-फायलेरिया विभाग आणि झोन कार्यालयांना दिले आहेत.

आता संपूर्ण नागपुरात होणार ‘कोरोना’ सर्व्हे

मनपाचे पाऊल : नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

नागपूर, ता. २४ : नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरात सर्व्हेची घोषणा केल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्ग़त येणाऱ्या सुमारे ५० हजार कुटुंबातील दोन लाख लोकांपर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाची चमू पोहोचली. आता या दोन झोन व्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात असा सर्व्हे होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार उर्वरीत आठ झोनमध्येही हा सर्व्हे करण्यात येणार आहे. ‘कोरोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर म्हणाले, या संपूर्ण सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. गंटावार यांनी केले आहे.

नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कोणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यायची आहे. कुणालाही दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनानचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आता मनपामध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार प्रशासकीय इमारतीपुढे व्यवस्था

‘कोरोना’वर मात करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आता नागपूर महानगरपालिकेमध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीपुढे हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.२४) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः प्रवेशद्वारावर हात धुवूनच कार्यालयात प्रवेश केला.
स्वच्छता हाच ‘कोरोना’पासून बचावाचा उत्तम उपाय आहे. प्रत्येकाने कोणत्याही व्यक्ती अथवा वस्तूंच्या संपर्कात आल्यास हात धुणे अत्यावश्यक आहे. मनपामध्ये येणा-या अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांनाही सवय लागावी या हेतूने प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हॅण्डवॉश किंवा साबणाने हात स्वच्छ धुवूनच कार्यालयात प्रवेश करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

 

रस्त्यांवरील बांधकाम साहित्य तातडीने उचलण्याचे आदेश

‘कोरोना’वर प्रतिबंधासाठी विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आदेश निघाल्यानंतर तीन दिवसांपासून नागपूर शहरात अघोषित संचारबंदी आहे. त्यातल्या त्यात आता मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केले. यामुळे नागपूर शहरातील रस्ते ओस पडले आहेत. या ओस रस्त्यांवर आता नागरिकांनी टाकलेले बांधकाम साहित्य स्पष्टपणे दिसू लागले आहे. हे साहित्य तातडीने उचलण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.

त्याच अनुषंगाने मनपाच्या लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि मंगळवारी झोनच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश निर्गमित केले आहे. संचारबंदी काळात ठिकठिकाणी रस्त्यांच्या बाजूला पडलेले बांधकाम साहित्य उचलण्यात यावे आणि ज्या परिसरात किंवा भागांत घाण आहे, जेथून मच्छरांची उत्पत्ती होते, अशा ठिकाणी हे साहित्य टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

News credit to NMC

आपली बस’सह व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आजपासून निर्बंध

‘कोरोना’चा अधिक ताकदीने प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (ता. २२) पुन्हा एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता सोमवार २३ तारखेपासून सर्व व्यवासायिक वाहतूक करणारी वाहने नागपूर शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

कोरोना विषाणूमुळे उद्‌भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार आयुक्तांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार आता नागपूर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सेवा वगळून इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस नागपूर शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस सह ऑटो, ओला, उबेर व अन्य कंपन्यांच्या टॅक्सी, खासगी ट्रॅव्हल्स आदींचा समावेश आहे.

News credit to NMC

मनपा डॉक्टरांची चमू करणार घराघरांत सर्व्हेक्षण

कोरोना’चा प्रादुर्भाव शहरात वाढू नये यासाठी जिल्हा आणि मनपा प्रशासनातर्फे आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आता नागपुरात जी चार रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आहेत त्यांच्या घरासभोवतालचा किमान तीन कि.मी. परिसरातील प्रत्येक घराचा सर्व्हे होणार असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी मनपाची चमू करणार आहे.

नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणारी आहेत. ही व्यक्ती परदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचीही माहिती काढली जात आहे. अशांनाही मनपाच्या आरोग्य विभागाने संपर्क केला असून त्यांना होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे.
मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये घरोघरी सर्व्हे करण्याकरिता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या १६ चमू करण्यात आलेल्या आहेत. एका चमूमध्ये २६ व्यक्ती असून ह्या चमू घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्यांची तपासणी करणार आहे. कुणी परदेशातून आले आहे का, याचीही माहिती या सर्व्हेक्षणादरम्यान मिळणार आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना होम कॉरेंटाईन करण्यात येणार आहे. आवश्यक त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले जाणार आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे : मनपा
कोरोनाचा प्रसार होऊ नये. वेळीच त्यावर प्रतिबंध घालता यावा यासाठी हे उपाय करण्यात येत असून आपल्या घरी येणाऱ्या मनपाच्या चमूला सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे मनपाचे अधिकृत ओळखपत्र राहणार असल्याचेही डॉ. प्रवीण गंटावार यांनी सांगितले.

News credit to NMC

मनपा आयुक्त स्वत: उतरले रस्त्यावर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आणि नंतर जिल्हा व मनपा प्रशासनाने ‘नागपूर लॉक डाऊन’चे आदेश काढले. त्याची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे स्वत: रस्त्यावर उतरले. बहुतांश सारीच दुकाने बंद असतानाही रस्त्यांवर नागरिकांना पाहून त्यांना घरी राहण्याचे आवाहन केले. जी एक-दोन दुकाने सुरू होती, त्यांना बंद ठेवण्याचे आदेश दिले.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी (ता. २१) सकाळी १० वाजता मनपा कार्यालयातून मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह बाहेर पडले. फुटाळा, सेमिनरी हिल्स, हजारी पहाड असा दौरा करीत ते बर्डीला पोहचले. व्हेरायटी चौकातील मूनलाईट सुरु दिसताच त्यांनी आपले वाहन त्या दुकानासमोर थांबविले. मूनलाईटच्या व्यवस्थापकांना ‘लॉक डाऊन’च्या आदेशाची माहिती देत तात्काळ दुकान बंद करण्यास सांगितले. मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर तातडीने मूनलाईट बंद करण्यात आले.

तेथून त्यांचा ताफा महाल, बडकस चौक परिसरात पोहोचला. मनपा प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत बहुतांश दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र, जी काही दुकाने सुरू होती त्या दुकानात आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यांचा ताफा पोहोचला. त्यांना बघताच सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि पुढील आदेश येईपर्यंत ती सुरू करणार नसल्याचे आश्वासन दिले.

यानंतर तेथून आयुक्तांचा ताफा थेट मोमीनपुऱ्यात पोहोचला. आयुक्त तुकाराम मुंढे हे गाडीतून उतरले आणि मोमीनपुऱ्यातील बाजारपेठेत पायी फिरले. जी-जी दुकाने सुरु दिसली त्यांना तातडीने ती बंद करण्यास सांगितले. याव्यतिरिक्त मोमीनपुऱ्यात अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी आढळून आली. त्या गर्दीलाही मार्गदर्शन करीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन केले.

कडक कारवाईस भाग पाडू नका : आयुक्त मुंढे
शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने आदेश काढल्यानंतरही आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतरही नागरिकांना अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य कळले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ही काळजी पुढील काही दिवस घ्यायची आहे. त्यामुळे कुठलेही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (ता. २१) दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेच्या माध्यमातून केले. विनाकारण रस्त्यावर जो दिसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

प्रशासनाच्या आदेशाचे नागरिकांनी पालन केले नाही तर नाईलाजास्तव प्रशासनाला कडक पावले उचलावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी घरी राहावे नाही तर आम्हालाच कडक पावले उचलावी लागतील, असा गर्भित इशारा देत ‘कोरोना’ संदर्भात प्रशासन किती गंभीर आहे, याबाबत सूचक विधान केले.

कोरोनाचा संसर्ग जर मोठ्या प्रमाणात झाला तर नागरिकांना भविष्यात बराच त्रास होईल. आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. कुठलेही कठोर पावले उचलण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशी वेळ नागरिकांनी येऊ देऊ नये.

त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कुटुंबीयांनाही बाहेर पडू नये, अशी कळकळीची विनंती करीत असल्याचे सांगितले. जे ऑटो, खासगी कार, अन्य खासगी वाहने आणि दुचाकीने शहरात फिरत आहे, त्यांनीही तात्काळ शहरातील आवागमन बंद करावे.

ते जर अनावश्यक कामाने फिरत असतील तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विनाकामाने शहरात फिरत असलेल्या नागरिकांना आता पोलिस जागोजागी विचारणा करतील. त्यांनी सांगितलेले कारण पटले नाही तर अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाने ‘लॉक डाऊन’ आणि ‘शट डाऊन’चा आदेश नागरिकांनी घरातच राहावे, यासाठी दिला. त्यामुळे सुट्या समजून दुचाकीने शहरात फेरफटका मारण्याचे धाडसही करु नका, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

प्रत्येक परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. परिस्थितीवर आमचे नियंत्रण आहे. सर्व अधिकारी आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण शहर बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

News credit to NMC:- http://news.nmcnagpur.org/News/20200321172800.html

नमस्कार! मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बोलतोय….

‘नागपूरकरांनो, नमस्कार! मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बोलतोय. सुरक्षितता हाच कोरोनापासून बचावाचा उपाय आहे. कोरोनाला घाबरू नका, सतर्क राहा. हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा….’ हे शब्द आता नागपूरकरांना घनकचरा संकलन गाड्यांवरून ऐकायला येणार आहेत.

नागपुरात झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यावर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात शासनाच्या दिशानिर्देशानुसार कार्य सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्या, हा संदेश गेल्या काही दिवसांपासून निरनिराळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या वतीनेही माध्यमे, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याची मोहीम सुरू आहे.

दरम्यान, दररोज सकाळी आणि दिवसभर नागपूरकरांच्या घरासमोर मनपाची घनकचरा संकलन गाडी येते. ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’ हे गाणे सध्या प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे. हे गाणे घराघरांत पोहचविण्यात मनपाच्या स्वच्छतादूतांची अर्थात घनकचरा संकलन गाड्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणूनही या स्वच्छतादूतांकडे बघितले जात आहे. ही बाब लक्षात घेता, कोरोनाबाबत नागरिकांना प्रभावी संदेश द्यायचा असेल तर घनकचरा संकलन गाडी हे उत्तम माध्यम ठरेल, हे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळ न घालवता स्वत: ‘कोरोना’ जनजागृती संदेशाचे रेकॉर्डिंग केले असून ‘मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे…’ ही सुरुवात आणि त्यांचा संदेश शुक्रवार २० मार्चपासून नागपूर शहरात पोहचणार आहे.

तसेच नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील निरनिराळया भागात प्रमुख ५१ चौकाच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक उदघोषणा यंत्रणे मार्फत (PAS) देखील आयुक्तांचा संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. नागरिकांनी हा संदेश ऐकावा, त्यावर अंमल करावा आणि इतरांनाही संदेशाचा भावार्थ सांगावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

News credit to NMC:- http://news.nmcnagpur.org/News/20200320115200.html

सरकार के बंद के आदेश के बावजूद चल रहे थे रेस्टोरेंट्स ,होम मिनिस्टर सहित हल्दीराम के रेस्टोरेंट पर भी हुई कार्यवाही

नागपुर : अब तो यह बात सभी लोगों में आम होगयी है के कोरोना महामारी के चलते कई शहरों और राज्यों में बंद की स्तिथि है। प्रशासन लगातार आदेश दे रहा है के मॉल्स,सिनेमा घर,होटल,रेस्टोरेंट,ऑफिस कुछ दिनों के लिए बंद करें ।यहां तक के अब तो मंदिर भी बंद है और ट्रेन जो के परिवहन का मुख्य साधन है।

लेकिन फिर भी कुछ लोग है के वो इन सभी चेतावनियों को गंभीरता से नहीं ले रहे।जनता तो दूर की बात है जब अनिल देशमुख जी जैसे राज्य के गृह मंत्री के ढाबे और रेस्टोरेंट अभी भी खुले हुए है ऐसे में आप आमजन से क्या उम्मीद कर सकते हैं? हालाकि उनके ढाबों और रेस्टोरेंट पर कार्यवाही चल रही है । इसके अलावा आज मंत्रीजी अचानक पहुंचे हल्दीराम और सुजल सब्जी की शॉप पर वहां भी कार्यवाही की गई ।इसके साथ ही और भी कई जगह छापेमारी की कार्यवाही चल रही है।

अब जनता को पूरी तरह सतर्क और जागरूक होने की जरूरत है यदि सरकार किसी चीज से जुड़े आदेश दे रही है तो निश्चित ही मामला गंभीर होगा।कुछ दिनों की परेशानी के बाद हो सकता है हम पूर्णतः इस महामारी से निजात पा सकें।

Exit mobile version