नागरिकांनी जबाबदारी करावा मास्कचा वापर: वाहतूक उपआयुक्त साळी

नागपूर: कोरोना महामारीचा रोगप्रसार रोखथामाकरिता व स्वत:चा यापासून बचाव करण्याकरता मास्क वापर करणे बंधनकारक केले गेले आहे, यासाठी नागपुरात महानगरपालिका चमूसह, वाहतूक पोलीस विभागही मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. उपायुक्त विक्रम साळी यांनी या संबंधित जनतेला आवाहन केले आहे, वाहतूक पोलीस विभागाने आतापर्यंत सहा हजार मास्क न वापरता वाहन चालवीत आढळलेल्या लोकांवर कारवाई करून दंड ठोठावला आहे.

पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी याबाबत माहिती देतांना नागरिकांना मास्कचा वापर जरूर करण्याचे आवाहन केले आहे, संपूर्ण पोलीस दल माननीय आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात नो मास्क वावरणा-यांर कारवाई करत आहे. विदाऊट मास्कचे आतापर्यत सहा हजार चलान केले गेले आहेत, कोवीड पासून दुर रहायचं तर मास्क, सॅनिटाईजर व सोशल डिस्टेंस हि त्रिसुत्री पाळावीच लागणार असल्याचे ते म्हणाले. मास्क पेहराव हा केलाच पाहिजे दुचाकी, चारचाकी वा पायी जरी फिरणार असाल तर मास्कशिवाय फिरत असल्यास दंडाचा सामना करावा लागेल.

जिल्ह्यातील सर्व कार्डधारकांना धान्य वाटप: पुरवठाधिकारी भास्कर तायडे

नागपूर: शहर व जिल्ह्यातील सर्व शिधापत्रधारकांना अन्नधान्याचे वाटप व केंद्र शासनाकडून प्राप्त मोफत धान्याचेही वाटप करण्यात आले आहे अशी माहिती नागपूर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली. जीवनावश्यक धान्य किट वाटपही यादरम्यान करण्यात आलं असल्याचे ते म्हणाले. ३ लाख ८१ हजार लाभार्थ्यांना प्राधान्याने हे वाटप केले गेले.

अंत्योदय मधे ७७ हजार १८३ लोक व प्राधान्य गट असे ३ लाख ५ हजार ८४६ यात कार्डधारक असे तीन लाख 25 हजार 989 १३११२७५ असे एकंदर १६ लाख 37 हजार 264 ग्रामीण नागपूर जिल्ह्याच्या लोकांत हे अन्नधान्याचे वाटप झालेले आहे. हा नियमीत लाभ आहे हे विशेष, याशिवाय आत्मनिर्भर योजनेअंतर्गत व पीएनजी योजनेअंतर्गत तांदूळ जे पाच किलो प्रती व्यक्ती होते त्याप्रमाणे वाटप केलेला आहे तसेच ज्यांचेकडे शिधापत्रिका नव्हत्यी त्यांचेसाठी सुद्धा प्रतिव्यक्ती पांच किलो तांदूळ व एक किलो चना असं धान्य वितरण केलेलं आहे, ५७,४९४ लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

नागपुर पुलिस डिपार्टमेंट ने रेडी किया खुद का कोविड सेंटर,आज सीपी करेंगे उदघाटन

नागपुर शहर में बढ़ते कोरोना मामलों के चलते पुलिस विभाग भी धीरे धीरे इसकी चपेट में आते जा रहा है।अब तक कोरोना 1386 वॉरियर्स पुलिस कर्मी संक्रमित हो चुके हैं।इसके साथ ही कोरोना संक्रमण से कुल 15 पुलिस ऑफिसर्स की मौत हो चुकी है।यहां तक कि प्राइवेट हॉस्पिटल्स में पुलिस कर्मियों के लिए बेड उपलब्ध नहीं होने के कारण उनकी मृत्यु हो रही थी इसी वजह से पुलिस विभाग ने अपना कोविड सेंटर रेडी किया है (Image used for representation purpose only)

एडवांस सुविधाओं से लेस यह सेंटर के बन जाने से पुलिस डिपार्टमेंट के कर्मचारियों को काफी राहत मिल सकती है।सीपी अमितेशकुमार के आदेश पर डीसीपी (क्राइम ब्राच) गजानन राजमाने और पुलिस वैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप शेंडे ने पुलिस हॉस्पिटल में 5 दिनों के अंदर कोविड सेंटर का निर्माण किया । 

पुलिस हॉस्पिटल के कोविड केयर सेंटर में टोटल 16 बेड की फैसिलिटी की गई है, जिसमें 3 बेड कैज्यूल्टी और 13 बेड आईसीयू में रहेगे।इसके अलावा 2 वेन्टीलेटर, ऑक्सीजन की नई सेंटर लाइन तैयार की गई है।मरीजों के उपचार में किसी भी प्रकार की मुश्किलें नहीं आए इसलिए अतिरिक्त 8 स्टाफ हायर किया गया है।जिसमे 1 फिजिशियन, 2 बीएमएएस डॉक्टरों समेत कुल 16 लोगों को स्टाफ पेशेंट्स की सेवा में दिन रात लगा रहेगा।वर्तमान में ‘बी’ और ‘सी’ कैटिगिरी के पेशेंट्स को किसी हॉस्पिटल में बेड की समस्याओं से टाइम पर इलाज़ नहीं मिलने के कारण कई लोगों की घर में ही मौत हो गई थी। ऐसा न हो इसलिए ‘बी’ श्रेणी के सर्दी, खासी, बुखार वाले मरीजों को और ‘सी’ श्रेणी में आने वाले क्रिटिकल कोविड मरीजों को ही सेंटर में उपचार दिया जाएगा। 

इसके बाद प्राथमिक इलाज़ देने के बाद अन्य हॉस्पिटल्स में बेड मिलने पर उन्हें वहां शिफ्ट किया जाएगा।प्राइवेट हॉस्पिटल्स में फोन करने पर उन्हें बेड उपलब्ध होने की जानकारी मिलती है, लेकिन 3-4 घंटे की यात्रा करने के बाद नागपुर पहुंचने तक बेड फूल हो जाते है। ऐसे में संक्रमित और परिवार को हॉस्पिटल्स के चक्कर काटने पड़ते है।इसी बात को नज़र में रखते हुए विदर्भ के किसी भी पुलिस कर्मी और उसके परिवार को पुलिस कोविड केयर सेंटर में निशुल्क उपचार देने की फैसिलिटी की गई है।   और तो और सिर्फ नागपुर के ही नहीं बल्कि विदर्भ के किसी भी जिले से आने वाले कोरोना पीढ़ित पुलिस कर्मी का इलाज किया जाएगा।कई पुलिस कर्मी अकोला, अमरावती, यवतमाल से शहर में इलाज़ करवाने आते है।

आजही ३५३ नागरिकांस मास्कचा दंड: ११ दिवसांत ६४४२ कारवायांपश्चातही लोक जुमानत नाहियत!

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३५३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ६४४२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. १५,८०,०००/- चा दंड वसूल केला आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे.

तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु ५००/- दंड आकारण्यात येत आहे.लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३९, धरमपेठ झोन अंतर्गत ४१, हनुमाननगर झोन अंतर्गत २४, धंतोली झोन अंतर्गत ४२, नेहरुनगर झोन अंतर्गत १६, गांधीबाग झोन अंतर्गत २०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २७, लकडगंज झोन अंतर्गत ११, आशीनगर झोन अंतर्गत २६, मंगळवारी झोन अंतर्गत १०५ आणि मनपा मुख्यालयात २ जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ६६७, धरमपेठ झोन अंतर्गत १२८९, हनुमाननगर झोन अंतर्गत ५८८, धंतोली झोन अंतर्गत ७१४, नेहरुनगर झोन अंतर्गत ३९५, गांधीबाग झोन अंतर्गत ४११, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ४००, लकडगंज झोन अंतर्गत ३७७, आशीनगर झोन अंतर्गत ६७५, मंगळवारी झोन अंतर्गत ८७८ आणि मनपा मुख्यालयात ४८ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

नागपूरच्या नव्या सीपींनी दिली व्यापा-यांना तंबी: अमितेश कुमारांच्या एक्शन मोडची चर्चा

नागपूर:- शहराचे नवे सीपी अमितेश कुमार कारवाईच्या मूडमध्ये आले आहेत. सोमवारी त्यांनी आपल्या संपुर्ण ताफ्यासह इतवारी मार्केटला भेट दिली, यावेळी बाजारपेठांत होणारी गर्दी, त्याची कारणे व वर्दळीस, रहदारीस अडथळे करणारी दुकानांची अतिक्रमणे त्यांनी न्याहाळली

प्रत्येक दुकानात जाऊन त्यांनी व्यापा-यांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी दुकानांसमोर ठेवलेल्या वस्तू व अतिक्रमणांबाबतही चेतावणी दिली.सीपींनी अन्य ब-याच बाबींवर व्यापा-यांशी चर्चाही केली, अतिक्रमणाबाबत त्यांनी व्यापा-यांना सांगितले की, त्यांनी तातडीने दुकानांवरील अतिक्रमण हटवावी. आज ते केवळ सर्व काढण्यासाठी सांगितले जात आहे, परंतु पुढच्या वेळी जेव्हा आम्ही परतू तेव्हा हीच परिस्थिति कायम असल्यास सर्व माल जप्त करू.

सिपींच्या या अचानक भेटीने व्यापा-यांत जरब बसला तर रहदारीत असलेल्या नागरिकांत कौतूहल होते, मार्गाने प्रवास करणारे नक्की काय सुरू आहे हे जाणून घ्यायला थांबून पहात होते. अमितेश कुमार यांच्या एक्शन मोडचीच चर्चा नंतर गाजत होती.

कोरोना काळात शहीद झालेल्या पोलिस कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा कवच प्रदान

नागपूर: राज्यातील पोलिस दल कोरोना विरुद्ध लढाईत आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची पर्वा न करणार्‍या पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचेकडील शासन निर्णयानुसार अधिकृत वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून 50 लाख रुपये प्रदान करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे त्याच अनुषंगाने नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत, शहीद झालेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा धनादेश आज प्रदान करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील कार्यरत पोलिस कर्मचारी व पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे नेमणुकीस असलेले सहायक फौजदार भगवान सखाराम शेजुळ व धंतोली पोलीस स्टेशन येथे नेमणुकीत असलेले पोलीस हवालदार सिद्धार्थ हरिभाऊ सहारे हे दोन्ही पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना covid-19 संक्रमण होऊन आजारी पडल्याने व त्यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू होऊन ते शहिद झाले. नमूद पोलीस कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य प्रस्ताव पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आदेशान्वये पोलिस समाधान कक्ष पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर यांनी मुदतीत कागदोपत्री कारवाई पूर्ण करून, पोलीस महासंचालक मुंबई यांच्यामार्फत, महाराष्ट्र शासनाला विनाविलंब सादर करून प्रत्येकी 50 लाख रुपये रक्कम मंजूर करून घेतली व आज शनिवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचार्‍यांचे वारसदारांस, पत्नी श्रीमती कुसुम भगवान शेजुळ व श्रीमती ईरा सिद्धार्थ सहारे यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे धनादेश नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार व सह पोलीस आयुक्त श्री नीलेश भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद पोलीस कर्मचार्‍यांचे वारसांना त्यांना भविष्यात काही अडचणी आल्यास नागपूर शहर पोलीस सदैव पाठीशी राहून सहकार्य करेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी श्री अमितेशकुमार पोलीस आयुक्त नागपूर शहर व सह पोलीस आयुक्त निलेश भरणे यांचे आदेशान्वये श्री गजानन राजमाने पोलीस उपायुक्त मुख्यालय यांचे मार्गदर्शनाखाली श्री राम शास्त्रकार, रिता कोहरे पोलीस समाधान कक्ष यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.

पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची कुटुंबासारखी काळजी घ्या: वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत कुमार खराबे

नागपुर:- एमआयडीसी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत कुमार खराबे यांनी कर्मचाऱ्यांची कुटुंबासारखी काळजी घेण्यावर भर राबविण्यात येत असल्याची माहिती नुकतीच कळवीली आहे. कोरोनावायरस संसर्गात पोलिस कर्मचा-यांना सर्वात जास्त जनसंपर्कामुळे संभाव्य धोका असतो करिता अलीकडेच कर्मचाऱ्यांना औषधी व पल्स मीटरचे त्यांनी ठाण्यात केलं.

ते सातत्याने कर्मचार्‍यांच्या फिटनेस व प्रश्नांकडे लक्ष ठेवून आहेत त्यांनी ठाण्यातील प्रत्येक खोलीत कर्मचाऱ्यांसाठी वाफारा व सॅनिटाईजेशन यंत्रे ठेवली आहेत शिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला ते दर तासाला गरम पाणी पिण्यासाठी सांगतात, आता एकत्र जेवण करू नका, सामाजिक अंतर पाळा अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्यास ताबडतोब ते त्यांना रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. व फॉलो अपही घेतात, त्यांच्या नेतृत्वात एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हे आलेख कमी झाला असून कर्मचाऱ्यांसाठीही ते वडिलकिच्या भूमिकेतून वागून असतात.

कोरोना कालावधीत आजपर्यंत पोलिस कर्मचार्‍यांनी आणि सर्व लोकांनी एकत्रित काम केले, प्रथम आम्ही लॉकडाऊन मधे राशन वितरण केले. आमचा भाग औद्योगिक असल्याने परप्रांतीय मजुर बहुसंख्येत येथे वास्तव्यास आहेत, त्यांसाठीची जेवण व्यवस्था ई.

राबविली, ज्यामुळे आमचे क्षेत्रातील लाखो कामगार त्यांच्या गावी परत गेले नाहीत, आता विद्यमान परिस्थितित कोरोनावायरस प्रादुर्भाव तिव्र आहे यामुळे आम्ही बाह्यभागातच पल्स ऑक्सिमिटर वगैरे सामग्री लावली आहे, ठाण्यात येणा-या प्रत्येकाचाच सॅनिटाईजेशन व पल्स ऑक्सीमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासतो, ज्यांची कमी आढळली, शरिराचे तापमान जास्त आढळले तर त्यास हॉस्पिटलला पाठविण्यात मार्गदर्शन व मदत करतो आणि त्यासाठी, आम्ही सर्वांना निवारक औषधही दिले आहे, जे कर्मचारी पॉजिटिव्ह आहेत, त्यांच्या घरीच ऑक्सिमीटर, प्रतिबंधक औषधं पाठवले आणि ति घेण्याविषयक मार्गदर्शन केले जाते, नागपूरचे नवे आयुक्त अमितेश कुमार यांनी याविषयक कोणत्याही प्रकारची कमतरता कर्मचा-यास भासू नये असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यवाही चालू असल्याचे हेमंत कुमार खराबे यांनी सांगितले

4127 लोकांस दंड, मास्क न घालणा-यांवर कारवाई सुरूच

नागपूर: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस विभागाने कडक पावले उचलली आहेत. घराबाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीने तोंडावर मास्क घालणे अनिवार्य आहे. असे असूनही, लोक स्वत:च्या व इतरांच्या आयुष्यासह खेळत आहेत. कोरोना संक्रमित लोकांची संख्या नागपूरात सतत वाढत आहे. म्हणूनच मास्क परिधान न करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश नवे सीपी अमितेश कुमार यांनी पोलिस विभागाला दिले आहेत. मंगळवारी पोलिसांनी यास्तवची विशेष मोहीम सुरू केली आणि 4975 लोकांवर कारवाई केली.

ही कारवाई बुधवारीही सुरू राहिली. सर्व प्रमुख मार्गांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस स्टेशन स्तरावर 3042 लोकांना अटक करण्यात आली होती, तर 1085 लोकांना वाहतूक विभागाने चालान केले. एकूण 4127 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या लोकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 7 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. सदर कारवाई सलग सुरू ठेवण्याचे आदेश सीपींनी विभागाला दिले आहेत. घराबाहेर पडताना वाहनचालकांना मास्क व हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कारमध्येही लोक जात असतील तर त्यांना मुखवटे घालावे लागेल.

मास्क व हेलमेट न पहनने पर हो रही है कार्यवाही , पहले दिन वसूला गया 13,21,480 रुपए का दण्ड

शहर में कोरोना ने उग्र रूप ले लिया है दिनों दिन मामले बढ़ते जा रहे हैं साथ है मृत्यु दर भी बढ़ रही है। इसी विषय की चर्चा के लिए महापौर जोशी , आयुक्त राधाकृष्णन बी व पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने की बैठक।
इसके साथ ही मंगलवार को पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने भी अपनी विभागीय मीटिंग की और गाड़ी चलाते वक्त मास्क व हेलमेट न पहनने वालों पर दंडात्मक कार्यवाही करने का फैसला किया।
उसी के अनुसार आज सुबह से हेलमेट न पहनने वाले सवारों पर कार्यवाही की जा रही है। कल्मना सहित शहर के बहुत से थानों ने लगभग हर सिंगनल पर बिना हेलमेट से चल रहे लोगों पर कार्यवाही की।
कल दिन भर चली इस प्रक्रिया में 1,784 मामले दर्ज किए गए साथ ही कुल 3 लाख 96 हजार 80 रुपए तक का दण्ड वसूला गया और शहर के परिवहन विभाग में लगभग 2 हजार 122 प्रकरण दर्ज किए गए जिसमें 9 लाख 25 हजार 400 रुपए का दण्ड वसूला गया । दोनों कार्यवाहियों का कुल किया जाए तो लगभग 13 लाख 21 हजार 480 रुपए का दण्ड वसूला गया ।
पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कहा के यदि आप कार्यवाही से बचना चाहते हैं तो हेलमेट पहनिए और वाहनों में सुरक्षित अंतर रखिए । और साथ ही जनता से आवाहन किया के परिवहन नियमों का सुरक्षा नियमों का पालन करें जिससे आप सुरक्षित भी रहेंगे और कड़ी कार्रवाई से भी बचेंगे।
इसके साथ ही नागपुर मनपा के उपद्रव शोधक विभाग ने 649 नागरिकों पर कार्यवाही की। 5 दिन की कार्यवाही में विभाग ने कुल 3,57,000 दंड वसूला ।
इस तरह की कार्यवाही लक्ष्मीनगर , धतोली, धरमपेठ, आशिनगर , लकड़गंज ,हनुमाननगर , सतरांजीपुरा , गांधीबाग , नेहरू नगर आदि इलाकों में हुई

कोरोना निर्देशांचे पालन करा: वाहतूक पोलीस आयुक्त विक्रम साळी यांचे नागपूरकरांस आवाहन

नागपूर: वाहतूक पोलीस आयुक्त विक्रम साळी यांनी नागरिकांनी कोरोना संबंधितचे गाईडलाइन नूसार वाहन चालवतांना मास्क लावणे, चारचाकी, दुचाकीवरील चालकांनी सोशल डिस्टेंस पालन करने कोरोनावायरस संसर्ग रोखथामासाठी खुप गरजेचे असल्याचे सांगितले.

सदर निर्देशांचे कोणी वाहनचालक पालन करीत नसल्यास त्यांचेवर वाहतूक विभागाची करडी नजर असेल व त्यांना मोठ्या दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल, याविषयक कारवाई सुद्धा कालपासून सुरू झालेली आहे.

नागरी सुरक्षेस्तव, सर्वांचे काळजीसाठी सदर उपाय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. कोरोना रोगाचे गांभीर्य ओळखून आपल्या जिवनशैलीत प्रतिबंधात्मक उपायांची सवय लावून घेणे आता गरजेचे आहे. त्यामुळे या विनंतीदाखल सुचनांस गंभीरतेने घ्यावे.

विभागांतर्गत जे पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत त्यांचे उपचारादाखल होत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

Exit mobile version