एम आय डी सी वाहतूक शाखेत विटॅमिन सी औषध वितरण

नागपूर: कोरोनावायरस संसर्ग काळात असलेल्या लॉकडाउन काळात अविरतपणे कर्तव्य बजावणा-या वाहतूक शाखेतील जवानांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, अनेक जवान या लढ्यात बाधित झाले, अनेक अद्याप काही रूग्णालयांत उपचार घेत आहेत, याची गंभीर दखल घेत नागपुरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्मचा-यांची प्रतिकारक क्षमता वाढावी या हेतुने विटॅमिन सी औषधाचे वितरण केले जावे या सुचना निर्गमीत केल्या तद्नुसार एम आय डी सी वाहतूक परिमंडळ शाखेत आज विटॅमिन सी औषधाचे वितरण निरीक्षक संजय जाधव यांचेहस्ते केले गेले.

यावेळी जाधव म्हणाले, नवे आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यभार स्विकारताच पोलिस दलातील वाढत्या मृत्युसंदर्भात पाहनी केली व त्यानुषंगेच्या उपाय योजनांवर भर देण्याच्या सुचना दिल्यायत.

नुकतीच आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस कर्मचा-यांना रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून तिव्र नाराजी व्यक्त करून याविषयक कारवाई न केल्या गेल्यास मनपा आयुक्तांकडे जाण्याचा मार्ग पत्करत पालिका आरोग्य यंत्रणेस खडसावले होते यावरूनच ते या विषयास किती गंभीरतेने घेत आहे याची जणू झलकच त्यांनी दिली होती, तत्पश्चात प्रशासनासही याची दखल घ्यावी लागली

जाधव सांगतात, आयुक्तांनी दलात असलेले बाधित, संशयीत सर्वच‌ प्रकारच्या कर्मचा-यांवर लक्ष ठेऊन प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्याचे निर्देश दिले, दैनिक व आठवडी अशा मल्टीविटामिन औषधि गोळ्या ठराविक पद्धतीने घेण्यासंबंधीच्या सुचना सर्व कर्मचा-्यांस समजावून व आवश्यकतेने घेण्यासंबंधी माहिती व त्यांचे वितरण त्यानुसार केल्या गेले

विशेष असे की १५ दिवसांचा हा साठा एकत्र खरेदी केला गेलेला आहे व संबंधितचे बिल विभागास दिले गेले आहे. नव्या आयुक्तांनी एखाद्या जबाबदार कुटुंब प्रमुखासारखी भुमिका घेत परिवाराची काळजी वहन करणारं उदाहरण घालून दिलं आहे हे निश्चितच कौतुकास्पद व वेळेची गरज ओळखून घेतलेलं पाऊल आहे

सर्व नागरिकांनीही महामारीच्या या काळात त्यातलं गांभीर्य जसं सुरूवातीच्या काळात जाणत काळजी घेतली तशीच आताही राखावी, हलगर्जीपणा न करता सोशल डिस्टेंसींग, मास्क, इम्युनिटी वाढ, वेळोवेळी ऑक्सीजन पातळी परिक्षण, वाफारा, मल्टीविटामिन औषधं ई बाबी वर विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगीतले

मास्क न लावणारे, सोशल डिस्टंसिंग न पाळणा-यांविरोधात आता कडक कारवाई

नागपूर: शहराचे महापौर संदीप जोशी यांनी नागपूर शहराचे नवनियुक्त मनपा आयुक्त व नवनियुक्त पोलीस आयुक्त यांचेसोबत आज संयुक्त बैठकीस हजेरी लावली, दोघेही नव्याने आलेयत व सर्वप्रतिनिधीसह बैठकीत झालेल्या चर्चांबाबत माहिती देताना जोशी यांनी सांगितले की कोरोना लढ्यात निर्देशानुसार न वागणाऱ्या, नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील नागरिकांवर यापुढे सक्तीने कारवाई करण्यात येईल. तोंडावर मास्क न वापरता फिरणा-या, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणा-या अशा उल्लंघनकर्त्यां विरोधात कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.

कोरोना प्रसार विरोधात, रोखथामात एकत्रितपणे कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो याबाबतची या बैठकीत चर्चा झाली. महानगरपालिकेने अशी ही कारवाई सुरू केली आहे, व उद्यापासून पोलिस विभागातर्फेही अशाच कठोर कारवाईची सुरुवात होणार आहे.
याबाबत प्रसिद्धी विभाग माहिती देईलच, बैठकीत कोरोना प्रसार रोखथामात कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चाचपणी केली गेली, जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा संबंधित उपायांचेही प्रसंगी नियोजन केले जाईल याबाबत चर्चा झाली.

कोरोना विरोधातील या लढ्यात संयुक्त प्रयत्नांची शिकस्त राखण्याचा सर्व मिळून प्रयत्न करू व कोरोनास दूर सारू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोना वॉरियर्स पोलिसांनाच नाहीत शहरात बेड उपलब्ध: आयुक्त अमितेश कुमार यांची नाराजी

नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे व कोरोना रुग्ण संबंधित बातम्या व अफवांचं पेव शहरभरात पसरत आहे, अशात परवा नागपुरात खुद्द पोलिसांसाठीच बेड उपलब्ध नसल्याची वार्ता शहराचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे कानावर गेली, यासंदर्भात त्यांनी तातडीची कारवाई करत सदर बाधित पोलिस कर्मचा-यांना रूग्णालयात बेड उपलब्ध होईल यासंबंधी यंत्रणेस खडसावून जागे केले.

कोरोना बधित पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेड का उपलब्ध होत नाहीत? त्याविषयक यंत्रणेतील झोनल अधिका-यांची कान उघडणी नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना करावी लागली आहे. कोरोना वरियर्स म्हणून महत्वाची कामगिरी बजावणारे पोलिसांनाच जर अशी वागणूक मिळत असेल तर हा प्रकार अत्यंत वाईट आहे असे त्यांनी म्हटले आहे.

यासंबंधित त्यांची संभाषणाची एक ऑडिओ क्लिपच सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेली आहे, यात त्यांनी अधिकाऱ्यांस याबाबत विचारणा केली असल्याचे आढळते.
बाधित कर्मचाऱ्यांची माहिती सांगत त्यांना सायंकाळपर्यंत बेड उपलब्ध झाले नाही तर ते स्वतः जातीने मनपा आयुक्तांकडे जाऊन याबाबतची तक्रार करणार असल्याची त्यांनी सांगितले

अशाप्रकारे कोरोना लढ्यात अग्रभागी लढा देणाऱ्या व्यक्तींनाच जर बेड मिळत नाही हे चित्र दुर्दैवी आहे, कुटुंब फक्त आपल्यालाच आहे काय त्यांना कुटुंब नाहीत काय? अशी विचारणाही त्यांनी केली. अशा लोकांना प्राथमिकतेने बेड मिळणे ही भविष्यासाठीचीही तजवीज असावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवाय दाखल करतांना रूग्णालयाचे फी म्हणजे संबंधित ची रक्कम भरण्याची प्रक्रिया ही पोलिस विभागाची असेल अशी त्यांनी खात्री दिली.

एका चमूचे नेतृत्व करत असताना टिमलिडर कसा असावा याचं उदाहरणच आयुक्त अमितेश कुमार यांनी दाखवून दिले आहे.

तत्कालीन पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय का विदाई समारोह हुआ आयोजित

नागपुर :आज सुबह 10 बजे पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय का विदाई समारोह थाटा में आयोजित किया गया।इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे महाराष्ट्र के गृहमंत्री श्री अनिल देशमुख।
श्री अनिल देशमुख ने डॉ भूषण कुमार को शॉल व फूल माला देकर उनके कार्यों के लिए सम्मानित किया और उनका अभिनंदन किया ।
इसके साथ ही श्री अनिल देशमुख ने नवनियुक्त पुलिस आयुक्त अमितेश कुमार का भी नागपुर में स्वागत किया।
इस विदाई समारोह के मौके पर सभी वरिष्ठ पुलिस अधिकारी , निरीक्षक और साथी कर्मचारी भी उपस्थित थे।

मैच फिक्सिंग उजागर करनेवाले, अमितेश कुमार आज स्वीकारेंगे पदभार

नागपुर: नवनियुक्त पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कहा है कि शहर में कानून व्यवस्था बनाए रखने के साथ महिलाओं और बुजुर्गों की सुरक्षा को विशेष प्राथमिकता दी जाएगी और साइबर अपराधियों पर अंकुश लगाने के लिए विशेष प्रयास किए जाएंगे। वह आज पुलिस आयुक्त का पदभार संभालेंगे। उन्हें सबसे बहादुर पुलिस अधिकारी के रूप में जाना जाता है, जिन्होंने वेस्टइंडीज के क्रिकेटर मार्लोन सैमुअल को गिरफ्तार किया और मैच फिक्सिंग का पर्दाफाश किया। उन्होंने यह भी कहा कि पुलिस का पहला कर्तव्य नागरिकों की सुरक्षा करना है।

कमिश्नर के लिए नागपुर शहर नया नहीं है। उन्होंने पहले 2005 से 2007 तक दो वर्षों तक पुलिस उपायुक्त के रूप में यहां कार्य किया है। इसलिए वे शहर के नस नस से वाकिफ हैं। वे यहां के अपराधियों को भी पहचानते हैं। इसलिए अभी से, कई अपराधी दहशत में हैं। अमितेश कुमार मुंबई में राज्य खुफिया विभाग में संयुक्त आयुक्त के रूप में कार्यरत थे। उन्हें पुलिस आयुक्त, नागपुर के पद पर पदोन्नत किया गया । उनके पास अर्थशास्त्र और साइबर क्राइम में मास्टर डिग्री है। उन्होंने यह भी कहा कि वह साइबर अपराधियों को नियंत्रित करने के लिए विशेष प्रयास करेंगे। नागपुर शहर में अपराध की समीक्षा की जाएगी।‌‌

तदनुसार, अपराधियों को नियंत्रित करने के लिए उपाय किए जाएंगे। शहर की परिवहन व्यवस्था को सुव्यवस्थित करने का प्रयास होगा। अमितेश कुमार ने कहा कि दुर्घटनाओं की संख्या को कम करने के लिए अभिनव पहल लागू की जाएगी। नागपुर शहर में अपराध की समीक्षा की जाएगी। तदनुसार, अपराधियों को नियंत्रित करने के लिए उपाय किए जाएंगे। शहर की परिवहन व्यवस्था को सुव्यवस्थित करने का प्रयास होगा। दुर्घटनाओं की संख्या को कम करने के लिए अभिनव पहल को लागू किया जाएगा। उन्होंने नागपुर के लोगों से भी सहयोग करने की अपील की।

ऐसे किया था बेटिंग को उजागर: वेस्टइंडीज की टीम ने नागपुर में एक अंतरराष्ट्रीय क्रिकेट मैच के लिए होटल में रूकी थी। उस समय टिम के हरफनमौला मार्लोन सैमुअल के लिए होटल की लैंडलाइन पर लगातार कॉल आए, जिससे तत्कालीन पुलिस उपायुक्त अमितेश कुमार ने इस पर ध्यान केंद्रित कर, दुबई के डॉन का क्रिकेट सट्टे का कारोबार चलाने वाले सट्टेबाज मुकेश कोचर का मैच फिक्सिंग के लिए दुबई से मार्लोन से लगातार संपर्क था। इस बात को महसूस करते हुए, अमितेश कुमार ने बातचीत को टैप करके क्रिकेट की दुनिया में हलचल पैदा कर दी थी। आईसीसी ने मार्लोन सैमुअल पर नागपुर पुलिस की जांच के आधार पर दो साल का प्रतिबंध भी लगाया था। अमितेश कुमार की तब काफी प्रशंसा की गई थी

नागरी हक्क जनजागृति बाबत पोलिस विभागातर्फे मोहिम: महत्वाचे कार्यालयांत दर्शनी फलक लावणार

भ्रष्टाचारास पायबंद घालण्याकरिता लोकांनी पुढे यावे म्हणुन नागपूर पोलीस आयुक्तालया अंतर्गत जनतेस आवाहन करणारे फलक सर्व पोलीस स्टेशन्स व वरिष्ठ अधिका-यांच्या कार्यालयात दर्शनी भागात लावण्याकरिता मा. डाॅ. श्री. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त, नागपूर यांचे हस्ते वितरित करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात उचलेले हे एक मोठे पाउल समजण्यात येते.

आपले कायदेशीर काम करण्याकरिता लोकसेवकाने लाच मागितल्यास त्याबाबत नेमकी कुठे तक्रार करावी? कोणत्या कार्यालयात जावे? याबाबत सर्व सामान्य जनता मोठया प्रमाणात अनभिज्ञ असतेे. जनतेस त्यांच्या कायदेशीर हक्काबाबत माहिती मिळण्याकरिता व दाद मागणे सोईचे जावे म्हणुन जनतेस आवाहन करणारे फलक तयार करण्यात आले आहेत.

या फलकामध्ये ”भ्रष्टाचार थांबविणे हे तुमच्या हाती आहे. भ्रष्टाचार नष्ट केला तरच देश मजबुत होवु शकतो, लाच घेणे आणि देणे हा गंभीर गुन्हा आहे. देशाच्या विकासाला खिळ घालणारा भ्रष्टाचार आपण सगळे मिळुन नष्ट करु. आपले कायदेशीर काम करण्याकरिता कोणि लाच मागितल्यास आपण खालील कार्यालयाशी संपर्क साधा.“ असे जनतेस आवाहन करण्यात आले असुन त्याखाली पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचे कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक नमूद करण्यात आले आहे.

दिनांक 03/09/2020 रोजी संध्याकाळी 04.00 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात कोविड-19 बाबत सर्व खबरदारी बाळगुन आवाहनाचे फलक वितरित करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या प्रसंगी मा. डाॅ. श्री. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी पोलीस उपायुक्त श्री. राजमाने व श्री. साळी यांना फलक वितरित केले. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. राजेश दुद्दलवार हे उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना मा. डाॅ. श्री. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी भ्रष्टाचारा विरुध्द तक्रार करण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांस त्यांच्या अधिकाराची जाणिव होवुन त्याबाबत व्यापक जनजागृती होणे अंत्यत आवश्यक असल्याचे सांगितले. जनतेस आवाहन करणारे फलक नागपूर पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिका-यांची कार्यालये, सर्व पोलीस स्टेशन्स, वाहतुक शाखा, विशेष शाखा, गुन्हे शाखेसह ईतर सर्व कार्यालयात लावण्यात येणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर तर्फे दरवर्षी राबविण्यात येणा-या जनजागृती सप्ताह कार्यक्रमा दरम्यान आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे व जनतेस आवाहन करणा-या फलकाचे त्यांनी कौतुक केले. या फलकाच्या माध्यमातुन लोकांमध्ये मोठी जनजागृती घडावी ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. राजेश दुद्दलवार यांनी नागपूर शहर पोलिसांप्रमाणे ईतर शासकीय विभागांनी सुद्धा असे फलक आपआपल्या कार्यालयात लावुन भ्रष्टाचार निर्मुलनाच्या लढाईत सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

आमदार मोहन मते यांचे निधीतून कोवीड रूग्णांसाठी १० लाखांचे साहित्य

नागपूर: दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांचे निधीतून शासकीय रूग्णालयांतील कोवीड रूग्णांसाठी आज १० लाखांचे साहित्य देण्यात आले.

यात प्रामुख्याने फेस मास्क, पी पी ई किट, कापड, सॅनिटायझर इत्यादी स्वरूपातील हे साहित्य मेडिकलच्या अधिकाऱ्यांचे सुपूर्द करण्यात आले.

मेडिकल चे अधिष्ठाता डॉ सजल मित्रा, दक्षिण नागपूर अध्यक्ष देवेंद्र दस्तूरे, अमर टिचकुले, तुषार फडणवीस, श्रीकांत गुप्ता, प्रमोद चेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

शहिदांनी बलिदान दिलं, आपण रक्तदान करू!

नागपुर:- नागपुर सिटी पुलिस ने नागपुर शहरों में रक्तदान शिविर का आयोजन किया है ताकि मरीजों को खून की कमी महसूस न हो। * हम रक्तदान कर रहे हैं, आप भी शहीद सैनिकों की याद में रक्तदान शिविर में भाग लें।

आप अपना नाम निम्न Google फ़ॉर्म लिंक पर पंजीकृत कर सकते हैं।
https://forms.gle/1mUVPF46VYgJMdT5A

जब आप Google फ़ॉर्म पर पंजीकरण करते हैं, तब आपको संदेश द्वारा सूचित किए जाने वाले समय के भीतर रक्त दान करने में सक्षम होगा; ताकि सामाजिक दूरी को बनाए रखा जा सके। Nagpurupdates इस कदम के लिए नागपुर पुलिस की सराहना करता है और साथ ही आमजन से ब्लड डोनेशन कैंप में पूरी तरह सहयोग देने के लिए आवाहन करता है।

आणखी एका हिस्ट्रीशीटर वर एम पी डी ए

नागपूर:- पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गतचा गुन्हेगार आरोपी टांडापेठ, कलकत्ता रेल्वे लाईन, मिलिंद नगर निवासी सूरज उर्फ ​​चिंदी सीताराम हेडाऊ (वय 21) वर एमपीडीए लादला आहे. सन 2018-19 च्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर सूरजवर यापूर्वी तडिपारीची कारवाई झाली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. 13 फेब्रुवारी रोजी सूरजने कुरेशी नावाच्या 22 वर्षीय तरूणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, प्राणघातक हल्ला, बेकायदा शस्त्रे बाळगण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता परिमंडळ 3 चे डीसीपी राहुल मकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय जयेश भंडारकर यांनी आरोपीची गुन्हेगारी नोंद काढून वरिष्ठांकडे फौजदारी कारवाई केल्याचा अहवाल पाठविला. अतिरिक्त सीपी निलेश भरणे आणि डीसीपी गजानन राजमन यांनी कागदपत्रांची छाननी करून एमपीडीएचा प्रस्ताव सीपी उपाध्याय यांना पाठविला.

सूरज उर्फ ​​चिंदी यांच्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता सीपी उपाध्याय यांनी त्यांच्याविरोधात एमपीडीए लावण्याचे आदेश जारी केले. त्याला अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे. सीपी उपाध्याय यांनी गेल्या 24 महिन्यांत शहरातील 52 गुन्हेगारांना एमपीडीएच्या अंतर्गत कारागृहात आणले. सर्व हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश ठाणेदारांना देण्यात आले आहेत.

एएसआय संदीप शर्मा यांना राष्ट्रपति पदक

नागपूर:- ७४ व्या स्वातंत्र दिन औचित्यावर सहाय्यक उपनिरीक्षक संदीप मनोहर लाल शर्मा यांना पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले आहे. या व्यतिरिक्त गडचिरोलीच्या १४ पोलिस कर्मचा-यांना विशेष कामगिरीसाठी पोलिस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे संदीप शर्मा यांच्यासह विदर्भातील ४ पोलिस अधिका-यांना राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे.

३९ वर्षांच्या सेवेत २७० पुरस्कार व प्रमाणपत्रे:

संदीप शर्मा सध्या गुन्हे शाखेत (शोध) कार्यरत आहेत. क्राईम डेटा, क्राईम अ‍ॅनालिसिस आणि गुन्हेगारीशी संबंधित सर्व बाबींत त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. १९८२ मध्ये त्यांची पोलिस हवालदार म्हणून नियुक्ती झाली. यासह शहरातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्यांना क्राईम संबंधि उल्लेखनीय कामांसाठी अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. २००६ साली झालेल्या अखिल भारतीय पोलिस ड्यूटी मिट मेळाव्यात त्यांनी भाग घेतला. त्याच वर्षी महाराष्ट्र पोलिस ड्यूटी मीट गुन्हे निरीक्षणामध्ये सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

2012 मध्ये त्यांनी मानवाधिकार

आयोगाच्या वादविवाद स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र पोलिस महाव्यवस्थापक राज्यात मुंबईला इन्सिग्निआ पदक देण्यात आले. ३९ वर्षांच्या सेवेत त्यांना २७० हून अधिक पुरस्कार व प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. या कर्तृत्वावर सी.पी. उपाध्याय, माजी जॉइंट सीपी रवींद्र कदम, जॉइंट सीपी निलेश भरणे, डीसीपी गजानन राजमाने, मकणीकर, संभाजी कदम, श्वेता खेडकर, एसीपी नंदनवार, जाधव यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांवतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version