Nagpur entrepreneur sponsors red zone police station sanitation

Nagpur:- The Pachpaoli Police Station, located in the North Nagpur Containment Zone, was sanitized with the aid of a private company to ensure the health of personnel fighting against the Covid-19 spread.

City police took a fresh start on the first day of the third lockdown process 3.0, battling the crisis and strictly following the norms.

In view of the cops’ plight and their susceptibility to coronavirus as a result of continuous mass exposure on the highways, entrepreneur Ajay Uttarwar funded a round of disinfectant spray at the Pachpaoli police station situated in front of an institutional quarantine facility.

From this quarantine center, about 17 persons were found positive corona. Most of this center’s inhabitants are from the Satranjipura corona hotspot in the city where significant numbers of patients have been found positive in the past.

Uttarwar, who volunteered, has continued his efforts despite some setbacks in his company, saying he wants to give the Covid warriors selfless support as a symbol of their gratitude. “Apart from other places including police stations, I’m sanitizing many food distribution centers in the area,” Uttarwar said.

Cops’ sticks, their chairs, cupboards, almirahs, cars, cabins, and chambers were disinfected by the sprayer.

Pachpaoli police station lockup, computer room, station house, wireless sets, and even branch wing detection were disinfected.

The chamber of Senior inspector of police Kishor Nagrale was also sprayed with the disinfectant.

Later, the disinfectant sprayer also sanitized the barricades and shades at the entry point of the containment zone at Kamal Chowk, where the cops have installed a corona effigy to increase public awareness.

After Cool April in Nagpur, the town is Witnessing Tough May

With frequent showers in the month of April, the passing month remained the town’s talk of being the second coolest month of the decade. It was earlier in 2010 when frequent rains and showers were observed to keep the whole month cool for people who often have a hard time in the summers. As far as the weather department is concerned, the disturbances received from the western parts of the state kept the city and even the entire region cool during the summers.

As per Skymet, the majority of days in the region were cool, while other parts of the country were faced with severe weather with high temperatures and heatwaves. The reports also suggest that the city and the central region receive a good amount of rain, which amounted to around 46% of the rain in Nagpur and the surrounding areas, making not only April cool, but also March. This has allowed the two months to remain the coolest in the region for the second time in the decade.

On the other hand, the city witnessed a tough day yesterday as it witnessed 43.2 degrees in Nagpur taking the temperature to the maximum level. Even the entire region seemed to be suffering from mercury rising to the next level. Akola was the deadliest with temperatures reaching 44.8 degrees, while Amravati recorded 44.2 degrees in the city, while Chandrapur and Brahamapuri were the most affected areas.

आयुर्वेदिक काढ्याचे वाटप

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असून, या महामारी पासून दूर राहता स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

त्यानुसार पतंजली परिवार नागपूर पश्चिम विभागतर्फे रोगप्रतिकारक शक्तिवर्धक आयुर्वेदिक काढ्याचे नि:शुल्क वितरण करण्यात आले.

याप्रसंगी माया हाडे, मुख्य योग शिक्षक अरविंद हाडे आदी उपस्थित होते.

ICMR approves 24 private laboratories at Maharashtra, 1st in Nagpur

Nagpur:- Nagpur has finally got its first private Covid-19 research center. The Indian Medical Research Council (ICMR) gave Dhruv Pathology and Molecular Diagnostic Lab in Ramdaspeth a permit on Friday to collect samples and perform Covid-19 tests. The cost of the swab sample processing in private laboratories would be Rs4,500 as per ICMR guidelines.

“We got the endorsement on Friday evening. We are ready to start checking samples from Monday with the set-up and manpower, “said Dr. Shailesh Mundhada, director of Dhruv lab. As per ICMR guidelines, laboratories can check samples from anyone who has a valid doctor’s prescription for the study. But, in Nagpur, the NMC has ordered private laboratories to obtain samples from only those patients admitted to hospitals and recommended by treating doctors for tests.

“If the patient displays Covid-19 signs, the doctors will approach us and our team will gather samples,” Mundhada said.

On Friday ICMR released a list of 105 private laboratories in the country where Covid-19 studies can be carried out. The list includes 24 Maharashtra Laboratories. Apart from Nagpur, there were also approvals for private labs in Thane, Nashik, and Karad. Earlier, 19 Pune and Mumbai based laboratories had approvals.

नागपूरच्या युवकांनी थोर पुरुषांचे पुतळे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना पुसून त्यांना हार अर्पण केले.

नागपूर:- काल शुक्रवार म्हणजेच दि.१ मे २०२० “महाराष्ट्र  दिन ” या दिनाचे औचित्य साधून “एक हात मदतीचा “मित्र परिवारा तर्फे, एक भारतीय नागरिक या नात्याने नागपूर शहरात १ मे महाराष्ट्र दिनी काही युवकांनी थोर पुरुषांचे पुतळे  स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना पुसून त्यांना हार अर्पण करण्यात आलेत. हे आपल्या देशासाठी आपल्याच महाराष्ट्रासाठी झटले , ज्यांनी हा संयुक्त असा हा महाराष्ट्र घडविला आपल्या जीवाची पर्वा न करता आपली आहुती दिली असे आपल्या महाराष्ट्रचे तसेच या देशाचे शूरवीर योद्धे , लढवय्ये यांच्या पुतळ्यास स्वच्छ पाण्याने अभिषेचन करून तसेच पुष्प माल्यार्पण करून अभिवादन केले व प्रार्थना केली की संपुर्ण जग सध्या कोरोना विषाणू ग्रस्त या महामारी रोगांने त्रासलेला आहे तो नष्ट होवो आणि हा आपला अखंड हिंदुस्थान अखंड महाराष्ट्र पुन्हा उजळून येवो , लोकांच्या मनात पुन्हा एक नवं आशेच किरण पल्लवित होवो अशी मनोकामना या ठिकाणी आमच्या मित्र परिवारांनतर्फे या उपक्रमात अमेय पांडे, लावकुमार आंबटकर, मोहित हिरडे, आशिष जोशी सहभागी होते.

खा.डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नांना यश: पीपीई किट्‌स होतील आता स्टरलाईज! संशोधनानंतर हिरवा कंदिल

नागपूर:- डॉ. महात्मे यांनी पुढाकार घेऊन जोधपूर येथील एम्समधील डीन यांच्याशी संपर्क साधून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यासाठी विनंती केली. जोधपूर एम्सकडून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यात आली त्यानंतर टेस्टिंग देखील करण्यात आली आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि जोधपूरच्या एम्सने या सर्व चाचण्या केल्यानंतर या टेक्नॉलॉजीला हिरवा कंदील दिला. म्हणजेच आता या किटला आपण स्टारलाईज करून पुन्हा वापरू शकतो. लवकरच या टेक्नॉलॉजीची ज्याकाही कायदेशीर परवानगी सरकारकडून घ्यायची असेल त्या डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनात मोनिश भंडारी पूर्ण करतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या उपचारादरम्यान येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पीपीई किट्‌सची आहे. रुग्णावर उपचार करताना डॉक्टर्स आणि परिचारिकांना ह्या किटचा वापरा करावा लागतो.१० ते १२ तास वापरल्यानंतर ती सरळ कचरापेटीमध्ये टाकावी लागते. एका किटकरिता १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. या समस्येवर खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपाय शोधून काढला असून स्टरलाईज होणाऱ्या पीपीई किट्‌स आता उपलब्ध होऊ शकतील. त्याच्या संशोधनाला हिरवा कंदील मिळाला असून कायदेशीर पूर्ततेनंतर या किट्‌स वापरता येतील.

यामुळे प्रती मशीन २ लाख ४० हजार बचत होणार असून सध्या देशामध्ये ६० च्या वर मशीन्स कार्यरत आहेत. संपूर्ण देशामध्ये जो  पीपीई किट्सचा तुटवडा निर्माण झालेला आहे तो ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने पूर्ण होऊ शकेल. हे देशासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या संकटसमयी डॉ. विकास महात्मे यांनी घेतलेला पुढाकार आणि मोनीश भंडारी यांचे प्रयत्न हे आपल्या सर्वांसाठी व देशासाठी फायद्याचे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे.

मोनीश भंडारी हे सन २०१३ पासून ही कंपनी चालवत आहेत. त्यांनी मिनिस्टरी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर घेतली होती, जी म्हणजे ‘मायक्रोवेव डीसिन्फेक्टांट सिस्टिम’. ज्यामुळे साधारणतः हॉस्पिटल मध्ये लागणारे लिनन किंवा तत्सम मटेरियल हे स्टेबलाइज होतात. सध्याचे युनीट हे बहुतांश एम्स आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लागलेले आहेत. त्यामध्ये फक्त काही सायकल्स  बदलवून पीपीई (PPE) किट्सपण स्टरलाईज होऊ शकतात.

पीपीई किट्‌स उपलब्धतेच्या समस्येचे निराकरण करण्या साठी डॉ. खा. विकास महात्मे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी एक चांगलं व वेगळ्या प्रकारचे निदान दिले आहे. ‘मास्टर टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे मोनीश भंडारी यांच्यासोबत डॉ. विकास महात्मे यांचा संपर्क झाला तेव्हा डॉ. महात्मे यांना मनीष भंडारी यांनी टेक्नॉलॉजीबाबत माहिती दिली.

भुकेल्यांना अन्न, हीच खरी ईश्वरसेवा

लॉकडाउनमध्ये शहरात अनेक नागरिक, विद्यार्थी अडकलेले आहेत. तर रस्त्यावर राहून जीवन व्यतित करणारे किंवा रोजगारासाठी शहरात धाव घेणा-यांचीही वाताहत होत आहे. यासर्वांच्या सुविधेसाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेक संस्थांनी साथ देउन मनपाचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी सर्वच अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे भुकेल्यांना अन्न, हीच ईश्वरसेवा आहे, अशी भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्यासाठी शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था मनपाला सहकार्य करीत आहेत. आतापर्यंत ४४ स्वयंसेवी संस्थांनी या सेवा कार्याला मनपाला साथ दिली आहे. या संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करण्यासाठी मंगळवारी (ता.२८) महापौर संदीप जोशी यांनी पूर्व नागपुरातील स्वयंसेवी संस्थांच्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट दिली.
पूर्व नागपुरातील पूर्वा ऑटोमोबाईल मित्र परिवार, इस्कॉनचे अन्नमित्र फाउंडेशन आणि शगुन महिला मंडळ या तीन संस्थांमार्फत दररोज १५ हजार ‘फूड पॅकेट्स’चे वितरण करण्यात येत आहे. या तिन्ही संस्थांच्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट देउन महापौर संदीप जोशी यांनी सेवा कार्यासाठी अहोरात्र झटणा-या प्रत्येकाचे अभिनंदन केले. यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम उपस्थित होते.
कोरोनाला मात देण्यासाठी आज प्रत्येकच जण घरात राहून प्रशासनाला सहकार्य करीत आहे. मात्र ज्यांना घरच नाही किंवा घर आहे पण आसराच नाही अशांची होणारी वाताहत लक्षात घेता मनपाने घेतलेला पुढाकार हा स्तूत्य आहे. मात्र मनपाच्या या कार्याला शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारा प्रतिसाद हा कौतुकास पात्र आहे. आपल्या शहरातील कोणतिही व्यक्ती अन्नाविना राहू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. ज्यांना अन्नाची गरज आहे त्या प्रत्येकाने मनपाच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा. नागरिकांच्या सोयीसाठी मनपाने हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ तर दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांनी ०७१२-२५६७०१९ या क्रमांकावर मनपाशी संपर्क साधून आवश्यक मदत मिळवून घ्यावी. शहरातील हे सेवा कार्य पुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी फक्त घराबाहेर निघू नये, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

 

मनपातर्फे आतापर्यंत साडे नऊ लाखांवर ‘फूड पॅकेट्स’ वितरीत

लॉकडाउनमध्ये शहरातील बेघर, निराधार, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात शहरात २७ ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहेत. तर जवळपास ४४ स्वयंसेवी संस्था या कार्यासाठी पुढे आल्या आहेत. या सेवाकार्यात योगदान देण्यासाठी शहरातील सेवाभावी नागरिकही सढळ हाताने मदत करीत आहेत. त्यातूनच दररोज ४५ हजारांच्या वर जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. मागणीनुसार या संख्येत दररोज वाढ होते आहे. २७ एप्रिल रोजी ४५८८८ तर २८ एप्रिल रोजी ४८०५६ फूड पॅकेटस्‌ वितरीत करण्यात आले. यामध्ये २८८५ बेघर किंवा निराधार, ३०७२ विद्यार्थी किंवा वसतीगृहात राहणारे, ४० ज्येष्ठ नागरिक, ३७५६ नागपूर मेट्रोचे कामगार आणि ३८३०३ रेशन कार्ड नसलेले असे एकूण ४८०५६ जेवणाचे डबे दररोज मनपातर्फे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहेत. असे एकूण आतापर्यंत नऊ लाख ८९ हजार १०४ ‘फूड पॅकेट्स’ वितरीत करण्यात आले आहेत. तर दिव्यांगांसाठी अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्याच्या किट रोज देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त राशन कार्ड नसलेले आणि धान्य खरेदीची क्षमता नसलेले परंतु धान्य दिल्यास अन्न शिजविण्याची व्यवस्था असलेल्या नागरिकांनाही रेशन किट मनपातर्फे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत असे लोकं आणि दिव्यांगांना मिळून ६४५७ रेशन किटचे सुद्धा वितरण मनपातर्फे करण्यात आले आहेत. याशिवाय लहान बाळांना सकस आहार मिळावा यासाठी मनपातर्फे आतापर्यंत ४३ ‘बेबी फूड’चेही वितरण करण्यात आले आहे.
लॉकडाउनमध्ये शहरात अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीची अडचण होऊ नये यासाठी मनपा कार्यरत आहे. शहरात अडकलेल्या व दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नसलेल्या व्यक्तींपर्यंत वेळेत जेवण पोहोचविता यावे यासाठी मनपातर्फे हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. आवश्यक मदतीसाठी मनपाला सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांनी ०७१२-२५६७०१९ या क्रमांकावर माहिती देउन आवश्यक मदत प्राप्त करून घ्यावी. शहरात कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी मनपा कटिबद्ध आहे. आवश्यक मदतीसाठी मनपाशी संपर्क साधा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे. नागपूर शहरात लॉकडाउनमुळे अनेक विद्यार्थी, कामगार अडकले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक, रस्त्यावर भिक्षामागून पोट भरणारे आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणा-यांची वाताहत होत आहे. लॉकडाउनमध्ये या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी मनपाने घेतली त्यांची विविध मार्गाने मदत केली जात आहे. रेशन कार्ड नसणा-यांना रेशनची किट, लहान मुलांसाठी ‘बेबी फूड’ आणि ज्यांच्याकडे जेवण तयार करण्याची व्यवस्था नाही अशांना दोन वेळचे तयार जेवण पुरवून मनपा दायित्व निभावत आहे. या सर्व माध्यमातून आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेतर्फे तब्बल साडे नऊ लाखांपेक्षा अधिक ‘फूड पॅकेट्स’ वितरीत करण्यात आले आहेत.

मनपाच्या बेघर निवाऱ्यात लाभार्थ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी

राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अख्यत्यारीत असलेल्या अशा बेघर निवाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांसोबत स्थलांतरित मजुरांना नेऊन या सर्व लाभार्थ्यांची विशेष काळजी घेणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात पहिली ठरली आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी निवाऱ्यातील प्रत्येक लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
नागपूर शहरात सीताबर्डी येथील पंडित रवीशंकर शुक्ला मनपा शाळा व बुटी कन्या शाळा, टिमकी भानखेडा येथील हंसापुरी प्राथमिक शाळा, डिप्टी सिग्नल येथील गुरु घासीदास समाज भवन, नारा रोड येथील मनपा ग्रंथालय आणि समाजभवन, टेकडी गणेश मंदिराजवळील रेल्वे स्थानक पुलाच्या खाली, सदरमध्ये आरपीजी मनपा शाळा व आयटीआय शासकीय वसतिगृह, तुली हॉस्टेल कोराडी रोड, अग्रेसन भवन रवी नगर, लोहाना महाजनवाडी सीए रोड, एलकेम हिंगणा रोड, पटेल समाजभवन बेसा,परमात्मा भवन बागडगंज, पी डब्ल्यू एस कॉलेज कामठी रोड, जैन कलार सभागृह रेशीमबाग, दुर्गा माता मंदिर छावणी, जत्तेवार सभागृह नंदनवन, सिद्धेश्वर सभागृह मानेवाडा असे एकूण २१ शहरी बेघर निवारा आहेत. ‘लॉकडाऊन’ची घोषणा होताच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात रस्त्यांवरील बेघरांना तसेच स्थलांतरीत मजुरांना तातडीने बेघर निवाऱ्यात नेण्यात आले. ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे विशेष काळजी घेऊन त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे.

‘लॉकडाऊन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना तसेच स्थलांतरित मजुरांना नागपूर शहरात मनपाच्या बेघर निवाऱ्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आश्रयित संपूर्ण बेघरांची या निवाऱ्यामध्ये मनपाच्या आरोग्य तपासणी चमू द्वारे नियमित संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून विशेष काळजी घेतली जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने निवाऱ्यांमधील स्वच्छता आणि आश्रयितांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

यासाठी मनपाचे डॉ. निलजा पापलकर, डॉ. वैशाली सोनटक्के, डॉ. अश्विनी काळे, डॉ. मनोज मेश्राम, डॉ. गिरीधर धापोडकर यांचेसह फार्मासिस्ट प्रविणा पांडे, मयूर मेश्राम यांचेसह परिचारिका सरिता डांगळे, मंगला ठाकरे, अनिता ठाकरे अविरत सेवा देत आहे. नियमित आरोग्य तपासणी शिबिरासाठी दीनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी व निवारा कर्मचारी परिश्रम घेत आहे.

नागपूरचे छोटे योद्धा, घरुनच देताहेत पेंटींगच्या माध्यमातुन कोरोनाशी लढण्याची ताकत.

Nagpur:- Lock down च्या परिस्थितीत देखील आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण आवश्यक विषयांवर करीत रहावे या उद्देश्याने ……..भारतीय शिक्षण मंडळ संचालित ,  सरस्वती शिशु मंदिर, नवयुग प्राथमिक शाळा यांच्या सहकाऱ्याने ,  नवयुग विद्यालय, महाल शाळेच्या मा.मुख्याध्यापिका डॉ.सौ.माया गायकवाड यांनी पालकांना आवाहन केले, घरी राहून मुलांनी  covid -19 ..stay inside,. stay  safe …. या विषयावर चित्र पाठवण्याकरिता,  या करिता शाळेतील शिक्षिका सौ.वर्षा भुजाडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सर्व सूचनेच पालन करून घरूनच नवयुग शाळा परिवारातर्फे समाजाला चित्रातून संदेश दिला. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा संजय शिरपूरकर , कार्यवाह ऍड उपेंद्र जोशी, सहसचिव सौ.हळदे , ऍड उमेश अंधारे ,सहसचिव  डॉ. भालचंद्र हरदास , मुख्याध्यापिका डॉ. माया गायकवाड  यांनी मुलांचे विशेष कौतुक केले, तर मार्गदर्शन चित्रकला शिक्षिका सौ.भुजाडे यांनी केले,  तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version